मला आवडलेली आत्मचरित्रं..

Submitted by _आनंदी_ on 15 November, 2013 - 00:53

इथे पुस्तकांविषयी चे बरेच धागे आहेत ,,,
तरी फक्त आत्मचरित्रांबद्दल माहिती मिळवी या हेतुने हा धागा काढत आहे...

एखद्या प्रसिद्ध अथवा गुणी व्यक्ती, त्याच्या आत्मचरित्रातुन जाणुन घेण्याची मजा काही औरच आहे,,,

कृपया आपल्याला आवडलेल्या आत्मचरित्र पुस्तकांची येथे नोंद करा..

***************************************************
***************************************************
***************************************************
०७/०१/२०१४ पर्यंत नोंदवलेली काही आत्मचरित्रे

मराठी

१) प्रकाशवाटा:- प्रकाश आमटे
२) एकटा जीव :- दादा कोंडके
३) अग्नीपंख:- ए.पी.जे. अब्दुल कलाम

४) झिम्मा :- विजया मेहता
आत्मचरित्र कस असाव याचा ऊत्तम वस्तुपाठ म्हणजे झिम्मा
कुठेही कोणावर दोषारोप नाही; सनासनाटी पनाच्या नावाखाली भड़क पणा नाही . अतिशय संयत भाषेत लिहिलेल / मराठी नाट्य सृष्टिचा महत्वाचा दस्तावेज अशी याची नोंद होईल

५) लमाण :- डॉ श्रीराम लागू
डॉक्टरान्च्या स्वभावाप्रामाणे परखड भाषेचा अनुभव देणार. वेळोवेळि स्वताला काढलेले चिमटे ; भोवतालच्या परिस्थितीचे ऊत्तम आणि अचूक विश्लेषण हे जमेचे मुद्दे

६)स्वतःविषयी :- अनील अवचट
७) सत्याचे प्रयोगः- म. गांधी
८) नाच गं घुमा - माधवी देसाई
९) आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
१०) 'कुणा एकाची भ्रमणगाथा':- गोनिदा
११) कॉलनी :- सिद्धार्थ पारधे.
१२) स्म्रुतीचित्रे:- लक्ष्मीबाई टिळक.
१३) रास :- सुमा करंदीकर.
१४) रांगोळीचे ठीपके:- वासंती गाडगीळ.
१५) झोंबी- आनंद यादव.
१६) आय डेअर- किरण बेदी.
१७) एक झाड दोन पक्षी :- विश्राम बेडेकर.
१८) हृदयस्थ- नीतू मांडके.
१९) जगाच्या पाठीवर :- सुधीर फडके.
२०) एका साळीयाने- लक्ष्मीनारायण बोल्ली.
२१) बंध-अनुबंध - कमल पाध्ये.
२२) समिधा - साधना आमटे.
२३) मास्तरांची सावली - कृष्णा सुर्वे.
२४) वार्ड नं. ५ - डॉ.रवी बापट
२५) मुसाफिर :-अच्च्युत गोडबोले
२६) मी दुर्गा खोटे - श्रीम. दुर्गा खोटे शब्दांकन आहे.
२६) सांगत्ये ऐका - हंसा वाडकर
२७) कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे
२८) एंडे कथा(माझी कथा) - कमला दास. नंतर मुस्लीम धर्म स्वीकारून पै.वासी झालेल्या.
२९) दि लास्ट प्रिन्सेस - गायत्रीदेवी.
३०) अंतर्यामी सूर गवसला - श्रीनिवास खळे
३१) माझा साक्षात्कारी हृदयरोग- अभय बंग ( ह्याला आत्मचरित्र म्हणण्यापेक्षा, हार्ट प्रॉब्लेम आल्यानंतर आलेले अनुभव, त्यातून ते काय शिकले आणि आपली जीवनशैली कशी असावी ह्याबद्दल हे पुस्तक आहे.)

३२) उपरा- लक्ष्मण माने.
३३) उचल्या- लक्ष्मण गायकवाड
३४) बलुतं- दया पवार.
३५) आयदान- उर्मिला पवार.
३६) ताई मी कलेक्टर व्हायनू -राजेश पाटील
३७) ताठ कणा.-डॉ.पी.एस.रामाणी (नाव नक्की नाही)
३८) तराळ-अंतराळ- शंकरराव खरात; अजिबात आक्रस्ताळे न होता दलित आत्मचरित्र लिहिता येते आणि तरीही ते तितकेच दाहक आणि अस्वस्थ करणारे असू शकते याचे कदाचित सर्वोत्कृष्ट उदाहरण.

