Br Ba

Submitted by तृप्ती आवटी on 5 December, 2013 - 10:46

If you aren't watching "Breaking Bad" at the moment, you need to reconsider your life choices!

Braking-Bad--620x400.jpg

"ब्रेकिंग बॅड" ही अमेरिकन टीव्हीवर सहा सीझन्समध्ये प्रसारित झालेली मालिका. वॉल्टर व्हाइट हा एक साधारण आयुष्य जगणारा 'फॅमिली मॅन'. उपचारांपलीकडे पोचलेल्या फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होते आणि वॉल्टरचे आयुष्य बदलून जाते. हायस्कूलमध्ये रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षक आणि त्याच्या आयुष्यात येणार्‍या ब्रिलियन्ट घडामोडी म्हणजे 'ब्रेकिंग बॅड'!

ब्रेकिंग बॅड अधिकृत - http://www.amctv.com/shows/breaking-bad/where-to-watch

ब्रेकिंग बॅड क्रू - http://www.imdb.com/title/tt0903747/fullcredits?ref_=tt_ov_st_sm

ब्रेकिंग बॅडबद्दल अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Breaking_Bad

http://breakingbad.wikia.com/wiki/Breaking_Bad_Wiki

साऊंडट्रॅक - http://breakingbad.wikia.com/wiki/Music

गिलिगनची मुलाखत - http://www.writermag.com/2013/06/19/raising-hell/

http://www.youtube.com/watch?v=5ujPobTnOB0

ब्रेकिंग बॅडबद्दल गप्पा मारण्यासाठी हा धागा.

brba.jpg
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे होय. घेते.

तो आवडता ड्रेस घातलेला वॉल्ट बघून बघून गुलजारनी लिहिलेलं आणि विशाल भारद्वाजनी संगीत दिलेलं एक गाणं शिरेलीचं टायटल साँग चालून जाइल Wink

हो Happy

आत्ता मी सि. ४ ए. ८ बघते आहे.
फूल एक्झॅक्टली नसला तरी क्रिमिनल बनायचं पोटेन्शियल त्याच्यात अजिबातच नाही. तो फक्त एक गीक /केमिस्ट्रितला जिनियस आहे. प्रत्येक वेळी फक्त ही कॅन बाय टाइम. स्कायलर जस्ती चांगली रूथलेस क्रिमिनल असू शकली असती.

>> क्रिमिनल बनायचं पोटेन्शियल त्याच्यात अजिबातच नाही.
You must be the first (and only) person to say that.
What are you missing? Proud

Lol

आली आली , मृणच्या भाषेत 'पहिलून' मजा आली मालिका बघताना Happy
सि. ४ ए. १० बहुतेक... मेक्सिकोमधले नाट्य उत्कंठावर्धक, थरारक वगैरे होते

बाई तुमच्या गसच्या पॅराबद्दल- गसने आधी गेलला हायर केलं. गेल ९९% प्युरिटी देता येत नाही म्हणतो तेव्हा तो वॉल्टला आणतो. जेसी नामक जंकी त्याच्या खिजगणतीत पण नसतो. वॉल्टच्या पण नसणार असं त्याला वाटत आणार. वॉल्ट जेव्हा जेसीला असिस्टंट म्हणून घेतो तेव्हा सुद्धा गसला वॉल्टबद्दल विश्वासच वाटत असतो. वॉल्ट हुशार आहे तरी तो क्रिमिनल नाही त्यामुळे त्याच्याकडून तसा धोका नाही. कधी ना कधी तो मरणार आहे. त्याचा या धंद्यात येण्याचा एकमात्र उद्देश कमी वेळात खूप पैसे कमावून ठेवणे हाच आहे असंच गसला वाटत असतं. तो आपल्या डोक्यावर बसेल असं त्याला कदाचित जेसीचा बदला वॉल्ट त्या दोन 'ट्रस्टेड एम्प्लॉयीज'ना मारतो तोपर्यंत वाटलेलं नसणार. त्याच्या अ‍ॅक्शन्स (वॉल्टला स्वतःच्या घराचा पत्ता देऊन जेवायला बोलावणे, त्याला सल्ला देणे) वरून तरी मला असं वाटतं. पण टुमास आणि त्या दोन जंकी प्रकरणानंतर मात्र वॉल्ट आणि जेसीमध्ये प्रोफेशनल रिलेशनशिपपेक्षा अधिक काही आहे हे त्याला जाणवतं. माणसं मारण्यापर्यंत यांची मजल जाऊ शकते हे त्याला पहिल्यांदाच कळतं आणि मग मात्र त्याचा वॉल्टवरचा भरवसा उडतो. म्हणून तो हट्टाने गेलला पुन्हा हायर करतो. व्हिक्टरला त्यांच्या पाळतीवर ठेवतो. गेलला लवकरात लवकर वॉल्टची मेथड शिकून घ्यायला फोर्स करतो.

