मला आवडलेली आत्मचरित्रं..

Submitted by _आनंदी_ on 15 November, 2013 - 00:53

इथे पुस्तकांविषयी चे बरेच धागे आहेत ,,,
तरी फक्त आत्मचरित्रांबद्दल माहिती मिळवी या हेतुने हा धागा काढत आहे...

एखद्या प्रसिद्ध अथवा गुणी व्यक्ती, त्याच्या आत्मचरित्रातुन जाणुन घेण्याची मजा काही औरच आहे,,,

कृपया आपल्याला आवडलेल्या आत्मचरित्र पुस्तकांची येथे नोंद करा..

***************************************************
***************************************************
***************************************************
०७/०१/२०१४ पर्यंत नोंदवलेली काही आत्मचरित्रे

मराठी

१) प्रकाशवाटा:- प्रकाश आमटे
२) एकटा जीव :- दादा कोंडके
३) अग्नीपंख:- ए.पी.जे. अब्दुल कलाम

४) झिम्मा :- विजया मेहता
आत्मचरित्र कस असाव याचा ऊत्तम वस्तुपाठ म्हणजे झिम्मा
कुठेही कोणावर दोषारोप नाही; सनासनाटी पनाच्या नावाखाली भड़क पणा नाही . अतिशय संयत भाषेत लिहिलेल / मराठी नाट्य सृष्टिचा महत्वाचा दस्तावेज अशी याची नोंद होईल

५) लमाण :- डॉ श्रीराम लागू
डॉक्टरान्च्या स्वभावाप्रामाणे परखड भाषेचा अनुभव देणार. वेळोवेळि स्वताला काढलेले चिमटे ; भोवतालच्या परिस्थितीचे ऊत्तम आणि अचूक विश्लेषण हे जमेचे मुद्दे

६)स्वतःविषयी :- अनील अवचट
७) सत्याचे प्रयोगः- म. गांधी
८) नाच गं घुमा - माधवी देसाई
९) आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
१०) 'कुणा एकाची भ्रमणगाथा':- गोनिदा
११) कॉलनी :- सिद्धार्थ पारधे.
१२) स्म्रुतीचित्रे:- लक्ष्मीबाई टिळक.
१३) रास :- सुमा करंदीकर.
१४) रांगोळीचे ठीपके:- वासंती गाडगीळ.
१५) झोंबी- आनंद यादव.
१६) आय डेअर- किरण बेदी.
१७) एक झाड दोन पक्षी :- विश्राम बेडेकर.
१८) हृदयस्थ- नीतू मांडके.
१९) जगाच्या पाठीवर :- सुधीर फडके.
२०) एका साळीयाने- लक्ष्मीनारायण बोल्ली.
२१) बंध-अनुबंध - कमल पाध्ये.
२२) समिधा - साधना आमटे.
२३) मास्तरांची सावली - कृष्णा सुर्वे.
२४) वार्ड नं. ५ - डॉ.रवी बापट
२५) मुसाफिर :-अच्च्युत गोडबोले
२६) मी दुर्गा खोटे - श्रीम. दुर्गा खोटे शब्दांकन आहे.
२६) सांगत्ये ऐका - हंसा वाडकर
२७) कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे
२८) एंडे कथा(माझी कथा) - कमला दास. नंतर मुस्लीम धर्म स्वीकारून पै.वासी झालेल्या.
२९) दि लास्ट प्रिन्सेस - गायत्रीदेवी.
३०) अंतर्यामी सूर गवसला - श्रीनिवास खळे
३१) माझा साक्षात्कारी हृदयरोग- अभय बंग ( ह्याला आत्मचरित्र म्हणण्यापेक्षा, हार्ट प्रॉब्लेम आल्यानंतर आलेले अनुभव, त्यातून ते काय शिकले आणि आपली जीवनशैली कशी असावी ह्याबद्दल हे पुस्तक आहे.)

