पूर्ण दिवस kaamaakarataa बाई हवी आहे - borivali

Submitted by वेल on 10 December, 2013 - 02:51

बोरिवली पश्चिम येथे घरातील वरची कामे करायला, ५ वर्षाच्या मुलाला पाहायला आणि पलंगास्थित आजीला सांभाळायला पूर्ण वेळ राहाणारी बाई हवी आहे.

सुट्टी - महिन्यातून २ रविवार
पगार - सहा हजार.

जितक्या लवकर मिळेल तितके चांगले.

पूर्वीची बाई(नात्यातली) खूप सुट्ट्या घ्यायची. एक दिवस सांगून तीन दिवसांनी परत यायची. ह्यामुळे तिला ह्यावेळी सुट्टी दिली नाही तर "मी एक तारखे पासून सोडून जाते" असे तिने सांगितले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यामुळे माझ्या डोक्यात हा प्रश्न आला, की जर २ तास डोके थंड ठेवावे म्हणून त्यांना बाहेर पिटाळावेसे वाटते, व 'दॅट इज वर्थ इट' असे वाटते, तर मुळात त्यांना पाळावेच कशाला? >>>>>>
'दिवसभर घरातच गोंधळ घालताय. जा एखाद तास बाहेर जाऊन खेळा जा.. मला जरा शांत पडू द्या' हे कुणाही आईने आपल्या मुलांना कधीच म्हटलेले ऐकिवात्/अनुभवात नाहीये का? असं त्या आईने म्हटलं म्हणजे 'तिने मुळात मुलं जन्माला घालावीच का?' असा प्रश्न विचारण्यासारखंच आहे हे!

बरं, मुलं थोडी मोठी झाली की आपल्याआपण बाहेर पडू शकतात. कुत्र्यांचं तसं नाही. कुणीतरी त्यांच्याबरोबर लागणार. मग मला जर पक्कं माहीत आहे की माझ्या शेड्यूलमधून मी हा वेळ रोजच काढू शकेन असं नाहीये आणि माझ्या आर्थिक गणितात आउटसोर्सिंग बसतंय, तर मी नक्कीच तसा निर्णय घेईन.

श्रद्धा जी,
मुळात डॉग्ज का आहेत? हा तो प्रश्न होता. घरात कुत्रा असणे हे मुले असण्याइतकेच आवश्यक, असे माझे मत नसल्याने, कॉमन बेसिक प्रिमायस नाही. त्यामुळे माझ्या डोक्यात हा प्रश्न आला, की जर २ तास डोके थंड ठेवावे म्हणून त्यांना बाहेर पिटाळावेसे वाटते, व 'दॅट इज वर्थ इट' असे वाटते, तर मुळात त्यांना पाळावेच कशाला? असं काहिसं लॉजिक आहे माझं.<<<

मुद्दाम वरती लिवलेला पर्तिसाद डकवलाय पुन्यांदी Proud बोल्डवलेले विसरलात तुम्ही.

बेबे शेवटच्या वाक्याला अनुमोदन. सुदैवाने माझी बाई अशीच आहे. कौतुकच सांगते. ती म्हणते हातपाय चालतात तोवर अगदी पोरांनी कितीही नाही म्हणलं तरिही तुमचं आणि अजून एक खालच्या मजल्यावरचं काम करणारचं. कधी कधी गमतीत माझी नोकरी गेली आता तुला पगार कुठून देऊ असं म्हणलं तर मी फुकट करते म्हणते. देऊ नका पगार.

कृपया ते नावापुढे 'जी' वगैरे लावू नका.

घरात कुत्रा असणे हे मुले असण्याइतकेच आवश्यक, असे माझे मत नसल्याने, कॉमन बेसिक प्रिमायस नाही.>>>> मग जे हा असा खर्च करतात त्यांचे असे मत असू शकेल, त्यांना ते तितकेच आवश्यक वाटत असेल, असा विचार करणं कठीण का वाटावं? मी अशी अनेक कुटुंबं बघितली आहेत. तसा विचार करून बघितला तर पाळीव प्राण्यांवर मुलांइतकंच प्रेम असलं तरी दोन घटका त्यांनाही बाहेर खेळायला पाठवून आपण निवांत बसावं, हे करणं चूक नाही, हेही पटेल.

