तोतो तोतो करु या छान ......

Submitted by पुरंदरे शशांक on 28 November, 2013 - 04:03

तोतो तोतो करु या छान ......

चला चला लौकर तो तो करु
छान छान काजळ-तिटी लाऊ

रडायचं नाही बरं का गं बये
उग्गाच हसून दाखवते काये

डोळे मिटा पट पट पट
साबण लाऊ चट चट चट

नको गं रडू सोनू-बाळा
तो बघ गेला उडाला काव्ळा

आटपा लवकर जायचंय ना भूर्र....
किती बै चाल्लीये हिची कुर्कुर

"अगं ए बये चल लौकर
किती हा खेळ सार्‍या घरभर
स्कूलबस येईल इतक्यात बघ
वाजेल हॉर्न पँ पँ मग....
सोड त्या बाहुलीला ठेव खाली
तोतोचा खेळ खेळा संध्याकाळी..."

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोतो तोतो म्हणजे काय?? अंघोळ?? >>> हो बरोबर आंघोळच
बुडुशा/भुडुशा, तोतो, आंबो असे बरेच मजेशीर शब्द आहेत छोट्यांच्या आंघोळीला Happy

सर्वांचे मनापासून आभार .....

शशांक्...तो शेवटचा टर्न विलक्षण आहे.
तोतो... भुश्शं...
एक छान आठवण... माझ्या सासूबाई, लेकाला भारतात आंघोळ घालताना, शेवटचे तांबे नद्यांची नावं घेऊन ओतीत...
इथे सिडनीला आल्यावर इथल्या नद्यांची नावं माहीत करून घेऊन म्हणायच्या.

खूप ग्रेट लिहिता तुम्ही शशांकजी .....
धन्स

सिडनीला आल्यावर इथल्या नद्यांची नावं माहीत करून घेऊन म्हणायच्या.<<< ग्रेट आहेत तुमच्या सासूबाई संस्कृती म्हणजे काय ते त्यानी किती छोट्याश्या कृतीतून कित्ती सह्ही प्रकारे शिकवलय ...कित्ती छान