पाऊस हा ।।

Submitted by राजीव मासरूळकर on 17 December, 2013 - 00:27

**पाऊस हा**

आभाळ दाटून
येतसे मनात
ओथंबे तनात
पाऊस हा

मनाच्या कुशीत
दाटे हिरवळ
गुढ दरवळ
पाऊस हा

ओलावून जाते
आठवबियाणे
आर्त प्रेमगाणे
पाऊस हा

वाऱ्‍याच्या मिठीत
शिरतो सारखा
वेडा वीजसखा
पाऊस हा

ओल्या मातीवर
पावलाचा ठसा
भावी भरवसा
पाऊस हा

- राजीव मासरूळकर
पानवडोद,ता.सिल्लोड
जि.औरंगाबाद
दि १६.०६.१२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे?? अशी स्मायली दिली तर हास्यास्पद आहे असा अर्थ होतो का?

याचा अर्थ छान आहे..मला आवडली असा आहे Happy

फक्त शब्दांत व्यक्त केला नाही इतकंच Happy