३२) उपरा- लक्ष्मण माने.
३३) उचल्या- लक्ष्मण गायकवाड
३४) बलुतं- दया पवार.
३५) आयदान- उर्मिला पवार.
३६) ताई मी कलेक्टर व्हायनू -राजेश पाटील
३७) ताठ कणा.-डॉ.पी.एस.रामाणी (नाव नक्की नाही)
३८) तराळ-अंतराळ- शंकरराव खरात; अजिबात आक्रस्ताळे न होता दलित आत्मचरित्र लिहिता येते आणि तरीही ते तितकेच दाहक आणि अस्वस्थ करणारे असू शकते याचे कदाचित सर्वोत्कृष्ट उदाहरण.

३९) माय एक्सपेरीमेंट्स विथ ट्रूथ- गांधीजी; हे खरेतर मूळ गुजरातीतूनच वाचले पाहिजे, किमान इंग्रजीतरी; मराठी अनुवाद वाचू नका फार पांचट आहे.
४०) 'परतीचा प्रवास' :-वनमालाबाई
४१) लंडनच्या आजीबाईची कहाणी :- लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य (चरित्र)
४२) स्टुडीओ- सुभाष अवचट
४३) तीन दगडांची चूल- विमल मोरे ( भटक्या जोशी समाजाचे चित्रण).
४४) कोल्हयाटयाचे पोर- किशोर शांताबाई काळे
४५) 'मयादा' हे आत्मचरित्रपण चांगले आहे, मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद आहे. इराकमध्ये सद्दामच्या राजवटीत तुरुंगात गेलेल्या 'मयादा' नावाच्या सुशिक्षित आणि स्वतःची प्रेस असणाऱ्या स्त्रीचे आत्मचरित्र आहे.

४६) 'ईराणमधून पलायन' हापण मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद आहे. ईराणमध्ये जुलमी राजवट आल्यानंतर एका स्त्रीने पलायन केले मुलासह, प्रथम फ्रान्समध्ये आली आणि नंतर कॅनडा येथे स्थायिक झाली.
४७) कुणास्तव कुणीतरी --- यशोदा पाडगावकर
४८) हसरे दु:ख - चाल्री चाप्लीन वरचे पुस्तक
४९) चार नगरातले माझे विश्व - जयंत नारळीकर
५०) ही श्री ची इच्छा -श्रीनिवास ठाणेदार
५१) ईडली ऑर्कीड आणि मी - कामत
५२) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
५३) रेडीयमः- मादाम मेरी क्युरी (शाळेत असताना रेडीयम नामक पुस्तक वाचले होते - मादाम मेरी क्युरी वरचे पुस्तक मला अतिशय आवडले होत...पण नाव नक्की रेडीयम च होते का हे नीट आठवत नाही.)

५४) द्रुष्टीदाता:- ब्रेल लिपी ज्याने शोधली त्याच्यवरचे (नाव नक्की आठवत नाही )
५५) उष:काल:- उषा किरण
५६) उपरा- लक्ष्मण माने.
५७) उचल्या- लक्ष्मण गायकवाड
५८) आमचा बाप आणि आम्ही -नरेंद्र जाधव
५९) 'इनसाइड द गॅस(gas) चेंबर्स' :- 'श्लोमो व्हेनेत्सिया' यांचे अनुभवकथन . सुन्न करणारा अनुभव. संपादन-जीन माउटापा, इंग्रजी अनुवाद- andru brown. मराठी अनुवाद- सुनीती काणे.
६०) राजमाता:- वि स वाळिंबे
६१) "माझंही एक स्वप्न होतं' ( I too had a dream...Vergese Kurien as told by Gauree Salavee):- सुजाता देशमुख यांनी अनुवाद केलेले श्री.व्हर्गीस कुरियन यांचे आत्मचरित्र.खूप स्पष्ट,निर्भीड वाटतेय.
६२) स्मृतीपूजा:- प्रभावती भावे (पु.भा.भावे यांच्या पत्नी)
६३) जेव्हा माणूस जागा होतो :- गोदावरी परुळेकर : हे आत्मकथनपर आहे ,यातला भाग शालेय अभ्यासक्रमात होता. आणखी एक प्रकरण अलीकडेच एका दिवाळी अंकात वाचले.
६४) माझा पोवाडा:- शाहिर साबळे
६५) धाकटी पाती:- सूर्यकांत
६६) टाईमपास:- प्रोतिमा बेदी (कबीर बेदी ची एक्स बायको)
६७) गोष्ट एका मारवाड्याची'- गिरीश जाखोटिया (आत्मचरित्र नव्हे पण बरेचसे तसेही.)
***************************************************************************************************************************************************************

