आई जेव्हा रागावते ....

Submitted by पुरंदरे शशांक on 3 December, 2013 - 22:03

आई जेव्हा रागावते .... Uhoh

घरात पाऊल टाकले तरी
आईच्या नावाने ओरडा नाही ???

का बाई शांत दिस्तयं घर ???
किती ते बावरं माझं मन ....

झालंय काय या सोनूला
मार्गच नाही कळायला

खोलीत पसरलेत वाटतं म्हाराज
सुस्त कस्काय सारं कामकाज ??

काय रे असा गप्प गप्पसा
पडलास का कुठे? बोल पटापटा

डोळे हे सांगतात वेगळेच बरं
तुझं हे लक्षण नव्हे रे खरं Angry

दिस्ताएत मला तुकडे अजून
कुठली बरणी ठेवलीस फोडून ?? Angry

कारट्या, कितीदा सांगितलंय तुला
किती रे छळशील अजून मला Angry

कामाने जातीये मी आधीच वैतागून
अन तू ठेव अजून पसारा मांडून

बास कर आता ते झटक नि फटक
मला काय कळत नाही तुझे हे नाटक

नकोय मला पाणी नि बिणी
कामाने इथे दमत नाही कोणी

काही नको लावूस ती लाडीगोडी
कळतीए मला तुझी लबाडी

गळ्यात माझ्या पडतोस ना अस्सा
राग हा मेला उडत जातो कस्सा ..... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही!