मला आवडलेली आत्मचरित्रं..

Submitted by _आनंदी_ on 15 November, 2013 - 00:53

इथे पुस्तकांविषयी चे बरेच धागे आहेत ,,,
तरी फक्त आत्मचरित्रांबद्दल माहिती मिळवी या हेतुने हा धागा काढत आहे...

एखद्या प्रसिद्ध अथवा गुणी व्यक्ती, त्याच्या आत्मचरित्रातुन जाणुन घेण्याची मजा काही औरच आहे,,,

कृपया आपल्याला आवडलेल्या आत्मचरित्र पुस्तकांची येथे नोंद करा..

***************************************************
***************************************************
***************************************************
०७/०१/२०१४ पर्यंत नोंदवलेली काही आत्मचरित्रे

मराठी

१) प्रकाशवाटा:- प्रकाश आमटे
२) एकटा जीव :- दादा कोंडके
३) अग्नीपंख:- ए.पी.जे. अब्दुल कलाम

४) झिम्मा :- विजया मेहता
आत्मचरित्र कस असाव याचा ऊत्तम वस्तुपाठ म्हणजे झिम्मा
कुठेही कोणावर दोषारोप नाही; सनासनाटी पनाच्या नावाखाली भड़क पणा नाही . अतिशय संयत भाषेत लिहिलेल / मराठी नाट्य सृष्टिचा महत्वाचा दस्तावेज अशी याची नोंद होईल

५) लमाण :- डॉ श्रीराम लागू
डॉक्टरान्च्या स्वभावाप्रामाणे परखड भाषेचा अनुभव देणार. वेळोवेळि स्वताला काढलेले चिमटे ; भोवतालच्या परिस्थितीचे ऊत्तम आणि अचूक विश्लेषण हे जमेचे मुद्दे

६)स्वतःविषयी :- अनील अवचट
७) सत्याचे प्रयोगः- म. गांधी
८) नाच गं घुमा - माधवी देसाई
९) आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
१०) 'कुणा एकाची भ्रमणगाथा':- गोनिदा
११) कॉलनी :- सिद्धार्थ पारधे.
१२) स्म्रुतीचित्रे:- लक्ष्मीबाई टिळक.
१३) रास :- सुमा करंदीकर.
१४) रांगोळीचे ठीपके:- वासंती गाडगीळ.
१५) झोंबी- आनंद यादव.
१६) आय डेअर- किरण बेदी.
१७) एक झाड दोन पक्षी :- विश्राम बेडेकर.
१८) हृदयस्थ- नीतू मांडके.
१९) जगाच्या पाठीवर :- सुधीर फडके.
२०) एका साळीयाने- लक्ष्मीनारायण बोल्ली.
२१) बंध-अनुबंध - कमल पाध्ये.
२२) समिधा - साधना आमटे.
२३) मास्तरांची सावली - कृष्णा सुर्वे.
२४) वार्ड नं. ५ - डॉ.रवी बापट
२५) मुसाफिर :-अच्च्युत गोडबोले
२६) मी दुर्गा खोटे - श्रीम. दुर्गा खोटे शब्दांकन आहे.
२६) सांगत्ये ऐका - हंसा वाडकर
२७) कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे
२८) एंडे कथा(माझी कथा) - कमला दास. नंतर मुस्लीम धर्म स्वीकारून पै.वासी झालेल्या.
२९) दि लास्ट प्रिन्सेस - गायत्रीदेवी.
३०) अंतर्यामी सूर गवसला - श्रीनिवास खळे
३१) माझा साक्षात्कारी हृदयरोग- अभय बंग ( ह्याला आत्मचरित्र म्हणण्यापेक्षा, हार्ट प्रॉब्लेम आल्यानंतर आलेले अनुभव, त्यातून ते काय शिकले आणि आपली जीवनशैली कशी असावी ह्याबद्दल हे पुस्तक आहे.)

३२) उपरा- लक्ष्मण माने.
३३) उचल्या- लक्ष्मण गायकवाड
३४) बलुतं- दया पवार.
३५) आयदान- उर्मिला पवार.
३६) ताई मी कलेक्टर व्हायनू -राजेश पाटील
३७) ताठ कणा.-डॉ.पी.एस.रामाणी (नाव नक्की नाही)
३८) तराळ-अंतराळ- शंकरराव खरात; अजिबात आक्रस्ताळे न होता दलित आत्मचरित्र लिहिता येते आणि तरीही ते तितकेच दाहक आणि अस्वस्थ करणारे असू शकते याचे कदाचित सर्वोत्कृष्ट उदाहरण.