काही इंग्रजी:-
१) 'Iron Lady' :- Margaret Thatcher
२) Madeleine Albright:- Madam Secretary
३) Early days:-Sir Winston Churchill
४) माझा लढा (main kampf) :- हीटलर चा
५) A diary of a young girl:- Anne Frank
६) डेझर्टर- विजय देवधर (एका जर्मन मेसेंजरच्या पलायनाची गोष्ट)
७) सैबेरियातून पलायन (लेखक आठवत नाही, एका जर्मन युद्धकैद्याचे रशियातून पलायन)

८) काळी बाई- ब्राझीलमध्ये झोपडपट्टीत राहणारी भंगार विकणारी बाई, फक्त दुसरी शिकलेली पोर्तुगीजमध्ये पण रोज आपली डायरी लिहायची सवय होती तिला. एका पत्रकाराने तिचे लिखाण प्रसिद्ध केले आणि ती फेमस झाली, तिचे चांगल्या वस्तीत राहून मुलांना वाढवायचे स्वप्न पूर्ण झाले.

९) अँजेलाज अ‍ॅशेस - फ्रँक मॅकोर्ट
१०) Iran Awakening :- Shirin Ebadi:- ह्या पुस्तकाच्या इराण जागा होतोय या नावाने प्रतिमा जोशीनी मराठीत अनुवाद केला आहे

११) Desert Flower :- Waris Dirie
१२) Agony and Ecstasy:- a biography of Michael Angelo by Irving Stone
१३) Clarence Darrow for defense:- biography of Clarence Darrow by Irving Stone
१४) In the line of fire :- Parvez Musharraf
१५) Daughter of Destiny :- Benazeer Bhutto
१६) Sunny Days - Sunil Gavaskar
१७) 4th Part Dashadwar se sopan tak:- Harivanshrai Bachchan
१८) Every Second Counts :- Lance Armstrong
१९) Winning :- Jack Welch
२०) Iacocca :- Lee Iacocca
२१) Open :- Andre Agassi
२२) My Life :- Brett Lee
२३) Made in Japan :- Akio Morita (Sony)
२४) A Double Life :- Alyque Padamsee
२५) Controversially Yours :- Shoaib Akhtar
२६) Genghis Khan and the Making of the Modern World -: Ghenghis Khan (हे चरीत्र आहे)
२७) Jinnah :- By Jaswant Singh
२८) The test of my life:- युवराज सिंग
२९) Out of comfort zone:- स्टिव्ह वॉ
३०) Indian summers :- जॉन राईट
३१) ऑन द लाईन :- सेरेना विल्यम्सचे
***************************************************************************************************************************************************************
काही चुकले असल्यास / राहिले असल्यास सांगा.. तसा बदल करेन..... Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीच थोडी सुरुवात करते..
प्रकाशवाटा वाचले..
खुपच सुंदर पुस्तक ..
आनंदवन ला जाण्याचा काही दिवसांपुर्वी योग आल्याने मनाला भिडलं..

नुकतीच वाचलेली आणि आवडलेली आत्मचरित्र --

1) झिम्मा -- विजया मेहता

आत्मचरित्र कस असाव याचा ऊत्तम वस्तुपाठ म्हणजे झिम्मा
कुठेही कोणावर दोषारोप नाही; सनासनाटी पनाच्या नावाखाली भड़क पणा नाही . अतिशय संयत भाषेत लिहिलेल / मराठी नाट्य सृष्टिचा महत्वाचा दस्तावेज अशी याची नोंद होईल

2) लमाण -- डॉ श्रीराम लागू

डॉक्टरान्च्या स्वभावाप्रामाणे परखड भाषेचा अनुभव देणार. वेळोवेळि स्वताला काढलेले चिमटे ; भोवतालच्या परिस्थितीचे ऊत्तम आणि अचूक विश्लेषण हे जमेचे मुद्दे

vinayak .. एकटा जीव खुप दिवसांपसुन वाचायचे आहे ... बघु आता मिळवेनच..
मी नतशा.. 'स्वतःविषयी' हे कोणाच पुस्तक आहे .. आणि कोणाबद्दल आहे?
जाई प्रमाणेच सगळ्यानी आपल्याला आवडलेले आत्मचरित्र कोणाबद्दल आहे हे लिहिल तर खुप छान संग्रह होईल..

