माकडाची मज्जा

Submitted by पुरंदरे शशांक on 29 November, 2013 - 00:24

माकडाची मज्जा

माकडभाऊ हूप हूप हूप
झाडावर बसले जाऊन चुप

बघायला जमली गर्दी खूप
मुले ओरडली शेपटीला तूप

वेफर्स वाजता कुर कुर कुर
उतरले खाली सुर सुर सुर

वेफर्स घेतले हातातून ओढून
ठेवले गालात नीट दडवून

पहातात नीट निरखून निरखून
ठेवलाय का खाऊ कोणी लपवून

गंमत एक झाली अशी
फुटला फुगा फटदिशी

आवाज ऐकून मोठासा
घेतला झाडाचा आडोसा

फुटता फुगे फटाफाट
पळाले भाऊ धूम चकाट

मुले ओरडली थांबा ओ.. भाऊ
अजून थोडे वेफर्स देऊ ????

cartoon-animals-monkey.gif

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचं मुलीच्या शाळेत माकड / वानर आलं होतं, मुलं खेळत होती मैदानावर आणि ते बघत बसलं होतं, मुलीला पोचवून बाहेर आले होते त्यामुळे तिला दाखवायचं राहून गेलं Sad

सर्वांचे मनापासून आभार .....

तुम्ही पुस्तक काढा आता लवकर. >>>> ते बघू केव्हा जमेल ते, तुम्हा सार्‍यांचे उत्साहवर्धक प्रतिसाद हेच मोठे पारितोषिक आहे .... आणि मुख्य म्हणजे या बालकविता ऐकल्यावर छोट्या दोस्तांना काय वाटते ते जाणून घ्यायला अधिक उत्सुक आहे - ते कृपया कळवणे ....

फार फार आवडली
अतीशय उत्तम बालकविता करता तुम्ही नेहमीच
तुमच्या आणि ग्लोरी च्या बालकविता वाचल्या की मलाही कराव्या वाटतात पण मी लिहिले तरी इतके छान निरागस लिहू शकणारच नाही हे पक्के माहीत असल्याने धाडसच होत नाही मग मी तसे करण्याचा विचारही गप्गुमान सोडून देतो