फोटोग्राफी स्पर्धा..डिसेंबर.. "architecture." वास्तु .. निकाल

Submitted by उदयन.. on 5 December, 2013 - 03:51

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " डिसेंबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

यंदाचा विषय आहे... "architecture." वास्तु

तसे हा विषय थोडाफार "अँगल" या थीम मधुन थोडाफार डोकावलेला होताच..

यंदा हा स्वतंत्र थीम म्हणुन निवडलेला आहे..

जगात इमारती, मंदीर , चर्च.. महाल.. वाडा अश्या अनेक स्वरुपात "architecture." आहेत..
"architecture." - वास्तु यांचे फोटो मधे . भव्यता, मांडणी यांच्या बरोबर अँगल देखील महत्वाचा ठरतो..
राजवाडे ,, एखादा वाडा ,, इत्यादीचा समावेश होतो.
थोडक्यात बांधलेली वस्तुंचा समावेश यात होतो.

यंदा कॅमेराची माहीती देताना ... फोटो काढलेल्या वास्तु ची देखील देण्यात यावी

यावेळी तुम्हाला उदाहरणाचे फोटो देण्यात येणार नाही..........

११ महिने झालेत......आता तुम्हीच समजुन चला काय अपेक्षित आहेत......

स्मित

निकाल :-

प्रथम क्रमांकः सुज्ञ माणुस : इली येथील कॅथाड्रल

अतिशय सुंदर अँगल. कृष्णधवल रंगाचा अगदी योग्य ठिकाणी वापर. खालचा माणसाचा पुतळा अर्धवट आला आहे तो खटकतो आहे. पोप्रो मध्ये काढता आला असता. समोरचा दरवाजा पण पुर्ण यायला हवा होता.

द्वितीय क्रमांकः मृणाल साळवी: Krakow, Poland येथिल Old market.

सुंदर प्रचि. फक्त कळसाच्या वरती अजुन थोडी breathing space हवी होती. जर का अजुन लांबुन हा फोटो काढला असता तर कळस आणि जमिनीवरचे reflection दोन्हिही छान आले असते.

तृतीय क्रमांकः इंद्रधनुष्य : खिद्रापुरच कोपेश्वर मंदिर, कोल्हापुर

छान अँगल. मंदिरातला माणुस व वरुन आलेला प्रकाशाचा झोत पोप्रो मध्ये काढता आला असता.

उत्तेजनार्थः Sariva: second photo: Palace ऑफ fine आर्ट्स.

छान प्रचि. पण बहुदा अँगला जर वेगळा घेतला असता तर आणखिन छान झाला असता.

जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

नियमः-

१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध संकेतस्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.

http://www.maayboli.com/node/43465

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी , फतेहपुर सिक्री , माझ ऑटाफे आहे. ते रेड आग्रा दगडातल प्रांगण , तो शुभ्र संगमरवरी दर्गा अन त्यासमोरच हिरव झाड !! आर्क्रीटेक्चर ला असताना फतेह्पुरचा भरपूर अभ्यास केला होता . अन खरोखर तिथे पोचले तेव्हा तिथल्या गाईड नी अत्यंत चुकीची फिल्मी माहीती सांगालयला सुरवात केल्यावर , मी अन माझ्या मित्र मैत्रीणीनी तिथे गाईडगीरी केली होती , ते आठवल. Happy

इन्ना असंख्य फोटो आहेत ह्या विषयावरचे असे म्हणत आहेस तर एक स्वतंत्र धागा का नाही काढत. नीट न्याय देता येईल.
आणि एक फु. स. - पहिला फोटो क्रॉप करून आडवा टाकला तर अजून नीट दिसेल Happy

मस्त फोटो येत आहेत. Happy

मानुषी तुम्ही टाकलेले दोन्ही फोटो मला खुप आवडले.

इन्ना, फोटोमागच्या स्टोरीमुळे फोटोची रंगत वाढली.