मी लहान असल्यापासून माझ्या घरी धुणीभांडी करणार्‍या आज्जी आता थकल्यात. ७-८ महिन्यांपासून येईना झाल्यात. त्यांचा मुलगा ब्यांकेत क्लार्क आहे. इतर कामे त्यांनी कधीच सोडली होती. तरीही कितींदा नाही सांगूनही येत होत्या. अजूनही अधून मधून येऊन जातात.
त्यांना पेन्शन लागू केलेली आहे. दवाखान्याचा खर्च फ्री असतोच.

*

अहो, म्हणून तर 'रागावू नका' म्हणत र्‍हेटोरिक प्रश्न होता. जौद्या @ श्रद्धा.

दक्षिणा तुझ्या पोस्ट्स आवडल्या.

dreamgirl चा अनुभव मला पण आला आहे. खूप वेळा कामवाली मुली (लहान वयामुळे) lifestyle ला copy करू पाहतात आणि कामात serious पण नाही राहत.

आमच्या कामवालीचे किस्से,

१. वाटेल तेव्हा कामाला येणार सकाळी ७.३० ते दुपारी २ पर्यंत काहीच वेळ सांगता येणार नाही. दुसरीकडे कुठे जास्त घराचे काम पकडले तर ते सांगायचे नाही.
बरे तिच्या वेळेस आपल्याला बाहेर जायचे असेल आणि अगदीच कोणी नसेल, तर ही खूप नाटकी करणार.
२. घरी नवीन स्वयंपाकी किंवा सफाईवाली ठेवली कि मात्र ही त्यांच्या वेळेत येणार जेणेकरून आपले कामबचत.
३. रात्री चे एका माणसाचे जेवण जादा बनवले जाते कारण कामवाली बाई टिकवायचे आहे (सासूबाई ची युक्ती). दुसऱ्या दिवशी सकाळी कामवाली हे जेवण घेवून जाते.
४. जर रात्री चे जेवण उरले नसेल तर सकाळी डब्यासाठी जे काही बनेल ते भरायचे. डब्याच्या कोरड्या भाज्या आपण मोजून आणतो पण ते घेवून जायचे(स्वतःचा दुपारचे जेवण manage करणे हा उद्देश) मग मागे काही कमी पडले तर ज्याला कमी पडेन त्याच्या प्रश्न.
५. सकाळी स्वयंपाकी च्या वेळेत यायचे म्हणजे जे काही नवीन असेल ते स्वतःला पण मिळेल.
६. शनिवार-रविवार उशिरा नाष्ट्या च्या वेळेत यायचे मग जे काही बनवले आहे, ते खाल्याशिवाय जायचे नाही.
७. घरातील जुने काही बाकी बायकांना दिले तर मग त्यांच्या शी काहीतरी वाद घालायचे.
८. दरवर्षी bonus , bag , saree हे सारे आहेच.
९. खूप जास्त personal गोष्टी मध्ये लक्ष देणे.

दीर चिडून बोलतात 'आई हिचे नाव ration कार्ड वर टाकून घे आत्ता'.

हे सारे लिहिण्याचे प्रयोजन, जर नवीन बाई ठेवली तर खूप छोटे points लक्षात ठेवून वागायचे. आपण माणुसकी म्हणून खूप काही करतो पण खूप लोक granted घेऊ लागतात.

गुलमोहोर कळू शकतय नक्कीच. माझ्याकडे ही अगोदर एक बाई उद्यापासून येते असं सांगून वर म्हणाली सकाळी एक मिस कॉल द्या Lol Rofl मी ४-४ फोन केले, आलिच नाही. अजून एक आली, दणदण काम केलं, तिला अट घातली होती ७ ला यायचं, पण ऐनवेळेला उद्या कधी येणार असं म्हणल्यावर ७.३० ला येऊन पावणे आठ पर्यंत (मला तेव्हा बस पकडायला लागायची) पोळीभाजी, भांडी केर फरशी होईल (१५ मिन्टात :अओ:) असा तिने दावा केलेला. मी राम राम ठोकला.
खरंतर कुणाला किती गरज आहे कामाची हे ही महत्वाचे आहे.

माझी आत्ताची बाई काम शोधायला आली तेव्हा सोबत ओळखपत्राच्या कॉपिज घेऊन आलेली, कधीपासून काम सूरु करू शकाल? अस विचारलं तर आत्तापासूनच असं उत्तर दिलं होतं, त्यामूळे खूप आवडली. नंतर काय सूरच जुळत गेले चांगले. चांगली बाई मिळायला नशिब लागतं.

