चिंब पाऊसधारा

Submitted by चकोर on 17 September, 2013 - 17:54

चिंब भिजवती तृणांना..
ओघळत्या पाऊसधारा..
तरारुनी करती जागं..
खोल रुतलेल्या मुळांना..

तरंग ते उठती..
शांत-शितल पाण्यावरती..
मन पांगुन-पांगुन जाई..
त्या तरंगरेषेभोवती..

झिम्मड धारा..
उधळती पाणी..
साज दवबिंदूंनी..
सजवती रानी..

सजलेल्या रानो-माळी..
पसरलेली माळ तृणांची..
त्यात तोयमोती..
मनःतृषा भिजली..

असाच बरस मेघा..
असाच तू गरज..
बावरलेल्या अवनीला या..
गडगडनाऱ्या प्रेमात रुजव..

...शुभी...

images.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार,

कविता छान आहे. दुसरे कडवे मनाला जास्त भावले -

तरंग ते उठती..
शांत-शितल पाण्यावरती..
मन पांगुन-पांगुन जाई..
त्या तरंगरेषेभोवती..