Br Ba

Submitted by तृप्ती आवटी on 5 December, 2013 - 10:46

If you aren't watching "Breaking Bad" at the moment, you need to reconsider your life choices!

Braking-Bad--620x400.jpg

"ब्रेकिंग बॅड" ही अमेरिकन टीव्हीवर सहा सीझन्समध्ये प्रसारित झालेली मालिका. वॉल्टर व्हाइट हा एक साधारण आयुष्य जगणारा 'फॅमिली मॅन'. उपचारांपलीकडे पोचलेल्या फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होते आणि वॉल्टरचे आयुष्य बदलून जाते. हायस्कूलमध्ये रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षक आणि त्याच्या आयुष्यात येणार्‍या ब्रिलियन्ट घडामोडी म्हणजे 'ब्रेकिंग बॅड'!

ब्रेकिंग बॅड अधिकृत - http://www.amctv.com/shows/breaking-bad/where-to-watch

ब्रेकिंग बॅड क्रू - http://www.imdb.com/title/tt0903747/fullcredits?ref_=tt_ov_st_sm

ब्रेकिंग बॅडबद्दल अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Breaking_Bad

http://breakingbad.wikia.com/wiki/Breaking_Bad_Wiki

साऊंडट्रॅक - http://breakingbad.wikia.com/wiki/Music

गिलिगनची मुलाखत - http://www.writermag.com/2013/06/19/raising-hell/

http://www.youtube.com/watch?v=5ujPobTnOB0

ब्रेकिंग बॅडबद्दल गप्पा मारण्यासाठी हा धागा.

brba.jpg
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती,

अ‍ॅडिक्शनचा एक अपरिहार्य अ‍ॅन्गल दिसतो ना त्यातून? किती निरपराध आणि अनरिलेटेड लोकांची आयुष्यं उध्वस्त होऊ शकतात एका अ‍ॅडिक्टमुळे - हा... संदेश म्हणू फारतर - म्हणून तर बॅलन्स्ड राहिली आहे मालिका. ---- पटलं नाही. जेन अ‍ॅडिक्ट असते. तिचा बाप नाही (जेननं तिच्या तारेत हकनाक माणसं मारली असती तर हे argument बरोबर आहे). *** कदाचित स्पॉयलर *** त्याचं मानसिक संतुलन ढळतं पण ते अ‍ॅडिक्ट काय पण कुठल्याही अशा व्यक्तिमत्वाच्या बापाचं ढळलं असतं. त्यासाठी पोर अ‍ॅडिक्टच असायला पाहिजे असं नाही. जेनची अ‍ॅडिक्शन, रिहॅब हिस्टरी असते. तो या सर्व गोष्टींमधून जात असतो. पण एवढ्या शॉकनंतर त्याच्याकडून होते ते मी नक्कीच समजू शकतो पण त्याचा संबंध फक्त अ‍ॅडिक्शन आणि त्याचे दुष्परिणाम याच्याशी दाखवायचा असेल तर They lost me. फक्त फ्लॅश फॉरवर्डमधून दचकवल्यानंतर काहीतरी भरल्यासारखं म्हणून सीझन २ संपवला आहे. माझ्या मते ते पात्र नीट उभं केलं गेलेलं नाही.

बाकी उध्वस्त आयुष्यं दाखवायची असतीच तर खूप इतरही गोष्टी पॅरलल स्टोरीज - कॉम्बोच्या घरच्यांची, स्पूजच्या कुटंबाची - दाखवता आल्या असत्या आणि तेच नेमकं ही मालिका करत नाही. असो. वैयक्तिकदृष्ट्या इथे बार खाली गेला. बट फिकर नॉट .... गुस्तावो फ्रिंग आलेला आहे. लॉस पोयोस हर्मानोस! Happy

आता तुम्हाला उत्तर दिलं तर मेजर स्पॉइलर होईल. Happy
आणि स्पूजची अवस्था दाखवली आहे की. बाकी मित्रांचेही... प्रवास इ. Happy

**

सीझन २, ९ एपिसोड्स Happy

अरे बस्के आपण सोबत आहोत म्हणजे.

रायगडाने थोडी भरारी (:फिदी:) घेतली तर ती पण येइल आपल्याबरोबर Happy

स्पूज, त्याचं घर, लहान मुल.. तो सगळा एपिसोड भयंकर अंगावर आला >>> +१ मी म्हंटलं ना की जेसीचा कोर्स ऑफ अ‍ॅक्शन एकदम आवडला.