वल्लरी - कामासाठि बाई हवि असेल तर इथे कॉल करुन बघ. माझ्या सासुबाईंसाठि इथुन बोलवलि होति.चांगलि सर्व्हिस होति.
Ultimate Facility Services, Goregaon East, Mumbai
Phone: 022 - 65224016
Mobile: 9223237089

वरदा - ज्यांना नाही परवडत त्या घरात काम करतात. मी अशा बायका पाहिल्या आहेत ज्या नोकरीही करतात आणि बायकांचा पगार परवडत नाही म्हणून घरातली कामं स्वतः करतात.

<<"त्यांच्यामूळे आपल्याला एक तास फ्री मिळतोय म्हणून माझ्या एक तासाच्या कमाईएवढे पैसे मी नाही देऊ शकत.">> ह्याला अर्धवट अनुमोदन कारण काम काय आहे त्यावर अवलंबुन आहे आणी त्या फ्री वेळात मी काय करणार आहे तेदेखील.

<<आपण घरांत नसताना घरांतील सर्व ऐषारामाच्या गोष्टींचा उपभोग आपण घ्यायचा सोडून त्यांना मिळतो. माझ्या मुलाला संस्कार ती बाई देणार ..... इ. अचानक, मला त्या उर फुटेपर्यंत धावणार्‍या शेतकर्‍याची आठवण आली. तेव्हा मी नोकरी सोडली. नोकरी धरायच्या आधी मला जे वैषम्य वाटायच (कुलुपाच्या ऐवजी आपण घरांत आहोत) ते नाहीसे झाले. मी जे काही करते आहे ते ही तितकेच महत्वाचे आहे ह्याची जाणीव मला नोकरी करायला लागल्यावर झाली. पण हे ही तितकेच खरे आहे की प्रत्येकाच्या प्रायोरिटीज ( त्या चांगल्या/ वाईट, योग्य/अयोग्य नसतात) वेगवेगळ्या असतात आणि परिस्थितीपण.>> राजसी अनुमोदन. मी हेच केलं मुलगा साडेतीन वर्षाचा होईपर्यंत मग प्रायोरिटि बदलावी लागली - परिस्थिती जन्य. आपले निर्णय परिस्थिती जन्य असतात. तू म्हणालीस तसं योग्य अयोग्य नसतं.

<<एकून आपलं परावलंबित्व कधी कमी होईल याची वाट पहायची>> असं व्हायला हवं असेल तर सगळच आपल्याला करावं लागेल.

<<पण, १०० पैकी १० लोकांना १० हजार रुपये महिना देणे परवडते म्हणून त्या बेसिसवर अमुक जॉबच्या पगाराचे कॅलिब्रेशन व्हावे का?>> हे अगदी बरोबर पण तरी demand supply ज्याच्यकडे पैसा आहे देण्यासारखा आम्ही त्याच्याचकडे काम करू, तुम्हाला जमतोय तर द्या नाहीतर आम्ही नाही काम करू शकत तुमच्याकडे.

<<श्रमप्रतिष्ठा वगैरे बरोबर असले, तरी हिशोब बरोबर येतोय का?>> नाहीच येत आणि मूळात दुखणं हेच असतं आपलं. एवढं शिकून सवरून आपली किंमत अशिक्षित लोकांपेक्षा कमी का?

आपण घरकाम करणार्‍या बायकांचे आपल्याला आलेले अनुभव आणि किस्से असा एक बाफ काअढला तर, कुठे काढूया?

वल्लरीच आणि साती,
तुमच्या पहिल्या पानावरच्या पगार + जेवणखाण + इतर फॅसिलिटीज बद्दलच्या पोस्ट्स वाचल्या.

पगाराबरोबर जेवणखाण इ. गोष्टींचा हिशेब आपण करतो, पण तो या प्रकारचे काम करणार्‍यांच्या ध्यानीमनी नसतो, किंवा ते लोक त्या गोष्टीला फारशी किंमत देत नाहीत. परंतु, तुम्ही जर जेवणाखाणाविना पगार ठरवायला गेलात तर हीच माणसं दीडपट पगार किंवा जेवणाचे म्हणून महिना २-३००० द्या असे मागतील. हे असे का ? याचं नीटसं उत्तर मला देता येणार नाही, पण सर्व गोष्टी पैशात मोजण्याकडे कल असतो असा अनुभव आहे. त्यांच्या दृष्टीने कॅश महत्वाची, कांइंडस् मधे काय देता हे फारसे खिजगणतीत नसते.