३९) माय एक्सपेरीमेंट्स विथ ट्रूथ- गांधीजी; हे खरेतर मूळ गुजरातीतूनच वाचले पाहिजे, किमान इंग्रजीतरी; मराठी अनुवाद वाचू नका फार पांचट आहे.
४०) 'परतीचा प्रवास' :-वनमालाबाई
४१) लंडनच्या आजीबाईची कहाणी :- लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य (चरित्र)
४२) स्टुडीओ- सुभाष अवचट
४३) तीन दगडांची चूल- विमल मोरे ( भटक्या जोशी समाजाचे चित्रण).
४४) कोल्हयाटयाचे पोर- किशोर शांताबाई काळे
४५) 'मयादा' हे आत्मचरित्रपण चांगले आहे, मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद आहे. इराकमध्ये सद्दामच्या राजवटीत तुरुंगात गेलेल्या 'मयादा' नावाच्या सुशिक्षित आणि स्वतःची प्रेस असणाऱ्या स्त्रीचे आत्मचरित्र आहे.

४६) 'ईराणमधून पलायन' हापण मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद आहे. ईराणमध्ये जुलमी राजवट आल्यानंतर एका स्त्रीने पलायन केले मुलासह, प्रथम फ्रान्समध्ये आली आणि नंतर कॅनडा येथे स्थायिक झाली.
४७) कुणास्तव कुणीतरी --- यशोदा पाडगावकर
४८) हसरे दु:ख - चाल्री चाप्लीन वरचे पुस्तक
४९) चार नगरातले माझे विश्व - जयंत नारळीकर
५०) ही श्री ची इच्छा -श्रीनिवास ठाणेदार
५१) ईडली ऑर्कीड आणि मी - कामत
५२) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
५३) रेडीयमः- मादाम मेरी क्युरी (शाळेत असताना रेडीयम नामक पुस्तक वाचले होते - मादाम मेरी क्युरी वरचे पुस्तक मला अतिशय आवडले होत...पण नाव नक्की रेडीयम च होते का हे नीट आठवत नाही.)

५४) द्रुष्टीदाता:- ब्रेल लिपी ज्याने शोधली त्याच्यवरचे (नाव नक्की आठवत नाही )
५५) उष:काल:- उषा किरण
५६) उपरा- लक्ष्मण माने.
५७) उचल्या- लक्ष्मण गायकवाड
५८) आमचा बाप आणि आम्ही -नरेंद्र जाधव
५९) 'इनसाइड द गॅस(gas) चेंबर्स' :- 'श्लोमो व्हेनेत्सिया' यांचे अनुभवकथन . सुन्न करणारा अनुभव. संपादन-जीन माउटापा, इंग्रजी अनुवाद- andru brown. मराठी अनुवाद- सुनीती काणे.
६०) राजमाता:- वि स वाळिंबे
६१) "माझंही एक स्वप्न होतं' ( I too had a dream...Vergese Kurien as told by Gauree Salavee):- सुजाता देशमुख यांनी अनुवाद केलेले श्री.व्हर्गीस कुरियन यांचे आत्मचरित्र.खूप स्पष्ट,निर्भीड वाटतेय.
६२) स्मृतीपूजा:- प्रभावती भावे (पु.भा.भावे यांच्या पत्नी)
६३) जेव्हा माणूस जागा होतो :- गोदावरी परुळेकर : हे आत्मकथनपर आहे ,यातला भाग शालेय अभ्यासक्रमात होता. आणखी एक प्रकरण अलीकडेच एका दिवाळी अंकात वाचले.
६४) माझा पोवाडा:- शाहिर साबळे
६५) धाकटी पाती:- सूर्यकांत
६६) टाईमपास:- प्रोतिमा बेदी (कबीर बेदी ची एक्स बायको)
६७) गोष्ट एका मारवाड्याची'- गिरीश जाखोटिया (आत्मचरित्र नव्हे पण बरेचसे तसेही.)
***************************************************************************************************************************************************************

काही इंग्रजी:-
१) 'Iron Lady' :- Margaret Thatcher
२) Madeleine Albright:- Madam Secretary
३) Early days:-Sir Winston Churchill
४) माझा लढा (main kampf) :- हीटलर चा
५) A diary of a young girl:- Anne Frank
६) डेझर्टर- विजय देवधर (एका जर्मन मेसेंजरच्या पलायनाची गोष्ट)
७) सैबेरियातून पलायन (लेखक आठवत नाही, एका जर्मन युद्धकैद्याचे रशियातून पलायन)

८) काळी बाई- ब्राझीलमध्ये झोपडपट्टीत राहणारी भंगार विकणारी बाई, फक्त दुसरी शिकलेली पोर्तुगीजमध्ये पण रोज आपली डायरी लिहायची सवय होती तिला. एका पत्रकाराने तिचे लिखाण प्रसिद्ध केले आणि ती फेमस झाली, तिचे चांगल्या वस्तीत राहून मुलांना वाढवायचे स्वप्न पूर्ण झाले.