मला आवडलेली काही आत्मचरित्र

नाच ग घुमा - माधवी देसाई
एकटा जीव - दादा कोंडके
आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
'Iron Lady' - Margaret Thatcher
Madam Secretary - Madeleine Albright

खुप वाचली आहेत. गोनिदा यांचे 'कुणा एकाची भ्रमणगाथा'

प्रकाशवाटा- प्रकाश आमटे.

नाच गं घुमा- माधवी देसाई.

आहे मनोहर तरीही- सुनीता देशपांडे.

कॉलनी- सिद्धार्थ पारधे.

स्म्रुतीचित्रे- लक्ष्मीबाई टिळक.

रास- सुमा करंदीकर.

रांगोळीचे ठीपके- वासंती गाडगीळ.

अग्निपंख- अब्दुल कलाम.

झोंबी- आनंद यादव.

आय डेअर- किरण बेदी.

आत्ता एवढीच आठवत आहेत पण अजून खूप वाचली आहेत.

वरची सर्व मला आवडली.

हृदयस्थ- नीतू मांडके.

जगाच्या पाठीवर- सुधीर फडके. (नुकतेच भावाने दिलय वाचायला पण अजून वाचले नाही).

एका साळीयाने- लक्ष्मीनारायण बोल्ली.

सुर्यकांत यांचे पण आत्मचरित्र वाचले आत्ता नाव आठवत नाहीये.

http://kharedi.maayboli.com/shop/Lamaan-2354-2350-2366-2339.html इथे आहे लमाण (साठा समाप्त अशी पाटी आहे).

http://kharedi.maayboli.com इथे शोधलंत तर कळेल कोणती पुस्तके आहेत किंवा नाहीत. एखादे नसेल आणि हवे असेल तर अ‍ॅडमिन न कळवा.

आहे मनोहर तरी - किती पटले / नाही पटले हे वेगळे पण आत्मचरित्र म्हणून आवडले.>>+१

नाच गं घुमा- माधवी देसाई.

स्मृतीचित्रे- लक्ष्मीबाई टिळक.

रास- सुमा करंदीकर.

रांगोळीचे ठिपके- वासंती गाडगीळ.

अग्निपंख- अब्दुल कलाम.

झोंबी- आनंद यादव.

एक झाड दोन पक्षी -विश्राम बेडेकर

बंध-अनुबंध - कमल पाध्ये.

हृदयस्थ- नीतू मांडके.

जगाच्या पाठीवर- सुधीर फडके.

समिधा - साधना आमटे.

मास्तरांची सावली - कृष्णा सुर्वे.

वार्ड नं. ५ - डॉ.रवी बापट

इतर बरीच आहेत.त्यात अनुवादितही आहेत्,पण नावे आठवत नाहीत.

बंध- अनुबंध मीपण वाचले.

आचार्य अत्रे यांच्या पत्नीचे मला वाटते सुधा अत्रे यांचेपण वाचले नांव आठ्वत नाही, वनमालाबाईचेपण वाचले आहे, कोणाला नावे आठवत असतील तर लिहा प्लीज.