असो.... माझ्याकडे कुठल्याही कामासाठी नोकर ठेवलेला नाही. कारण अनेकदा कामाला ठेवलेल्याचे नखरे सांभाळण्यापेक्षा स्वत: कामे केलेली परवडतात. हे थोडे विषयांतर झाले. माझ्याकडे नोकर नसला तरी इतरांचे अनेक उदाहरणे ऐकलेली/पाहिलेली आहेत.

त्यातली दोन उदाहरणे देतो :

(१) आमच्या वरच्या मजल्यावर राहणार्या कुटुंबात दिवसातून दोन वेळा पोळ्या, भाजी करायला एक बाई येऊन जाते. एका वेळच्या ८ पोळ्या आणि एक भाजी. महिन्याचे ३००० रु. घेते ती बाई.

(२) माझ्या जवळच्या नात्यात एक वृद्ध गृहस्थ आहेत. वय ८०-८५ दरम्यान. वयानुसार थकले असले तरी हिंडते-फिरते आहेत. स्वत:च्या घरातच रहायचं या हट्टापोटी मुलाजवळ न राहता ते एकटेच राहतात. स्वत:ची कामे स्वत:च करतात. मशिनमधे कपडे लावून वाळतही घालतात. त्यांच्याकडे फक्त लक्ष देणे, चहा करून देणे, डबेवाल्याकडून येणार्‍या डब्यातील जेवण वाढून देणे आणि एक वेळचा घरातला केरवारा करणे इतक्या कामांसाठी ११ तासांच्या दोन शिफ्ट मधे दोन बायका येतात. प्रत्येकीचा दिवसाचा पगार ३०० रु. आहे.
म्हणजे दोघींचे मिळून सुमारे १८००० रु. महिन्याला.

आता विचार करा, ६००० रु. मध्ये २४ तासाची बाई मिळणे सहज शक्य आहे का ?
माझ्या मते मिळाली तर तुम्ही नशिबवान अहात असे म्हणावे लागेल.

<<पण, १०० पैकी १० लोकांना १० हजार रुपये महिना देणे परवडते म्हणून त्या बेसिसवर अमुक जॉबच्या पगाराचे कॅलिब्रेशन व्हावे का?>> हे अगदी बरोबर पण तरी demand supply ज्याच्यकडे पैसा आहे देण्यासारखा आम्ही त्याच्याचकडे काम करू, तुम्हाला जमतोय तर द्या नाहीतर आम्ही नाही काम करू शकत तुमच्याकडे.

<<<

मला घरातून बाहेर पडायला मिळतंय!
मला माझ्या शिक्षणाचा(बीए!) उपयोग करता येतोय!! (मी दगड&धोंडूकंमधे क्लेरिकल जॉबला आहे बीकेकॉम्प्लेक्सात. वट्टात १५ हज्जार मिळतात. मी रहातो/ते क्ष्क्ष ला. फक्त दीड तास जायला अन तितकाच यायला.
पण आय एंजॉय माय जॉब.
काय पर्सनल सॅटिस्फॅक्शन आहे की नाही?

**

रच्याकने.

एक फनी अन अगदी खरी गोष्टः
आमच्या घरी आजकाल स्वयंपाक करणारीने सौं.ना सांगितलं, की तिने तिच्या घरची भांडीवाली नोकरीवरून काढून टाकली. सध्या गावात कॉर्पोरेशनची इलेक्शन्स चालू आहेत. रॅलिज काढायला सगळेच पक्ष २०० रुपये रोज प्लस जेवणखावण देताहेत. त्याच काळात तिची भांडेवाली 'घरी लग्न आहे' म्हणुन १० दिवस गायब होणार होती. डेट्स म्याच होत होत्या Wink

तेव्हा लोकहो,
मी कारकुनी करून घरची भांडेवाली कशी सांभाळू? हा विचार तुमच्या भांडेवालीच्या डोक्यातही असू शकतो बरे!

बापरे उल्हासजी..
आकडे आकडी आणणारे आहेत.

त्यांच्या दृष्टीने कॅश महत्वाची, कांइंडस् मधे काय देता हे फारसे खिजगणतीत नसते.
>> पण मग काईंड न दिलेलीही ह्यांना चालत नाही. म्हणजे मी दिवाळीत एखाद्या साडीऐवजी थोडे पैसे जास्त दिले (बोनस व्यतिरीक्त) तरी साडी/वस्तु देईपर्यंत तोंड वाकडेच असते.

