दिवेलागणी

Submitted by shrishrikant on 20 May, 2009 - 01:53

मी तुटून लिहीतो कविता
हे दु:ख पचविण्यासाठी
सांगाती माझ्या आल्या
संचितास पडल्या गाठी

एवढ्या लांबूनी तारा
अंधार उजळतो वक्षी
मेंदीच्या तळहातावर
भयदग्ध फुलांची नक्षी

भय इथे इथे भरलेले
हळूवार फुलांच्या साली
सोलूनी कुणी घेतांना
हंबरून संध्या आली

मज दिवेलागणी म्हणजे
तुटलेली वृद्ध सतार
कोलाहल शमता-शमता
नजरेस पूर येणार

गुलमोहर: 

वाहवा, जियो दोस्त !

***********************************
मनामधली कविता घेऊन, कागद माझा उडतो आहे,
उतरेल त्याच प्रदेशात, चंद्र जेथे बुडतो आहे !!

व्वाह ! जिय्यो !

जबरदस्त.
.............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

मज दिवेलागणी म्हणजे
तुटलेली वृद्ध सतार

सुंदर...

*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************

व्वा!!! मस्तच!!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

मज दिवेलागणी म्हणजे
तुटलेली वृद्ध सतार
कोलाहल शमता-शमता
नजरेस पूर येणार>>>सुंदर

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" सुंदर! "

मस्त शब्द, भावपूर्ण. प्रत्येक ओळ वेचलेली.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

फारच सुंदर बॉस !! त्रिवार मुजरा !!!

............अज्ञात

you may meet me in details at ....... www.layakari.com

मेंदीच्या तळहातावर
भयदग्ध फुलांची नक्षी
>> व्वा!!

कविता आवडली!!

श्रीश्रीकांत,
छान आहे कविता. पहिली दोन कडवी खूप छान आहेत पण नंतरच्या कडव्यांमधे थोडा विस्कळितपणा जाणवतो आहे. विशेषतः तिसर्‍या कडव्यात.
- मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
भगवद्गीता:- http://marathi-bhagavadgita.blogspot.com

अप्रतिम! एकेका ओळीला दाद द्यावी तेव्हढी थोडीच आहे!
मेंदीच्या तळहातावर
भयदग्ध फुलांची नक्षी

सोलूनी कुणी घेतांना
हंबरून संध्या आली

आणि शेवट तर केवळ!

मज दिवेलागणी म्हणजे
तुटलेली वृद्ध सतार
कोलाहल शमता-शमता
नजरेस पूर येणार

फार फार आवडली!

मुंकुंद, मला वाटत नाही. पण असेलही तसे! शेवटी, रसिक देवो भव!

शुमा आणि जगु, मनापासून धन्यवाद!!!
प्रोत्साहन कामी येतं माझ्या.

- श्रीकांत

कविता छान आहे.. ग्रेसची एखादी कविता वाचतो आहोत असेच वाटले क्षणभर.

अहो स्वाति, या सर्व कवितेचा अर्थ समजावून सांगा ना. म्हणजे आम्हालाहि कळेल याच कवितेला चांगले का म्हणायचे? (तश्या आम्ही पण पूर्वी काही कविता लिहील्या होत्या!!)

आणि या वेळी तुम्ही नाही का निवडली कविता?

विशेषतः

हळूवार फुलांच्या साली
सोलूनी कुणी घेतांना

नि

मेंदीच्या तळहातावर
भयदग्ध फुलांची नक्षी

यांचा अर्थ काय?? फुलांना साली? का पाकळ्या? की फळांच्या साली? का साली म्हणजे मेव्हणी?
काSSSहि कळत नाही हो!!

Happy Light 1

अभिनंदन!

कविता कळायला मात्र अवघड आहे. २-३ वेळा वाचली. एकूण अर्थ कळाला असे वाटते आहे, पण सगळ्या ओळींमधले अर्थ नाही कळाले. कोणी रसग्रहण केले तर बरे होईल.

वाह फार सुंदर...!!! आता कुठुन आली...? मस्त...

निव्वळ महान !

परागकण

कळली असे म्हणणार नाही - पण फार्फार आवडली
तुमच्या कविता वाचायला आवडेल.

~~
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे.
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

निवड समितीमुळे सुंदर कविता वाचायला मिळाली. धन्यवाद.

कविता अफाटच आहे. विशेषतः शब्दांचा वापर. ग्रेसची प्रचंड छाप दिसते. 'भयदग्ध', 'अंधार उजळतो वक्षी', 'दिवेलागण', 'हंबरुन संध्या' वगैरे शब्द ग्रेसची आठवण करुन देणारे. सुरेखच.

Pages