पूर्ण दिवस kaamaakarataa बाई हवी आहे - borivali

Submitted by वेल on 10 December, 2013 - 02:51

बोरिवली पश्चिम येथे घरातील वरची कामे करायला, ५ वर्षाच्या मुलाला पाहायला आणि पलंगास्थित आजीला सांभाळायला पूर्ण वेळ राहाणारी बाई हवी आहे.

सुट्टी - महिन्यातून २ रविवार
पगार - सहा हजार.

जितक्या लवकर मिळेल तितके चांगले.

पूर्वीची बाई(नात्यातली) खूप सुट्ट्या घ्यायची. एक दिवस सांगून तीन दिवसांनी परत यायची. ह्यामुळे तिला ह्यावेळी सुट्टी दिली नाही तर "मी एक तारखे पासून सोडून जाते" असे तिने सांगितले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याला दिवसाभराला कामाला बाई हवी असेल तर तिची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट बघावी लागते. ती आपल्याकडे जे काही ८ - १० - १२ तास काम करणार तेवढ्या वेळात बाकीच्या तीन घरी ती सुट्टी धुणं-भांडी, केर-लादी वगैरे कामं करू शकते. त्यापेक्षा जास्त घरात सहसा करू शकत नाही - वेळ आणि शक्ती यांचा कन्स्ट्रेंट.

सुट्ट्या कामाला (कामाचं स्वरूप, घराचे क्षेत्रफळ आणि कामवाल्यांचा सप्लाय) साधारण रु. २००० ते रु. ३००० ते रु. ४००० पर्यंत मिळू शकतात. असं असेल तर तिला तिची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट (म्हणजे साधारण तीन सुट्ट्या कामाएवढे पैसे मिळाले तर ती आपल्याकडे टिकू शकते.)

चांगली कामवाली असेल तर वर्षाच्या शेवटी एकाऐवजी दोन पगार बोनस म्हणून द्यायला हरकत नाही. जर चांगल्या कामवालीकरता आपण एक्झिट बॅरीयर निर्माण केला तर ती ही खुश आणि आपल्यालाही पूर्ण शांती!

तिच्या दृष्टीनंही तीन घरांची तीन तंत्र सांभाळण्यापेक्षा एकाच घरात राहणं जास्त ठीक आहे हे तिला समजावून सांगा. याउप्पर तिची मर्जी!

<<<श्रमप्रतिष्ठा वगैरे बरोबर असले, तरी हिशोब बरोबर येतोय का?>> नाहीच येत आणि मूळात दुखणं हेच असतं आपलं. एवढं शिकून सवरून आपली किंमत अशिक्षित लोकांपेक्षा कमी का?>

श्रमप्रतिष्ठा आणि श्रमाचे मोल या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. घरकामाला प्रतिष्ठा आहे असे दिसत नाही. किंमत जास्त असण्याचे साधे सरळ सोपे कारण मागणीपुरवठ्याचे गणित.

माझा हिशोब ही मामी यांच्या प्रमाणेच...

खरेतर मला मूल झाल्यावर मी बाई शोधली, कारण घर आणि मूल दोन्ही साबांवर सोडून जाणे त्यांच्या वयाच्या मानाने खुप जास्त होईल.

सुरूवातीला बाळ सांभाळायला असा विचार होता पण एक दोन प्रयत्नांनंतर मी जॉब डिस्क्रिप्शन बदलले
कारण बाळ सांभाळायचे असा विचार करून येणारी बाई मग बाळाशी खेळणे त्याला खाली फिरवणे यात आप्ल्याला ५ तास घालवायचे आहेत आणि मग जमले तर उरलेली कामे करयची आहेत असा समज घेऊन येतात.
काम सांगू नये म्हणून बळेच खाली आनंदाने बागडणारे बाळ मांडी वर घेऊन बसणारे नमुने पण बघितले. (
यात तोटे दोन - १. माझे वरचे काम होणार नाही,२, बाळाला सारखी मांडी ची सवय लागेल व ते आम्हाला त्या साठी त्रास देईल,)

मग माझे जॉब डिस्क्रिप्शन :
८ ते ८.५ तास घरकामाला बाई हवी.पडेल ते काम करावे लागेल. तशी झाडणे/पुसणे, भांडी याला वेगळी बाई आहे पण ती ज्या दिवशी येणार नाही त्या दिवशी ते काम पण करावे लागेल. पडेल ते काम यात बाळ सांभाळणे हे काम पण येऊ शकते.