आमच्याकडचा अनुभव म्हणजे फक्त कपडे+भांडी+लादी या कामासाठी १ तास बाई येते. आणी ह्या एका तासातही तिची अपेक्षा असते की आम्ही तिला दुपारचे जेवण द्यावे. ह्या दिवसभर थांबणार्‍या बायका अशी जेवणाची अपेक्षा न ठेवतील तरच नवल.

म्हणजे मी दिवाळीत एखाद्या साडीऐवजी थोडे पैसे जास्त दिले (बोनस व्यतिरीक्त) तरी साडी/वस्तु देईपर्यंत तोंड वाकडेच असते. >>> हा अनुभव कॉमन आहे.
कसं आहे ना, ते आपल्याकडे काम करतात म्हणजे आपल्यावर मेहेरबानी करतात असा काहीसा ऍटिट्युड असतो काम करणार्‍या लोकांचा.

माझ्या वरच्या पोस्टमधे सांगितलेल्या दुसर्‍या उदाहरणातील बायका स्वतःचा जेवणाचा डबा घेऊन येतात.
कामाला आलेल्या घरात फक्त त्यांना चहा द्यावा लागतो.

मला घरातून बाहेर पडायला मिळतंय!
मला माझ्या शिक्षणाचा(बीए!) उपयोग करता येतोय!! (मी दगड&धोंडूकंमधे क्लेरिकल जॉबला आहे बीकेकॉम्प्लेक्सात. वट्टात १५ हज्जार मिळतात. मी रहातो/ते क्ष्क्ष ला. फक्त दीड तास जायला अन तितकाच यायला.
पण आय एंजॉय माय जॉब.
काय पर्सनल सॅटिस्फॅक्शन आहे की नाही?

>> इब्लिसजी, आपलं म्हणणं मलाही १००% पटत असलं तरी सॅटिसफॅक्शन हे व्यक्तीसापेक्ष असतं हे आपल्याला मान्य करावं लागेल. खरंच एखाद्यासाठी बीए ही डिग्री आणी १५ हजार देणारा जॉब हे खुप सॅटिसफॅक्शन देणारं असू शकतं. त्यात काहीही अयोग्य नाही. कारण आपल्याहीपेक्षा जास्त शिकलेली आणि जास्त कमावणारी माणसं जगात आहेतच. तेही आपल्याला असंच म्हणू शकतातच की..

अजुन एक मुद्दा.. ज्यावर अगदी भरपूर चर्चा ह्या धाग्यावर होऊन गेलीये तो म्हणजे.. स्त्रीने/ गृहिणीने घरी राहून घरकाम करून कितीही पैसे वाचवले तरी त्याची किंमत घरच्यांना असतेच असं नाही. ह्याउलट बाईने बाहेर नोकरी करून आणी घरी बाई ठेवुन अगदी मोजकेच पैसे सुटत असले तरी तिला बर्‍यापैकी मान असतो घरात. त्यामुळे पगारातून उरणार्‍या पगारापेक्षा नोकरी केल्याने मिळणार्‍या सन्मान/ आर्थिक स्वातंत्र्य ह्या बाबी जास्त कोणत्याही गृहिणीला जास्त महत्वाच्या वाटल्या तर त्यात नवल वाटायला नको.

मला घरातून बाहेर पडायला मिळतंय!
मला माझ्या शिक्षणाचा(बीए!) उपयोग करता येतोय!! (मी दगड&धोंडूकंमधे क्लेरिकल जॉबला आहे बीकेकॉम्प्लेक्सात. वट्टात १५ हज्जार मिळतात. मी रहातो/ते क्ष्क्ष ला. फक्त दीड तास जायला अन तितकाच यायला.
पण आय एंजॉय माय जॉब.
काय पर्सनल सॅटिस्फॅक्शन आहे की नाही?>>> हे नक्की कुणाला उद्देशून आहे? घरच्या बाईला? कोण किती शिकलंय, कोण कसला कारकूनी जॉब् करतंय आणि कुणाचा पगार किती यावर असली जनरलाईज्ड विधाने कशासाठी? बीए असणारी व्यक्ती चांगले पैसे कमावू शकत नाही का? कारकूनाने त्याचा जॉब एंजॉय करूच नये असे काही आहे का?

