पूर्ण दिवस kaamaakarataa बाई हवी आहे - borivali

Submitted by वेल on 10 December, 2013 - 02:51

बोरिवली पश्चिम येथे घरातील वरची कामे करायला, ५ वर्षाच्या मुलाला पाहायला आणि पलंगास्थित आजीला सांभाळायला पूर्ण वेळ राहाणारी बाई हवी आहे.

सुट्टी - महिन्यातून २ रविवार
पगार - सहा हजार.

जितक्या लवकर मिळेल तितके चांगले.

पूर्वीची बाई(नात्यातली) खूप सुट्ट्या घ्यायची. एक दिवस सांगून तीन दिवसांनी परत यायची. ह्यामुळे तिला ह्यावेळी सुट्टी दिली नाही तर "मी एक तारखे पासून सोडून जाते" असे तिने सांगितले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वल्लरी आधी ते शिर्षक बदल बाई.... नाहितर इथे मदतीपेक्षा कीसच जास्त पडेल आणि अख्ख पान त्यात खर्ची घालतील माबोकर...

पलंगास्थित आजीला सांभाळायला पूर्ण वेळ राहाणारी बाई हवी आहे. >>>>>>>

मानवसेवा असे काहीतरी त्या संस्थेचे नाव आहे ..गुगल करुन बघितल्यास माहीती मिळेल.. ती संस्था आया..कामवाली देतात...... ४०० की ३५० असा काहीसा त्यांचे रेट आहे....... गुगलुन बघा माहीती मिळेल

एक दिवस सांगून तीन दिवसांनी परत यायची>>> एवढे एकच कारण असेल तर महिन्याला सलग चार दिवस सुट्टी गृहित धरायला हवी. त्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करायला हवी. आजींना सांभाळायला आया ठेवणे, मुलाला एखाद्या पाळणाघरांत ठेवणे. नव्या मोलकरणीला तयार करण्यात तुमचा किती वेळ जाईल? शिवाय ही बाई ओळखीतली, विश्वासू आहे ना?

राजसी - मुद्दा पटतो आहे. खर तर इतकं टोकाला जायला नको होतं. पण ती एक दिवस म्हणून सुट्टी घेते आणि तीन दिवसानंतर परत येते. आधी सांगून सुट्टी घेतली तर आपल्याला अ‍ॅडजस्ट करता येतं. दुसरी पर्यायी व्यवस्था करता येते. नाहीतर माझ्या ऑफिसला सुट्टी. शिवाय तिने तीन दिवस लागोपाठ सुट्टी घेतल्याने आजीच्या क्लिनिंगचा प्रॉब्लेम होतोच.

मी काही अ‍ॅड्जस्ट होईल का पाहाते आहेच.

वल्लरी, इतक्या कमी पगारात बाई मिळणे अशक्य. तुम्हाला २४ तासाची बाई हवी आहे का?
मी ५ वर्षांपुर्वी माझ्या मुलाला सांभाळायला ९-६ फक्त ५५०० देत असे, जेवुन खावुन.
त्यावरुन हिशेब घाल.

आजुन एक, त्या पूर्वीच्या बाईला गूळ लावुन परत बोलवा. आणि पर्यायी दिवसांसाठी www.aajicare.in इथे संपर्क करा. कधीही बाई आली नाही तरी हा मार्ग ब्येश्ट.... रेट -दिवसाला ५०० रु. फुल ट्रेण्ड नर्स ,ब्रदर असतात.
श्री. भिडे/पै असतील... त्यांना माझा रेफ. दिला तरी चालेल. माझ्या आइसाठी उत्तम अनुभव आला.

मी पण मुंब ईत आल्यावर हैद्राबादची लिव्ह इन मेड आणली होती तिला १०५००.०० देत होते.
पण ती सहा महिन्यानंतर मुलगी व नातवाला घेउन आली व हॉटेलात राहिल्यासारखे दोघी राहू लागल्य थोडे इमोशनल ब्लॅक मेलिग्न प्रकारही केले. मग आ म्ही तिला नारळ दिला. पहिले खूप त्रास झाला अ‍ॅडजस्ट व्हायला. पण आता जमले आहे. कुत्रे चालवायला एक विद्यार्थी आहे तो ६००० घेतो आणि मेड ४५००.०० फक्त कामाचे. राहायचे वगैरे नाही. सेम कॅश आउट गो पण मला दोन
जास्त हार्ड वर्किन्ग लोक्स मिळाले आहेत. कुत्रा चालवायच्या मुलामुळे त्याला फायदा होतो आणि मला सकाळी एक फुल तास मिळतो. व्हिच इज वर्थ इट. म्हा तार्‍यांचे घरी करणे फार अवघड आहे.
मी आईबाबा दोघांचे केले आहे व तेव्हा मुलगीही ल हान होती. समडेज यू आर जस्ट क्लीनिन्ग क्लीनिन्ग. कंबर मोडते.