अच्च्युत गोडबोलेंचं 'मुसाफिर' कुणी वाचलंय का? आजच्या पिढीतील प्रत्येक मुलाने - विशेषत: संगणक क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. मुंबई आय.आय.टी. मधून केमिकल इंजिनिअर असलेल्या या व्यक्तीने मोठमोठ्या आय.टी. कंपन्यांमधे सी.ई.ओ. सारखी पदे मिळवली. प्रत्येक क्षेत्रातला या व्यक्तीचा अनुभव आणि त्या अनुभवांचे शब्दचित्रण वाचण्यासारखे आहे. या वर्षात आम्ही जवळ जवळ दहा पुस्तके (मुसाफिर) विविध लोकांना भेट म्हणून दिली. Happy

आचार्य अत्रे यांच्या पत्नीचे मला वाटते सुधा अत्रे यांचेपण वाचले नांव आठ्वत नाही>>. हो वाचले आहे.नाव आठवत नाही.
१)मी दुर्गा खोटे - श्रीम. दुर्गा खोटे शब्दांकन आहे. पण फार सुरेख आहे.
२)सांगत्ये ऐका - हंसा वाडकर
३)कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे
४)एंडे कथा(माझी कथा) - कमला दास. नंतर मुस्लीम धर्म स्वीकारून पै.वासी झालेल्या.
५)दि लास्ट प्रिन्सेस - गायत्रीदेवी. अनुवाद वाचलाय.

सांगते ऐका आणि वॉर्ड नं ५ वाचले आहे.

माझा साक्षात्कारी हृदयरोग- अभय बंग ( ह्याला आत्मचरित्र म्हणण्यापेक्षा, हार्ट प्रॉब्लेम आल्यानंतर आलेले अनुभव, त्यातून ते काय शिकले आणि आपली जीवनशैली कशी असावी ह्याबद्दल हे पुस्तक आहे.)

उपरा- लक्ष्मण माने.

उचल्या- लक्ष्मण गायकवाड

बलुतं- दया पवार.

आयदान- उर्मिला पवार.

अनुवादित आत्मचरित्रेपण खूप वाचली आहेत, नावे लिहून ठेवायला हवी होती, लक्षात राहत नाही.

डेझर्टर- विजय देवधर (एका जर्मन मेसेंजरच्या पलायनाची गोष्ट)

सैबेरियातून पलायन (लेखक आठवत नाही, एका जर्मन युद्धकैद्याचे रशियातून पलायन)

नेदरलँड्मधल्या ज्यूंना मदत करणाऱ्या दोन बहिणींना पकडले जाते, नंतर एक बहिण वाचते मग तिची सुटका होते, हे खूप छान पुस्तक आहे. कोणी वाचले असेल तर नाव आठवलं तर लिहा इथे.

काळी बाई- ब्राझीलमध्ये झोपडपट्टीत राहणारी भंगार विकणारी बाई, फक्त दुसरी शिकलेली पोर्तुगीजमध्ये पण रोज आपली डायरी लिहायची सवय होती तिला. एका पत्रकाराने तिचे लिखाण प्रसिद्ध केले आणि ती फेमस झाली, तिचे चांगल्या वस्तीत राहून मुलांना वाढवायचे स्वप्न पूर्ण झाले.

ताई मी कलेक्टर व्हायनू -राजेश पाटील-(हे सध्या वाचतेय, हे अनुवादित नाही.)

अन्जू,श्रीयू,...+१. ही आत्मचरित्रे वाचली आहेत.

पुस्तकाचे नाव आठवत नाही,बहुतेक ताठ कणा.-डॉ.पी.एस.रामाणी
प्रकाशवाटा,अंतर्यामी सूर गवसला हे वाचायला हवे.धन्यवाद अन्जू,धारा.

मिलिंदा धन्यवाद..
अन्जू .. वाह केवढी मोठी आणि मस्त यादी ...
थोडी अजुन नावे जमा झाली की धाग्याच्या वरच अ‍ॅड करेन.. Happy

तराळ-अंतराळ- शंकरराव खरात; अजिबात आक्रस्ताळे न होता दलित आत्मचरित्र लिहिता येते आणि तरीही ते तितकेच दाहक आणि अस्वस्थ करणारे असू शकते याचे कदाचित सर्वोत्कृष्ट उदाहरण.

माय एक्सपेरीमेंट्स विथ ट्रूथ- गांधीजी; हे खरेतर मूळ गुजरातीतूनच वाचले पाहिजे, किमान इंग्रजीतरी; मराठी अनुवाद वाचू नका फार पांचट आहे.

आनंदी धन्यवाद. अगदी लहानपणापासून वाचतेय. लक्षात स्टोरी राहते, नावे आठवत नाहीत.

Pages