Br Ba

Submitted by तृप्ती आवटी on 5 December, 2013 - 10:46

If you aren't watching "Breaking Bad" at the moment, you need to reconsider your life choices!

Braking-Bad--620x400.jpg

"ब्रेकिंग बॅड" ही अमेरिकन टीव्हीवर सहा सीझन्समध्ये प्रसारित झालेली मालिका. वॉल्टर व्हाइट हा एक साधारण आयुष्य जगणारा 'फॅमिली मॅन'. उपचारांपलीकडे पोचलेल्या फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होते आणि वॉल्टरचे आयुष्य बदलून जाते. हायस्कूलमध्ये रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षक आणि त्याच्या आयुष्यात येणार्‍या ब्रिलियन्ट घडामोडी म्हणजे 'ब्रेकिंग बॅड'!

ब्रेकिंग बॅड अधिकृत - http://www.amctv.com/shows/breaking-bad/where-to-watch

ब्रेकिंग बॅड क्रू - http://www.imdb.com/title/tt0903747/fullcredits?ref_=tt_ov_st_sm

ब्रेकिंग बॅडबद्दल अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Breaking_Bad

http://breakingbad.wikia.com/wiki/Breaking_Bad_Wiki

साऊंडट्रॅक - http://breakingbad.wikia.com/wiki/Music

गिलिगनची मुलाखत - http://www.writermag.com/2013/06/19/raising-hell/

http://www.youtube.com/watch?v=5ujPobTnOB0

ब्रेकिंग बॅडबद्दल गप्पा मारण्यासाठी हा धागा.

brba.jpg
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ बाई सीझन २ संपून तिसर्‍याचे ३ भाग शिजवून झाले. गेल्या आठवड्यात तीन जणांना पॉलिश मारलं होतं BrBa बघण्यासाठी. त्यातल्या एकांनी सुरूवात करून ते माझ्या पुढे सुद्धा गेले.

सीझन ३ भाग ३-४ झाले. स्कायलर स्टुपिड बियाच प्ले करते आहे सध्या.

रच्याकने, तुमचा वॉल्ट किती अंगप्रदर्शन करतो.

हो ते लिहायचंच राहिलं. मला पण ते पात्र आणि प्लेन क्रॅशचा प्रसंग बळंच ओढल्यासारखं वाटलं.

प्लेन क्रॅशला वॉल्ट डायरेक्टली जबाबदार आहे का? खरंतर नाही. आणि तरीही तो गिल्ट त्याला टच करतोच. शाळेत दिलेल्या स्पीचमधे तो ते रॅशनलाइज करण्याचा जो पथेटिक प्रयत्न करतो त्यातून ते लख्ख दिसतं >>>> वॉल्ट त्या प्रसंगाचा साक्षी असतो आणि तो जेनला काहीही मदत करत नाही म्हणून त्याला गिल्टी वाटतं हे पटलं. पण जेनची अवस्था तिची तिनेच ओढवून घेतली आहे.

व्यसनाधीन माणसामुळे इतरांची आयुष्य अफेक्ट होउ शकतात पण ती सहसा निकटच्या कुटुंबियांचीच असतात. त्यांच्या अयुष्यावर परिणाम होतात पण इतरांची आयुष्य उद्ध्वस्त होणं किंवा इतक्या मोठ्या प्रमाणावर निरपराध मारले जाणं हे तसं विरळ उदाहरण आहे. जेनचा बाप कमकुवत किंवा अती संवेदनशील आहे. ती इतर कुठल्या कारणाने हातची गेली असती तरी सुद्धा त्याची रिअ‍ॅक्शन हीच झाली असती असं मला वाटतं. त्यामुळे ते संदेश देणं पण मला पटत नाही. लेखकाचा खरंच तसा हेतू असेल का? असला तरी जेनची जी अवस्था होते तोच पुरेसा संदेश होता. पुढे आणखी प्लेन क्रॅश कशाला?

आधी एका प्रसंगात माझा बाप फार डेंजर आहे असं जेन म्हणताना दाखवली आहे त्यावरून आणि इथल्या पोस्टी वाचून तिचा बाप मुद्दाम प्लेन क्रॅश घडवून आणेल असं मला वाटलेलं.

