..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

०७/०१७ आजकाल बर्‍याच नव्या नव्या उपचार पद्धती उदयास येत आहेत हे तुम्हाला माहीतच असेल. तर अशाच एका तथाकथित शास्त्रज्ञाने हिप्नॉटिझम अर्थात स्ंमोहनाद्वारे हृदयविकारावर उपचार करण्याचा दावा केला. सुरुवातीला येणार्‍या रुग्णांना नाममात्र दरात उपचार द्यायचे ठरवले. पंचावन्न वर्षांच्या वसंतरावांना स्वस्तात मिळणार्‍या कोणत्याही गोष्टीचा मोह पडायचा. योगायोगाने त्यांनाही ब्लॉकेजेस डिटेक्ट झालेच होते. तेव्हापासून ते फारच अस्वस्थ होते. त्यांनी हे उपचार आजमवायचे ठरवले. उपचार काय? तर एक आकर्षक, अत्यंत सुंदर डोळ्यांची , भेदक नजरेची तरुणी पेशंटच्या डोळ्याला डोळे भिडवून बसायची.. त्याचे वेळी अमिताभ बच्चन टाइप आवाजात पेशंटला संमोहित करणार्‍या सूचना व मंद्र संगीत जोडीला मंद प्रकाश. पहिल्याच सेशननंतर वसंतरावांना आपण फिरून यौवनात आल्यासारखे वाटू लागले. सेशन संपवून घरी आल्यावर त्यांच्या कुटुंबीयांच्या चौकशीला त्यांनी गाण्यातच उत्तर दिले. कोणत्या?

कोडं ०७/१४:

इच्छाधारी नागाने एकदाच तिच्याकडे पाहिलं. 'मेरी मौतका बदला लेना' तो कसाबसा म्हणाला आणि त्याने प्राण सोडला.
इच्छाधारी नागिणीने त्याच्याकडे पाहिलं. तो गेलाय ह्यावर तिचा विश्वासच बसेना. पण तिने इच्छाधारी नागांवरचे अनेक हिंदी चित्रपट पाहिले होते. त्यामुळे आपला नवरा मेलाय आणि आता आपल्याला त्याच्या डोळ्यात त्याच्या मारेकऱ्याची तस्वीर पहायला हवी हे ती जाणून होती. डोळ्याचा मस्करा खराब होणार नाही इतपतच रडून तिने काजळ पसरणार नाही ह्याची काळजी घेत डोळे पुसले. आणि नवऱ्याच्या डोळ्यात पाहिलं.
पण त्याच्या डोळ्यात तिने जे पाहिलं त्याने तिच्या ह्रदयाचा ठोकाच चुकला. त्याच्या डोळ्यात छबी होती ती एका रुबाबदार तरुणाची - उंचापुरा, सावळाच पण तजेलदार कांतीचा, अतिशय देखणा. नागीण मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडे पहात राहिली. एव्हढा देखणा तरुण अख्ख्या इच्छाधारी नाग जमातीत मण्याच्या उजेडात शोधूनदेखील सापडला नसता.

तो कोण आहे, कुठे असतो ह्याबद्दल तिला काहीच माहिती नव्हती. पण त्याला शोधणं तिला भाग होतं. कारण बदला-बिदला सगळं विसरून ती त्याच्यावर लट्टू झाली होती.
अनेक हिंदी चित्रपट पाहिले असल्याने ह्या सिचुएशनला साजेसं गाणं तिला लगेच मिळालं. तुम्हाला मिळतंय का बघा बरं.

उत्तर:
आखोसे जो उतरी है दिलमे तस्वीर है एक अंजानेकी
खुद धुंड रही है शम्मा जिसे क्या बात है उस परवानेकी

मामी, तुला इच्छाधारी नाग-नागिणीवर काढण्यात आलेल्या तमाम हिन्दी चित्रपटांच्या डिव्हिडीजचा सेट. Proud

०७/०११:
कैसे बतायें, क्युं तुझको चाहे
यारा बता ना पाये
बातें दिलों की
देखो जुबाँ की
आंखे तुझे समझाये
तु जाने ना..

????

तुम्हें कैसे कहूं मै दिल की बात
केहते हुए मैं शरमाउं
अखियों से तुमको समझाऊं
बोलो समझ गये, बोलो समझ गये ना

-आंगन की कली

????

बिंगो!!!!
इश्श, बरोबर उत्तर Happy

०७/११: उत्तरः
तुम्हें कैसे कहूं मै दिल की बात
केहते हुए मैं शरमाउं
अखियों से तुमको समझाऊं
बोलो समझ गये, बोलो समझ गये ना?

कोडं सोडवल्याबद्दल इश्श यांना मिळत आहे गरमागरम कांदा भजी आणि वाफाळलेला गवती चहा.
Happy Happy

०७/१६:
झलक दिखला जा
एक बार आजा आजा आजा आजा आजा

ते पण हिमेसभाईंच्या (नाकातल्या) आवाजात Happy

भुतांना हे गाणं आवडतं म्हणे Wink

लोक्स, हे उत्तर नाहिये.
एक वाईट जोक करण्याचा क्षीण प्रयत्न होता. बाकी चालु द्या.

मामी, तुला इच्छाधारी नाग-नागिणीवर काढण्यात आलेल्या तमाम हिन्दी चित्रपटांच्या डिव्हिडीजचा सेट. >>. अगं बक्षिस दे, शिक्षा नको करूस! Happy

०७/०१७ : क्लु १: चित्रपटाच्या नावातला एक महत्त्वाचा शब्द कोड्यात आहे.
२. चित्रपटाच्या नायकाच्या नावाचा संबंधही कोड्याशी जोडला आहे.

नाही.
क्लु ३: आजारी माणसाला भेटायला गेलात तर पहिले वाक्य काय बोलाल? त्या वाक्यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द गाण्यात आहे.

मराठीत आजार्‍याची चौकशी कशी करणार? वसंतरावांच्या कोणत्या अवयवाला आजार झालाय? त्याचे नावही गाण्यात आहे. लग्न झाल्यानंतर जिप्सीला कोडी सोडवता येत नाहीत असे म्हणू का?

Pages