Submitted by shrishrikant on 20 May, 2009 - 01:53
मी तुटून लिहीतो कविता
हे दु:ख पचविण्यासाठी
सांगाती माझ्या आल्या
संचितास पडल्या गाठी
एवढ्या लांबूनी तारा
अंधार उजळतो वक्षी
मेंदीच्या तळहातावर
भयदग्ध फुलांची नक्षी
भय इथे इथे भरलेले
हळूवार फुलांच्या साली
सोलूनी कुणी घेतांना
हंबरून संध्या आली
मज दिवेलागणी म्हणजे
तुटलेली वृद्ध सतार
कोलाहल शमता-शमता
नजरेस पूर येणार
गुलमोहर:
शेअर करा
श्रीकांत
श्रीकांत रसग्रहणामूळे अजुनच मनात खोल शिरली कविता खुपच उच्च कविता Hats Off , निवड समिती चे शतशः: धन्यवाद
मज दिवेलागणी म्हणजे
तुटलेली वृद्ध सतार
कोलाहल शमता-शमता
नजरेस पूर येणार
खुपच सुंदर............!
सर्व
सर्व रसिकांना, कड घेणार्या, न घेणार्या, कविता आवडलेल्यांना, नावडलेल्यांना
मनापासून शतशः धन्यवाद!!!!
च्चाण आ।ए
च्चाण आ।ए
मस्त कविता
मस्त कविता

आणि रसग्रहणही
************
To get something you never had, you have to do something you never did.
धन्यवाद
धन्यवाद राजेश!
ग्रेस साहेबांच्या दर्ज्यातली
ग्रेस साहेबांच्या दर्ज्यातली कविता....अप्रतीम..
क्या ब्बात है!
क्या ब्बात है!
Pages