Submitted by पुरंदरे शशांक on 28 November, 2013 - 04:03
तोतो तोतो करु या छान ......
चला चला लौकर तो तो करु
छान छान काजळ-तिटी लाऊ
रडायचं नाही बरं का गं बये
उग्गाच हसून दाखवते काये
डोळे मिटा पट पट पट
साबण लाऊ चट चट चट
नको गं रडू सोनू-बाळा
तो बघ गेला उडाला काव्ळा
आटपा लवकर जायचंय ना भूर्र....
किती बै चाल्लीये हिची कुर्कुर
"अगं ए बये चल लौकर
किती हा खेळ सार्या घरभर
स्कूलबस येईल इतक्यात बघ
वाजेल हॉर्न पँ पँ मग....
सोड त्या बाहुलीला ठेव खाली
तोतोचा खेळ खेळा संध्याकाळी..."
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कित्ती छान कविता आहे लेकाला
कित्ती छान कविता आहे लेकाला असंच म्हणत पुन्हा तोतो घालायची प्रकर्षानं इच्छा झाली! खुप आवडली.
सही आहे हे....
सही आहे हे....
गोड आहे
गोड आहे
मस्त, माझी नात आता मस्ती
मस्त,
माझी नात आता मस्ती करायला लागलीय. तिला ऐकवायला हवी !
तोतो तोतो म्हणजे काय??
तोतो तोतो म्हणजे काय?? अंघोळ??
हो! मस्त आहे कविता, आवडली.
हो! मस्त आहे कविता, आवडली.:स्मित:
वाह...गोड कविता.
वाह...गोड कविता.
खूपच गोड. जियो
खूपच गोड. जियो
वा, गोडच
वा, गोडच
तोतो तोतो म्हणजे काय??
तोतो तोतो म्हणजे काय?? अंघोळ?? >>> हो बरोबर आंघोळच
बुडुशा/भुडुशा, तोतो, आंबो असे बरेच मजेशीर शब्द आहेत छोट्यांच्या आंघोळीला
सर्वांचे मनापासून आभार .....
मस्त कविता! तुम्ही फार छान
मस्त कविता!
तुम्ही फार छान लिहिता लहानांचं, लहानांसाठीचं. मनापासून आभार!
मस्त, गोड आहे, आवडली कविता.
मस्त, गोड आहे, आवडली कविता.
शशांक्...तो शेवटचा टर्न
शशांक्...तो शेवटचा टर्न विलक्षण आहे.
तोतो... भुश्शं...
एक छान आठवण... माझ्या सासूबाई, लेकाला भारतात आंघोळ घालताना, शेवटचे तांबे नद्यांची नावं घेऊन ओतीत...
इथे सिडनीला आल्यावर इथल्या नद्यांची नावं माहीत करून घेऊन म्हणायच्या.
खूप ग्रेट लिहिता तुम्ही
खूप ग्रेट लिहिता तुम्ही शशांकजी .....
धन्स
सिडनीला आल्यावर इथल्या नद्यांची नावं माहीत करून घेऊन म्हणायच्या.<<< ग्रेट आहेत तुमच्या सासूबाई संस्कृती म्हणजे काय ते त्यानी किती छोट्याश्या कृतीतून कित्ती सह्ही प्रकारे शिकवलय ...कित्ती छान
गोड्च आहे तोतो!
गोड्च आहे तोतो!