Submitted by राजीव मासरूळकर on 17 December, 2013 - 00:27
**पाऊस हा**
आभाळ दाटून
येतसे मनात
ओथंबे तनात
पाऊस हा
मनाच्या कुशीत
दाटे हिरवळ
गुढ दरवळ
पाऊस हा
ओलावून जाते
आठवबियाणे
आर्त प्रेमगाणे
पाऊस हा
वाऱ्याच्या मिठीत
शिरतो सारखा
वेडा वीजसखा
पाऊस हा
ओल्या मातीवर
पावलाचा ठसा
भावी भरवसा
पाऊस हा
- राजीव मासरूळकर
पानवडोद,ता.सिल्लोड
जि.औरंगाबाद
दि १६.०६.१२
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त अभंग!
मस्त अभंग!
धन्यवाद शरदजी !
धन्यवाद शरदजी !
(No subject)
के अंजली........ काय झालं !
के अंजली........ काय झालं ! हास्यास्पद आहे का कविता/अभंग?
अरे?? अशी स्मायली दिली तर
अरे?? अशी स्मायली दिली तर हास्यास्पद आहे असा अर्थ होतो का?
याचा अर्थ छान आहे..मला आवडली असाच आहे
फक्त शब्दांत व्यक्त केला नाही इतकंच
मी समजून घेण्यास कमी पडलो
मी समजून घेण्यास कमी पडलो आपला खयाल. क्षमस्व आणि धन्यवाद !