अमा, मेड पेक्षा कुत्रे चालविण्याचे पैसे जास्त?
एकंदरात अवघड आहे बाई. मला तुम्ची बाई, मुलगी, नातु हा किस्सा आठवतो आहे.....

घरी स्वयंपाकाला वेगळा कुक आहे. धुणी भांडी केर लादी ला वेगळी बाई.

ह्या बाईला आजीचे स्पंजिंग, क्लिनिंग, आठवड्यातून एकदा आंघोळ. माझे डबे भरणे, मला नवृयाला आणि मुलाला जेवायला वाढणे, जेवण गरम करणे, मशिनमधले कपडे माझ्या नणंदेला वाळत घालायला सांगणे, भाज्या फ्रीजमध्ये ठेवणे, कुकला काय जेवण बनवायचे ते सांगणे, दूध्-पनीर्-अंडी-ब्रेड आणणे, तयार हो तयार हो असे मुलाच्या मागे लागणे त्याला बसपर्यंत सोडणे आणि परत आणणे, त्याला दूध देणे, खाली खेळायला पाठवणे एवढे काम असते. बाकी पूर्ण वेळ टीव्ही पाहाण्यात जातो. बरे आमच्या घरी तिला कसलीही आडकाठी नाही. महिन्या दोन महिन्यातून एकदा आम्ही त्यांना सिनेमाला, हॉटेलमध्ये जेवायला नेतो. ह्याकरता ६-७००० कमी आहेत का?

हो, असे खेदाने म्हणावे लागेल. आमच्या सा.बु. साठी एक मावशी आहेत. ते आता थकले, पण बेड रिडन नाहीत. तरी तिला ८-९ हजार देतो.
सासरे आपली आन्हिके आटोपतात, जेवतात इ.
यात मी, नवरा, मुलगा यांचा काडीचाही संबंध नाही. कारण ते समोरच्या फ्लॅट मधे असतात.

ह्याकरता ७००० कमी आहेत का?>> हो अर्थातच.

आजीचे स्पंजिंग, क्लिनिंग>> या कामाचेच दिवसाचे २५०/- रुपये या दराने २६ दिवसांचे ६५००/- रुपये होतील.
२५०/- रुपये रोजचे (बारा तास) हा कमीत कमी दर आहे.

कामाला बाई मिळणे तेही आपल्या (माफक वाटल्या तरी) अटींवर सध्याच्या परीस्थितीत कठीणच आहे.
त्यातून घरात लहान मूल, बेडरिडन/आजारी म्हातार्‍या व्यक्ती आणि कर्ती माणसे (नवरा-बायको) नोकरीला असतील तर महाकठीण!!
बाई ठेऊन आपण हुश्श करतो न करतो तोच यांच्या भरपगारी दांड्या सुरू होतात, न कळवता. मग भिजवलेल्या कपड्यांचा चिखल, सिंक मधली खरकटी भांडी असा अवतार ऑफीसातून दमून भागून आल्यावर पाहीला की डोक्यात जाते परिस्थिती...
सहा हजार आजी, नातू आणि घर सगळं सांभाळण्यासाठी नक्कीच खूप कमी आहेत. त्यामुळे गावातून एखादी गरजू बाई मिळते का बघ. काय होतं बाई ठेवली की आपण तशी मानसिक तयारी करतो की चला आता सगळं आलबेल आहे, मग मध्येच धप्पकन आपटतो न सांगता सुट्ट्या झाल्या की...

