रुमाल व तोरण

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 November, 2013 - 02:35

अवल मॅडमच्या ऑन्लाईन क्लास मध्ये शिकलेले हे रुमाल व तोरण.

रुमाल
१)

२)

तोरण
३)

४) हे उलट बाजूने देठे दिसण्यासाठी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर,
जागू तोरणात, त्या फुलांच्या खालीच थोडा पिवळा रंग वापरून आणखी एक फुल करता येईल.
नुसत्या साखळीने तांदळाची ओंबी आणि छोटेसे पॉम पॉम करुन ते जांभळे गोंड्याचे फुल पण जमेल.
( मला सांगायला काय जातंय ? )

दोन्ही अप्रतिम..
रूमाल बघुन आजी ची आठवण झाली. माझ्या आजी ने दोर्‍याचे विणलेले रूमाल अजूनही जपून ठेवले आहेत.

दोन्ही सुंदर झालंय!! आणि शिवाय रुमाल बराच मोठा पण केलेला दिसतोय! मस्त! तोरण चांगलंच ट्रिकी असून तू फार सफाईदार केलं आहेस! ....... दोन्ही खूप आवडले... Happy

शांकली अगदी बरोब्बर लिहिलस
हे डिझाईन खरच तसे अवघड आहे. पण जागूने अगदी मस्त केले. तिने फुलांना हिरवे देठही केलेत आपल्या मनाने. शाब्बास ग Happy
दिनेशदा मस्त कल्पना
जागू, हा माझा झब्बू Wink

my toran copy.jpgDSC_1702 copy.jpg

सुंदर ! अर्थात झब्बूही !!
असल्या बारिक, नाजूक कामात कसब मिळवणार्‍यांचं मला मनापासून कौतुक वाटतं !!

अवल, मी अर्धगोल पॉम पॉम बघितले आहे. चकतीच्या केवळ अर्ध्याभागातच लोकर गुंडाळून केले होते ते.
नक्की जमतील.

तांदळाच्या ओंब्या जरा देठासकट तोडून, ते देठ एकमेकात गुंफून ( साधारण सुपासारखा आकार किंवा आपली
दसर्‍याची पाटीवरची सरस्वती असते तो आकार ) केलेले मस्त तोरण मला ठाण्याला मिळाले होते. एवढे सुबक आणि घट्ट विणले होते कि ओंब्या सुकल्यावरही ते विसविशीत झाले नव्हते.

Pages