हर्पेन , हा घ्या आडवा फोटो.
झकासराव धन्यवाद. माझ्या भटकंतीत काढलेल्या प्रत्येक फोटोज ना स्टोरी आहे. खरतर एक फोटो डॉक्युमेंटरी स्वरूपात ते काढलेत. ते लिहून काढायला हव लवकरचIMG-20120509-00347.jpg. Sad

१. Krakow, Poland येथिल Old market.

Dimensions 2906 x 1082
File name DSC_4582.jpg
File size 528.7K
Camera NIKON D7000
Focal Length 21mm
Exposure 10s
F Number f/8
ISO 100
Camera make NIKON CORPORATION
Flash Not used

२. Prague, Czech Republic येथील Dancing Building.

Date taken 10/18/13, 12:32 PM
Dimensions 1356 x 2048
File name DSC_4197.jpg
File size 560.06K
Camera NIKON D7000
Focal Length 34mm
Exposure 1/100
F Number f/8
ISO 100
Camera make NIKON CORPORATION
Flash Not used

अहो वरती बघा..........पिकासावरुन कसे फोटो अपलोड करायचे ते

नाना फडणवीसांच्या मेणवलीतल्या वाड्याची, काळाचे तडाखे सोसलेली, एक भिंत. शिसवी का सागवानी लाकडाची जाळीदार खिडकी, वेलबुट्टींनी सजवलेल्या महीरपी, नैसर्गीक चुनखडी रंगात रंगवलेली भिंत, त्यावरच्या खुंट्या......
मराठमोळ्या वाडा-स्थापत्याचा एक तुकडा-नमुना

100_3786.jpg

अशनीपातामुळे तयार झालेल्या, भुमीअंतर्गत खार्‍या सरोवरासाठी जगप्रसिध्द असलेल्या लोणार गावातले हे दैत्यसूदन मंदीर.
ह्याच्या (कोणार्कच्या सुर्यमंदीरासदृष्य) रचनेवरून असे मानले जाते की हे मंदीर बांधतेवेळी सुर्याचे म्हणून बांधले गेले असावे. परंतू सध्या त्यामधे पूजा केली जाते ती, लवणासूराचा वध करणार्‍या दैत्यसूदन ह्या विष्णूच्या अवतार स्वरूपाची. तसेच ह्या प्राचीन हेमाडपंती मंदीराला, अर्वाचीन काळात (तरी म्हणजे ७०-८० वर्षांपुर्वी असेल) केलेल्या उत्खननानंतर विटांचे कमानदार जोडकाम केलेले आहे.

DSC03144.jpg

ह्या विटांच्या कमानदार / मिनारी जोडकामामुळे, हे काय धेडगुजरी स्थापत्य असा शेरा एका पर्यटकातोंडून ऐकला. पण माझ्यामते तरी त्या जोडकामामुळे हे मंदीर आपल्या सर्वसमावेशक, सर्वग्राही, सहिष्णू अशा अस्सल भारतीय परंपरेचा नमुना दिसते आहे.

उदयन....ह्या महिन्याची पण मुदत वाढवून १५ जानेवारी करणार आहे का?

नाही... जानेवारी महिना ब्रेक घेणार आहे........ लोकांना निवांत होउ द्या........

फेब्रुवारी पासुन प्रोफेशल विषय घेणार आहे..... अजुन त्यावर विचार चालु आहे

ttps://lh5.googleusercontent.com/-ILqkkOmI3Ak/UsBKbB0cl8I/AAAAAAAAE3M/44ZXatC4Lrk/s640/DSC05053.JPG

या वेळचा विषय खूपच विस्तृत आहे.

ही दोन्ही प्रकाशचित्रे सानफ्रान्सिस्को येथील Palace ऑफ fine आर्ट्स ची आहेत.
सन १९१५ मधे ग्रीक व रोमन वास्तुशैलीची प्रेरणा घेऊन याची निर्मिती वास्तुरचनाकार बर्नार्ड यांनी केली.
१९६४ मध्ये तो पूर्ण पाडून त्याचे जोरदार नूतनीकरण करण्यात आले आहे.

उत्तम landscape archetecture सुद्धा आपल्याला इथे दिसते.

१.
.
२.

आजचा शेवटचा दिवस या विषयाचा आणि संपुर्ण स्पर्धेचा............

सगळ्याच विषयांना भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल समस्त मायबोलीकरांचे मनपुर्वक आभार आणि धन्यवाद....

Los Angeles येथील भव्य स्वामीनारायण मंदिराची वेगवेगळ्या कोनातून काढलेली ही २ प्रकाशचित्रे

१.

२.

या स्पर्धेचा निकाल कधी लागणार? दोन्ही महिन्यांचे निकाल बरोबरच लागणार होते ना? आणि स्पर्धेचे नवीन विषय आणि स्वरूप याबद्दल केव्हा कळणार? ....प्रतीक्षेत!

निकाल लावला आहे

विजेत्यांचे अभिनंदन

-----------------------------------

स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन ...

धन्यवाद

Pages