पपई + स्ट्रॉबेरी चटणी

Submitted by सुलेखा on 17 January, 2014 - 02:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप पपईच्या फोडी.
१/२ कप स्ट्रॉबेरीच्या फोडी.[४/५ स्ट्रॉबेरी]
१/२ टी स्पून दालचिनी पुड.
१/२ टी स्पून लवंग पुड.
१/२ टी स्पून सेंधव मीठ.
चवीपुरते साधे मीठ.
७/८ बदामाचे तुकडे.
१/२ टेबलस्पून लिंबाचा रस.
[स्ट्रॉबेरीच्या आंबट किंवा गोड चवी प्रमाणे लिंबाचा रस घाला.]
२ टेबलस्पून साखर.

क्रमवार पाककृती: 

एका पॅन मध्ये पपईच्या व स्ट्रॉबेरीच्या फोडी व दालचिनी पुड ,लवंग पूड,बदामाचे तुकडे एकत्र करुन मध्यम गॅसवर शिजायला ठेवा.
त्यात सेंधव व साधे मीठ ,मीरे पुड घालुन मिश्रण चमच्याने सतत ढवळा.
सर्व फोडी छान शिजल्या कि चमच्याने एकत्र घोटुन घ्या.त्यात लिंबाचा रस व साखर घाला..
साखर विरघळली कि चटणी तयार आहे.

papaee chatani.JPG

अधिक टिपा: 

पपई बरोबर केळे,अननसस ,चेरी,प्लम,सफरचंद असे ही घेता येईल.तयार चटणीला पपईचा नैसर्गिक रंग छान येतो.
इथे पपई अगोड असल्याने २ टेबलस्पून साखर घातली आहे.

माहितीचा स्रोत: 
प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी!

छान वाटतेय.
सुलेखाताई, त्यादिवशीच धिसाडघाईने कापलेली एक कच्ची पपई फ्रीजमध्ये आहे...मला वाटतं या पद्धतीने तिला मार्गी लावावं. एकदम टायमावर आली ही रेस्पि. आता युसुयुसावर पिडायला नको पब्लिकला Proud