>> लेखकाचा खरंच तसा हेतू असेल का?
डन्नो. ते मला सीरियल फार्फार आवडली म्हणून मी केलेलं रॅशनलायझेशन असू शकेल. Proud

>> पण जेनची अवस्था तिची तिनेच ओढवून घेतली आहे.
येस अ‍ॅन्ड नो. म्हणजे तिचा तसा अंत जवळपास अटळ असला तरी त्या पर्टिक्युलर क्षणी वॉल्ट तिथे हजर होता आणि ते थांबवू शकला असता. तो आधी गोंधळतो, पण मग त्याच्या लक्षात येतं की त्याच्या मार्गातला काटा परस्पर निघतो आहे, आणि थांबतो. नंतर त्याच्या डोळ्यांत जे पाणी येतं ते चमनने म्हटल्यासारखं गलबलल्यामुळे येतं का याबद्दल मी साशंक आहे. त्याचा श्र्यूडनेस बघता ते रिलीफचंही असू शकतं.

श्र्यूडनेस बघता ते रिलीफचंही असू शकतं >>>> परिस्थितीमुळे आणखी किती वाईट कृत्य करावी लागणार आहेत याचं वाईट वाटणं असु शकतं. मुळात इझी आणि क्विक मनी एवढाच त्याचा उद्देश असतो. माणसं मारणं किंवा मरु देणं हे त्याचं टार्गेट नसतं किंवा तो कुणी निर्ढावलेला डॉन नाही की माणसं मेली तरी त्याला काही फरक पडणार नाही.

हो. ट्रू.

प्लेन क्रॅशबद्दल शोधाशोध केली असता हे एक आर्टिकल सापडलं. यांनाही ती वन ऑफ द बिगेस्ट मिस्टेक वाटली आहे विजिगिषु आणि तुझ्याप्रमाणे. (आणि त्यांनीही जिममधल्या सीनचा माझ्यासारखाच रेफरन्स लावला आहे!) Proud

ती मिस्टेक नंबर २ आहे. पुढचं वाचू नका - स्पॉइलर्स आहेत अर्थातच. Happy

अरे शॉप लिफ्टिंग पण आहे त्यात. मला ते पण उगीच घुसडलेलं वाटलं. नंतर त्याबद्दल काही दाखवलेलंच नाहीये. कदाचित स्कायलर कशी तत्व सोडत नाही हे हायलाइट करायचं असेल. पण सध्या ती जे करतेय त्यात कुठे आहेत ती तत्व?

“Everyone Breaks a Little Bad, Sometimes.” >>> हा तुमचा पण मुद्दा होता ना?

>> Everyone Breaks a Little Bad, Sometimes.
हो!
मग मरीचं शॉपलिफ्टिंग असो, स्कायलरचं XXXX असो (:P), हॅन्कचं क्यूबन सिगार अ‍ॅक्सेप्ट करणं असो किंवा वॉल्ट ज्यूनियरचा मित्रांच्या नादाने का होईना उंगली टेढी करून बीअर मिळवायचा प्रयत्न असो. प्रत्येकाची उडी किती पडते हा पर्सनॅलिटीचा भाग, पण फोर्बिडन ते करण्यातलं अपील प्रत्येकाला खुणावतं हेही तितकंच खरं.

फोर्बिडन ते करण्यातलं अपील प्रत्येकाला खुणावतं हेही तितकंच खरं >>> +१

काही जणांची उडी ऑफिस आवर्समध्ये मायबोलीवर येऊन ब्रेकिंग बॅड बद्दल चर्चा करणे इतपत Proud

स्कायलर पात्र हे कुठल्याही तत्त्वाला जागून किंवा प्लॅन ठरवून काम करणारं पात्र नाही. तिच्या सगळ्या अ‍ॅक्शन्स मानसिक हिंदोळ्यावर ऊचंबळून येतात आणि शमतात.

आधी संशय घेणं, मग बोलणं सोडणं, मग घाबरणं, वॉल्टला हाकलून देणं, टेडकडे जाणं, वॉल्टला दुखावण्यासाठी टेडला वापरणं, मग वॉल्टच्या कारनाम्यात सहभागी होणं, (ज्यावेळी ती वॉल्टचे पैसे वापरायला लागते त्यावेळी तिचं वाढलेलं वजनही लक्षात येईल.) आणि अगदी वॉल्ट आता कॅन्सरने मरावा ईथपर्यंत चिंतनं. तिला कुठलाही मोठा ध्येयभाग साधायचा नाही. तिला कंट्रोल घ्यावासा वाटतो (कार वॉश खरेदी) पण तो तिला पेलवत नाही किंवा आपलं ध्येय वॉल्टच्या ध्येयापुढे सदैव गौण आहे हे तिला जाणवत राहतं). स्कायलर पात्रं (त्याचं लिखाण नव्हे) हे पूर्ण सिरिजमधलं सगळ्यात अपयशी, कुठल्याही ध्येयाविना जगणारं आणि भरकटलेलं पात्र आहे (जेसी पेक्षाही कैकपट सायकॉलोऑजिकली अनस्टेबल).