ज्यांना परवडतंय ते ठेवतील कामवाली. नाही परवडत ते बघतील दुसरा काही ऑप्शन. ज्या विषयामधे आपल्याला समजत नाही तिथे प्रत्येक वेळेला मत देण्याचा हास्यास्पद अट्टाहास कशासाठी? मागच्या तुमच्या पोस्टला सभ्य भाषेत व्यवस्थित उत्तर दिलं होतं. पण तरी हे असले टोमणेगिरी चालूच आहे तुमची.

बास करा आता.

<<पण मग काईंड न दिलेलीही ह्यांना चालत नाही. म्हणजे मी दिवाळीत एखाद्या साडीऐवजी थोडे पैसे जास्त दिले (बोनस व्यतिरीक्त) तरी साडी/वस्तु देईपर्यंत तोंड वाकडेच असते.>> अगदी अगदी. माझ्या लग्नाच्या वेळी साबुंनी कामवाल्या बाईला साडी द्यायला उशीर केला. लग्नानंतर दिली. शिवाय आधी जी देणार होते ती न देता दुसरी दिली. तर ती ते आजपर्यंत बोलून दाखवते. आणि अजूनही मला त्यावेळी माझ्यासाठी निवडलेल्या साडीसारखी साडी मला कधी देणार असे विचारते. लग्नाला सात वर्ष झाली आणि साबुंना जाऊन साडेसहा. ह्यामध्ये प्रत्येक दिवाळीला तिला बोनस दिलेला होताच. बरे कधी जास्त काम करेल, दिवाळीची साफ सफाई करेल तर कधीही नाही.

आजकालच्या दहावी / बारावी झालेल्या मुलींना घरकाम करून जास्त पैसे मिळवण्यापेक्षा कमी पैशात मॉलमध्ये टॉयलेट आणि जमीन सफाईची कामे करणे जास्त श्रेयस्कर वाटते. कारण त्यात मेकप करून पर्स घेऊन मिरवत मिरवत ऑफिसला जाता येते. ऑफिसला गेल्यावर तिथे काही काम करावे लागेना का. >> (हे माझे विचार चुकले आहेत.)

पियु परी >> १००% मोदन. सॅटिस्फॅक्शन हे व्यक्तीसापेक्ष असतं. आणि दुसर्‍याच्या सॅटिस्फॅक्षनला आपण आपला तराजू नाही लावू शकत.

दहावी / बारावी झालेल्या मुलींना घरकाम करून जास्त पैसे मिळवण्यापेक्षा कमी पैशात मॉलमध्ये टॉयलेट आणि जमीन सफाईची कामे करणे जास्त श्रेयस्कर वाटते.>> वल्लरीचजी याला दुसरी बाजूपण असू शकते ना? काम आणि कामाच्या वेळा फिक्स.. एसी/ बा़किचे सहकारी आणि कामासाठी हण्डग्लोज/ इतर साधने... नीट काम केले तर पुढचे प्रमोशन... सेक्युरिटी गार्ड/ सेल्सगर्ल/ वगैरे...कंपनीसाठी अशी काम करणे हे चांगलेच समजणार ना, घरगुती काम करणार्यापेक्षा... दुबईत एअरपोर्टवर बघितले होत, सगळी अशी कामे आपले देशी बांधवभगिनी करत होते...

राजू७६ - हा मुद्दा माझ्या लक्षात नव्हता आला. बरे झाले सांगितले. पण १०% सॅलरी रेज आपण घरकामाच्या बाईला सुद्धा देतो दरवर्षी. असे प्रमोशन मिळते हे माहित नव्हते.

कामासाठी हण्डग्लोज/ इतर साधने - हे आम्ही आमच्या घरात पेशंटची काळजी घेणार्‍या बाईला सुद्धा देतो. केर लादी करणार्‍यांना मात्र देत नाही.

शिवाय आधी जी देणार होते ती न देता दुसरी दिली >>>> हे सगळे डिटेल्स त्या बाईला कुणी दिले?

आजकालच्या दहावी / बारावी झालेल्या मुलींना घरकाम करून जास्त पैसे मिळवण्यापेक्षा कमी पैशात मॉलमध्ये टॉयलेट आणि जमीन सफाईची कामे करणे जास्त श्रेयस्कर वाटते. कारण त्यात मेकप करून पर्स घेऊन मिरवत मिरवत ऑफिसला जाता येते. >>>> हे तुला कुणी सांगितले?

एकाचे सॅटिसफॅक्शन दुसर्‍याच्या तराजूत तोलता येत नाही असं तूच म्हणालीस ना?