मी सिंडीच्या खूप नंतर पाहायला लागलीये. पण इतके एपिसोड्स एकदम पाहिलेत. थांबवत नाही. नील झोपला की चालू. शेवटी काल मायग्रेन.. आता आज रात्रीपर्यंत विश्रांती!

रायगडाने काल सीजन २ च्या २ भागांपर्यतच भरारी घेतली. नंतर रात्रभर टुको जिवंत हो ऊन आपल्या घरी आलाय अशी भयंकर स्वप्न बघत होते.

चमन यू आर कम्पेअरिंग अ‍ॅपल्स विथ ऑरेन्जेस >> येस & नो!! What I am saying is, if you are hungry then choose an apple over an orange. An apple will bring you more satisfaction.

आणि आपण केमिस्ट्री वगैरे शास्त्रीय दृष्टीकोनातून बोलतच आहोत तर ही लिंक वाचा

http://www.improbable.com/airchives/paperair/volume1/v1i3/air-1-3-apples...

निष्कर्ष वाचलात ना? Proud

टुको च्या एपिसोड नंतर बिचार्‍या जेसीचे कोण हाल.

उद्या ऑफिसला सुट्टी आहे सो, आज रात्री ३-४ भाग पुढे भरारी मारता येईल का बघते.... पण एकदम एवढ झेपत नाही... आधी बघितलेलं पचवावं लागतं ना!

स्वाती,

आता तुम्हाला उत्तर दिलं तर मेजर स्पॉइलर होईल. ----- ओके, योग्य वेळ आली की... काळ आलाय पण वेळ आलेली नाही! Happy

आणि स्पूजची अवस्था दाखवली आहे की. बाकी मित्रांचेही... प्रवास इ. ----- I have a problem when it adds another level... I am fine with the main characters and the characters tied to them (story wise) so Jesse to Spooge or Jesse to Badger or Combo or Skinny Pete or Jane but when the storyline extends beyond Jane... to her dad and how his actions find a circuitous way to muddle up the main storyline, I personally feel that is unnecessary. Because we now have Jesse to Jane to her dad and what he does ... even when Jane is out of the story. In case of Jesse's friends, we don't see what Combo's mom does (after she goes through the same trauma and grief) and if at all, it affects few/more/however many people. That's where it loses me.

आणि कशाला? आकाशगर्जना, मृत्युचं तांडव, यामध्ये एकाकी वॉल्ट वगैरेंनी युक्त प्रतिकात्मक शेवटाकरता (सीझन २)? फारच द्राविडी प्राणायाम आहे. Happy

नेटवर शोधतो. विन्स आणि इतर लोकांचा काय टेक आहे यावर ...

वा, वा, सगळ्यांना मेथनं गळाला लावलं आहे तर. Lol

Ballad of Heisenberg is favorite.

स्कायलर आता वेगळीच वाटायला लागली आहे. सुरुवातीची नवर्‍यावर प्रेम असणारी, त्याच्या आजाराचं निदान झाल्यावर दु:खी झालेली अशी होती. आता ती वॉल्टचं जिवंत असणं-नसणं फक्त तिच्या आणि फॅमिलीच्या भवितव्याशी जोडते आहे असं वाटलं.

जेसीला 'टॉकिंग अबाउट अस' वगैरे बोलताना बघून मजाच वाटली Happy

================================================================
**स्पॉइलर**स्पॉइलर** स्पॉइलर** स्पॉइलर** स्पॉइलर** स्पॉइलर** स्पॉइलर** स्पॉइलर** स्पॉइलर
================================================================
प्लेन क्रॅशपर्यंत आला नसाल तर ही पोस्ट वाचू नका. Happy

================================================================
विजिगिषु, जेनचा बाप काही पात्र/घटनांचा अ‍ॅन्टीथीसिस असल्यासारखा येतो असं मला वाटतं. तो जेसीच्या आईवडिलांसारखा गिव्ह अप करायचा सोपा पर्याय निवडत नाही, मुलीच्या अ‍ॅडिक्शनची फळं निष्कारण स्वतः भोगतो आणि अनइन्टेन्शनली अनेकांना भोगायला लावतो, तो वय/सोशल स्टॅटस इ.मधे वॉल्टला जवळचा असल्यामुळे त्याच्याशी बारमधेही सहज कनेक्ट करतो असं दाखवणं लेखकांसाठी सोपं होतं - आणि तिथे तो वाॅल्टच्या खात्यावर एक सत्कार्य जमा व्हायलाही कारणीभूत होतो.