९) अँजेलाज अ‍ॅशेस - फ्रँक मॅकोर्ट
१०) Iran Awakening :- Shirin Ebadi:- ह्या पुस्तकाच्या इराण जागा होतोय या नावाने प्रतिमा जोशीनी मराठीत अनुवाद केला आहे

११) Desert Flower :- Waris Dirie
१२) Agony and Ecstasy:- a biography of Michael Angelo by Irving Stone
१३) Clarence Darrow for defense:- biography of Clarence Darrow by Irving Stone
१४) In the line of fire :- Parvez Musharraf
१५) Daughter of Destiny :- Benazeer Bhutto
१६) Sunny Days - Sunil Gavaskar
१७) 4th Part Dashadwar se sopan tak:- Harivanshrai Bachchan
१८) Every Second Counts :- Lance Armstrong
१९) Winning :- Jack Welch
२०) Iacocca :- Lee Iacocca
२१) Open :- Andre Agassi
२२) My Life :- Brett Lee
२३) Made in Japan :- Akio Morita (Sony)
२४) A Double Life :- Alyque Padamsee
२५) Controversially Yours :- Shoaib Akhtar
२६) Genghis Khan and the Making of the Modern World -: Ghenghis Khan (हे चरीत्र आहे)
२७) Jinnah :- By Jaswant Singh
२८) The test of my life:- युवराज सिंग
२९) Out of comfort zone:- स्टिव्ह वॉ
३०) Indian summers :- जॉन राईट
३१) ऑन द लाईन :- सेरेना विल्यम्सचे
***************************************************************************************************************************************************************
काही चुकले असल्यास / राहिले असल्यास सांगा.. तसा बदल करेन..... Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किशोर आरस याण्चे पुस्तक छानच आहे. रूढार्थाने लेखक नसलेल्या पण ज्याण्च्याकडे सांगण्यासारखे काही आहे अशी पुस्तके शैलीदार नसली तरी रंजक असतात. एका नव्या विश्वाचा परिचय होतो.

हा धागा फक्त आत्मचरित्रांपुरता आहे की चरित्रे पण चालणार आहेत का ?
बरेच जण "चरित्रे" पण लिहित आहेत.
असे झाले तर यादी फार म्हणजे फार मोठी होईल.

The Tunnel of Time - R. K. Laxmna, good read

ह्याचा मराठी अनुवाद मिळाला तर वाचा.

चरित्र पण चालेल असे वाटते...
म्हणजे एखाद्या बद्दल स्वतः त्यानेच लिहिले असेल किंवा कोणी दुसर्याने लिहिले असेल तरी चालेल..
कोणाचे दुसरे मत असल्यास सांगावे..

इडलीबाबाचे आत्मचरित्र आणि चम्प्याने लिहिलेले त्याचे चरित्र आणि इतरांनी सांगितलेल्या हृद्य आठवणी हे सध्या 'इन' आहे Proud

मी वाचलेली चरित्रे,

दुर्दम्य - लो.टिळकांचे चरित्र - ले. गंगाधर गाडगीळ
इंदिरा गांधी - ले. पुपुल जयकर
छत्रपती राजर्षी शाहू महाराज - ले. तु.बा.नाईक
एक होता कार्व्हर - अनुवाद मीरा गवाणकर
लाल बहादुर शास्त्री - ले. सी.पी.श्रीवास्तव - अनुवाद अशोक जैन

याव्यतिरिक्त साने गुरूजी, विनोबा भावे, गांधी (माझे सत्याचे प्रयोग), गोपाळ गोडसे, आंबेडकर, जयप्रकाश नारायण, बाळासाहेब भारदे, रामकृष्ण, विवेकानंद, राजा शिवछत्रपती, इ. चरित्रे वाचली आहेत.
त्याची सविस्तर माहिती सवडीने देण्याचा प्रयत्न करीन.