कुणाच्या घरी जाऊन लादी पोछा करण्यापेक्षा तेच काम मॉलमध्ये केलेले सुरक्षित वाटत असेल. तिथे इतर लोक असतात, दुकानांमधला स्टाफ असतो, सिक्युरिटी असते, कॅमेरे असतात.

हे सगळे डिटेल्स त्या बाईला कुणी दिले >> माझ्या साबा..

आजकालच्या दहावी / बारावी झालेल्या मुलींना घरकाम करून जास्त पैसे मिळवण्यापेक्षा कमी पैशात मॉलमध्ये टॉयलेट आणि जमीन सफाईची कामे करणे जास्त श्रेयस्कर वाटते. कारण त्यात मेकप करून पर्स घेऊन मिरवत मिरवत ऑफिसला जाता येते>> हा पोस्ट चुकला माझा. सगळ्या बाजूने विचार नाही केला. पण मी पोस्ट काढत नाहीये..

दहावी / बारावी झालेल्या मुलींना घरकाम करून जास्त पैसे मिळवण्यापेक्षा कमी पैशात मॉलमध्ये टॉयलेट आणि जमीन सफाईची कामे करणे जास्त श्रेयस्कर वाटते.>>>

आमच्या भागातल्या बर्‍याच कामवाल्यांच्या मुली ब्युटीपार्लरमध्ये काम करतात. सुरवात साफसफाईच्या कामापासूनच होते. पण मग ते काम करता करता वॅक्सिंग /पेडीक्युअर शिकणं, शांपु करून देणं, हेअरड्रेसरच्या हाताखाली काम करणं (यात शक्यतो केस सेट करताना ड्रायर वापरणं, स्टीम देणं इ काम असतं).
एखादी जर कामात हुशार असेल तर कोर्स करून मेकअप, फेशियल या बाबीपण शिकून देतात.

या मुलींना पार्लरमध्ये खूप कमी पगार (साधारण्तः नवशिक्या मुलीला ३००० ते ट्रेनिंग घेतलेल्यांना जास्तित जास्त ८-१० हजार. रुपये. मेन हेअरड्रेसर किंवा मेकअप करणार्‍यांना १५) मिळतो. पण या कामामध्ये तुलनेनी घरकामापेक्षा प्रतिष्ठा जास्त आहे. सुरवातीला दिवसाचे तिन हजार मिळाले तरी नंतर लवकरच काम शिकल्यावर तोडे जास्त पैसे मिळतात. रहाणीमान बर्‍यापैकी उंचावतं. पुढेमागे स्वतःचं काम करायचि संधी मिळण्याची शक्यता वाढते.

मला तरी या मुलींनी/ मुलांनी घरकामापेक्षा दुसरं एखादं स्कीलवालं (सेल्सगर्ल्चं काम करणं सुद्धा स्कील असलेलंच काम आहे) काम शिकलेलं /केलेलं बघायला आवडेल. (मला स्वतःला मुलाला सांभाळणार्‍या मुली पार्लरमध्ये आणि कुक म्हणून काम करायला लागल्यामूळे त्रास झाला होता..पण आयुष्यभर ५-७ हजाराचं घरकाम करत रहाण्यापेक्षा या कामांमध्ये त्यांचा फायदा होता हे ही खरंच. )

पोस्ट बहूतेक कै च्या कै झाली आहे लिहिण्याच्या नादात. असो..

पण तरी हे असले टोमणेगिरी चालूच आहे तुमची.

बास करा आता.
<<
नंदिनी,
जो हुकुम.
बास करतो. काय करणार? हुकुम पाळावाच लागतो ना! मालक आहात तुम्ही इथल्या!!

पण महोदया, माझे "टोमणे" नाहियेत. मला जे वाटते ते मी बोलतोय. तुमची काही हरकत??

जगात काय फक्त तुमच्याच घरी कामवाल्या आहेत का? की कामवाल्यांना पगार हा फक्त बायकांचा विषय आहे? जनरलायझेशन मी करतो???

>>
ज्यांना परवडतंय ते ठेवतील कामवाली. नाही परवडत ते बघतील दुसरा काही ऑप्शन. ज्या विषयामधे आपल्याला समजत नाही तिथे प्रत्येक वेळेला मत देण्याचा हास्यास्पद अट्टाहास कशासाठी? मागच्या तुमच्या पोस्टला सभ्य भाषेत व्यवस्थित उत्तर दिलं होतं. पण तरी हे असले टोमणेगिरी चालूच आहे तुमची.
<<

व्हू द हेल आर यू टू डिसाईड की मला या विषयात समजत नाही?? हे अती होतंय तुमचं. कसली सभ्या भाषा तुमची?? ही अशी?? आरसा पहा जरा!