वॉल्टच्या अवस्थेला तो स्वतः कमी आणि जेसी आनि स्कायलर जास्त जबाबदार आहेत असं मला वाटतं.

वॉल्ट आणि स्कायलर हँक हॉस्पिटल्मध्ये असतांना जे काय बु*शि*ग करतात त्याला मात्र तोड नाही.

चमन, भरकटलेलं/अपयशी नाही वाटलं मला अजिबातच. तीही ह्यूमन आहे. ध्येयवादी वगैरे नाही. आपला लाइफ पार्टनर आपल्यापासून काहीतरी लपवतो आहे याचं दु:ख बाकी कशाहीपेक्षा जास्त आहे. नंतर त्याचं सीक्रेट कळल्यावर ती मेथचा पैसा मला नको म्हणत नाही. पैसा नको व्हायला निराळं कारण होतं, जे अगेन ह्यूमन आहे.

रच्याकने, स्विमिंग पूल आणि दोन गाड्यांसाठी गराज असलेल्या त्यांच्या घरात २ किंवा अधिक बाथरूम्स नाहीत का?

कशावरून म्हणतेस सिंडे? म्हणजे मुलगा त्यांची बाथरूम वापरताना दाखवलेला नाही - ती मास्टर बेडरूमला अटॅच्डच दाखवली आहे ना?

मी मागेच आहे अजुन.. आत्ताशी त्या वीस वर्षं न पकडल्या गेलेल्या माणसाला भेटला वॉल्ट..

बायदवे, वॉल्टची जी पार्टी असते त्यात ज्युनिअरला व्हिस्की प्यायला लावतो वॉल्ट.. त्यात वॉल्ट अचानक विचित्र का वागतो!? हँकवर पण किती चिडतो.. मला काहीझेपलच नाही..

स्कायलर दार लावून घेते आणि त्याला अटॅच्ड बाथरुम वापरू देत नाही. ते घर ०.१६ एकर्स प्लॉटवर आहे. सिंगल फॅमिली हाउस विथ ३ बेडरुम्स. म्हणजे २ बाथरुम नक्कीच असणार. काही सीन्स unexplained वाटतात, हा त्यातलाच एक.

व्हिस्की नाही, टकीला शॉट्स. Proud

त्याच्यातला हायझेनबर्ग जागा होतो. Proud
'आय अ‍ॅम द बॉस' हे दाखवून द्यायची इच्छा. नाहीतर हॅन्क आणि मरी दोघंही जरा भावखाऊ दाखवले आहेत पहिल्याच एपिसोडपासून. ते कधीतरी ओव्हरकम करायची इच्छा.

बायदवे, वॉल्टची जी पार्टी असते त्यात ज्युनिअरला व्हिस्की प्यायला लावतो वॉल्ट.. त्यात वॉल्ट अचानक विचित्र का वागतो!? हँकवर पण किती चिडतो.. मला काहीझेपलच नाही..
>> ते ग्रेचेन आणि ईलियटच्या संदर्भातून असतं कारण त्या पार्टीत स्कायलर त्या दोघांना वॉल्टच्या ट्रीटमेंट साठी पैसे दिले म्हणून धन्यवाद देते आणि त्यामुळे वॉल्टचा स्वाभिमान डिवचला जातो. त्याला ऐतिहासिक कारणंही आहेत.
आणि ते बहूतेक तरी विस्कीचेच शॉट्स असतात, टकिला नाही. (अपारदर्शी टकिला शॉट्स, फॅमिली पार्टीमध्ये आणि तेही लिंबू आणि मीठ न चाटता Uhoh )

स्वाती, पण तिचं हे ह्युमेन वागणं प्रसंगानुरूप बदलतं. <मेजर स्पॉयलर वॉर्निंग>जेसीला मारच म्हणून ती वॉल्टच्या मागे लागते तेव्हा, वॉल्ट आता मरावाच असं चिंतनं, गस मेल्यानंतरचं तिचं वागणं, भांडाफोड झाल्यानंतर ते हँक-मरीला पाठवलेल्या कॅसेट-षडयंत्रात तिचा सहभाग आणि शेवटी वॉल्टशी शेवटची हमरीतुमरी करतांना तिचं वागणं हे सगळं पचंड अनप्रेडिक्टेबल आहे. तिच्या ह्युमेन वागण्याच्या व्याख्या पदोपदी बदलतात.

ब्लॉगवर तरी टकीला लिहिले आहे, तो सीन पुन्हा बघावा लागेल. मला विस्कीची बॉटल बघितल्यासारखं वाटतंय, पुन्हा बघून कनफर्म करतो.

Pages