फोटोग्राफी स्पर्धा..डिसेंबर.. "architecture." वास्तु .. निकाल

Submitted by उदयन.. on 5 December, 2013 - 03:51

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " डिसेंबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

यंदाचा विषय आहे... "architecture." वास्तु

तसे हा विषय थोडाफार "अँगल" या थीम मधुन थोडाफार डोकावलेला होताच..

यंदा हा स्वतंत्र थीम म्हणुन निवडलेला आहे..

जगात इमारती, मंदीर , चर्च.. महाल.. वाडा अश्या अनेक स्वरुपात "architecture." आहेत..
"architecture." - वास्तु यांचे फोटो मधे . भव्यता, मांडणी यांच्या बरोबर अँगल देखील महत्वाचा ठरतो..
राजवाडे ,, एखादा वाडा ,, इत्यादीचा समावेश होतो.
थोडक्यात बांधलेली वस्तुंचा समावेश यात होतो.

यंदा कॅमेराची माहीती देताना ... फोटो काढलेल्या वास्तु ची देखील देण्यात यावी

यावेळी तुम्हाला उदाहरणाचे फोटो देण्यात येणार नाही..........

११ महिने झालेत......आता तुम्हीच समजुन चला काय अपेक्षित आहेत......

स्मित

निकाल :-

प्रथम क्रमांकः सुज्ञ माणुस : इली येथील कॅथाड्रल

अतिशय सुंदर अँगल. कृष्णधवल रंगाचा अगदी योग्य ठिकाणी वापर. खालचा माणसाचा पुतळा अर्धवट आला आहे तो खटकतो आहे. पोप्रो मध्ये काढता आला असता. समोरचा दरवाजा पण पुर्ण यायला हवा होता.

द्वितीय क्रमांकः मृणाल साळवी: Krakow, Poland येथिल Old market.

सुंदर प्रचि. फक्त कळसाच्या वरती अजुन थोडी breathing space हवी होती. जर का अजुन लांबुन हा फोटो काढला असता तर कळस आणि जमिनीवरचे reflection दोन्हिही छान आले असते.

तृतीय क्रमांकः इंद्रधनुष्य : खिद्रापुरच कोपेश्वर मंदिर, कोल्हापुर

छान अँगल. मंदिरातला माणुस व वरुन आलेला प्रकाशाचा झोत पोप्रो मध्ये काढता आला असता.

उत्तेजनार्थः Sariva: second photo: Palace ऑफ fine आर्ट्स.

छान प्रचि. पण बहुदा अँगला जर वेगळा घेतला असता तर आणखिन छान झाला असता.

जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

नियमः-

१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध संकेतस्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.

http://www.maayboli.com/node/43465

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्ह्णुनच.... जानेवारी पासुन.... प्रोफेशनल विषय निवडणार आहोत... एक वर्ष तर द्यावे ना लोकांना Happy

१. टॉवर ब्रिज उघड्तानाचे दृश्य. ब्रिजचे आर्किटेक्चर आणि डिजाईन जेवढे भारी आहे तेवढाच मेंटेनन्स पण कमालीचा आहे. मोठे जहाज आले की हा ब्रिज अलगद उघडला जातो. ( महत्वाचे म्हणजे बंदही होतो. Happy )
From !! शि.सा.रा. उवाच !!

Details: Camera Canon EOS 1100D, FL- ३५ mm, Exposure १/६०, F Number f/४.५, ISO १२५

२. इली येथील कॅथाड्रल- (इंग्लंड मधील सर्वात जास्त उंच कॅथाड्रल. २५० फुट उंची. )
From !! शि.सा.रा. उवाच !!

Details: Camera Canon EOS 1100D,
Focal Length-18 mm,Exposure 1/30,F Number-f/3.5,ISO-1000

वास्तु सारखा सर्वव्यापी विषय असताना... २-३च प्रचि??

सुज्ञ माणूस दिसत नाहीयेत प्रचि. Sad
शोभा सुवर्णमंदीर मस्त टिपलं आहेस.दुसर्‍या प्रचिचा अँगल आवडला.