ज्यान्ना जे परवडतंय ते, अन मी पाहून घेऊ. तुम्ही कोण मला शिकविणार्‍या? तुमच्या घरच्या नोकरांना मी पगार देत नाही, अन माझ्या घरच्यांना तुम्ही नाही. नोकर अन नोकरांचा पगार याबद्दल लै ज्ञान उत्पन्न झालंय का तुमच्या जवळ आपोआप??? प्रत्येकच वेळी माझ्याशी असला दीडशहाणपणा कशाला करता हो तुम्ही?

बाकी नेहेमी प्रमाणे, 'तुमचे पैसे' 'तुमचा टीव्ही' 'तुमची म्याच' इत्यादी प्रकारची तुमची आर्ग्युमेंट्स मला पाठ आहेत. पुढचे 'अहो अ‍ॅडमिन' असे असते
.
असो.

सध्या तुमच्या स्टाईलने, अहो अ‍ॅडमिन, या बाईंना काही समज देता येईल का? या असलं पर्सनली घेऊन का ताणतात माझ्या पोस्टींना? असे म्हणतो.

रच्याकने. सभ्य उत्तराबद्दल धन्यवाद! उपकार झालेत

@ नंदिनी.

मी शक्य तितक्या सभ्य शब्दांत लिहिले आहे, व अ‍ॅडमिन यांनाही विपु केलेली आहेच. नेक्स्ट टाईम, कृपया सभ्य भाषेत बोलत जा.

थयथयाट काय असतो, ते तुम्ही पाहिलं नाहिये अजून. धन्यवाद!

हा धागा नक्की कशासाठी वल्लरी यांना कामवाली बाई शोधून देण्यासाठी की कामवाल्या बायांचा पगार, पॅकेज विषयी चर्चा, त्यांचे गुण-अवगुण याविषयी गप्पा यांसाठी आहे?

असो. कामवाल्या बाया ह्या अनेकांच्या गप्पांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे वाटतं. Happy

rajasee,दक्षिणा यांच्या पोस्ट आवड्ल्याच.rajasee,ने म्हटल्याप्रमाणेच माझ्या घरी बाई आहे.
भिडेनी म्हटल्याप्रमाणे ह्या बायकांना तुम्ही जेवणखाण इ.काय देता यापेक्षा कॅश महत्वाची असतेच.जेवणखाण न देता तुम्ही त्यांना पगार जास्त द्या किंवा आपल्या मनाला वाटते म्हणून आपण जेवण देतो म्हणायचे(तेच खरे आहे).
वल्लरीच
आपण व कामवाली,दोघांना कामाची गरज असते.किंबहुना आपल्याला जास्त गरज असते.पण हे कामवालीला दर्शवू नका नाही येत म्हणाली तरी पगार वाढवणे इ. बाबी नका करू.काही दिवस त्रास होतो. पण आपल्या परिस्थितीचा
तिने फायदा घेता नये.
पियु परी >> १००% मोदन. सॅटिस्फॅक्शन हे व्यक्तीसापेक्ष असतं. आणि दुसर्‍याच्या सॅटिस्फॅक्षनला आपण आपला तराजू नाही लावू शकत.>>>>> अगदी खरंय!

पलंगास्थित बाई/पुरुष सांभाळायचे सध्याचे मुंबईचे भाव असे आहेत.

७५०-९०० रुपये १२ तास दिवसाचे, जेवण नाही. पण मध्ये दोन तास सुट्टी.
६०० रुपये, नाश्ता.

पुण्याचे रेट
४५०-५०० जेवणासहित
५००-६५० जेवण नाही. हे दिवसाचे रेट आहेत.
पेशंट स्ट्रोक, पार्किंनसन्स, मलटिप्ल स्क्ले.. वगैरे असतील तर ज्यास्त...

वल्लरीच, एक राहिले... हे ब्युरोचे रेट आहेत,आयांचे नाहीत.
आमच्य्य इथे पुण्यात(कोथरूड वगैरे) असाल तर बरे आहेत आयांचे रेट, ब्युरो तसे महाग आहे. पेशंटचीच कामं करतील.

Pages