आम्ही अर्णव लहान असताना आणली होती गावातून एक अठरा वर्षांची मुलगी. फक्त वरची छोटी मोठी कामे करण्यासाठी आणि सोबतीला म्हणून. ३०००/- आणि खाणं, पिणं. पण तिचा एकंदर रागरंग पाहीला, सतत आजारी आहे, डोकं दुखतंय अशी बतावणी करणे, आणलेली औषधे कचर्‍याच्या डब्यात टाकून देणे, कहर म्हणजे सतत खिडकीपाशी उभी राहून हसत राहणे, प्रत्येकवेळी लिफ्टचा आवाज ऐकला की दार उघडून चोरून पाहणे... मग म्हटलं नस्ती आफत नको. सोडून आलो परत.
कामवाल्यांशी नक्की कसं वागायचं हे बर्‍याच प्रयत्नांनंतरही कळालेलं नाही. त्यामुळे दोघंच अ‍ॅडजस्ट करतोय कामं वाटून घेऊन. फक्त कपडे-भांड्यांना बाई ठेवलेय आणि तिने पण दांड्या मारल्या तर घरी आल्यावर तो पसारा उपसायची मानसिक तयारीही Happy

तळटिप : कसं हँडल करायचं या कामवाल्यांना प्लीज कोणी सांगेल का?

मी महिना दहा हजार देते (पण मी खेड्यात राहते, मुंबईत नाही!!!) कूकिंग, धुणी भांडी कचरा अंगण साफ करणे, सुनिधीला शाळेतून आल्यावर भरवणे, झोपवणे आणि इतर सर्व घरकाम. संध्याकाळच्या स्वैपाकाची फक्त तयारी करून देते मग मी रांधून घेते. प्रत्येक रविवारी तिची सुट्टी असते. इतर वेळी मात्र अजिबात दांडी मारत नाही. हिची भिती एवढीच की तीन चार महिन्यातून एकदा हिचा नवरा हिला घेऊन जातो,मग ती पंधरा वीस दिवस येत नाही. पण इतर वेळी दांड्या नाहीत.

ह्या बाई म्हणजे शी इज प्रॅक्टिकली मिनी यू. परत आजींचे पण करतात. ग्रेट आहेत की. त्यांना परत बोलावून एक फ्री स्पा ट्रीट्मेन्ट दे आणि मस्त रेज दे. एम्प्लॉयीज खूष म्हणजे आप्ण खूष.

मी न सांगुन मारलेल्या दिवसाचे पैसे कापते असे २ ३ दा सांगते [ रचक्याने कापलेले पण एकदा ]
पण पाहुणे आले की मि तिला १०० रु जास्तीचे देते ते पण स्वताहुन

ह्म्म थोड अवांतरच म्हणता येईल पण .. माझ्याकडे फक्त सकाळच्या ११ फिक्स पोळ्या करण्यासाठी ...
बाई १५००-२००० घेते .... त्यातही संडे सुट्टी ... शनीवारी बर्‍याचदा नहिच सांगत... महिन्यातुन ३ दिवस कंपल्सरी सुट्टी..

मुग्धा, तो डॉगवॉकर दिवसातून दोनदा येतो. एकेक तास. ही त्याच्या श्रमाची किंमत नाही. तर मला जो मोकळा वेळ मिळतो त्याची आहे. शनिवारी त्याच्या हातात कुत्र्यांना सोपवून मग चहाकरून आरामात पेपर वाचताना जे सूख मिळते त्यासाठी वर्थ इट.

लोकहो तुम्ही रेट बघताना एका माणसाचा रहाण्या- खाण्याचा अख्खा खर्च करत असतो, एक चांगली लाईफस्टाइल देत असतो हे विसरताय.
एका माणसाचे राहाण्याखाण्याचे आरामात ३०००-४००० महिन्याचे होतात.
ब्यूरोकडून येणार्या नर्सला आपण कर्टसी म्हणून जेवण खाणं दिलं तरी तसं कंपल्शन नसतं.
आजकाल कोणी शिळंपाकं तर घरात राहणार्या कामवालीला देत नाही.
दररोज तीन वेळ्या ताज्या चांगल्या जेवणाचे किती होतात बघा.
त्यात या बायांकरिता मी तरी क्रीम पावडर एकूण एक कपडे साबण सगळे स्बतः आणून देते.
इथे आसपासही हीच पद्धत आहे.

या सगळ्याचे पैसे हे डेली येऊन काम करणारांपेक्षा नक्कीच एक्स्ट्रा होतात ना?
मग ६०००+४००० हे दहाहजार दिल्यासारखेच आहेत.

Pages