तो चांगला मॅनेजर आहे कामाच्या वाटणीच्या बाबतीत. पण तरी वॉल्टवर भरोसा करण्यात आणि त्याची क्षमता जोखण्यात मात्र तो चूक करतो असं मला वाटलं. त्याच्यासारख्या कॉशस, हुशार माणसाने अशी चूक करावी याचं आश्चर्य पण वाटलं.

ह्याचं कारण वॉल्टची बॅकग्राऊंड आणि त्याची नोकरी, ह्या धंद्यात येईपर्यंत सरळमार्गी असणं हेच असावं. वॉल्टची ह्या धंद्यात टिकून रहायला कुठल्याही लेवलवर जायची तयारी असू शकेल हे त्याला एक्स्पेक्टेड नसावं.

जस्ट फिनिश्ड. अगेन! Fe(Iron) - blood, Li(Lithium) - meth, and Na(Sodium) - tears. Anagram of Fi Na Le!

गुडबाय वॉल्ट. तो चेहरा - कॉलबॅक टू 'Crawlspace'!

बॅडफिंगरच्या 'बेबी ब्लु' नं सांगता. सिम्पली जिनिअस.

Guess I got what I deserve
Kept you waiting there, too long my love
All that time, without a word
Didn't know you'd think, that I'd forget, or I'd regret

The special love I have for you
My baby blue
...
...
...

विन्स, यू द मॅन!

मी तो I'm the danger वाला एपिसोड बघितला काल. सध्या १-२ भाग बघायचे मग ब्रेक घेऊन हम आप के है कौन सारखं काही तरी बघायचं असं सुरू आहे. स्कायलर आता स्मार्ट काम करते आहे. वॉल्ट मला शूम्पीच्या भाषेत 'फूल' वाटला एकदम गेल्या १-२ एपिसोड्समध्ये.

एका ब्रेबॅ फॅन फॅमिलीने ७५" टिव्ही घेऊन त्यावर मॅरेथॉन मारली. जय हो! Happy

मधली बरीच चर्चा वाचली नाही पण क्रॉलस्पेसचा उल्लेख झाला म्हणून. त्या एपिसोड मध्ये वॉल्ट क्रॉलस्पेस मध्ये आणि स्कायलर वरुन बघत असताना जेव्हा वॉल्टचा संयम सुटतो तो सीन अफलातून जमलाय!
वॉल्ट तर मास्टर आहेच पण स्कायलरच्या चेहर्‍यावरची भिती आणि एकंदरित भाव फार अ‍ॅक्युरेट दाखवले आहेत.

शेवट केमिस्ट्री लॅब मध्येच झाला म्हणून अगदी एक सर्कल पूर्ण झाल्याचं अतीव समाधान मिळालं.

तिच्या शेवटच्या शॉटमध्ये सुद्धा मरी तेवढीच ईरिटेटिंग वागते, एकदम कन्सिस्टंट आहे ती ह्या बाबतीत.

विजिगीषु तुमचं प्रेम वॉल्ट वरच की क्रॅन्स्टनवर पण? त्याचा नवीन काही तरी पॉलिटिकल ड्रामा येतो आहे ना?

मी क्विजमास्टर व्हायच्या लायकीची अजून पारायणं केलेली नाहीत. फक्त काही काही सीन्स, संवाद जास्त लक्षात राहतात येवढच. Happy माझा अजून ५.५ बघून व्हायचा आहे खरं त्यामुळे मी इथे घाबरत घाबरतच येतो. Happy

S01E01 चं क्विझ घेतलं मग लक्षात आलं की जगातला सगळा वेळ पाहिजे पूर्ण करायला. तरी पहिल्या क्विझमध्ये ११ पैकी १० बरोबर. चुकलेल्या उत्तराच्या वेळी घरी distraction! Happy

चमन,

क्रॅन्स्टन माहित/स्ट्राईक झाला वॉल्टमुळेच. माल्कम बघितलेला नाही. नुसतंच ऐकीव. वरच्या विन्सच्या मुलाखतीत तो म्हणतो त्याप्रमाणे ब्रायन इज सच अ कमिलीअन... फिल्मोग्राफी रग्गड आहे त्याची, 'आर्गो' मध्ये पण आहे तो पण ब्रेकिंग बॅड ते ब्रेकिंग बॅड!

ब्रायनचा नवीन ड्रामा? कुठे दिसततरी नाही तसं.

FeLiNa नंतर 'बेबी ब्लु' लूपमध्ये ऐकताना आत तुटत राहिलं. दुसर्यांदा पण... पायलट ते शेवट सगळा ग्राफ, त्रुटी, रायटर्स, कॅरॅक्टर्सच्या एंट्रीज आणि एक्झिट्स, मेहीको, म्युझिक, साऊथवेस्ट, टाईमलॅप्स, ब्रँड्स (ओ येस, पब्लिक फोनवरचं 'मॉनको - कॅलिबर १२' तर नक्कीच उचलायला पाहिजे :P)... स्लो प्लेईंग, डीप गेम अ‍ॅट देअर बेस्ट! मेजर मेजर इम्पॅक्ट... मेबी आफ्टर 'Inception'.

Pages