सेंट मेरीज कॅथेड्रल, पर्थ, प. ऑस्ट्रेलीया

St Mary’s Cathedral is the cathedral church of the Roman Catholic Archdiocese of Perth, and also is a seat of its Archbishop. [Currently Timothy Costelloe]. Officially the Cathedral of the Immaculate Conception of the Blessed Virgin Mary, the cathedral is located at the peak of a hill in East Perth, at the centre of Victoria Square in Western Australia.

The cathedral as it now stands was constructed in three main phases, with the first phase completed in 1865. Plans were drawn up for the replacement of the cathedral in the 1920 with a larger Perpendicular Gothic edifice. However, construction was interrupted by the onset of the Great Depression, leaving a new transept and sanctuary, with the aisle of the original cathedral as its nave.

Information reference with thanks : http://visitperthcity.com/location/st-marys-cathedral

पिकासाने पुरवलेली तांत्रिक माहिती Wink

Camera : Canon DIGITAL IXUS 85 IS
ISO : 80
Exposure : 1/1000 sec
Aperture : 3.2
Focal Length : 7mm
Metering Mode : 5
CCD Width : 1.8038665
Focal Plane X-Resolution : 15136.93
Focal Plane Resolution Unit : 2.0
Compressed Bits Per Pixel : 5.0
Max Aperture : 3.34375

शिलाहार राजवटित बांधलेले १२व्या शतकातील खिद्रापुरच कोपेश्वर मंदिर, कोल्हापुर

हेमाडपंथी बनावटीच गोंदेश्वर मंदिर, सिन्नर.

Canon SX40 HS
Auto Mode

उदयन,
वेगवेगळ्या अल्बममधल्या लिंक्स हे कारण असेल का माहीत नाही, पण या स्पर्धेतले इतर बाफ माझ्याकडे दिसायला बराच वेळ जातो. एकाच अल्बममधल्या लिंक्स वरचे बरेच फोटो असले तर असे नाही होत.

आता इथले फोटो दिसताहेत म्हणून माझेही चार पैसे.. छे चार पैसे कसले, सर्व मर्‍हाटी लोकांचा हा शिवकालीन होन आहे.. ( पण स्पर्धेसाठी विचार नका करू. )

shivneri_260108_058.jpg

ट्विन टॉवर्स क्वालालम्पूर.......अ‍ॅन्गलच्या स्पर्धेतही हा फोटो दिला. होता. परत चालेल का?

यावेळी कमी फोटो येण्याचे कारण म्हणजे विषय खूपच सधा घेतलाय
तसेच स्पिसिफिक नाही . जगात लाखो बांधकामे आहेत , परत त्यात फोटो घेण्यार्याच्या कौशाल्य्पेक्षा बांधकामाला महत्व आहे.

परदेशात राहणाऱ्या लोकांनअ जास्त फायदा होईल, तिकडचे architecture भन्नाट असतात

architecture मध्ये पण एखादी कॅटेगरी देऊन त्या अनुषंगाने स्पर्धा ठेवली असती तर दम वाटला असता
म्हणजे फक्त देवळे , किंवा काचेच्या बिल्डींग .. अस काहीतरी
आता विषय खूपच मोठा झालाय ,

हरकत नाही पुढील महिन्याच्या स्पर्धेह्ची वाट बघतोय
मस्त उपक्रम आहे

१. फत्तेपूर सिक्री : आतील प्रशस्त पटांगण, बाजूनं बांधलेल्या ओवर्‍या आणि खोल्या यांचं नक्षीदार कुंपण आणि आत उजवीकडे सलीम चिस्तीचा दर्गा

२. सुप्रसिद्ध माँटे कार्लो कसिनो, मोनॅको. खालील फोटो कसिनोची मागची बाजू दिसत आहे.