प्लेन क्रॅशला वॉल्ट डायरेक्टली जबाबदार आहे का? खरंतर नाही. आणि तरीही तो गिल्ट त्याला टच करतोच. शाळेत दिलेल्या स्पीचमधे तो ते रॅशनलाइज करण्याचा जो पथेटिक प्रयत्न करतो त्यातून ते लख्ख दिसतं.

गिल्टी कॉन्शन्सची हीच तर मजा असते ना? तुम्ही सगळ्या जगाला कदाचित सर्वकाळही फसवाल, पण आपल्या मनातल्या आपल्याच ढासळत्या इमेजला कसं सावराल? 'आय अ‍ॅम नॉट अ क्रिमिनल' आणि 'आय अ‍ॅम नॉट रिअली अ‍ॅडिक्टेड' ही एकाच जातकुळीची वाक्यं आहेत. दॅट यू फील द नीड टु से इट सेज इट ऑल!
================================================================

इतक्या वेळा एडिट करून पोस्ट टाकल्यावर कितीही स्पॉइलर वॉर्निंग्स दिल्या तरी वाचण्याचा मोह होणारच Wink

मी आता वॉर्निंग असो नसो बाई, चमन, विजिगिषु या सगळ्यांच्या पोस्टी वाचते आहे. कथेत काय घडतं यापेक्षा ते कसं घडतं/दाखवलं आहे हे जास्त इंटरेस्टिंग होत चाललं आहे माझ्यासाठी तरी.

46787 इथे 'हो, नकळत नाही तर जाणीवपूर्वक' असं उत्तर देण्याचा मोह होतोय. हायझेनबर्ग इज अ कल्ट Proud

जेनच्या शेवटच्या आचक्याला वॉल्ट गलबलतो. आपल्या संपूर्ण प्लॅन आणि गुपित ऊध्वस्त करण्याईतका पावरफूल हुकमी एक्का जेन सारख्या जंकीच्या हातात लागलेला आहे हे समजूनही त्याच्या मनात 'हिला आता संपवावे' अशी भावना येत नाही. बार मध्ये जेनच्या वडिलांशी बोलणार्‍या वॉल्टचं वागणं त्या प्रसंगात जेवढं पॅनिक आणि कोपलेलं असायला हवं तेवढं वाटत नाही. जेन बद्दल त्याला गिल्टी वाटत असेल असं वाटतं पण प्लेन क्रॅशनंतर जेनच्या मृत्यूला काहीच अर्थ ऊरत नाही आणि त्याने 'त्या' धुमश्चक्रीनंतर जेसीला सांगणं की तिला मरतांना मी पाहिलंय ह्यातून वॉल्टचं गिल्टी कॉन्शन्स फक्त त्याला स्वतःलाच सोयीस्कर ऊत्तरं देण्याईतपतच जागं आहे, बाकी काही नाही

>> त्याने 'त्या' धुमश्चक्रीनंतर जेसीला सांगणं की तिला मरतांना मी पाहिलंय ह्यातून वॉल्टचं गिल्टी कॉन्शन्स फक्त त्याला स्वतःलाच सोयीस्कर ऊत्तरं देण्याईतपतच जागं आहे
अ‍ॅब्सोल्यूटली! शिवाय 'त्या' धुमश्चक्रीपर्यंत तो आणखी निर्ढावलेला नाही का?

* टू मच स्पॉइलर म्हणून संपादित. * Happy

>> त्याच्या मनात 'हिला आता संपवावे' अशी भावना येत नाही

आर यू शुअर अबाउट दॅट? Happy (ही इज द गाय हू नाॅक्स, रिमेम्बर?)
ती नुसतं ब्लॅकमेलची धमकी देत नाही, तो जेसीशी बोलत असताना त्याच्या तोंडावर दार लावून अपमानही करते. शी नीड्स टु बी डेल्ट/डन विथ!

काल दुसर्‍या सीझन चे पुढचे ३ भाग बघितले. आता सीझन २ - ५ भाग झाले. हे ३ भाग म्हणजे सारं कसं शांत शांत वाटलं..पहिले टुको वाले २ भाग झाल्यानंतर. तो टिंग टिंग म्हातारा पोलिसांना काही सांगत का नाही म्हणे? ते काही कळलं नाही...
स्कायलर पण एकदम शांत शांत...! तिच्यातले बदल interesting आहेत....
वॉल्टर ला काय वेड लागलय का परत परत त्या मार्गाने जायला असं वाटत राहिलय...

Pages