तशी बाळाला सांभाळायला त्याची आजी आहेच की, त्यांच्या बरोबर राहिले तर त्या बाळाची भाषा, संस्कार यावर पण माझा ताबा राहतो, काम्वाल्या बाई चा नाही. आणि त्या दमल्या तर बाई ला सांभाळायला सांगू शकतात

बाकी पडेल त्या कामात, फर्निचर पुसणे, भांडी जागेवर लावणे, कपडे मशिन मधून काढून वाळत टाकणे, वाळलेले
कपडे घडी करून ज्याच्या त्याच्या खोलीत (कपाटात नाही) ठेवणे, बाथरूम / बेसिन (टॉयलेट नाही)
घासणे, फर्निचर पुसणे, भाज्या निवडून ठेवणे,दळणासाठी धान्य निवडून ठेवणे, गूळ चिरून ठेव, लसूण सोलून ठेव
इतर काही मधून मधून होणारी आवरा आवर, स्वच्छता हे समाविष्ट होते.
शिवाय बाळ आहेच मधून मधून लुड्बुड करायला.

पाहुणे आले तर जास्ती चे पडणारे काम यात अध्यारूत आहे, त्याचे वेगळे पैसे नाहीत.

दोन्ही वेळचा स्वयंपाक आम्ही घरीच करतो

बेसिकली मी तिची सर्विस ८- ८.५ तासासाठी घेतली आह, त्यात काय काम करून घ्यावे हा निर्णय माझा!

यात बिलो डिग्निटी वाटू शकतील अशी कामे न देणे हा अलिखित नियम आहे.

भांडेवाली बाई महिन्याचे ५०० तो इथला रेट आहे.

ते काम करायला साधारण अर्धा तास लागतो. म्हणजे तासाचे १०००.

शिवाय वेगवेगळ्या घरी फिरून कामे करताना जाण्या येण्याचा वेळ , जेवण इ. साठी वेळ सोडला तर ती बाई १२-१३ घरची भांडी करू शकेल फार तर ८ तासात, आणि श्रम त्या मानाने खूप जास्त.

माझ्याकडे ती ८ तास असेल तर प्रत्येक मिनिट काम करत नाही. दररोज ची कामे झाली असतील आणि बाळ झोपले असेल,आजी पण जरा दुपारची पडली असेल तर ती पण अर्धा एक तास पडते त्याला आमची हरकत नाही.

डबा तिचा ती आणते, चहा आम्ही देतो.

मधून मधून अ‍ॅडव्हान्स सुरू असतो. पण काम चांगले व बाई विश्वासू त्यामुळे माझी तक्रार नाही याबद्दल.

सुट्ट्या महिन्या तून दोन पगारी, त्यापेक्षा जास्त झाल्या तर पैसे कापणार ही बोली आणि मी कापते ही!
कधी मग ती म्हणते कापू नका , पुढच्या महिन्यात घेत नाही. मग मी त्याप्रमाणे तिचा लिव्ह बॅलन्स नोंदवून
ठेवते. कधी कधी चार महिने अजिबात सुट्टी न घेता ती मग आठ दिवस गावी जाते. मी पैसे कापत नाही.

या सगळ्या गोष्टी बघता ६५०० मला योग्य पगार वाटतो.

वरती कोणीतरी म्हटले.
नर्स बोलावतो तिला दिवसाचे ३५०-४०० देता मग बाई ला का नाही?
तर नर्स बनण्या साठी तिने काहीतरी थोडे फार शिक्षण घेतलेय, तिला अशा गोष्टी जास्त शास्त्रोक्त पद्धती ने करता येतात बरोबर , चूक लगेच कळू शकते

म्हटून वरचे जास्त पैसे तिच्या नस्रिंग बद्दल च्या जास्ती च्या कौशल्या साठी असतात.

आता खरेच तिच्या या जास्ती च्या ज्ञानाची आप्ल्याला गरज आहे की नाही यावर बाई का नर्स ते ठरवावे आणि त्या प्रकारे पैसे पण द्यावेत.

नर्स बोलावतो तिला दिवसाचे ३५०-४०० >> हे ३५०-४०० अप्रशिक्षित आयांचे आहेत. त्यांना खरंच फारसे काही कळत नाही. त्या बहुतेकदा शिकलेल्या नसतात, त्यांना औषधे ही बर्‍याच वेळा कळत नाहीत. त्या ब्युरोत रजिस्टर करतात, तिथुन आपल्याअ गरजेप्रमाणे घरी येतात. एखाद दिवशी सुट्टी असली तर बदली आया येतात.
पूर्णवेळ नर्सचे पैसे नक्कीच जास्त आहेत. दिवसातुन तीन वेळा येऊन फक्त इंजेक्शन देणे ( एका वेळी केवळ ५ ते १० मिनीटे) याचा रेट दिवसाचा किमान ५००रु आहे.

मला माझ्या शिक्षणाचा(बीए!) उपयोग करता येतोय!! >>> निषेध!!
कोणाच्याही कसल्याही शिक्षणाची हेटाळणी करण्याचा कोणालाही हक्क नाही.

पुण्यामध्ये विश्रांतवाडी परिसरात पूर्ण वेळ (~ १० तास) कामासाठी बाई हवी आहे. स्वयंपाक नाही, पण ६ महिन्याच्या मुलाची देखरेख आणि घरातील इतर पडतील ती कामे. agency वरून प्रयत्न करून पहिला पण हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

Pages