कुतुहल शमवण्यासाठी कसिनो च्या दर्शनी भागाचाही फोटो टाकत आहे. पण हा स्पर्धेसाठी नाही. ऑलरेडी दोन झाले आहेत. Happy

असंख्य फोटो आहेत ह्या विषयावरचे. त्यामुळे कोणता टाकावा हे कळेना. खर तर आर्किटेक्चर बद्दल फोटो म्हणजे त्या आर्कीटेक्ट्ची संकल्पना मांडणारा निबंध . तेवढी पात्रता माझी नाही खरतर. पण हे २ फोटो जर्मनीतील ऑलिंपिक स्टेडियमचे. दोन्हीही त्या त्या काळात एक स्टेटमेंट करण्याकरता बांधले गेले.
१) बर्लीनचे स्टेडियम, खुद्द हिटलर्ने फ्लॅगऑफ केलेले .त्याच्या राजकीय आय्डियॉलोजीज मांडण्याचे व्यासपिठ असा त्याचा वापर हिटलरला करायचा होता. सुप्रिम सत्ता अन ताकद दाखवणारे रोबस्ट पिलर्स असलेले भव्य स्टेडियम! ऑलिंपिक कालावधीत प्रतिमा साफसफाई पण केली गेली, एका ज्यु अ‍ॅथलिट्चा जर्मन संघात समावेश अन शहरातील ज्युना प्रवेश्बंदीचे बोर्ड काढणे हे वानगी दाखल. (१९३६ )
२) १९७२ ,साली जर्मनीला परत संधी मिळाली अन दुसर्‍या महायुद्धानंतर प.जर्मनीनी त्याचा उपयोग "जर्मनी हा देश लोकशाही तत्वावर चालणारा भविष्याबद्दल बद्दल आशावादी असणारा आहे " हे ध्वनित करणार स्टेडियम बांधून केला. दुर्दैवानी , इझ्राईली संघाच्या संतापजनक कत्तलीनी हे ऑलिंपिक जास्त गाजले.

दोन्ही स्टेडिया एक विशिष्ठ विचारधारा ध्व्नीत करण्याकरता संयोजली गेली. वास्तूरचना ते ध्वनीत करण्यात यशस्वीही ठरली . हे माझे स्पर्धेसाठी चे फोटो.

असेच अजून काही टाकायचेत , इथे टाकले तर चाल्तील का?

१)IMG-20120509-00346.jpg

२) IMG-20120511-00497.jpg

इन्ना, स्वतंत्रपण टाकणार का, मला बघायला आवडतील.

इथे अंगोलातही ३ महिन्यापुर्वीच एक सुंदर मल्टीपर्पज स्टेडीयम बांधून झाले. त्याची बाहेरची बाजू म्हणजे जणू
सहस्त्र पाकळ्यांचे कमळच वाटते. त्यासाठी स्टीलच्या सलग शीट्स वापरल्या आहेत. सलग असल्या तरी त्याला एक खास वळणही दिलेले आहे.

रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या रंगाचे लाईट्स त्यात लावतात आणि ते खुपच सुंदर दिसते.
ते माझ्या घरातून दिसते पण अर्धवट आणि तिथे लाईट्स कधी लावणार आहेत ते आम्हाला आधी कळत नाही,
त्यामूळे तिथे जाऊन फोटो काढणे होत नाही... सो, नीट फोटो नाही माझ्याकडे Sad

अहाहा सर्वांचेच प्रचि मस्त!!
सुज्ञ माणूस दिसले दोन्ही प्रचि... पहीला छानच टिपलाय दुसर्‍या कॅथॅड्रलच्या राखाडी रंगछटा सुखद!!
दिनेश छायाप्रकाशातून डोकावणार्‍या सुरेख वळणदार कमानी
मानुषी पहीला आणि तिसरा मस्तच

मामी पटांगणाचा प्रशस्तपणा नजरेत भरण्यासारखा पण खूपच लांबून घेतल्यासारखा वाटतोय.

मामी पटांगणाचा प्रशस्तपणा नजरेत भरण्यासारखा पण खूपच लांबून घेतल्यासारखा वाटतोय.

>>>>> नाही. प्रवेशदारातून आत शिरल्या शिरल्या तिथल्या ओवरीतून घेतला आहे. ते पटांगण प्रशस्तच आहे.

इन्ना, दुसरा फोटो अप्रतिम आहे. फारच सुरेख इमारत.

Pages