आम्ही असे झालो : आ. अत्रे. कर्‍हेचे पाणी सुद्धा.
दिवस असे होते :वि,द,घाटे
पथिक न.वि. गाडगीळ
जीवनसेतु : सेतुमाधववराव पगडी
?? स्नेहप्रभा प्रधान
?? सरस्वतीबाई अकलूजकर (सरोजिनी वैद्यांची आई)
अजुनी चालतेच वाट (?) आनंदीबाई विजापुरे
पानाआडचे फूल आशालता सावे.
?? आशा आपराद (एका सुशिक्षित आणि यशस्वी मुस्लिम महिलेचे आत्मकथन. मस्ट रीड.)
आउटसाय्डर नरसिंह राव.
अंगणातले आभाळ (?) यशवंत पाठक.
? लीला चिटणीस
? दुर्गा खोटे
? महादेवशास्त्री जोशी.
नावे ठाऊक नाहीत किंवा खात्री नाही तिथे प्रश्नचिह्न टाकले आहे.

<?? स्नेहप्रभा प्रधान> : स्नेहांकिता
?? आशा आपराद (एका सुशिक्षित आणि यशस्वी मुस्लिम महिलेचे आत्मकथन. मस्ट रीड.): भोगले जे दु:ख त्याला
? दुर्गा खोटे : मी : दुर्गा खोटे
-----
लीला चिटणीस : चंदेरी दुनियेत (हे विकीपेडियावतून शोधले)

वरदा - धन्यवाद

Princess - सध्या बेस्टसेलर आहे. भाषा सोपी आहे.

Roses in December - M.C. Chagla
Ram Jethmalani: An Authorized Biography - Ram Jethmalani

नानी पालखीवाला - पुस्तकाचं नाव आठवतं नाहीये.

मला आवडलेली आत्मचरीत्रे

सत्याचे प्रयोग - महात्मा गांधी
मला उध्वस्त व्हायचंय - मल्लिका अमर शेख
माझ्या जीवनाची सरगम - सी. रामचंद्र
दास्तान-ए-नौशाद - नौशाद(मराठी शब्दांकन : शशिकांत किणीकर(बहुतेक, नक्की आठवत नाही))
झोंबी - आनंद यादव
करूणाष्टक - व्यंकटेश माडगुळकर

याशिवाय खालील चरीत्रात्मक पुस्तके

देवगंधर्व - शैला दातार
रामूभैय्या दाते - रवि दाते

protima Bedi, during her modelling days, met Kabir Bedi. And after a few months, she walked out of her parents' house to live with him. It was another indication of her expression of individuality, which continued throughout her life. She married Kabir in 1969 and had two children - Pooja Bedi; acted for a brief while before becoming a television presenter, and Siddharth Bedi.

"बाईंडरचे दिवस" कोणी वाचले आहे का ? कमलाकर सारंग यांचे ?>>> हो. मराठीतील अतिशय उत्तम पुस्तकांपैकी एक आहे!

प्रतिमा बेदींची नृत्यांगना म्हणून स्पष्ट स्वतंत्र ओळख होती.>>
होय पण ती आयुष्याच्या शेवटच्या पर्वात मानसिक शांतीच्या शोधात. स्वतःच्या बेबन्द , बेजबाबदार ,हट्टी जीवनपद्धतीनन्तर वेळ निघून गेल्यावर झालेली उपरती. आणि प्रो बेदी म्हणजे काही सितारादेवी सोनल मानसिंग किंवा भाटेताई नव्हे. तिथेही बाईंचा भुलावणीचा कार्यक्रम चालूच गुरुशी भांडण इत्यादि.

'आणि दोन हात' -- डॉ.वि.ना.श्रीखंडे.

कॅन्सरच्या अनुभवाविषयी--- 'कॅन्सर माझा सांगाती' --- डॉ.अरविंद बावडेकर

"बाईंडरचे दिवस" कोणी वाचले आहे का ? कमलाकर सारंग यांचे ? >>> मी स्वतः वाचलेले नाही, एका मैत्रिणीने वाचले आहे. तिला प्रचंड आवडले आहे पुस्तक. संग्रही ठेवण्यासारखे आहे असे म्हणत होती.

देवकी, डॉ. वि. ना. श्रीखंडे यांच्या पुस्तकाचे नाव बहुतेक 'आणि दोन हात' असे आहे. मी वाचले नाहीये अजून.

भालचंद्र मुणगेकर यांचेपण वाचले आहे, नाव आठवत नाहीये.

अन्जू,

तुमचे बरोबर आहे.'आणि दोन हात' हेच नाव आहे. धन्यवाद! पोस्ट एडिट्ते.
पुस्तक खूप चांगले आहे.जरुर वाचा.

Pages