३९) माय एक्सपेरीमेंट्स विथ ट्रूथ- गांधीजी; हे खरेतर मूळ गुजरातीतूनच वाचले पाहिजे, किमान इंग्रजीतरी; मराठी अनुवाद वाचू नका फार पांचट आहे.
४०) 'परतीचा प्रवास' :-वनमालाबाई
४१) लंडनच्या आजीबाईची कहाणी :- लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य (चरित्र)
४२) स्टुडीओ- सुभाष अवचट
४३) तीन दगडांची चूल- विमल मोरे ( भटक्या जोशी समाजाचे चित्रण).
४४) कोल्हयाटयाचे पोर- किशोर शांताबाई काळे
४५) 'मयादा' हे आत्मचरित्रपण चांगले आहे, मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद आहे. इराकमध्ये सद्दामच्या राजवटीत तुरुंगात गेलेल्या 'मयादा' नावाच्या सुशिक्षित आणि स्वतःची प्रेस असणाऱ्या स्त्रीचे आत्मचरित्र आहे.

४६) 'ईराणमधून पलायन' हापण मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद आहे. ईराणमध्ये जुलमी राजवट आल्यानंतर एका स्त्रीने पलायन केले मुलासह, प्रथम फ्रान्समध्ये आली आणि नंतर कॅनडा येथे स्थायिक झाली.
४७) कुणास्तव कुणीतरी --- यशोदा पाडगावकर
४८) हसरे दु:ख - चाल्री चाप्लीन वरचे पुस्तक
४९) चार नगरातले माझे विश्व - जयंत नारळीकर
५०) ही श्री ची इच्छा -श्रीनिवास ठाणेदार
५१) ईडली ऑर्कीड आणि मी - कामत
५२) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
५३) रेडीयमः- मादाम मेरी क्युरी (शाळेत असताना रेडीयम नामक पुस्तक वाचले होते - मादाम मेरी क्युरी वरचे पुस्तक मला अतिशय आवडले होत...पण नाव नक्की रेडीयम च होते का हे नीट आठवत नाही.)

५४) द्रुष्टीदाता:- ब्रेल लिपी ज्याने शोधली त्याच्यवरचे (नाव नक्की आठवत नाही )
५५) उष:काल:- उषा किरण
५६) उपरा- लक्ष्मण माने.
५७) उचल्या- लक्ष्मण गायकवाड
५८) आमचा बाप आणि आम्ही -नरेंद्र जाधव
५९) 'इनसाइड द गॅस(gas) चेंबर्स' :- 'श्लोमो व्हेनेत्सिया' यांचे अनुभवकथन . सुन्न करणारा अनुभव. संपादन-जीन माउटापा, इंग्रजी अनुवाद- andru brown. मराठी अनुवाद- सुनीती काणे.
६०) राजमाता:- वि स वाळिंबे
६१) "माझंही एक स्वप्न होतं' ( I too had a dream...Vergese Kurien as told by Gauree Salavee):- सुजाता देशमुख यांनी अनुवाद केलेले श्री.व्हर्गीस कुरियन यांचे आत्मचरित्र.खूप स्पष्ट,निर्भीड वाटतेय.
६२) स्मृतीपूजा:- प्रभावती भावे (पु.भा.भावे यांच्या पत्नी)
६३) जेव्हा माणूस जागा होतो :- गोदावरी परुळेकर : हे आत्मकथनपर आहे ,यातला भाग शालेय अभ्यासक्रमात होता. आणखी एक प्रकरण अलीकडेच एका दिवाळी अंकात वाचले.
६४) माझा पोवाडा:- शाहिर साबळे
६५) धाकटी पाती:- सूर्यकांत
६६) टाईमपास:- प्रोतिमा बेदी (कबीर बेदी ची एक्स बायको)
६७) गोष्ट एका मारवाड्याची'- गिरीश जाखोटिया (आत्मचरित्र नव्हे पण बरेचसे तसेही.)
***************************************************************************************************************************************************************

काही इंग्रजी:-
१) 'Iron Lady' :- Margaret Thatcher
२) Madeleine Albright:- Madam Secretary
३) Early days:-Sir Winston Churchill
४) माझा लढा (main kampf) :- हीटलर चा
५) A diary of a young girl:- Anne Frank
६) डेझर्टर- विजय देवधर (एका जर्मन मेसेंजरच्या पलायनाची गोष्ट)
७) सैबेरियातून पलायन (लेखक आठवत नाही, एका जर्मन युद्धकैद्याचे रशियातून पलायन)

८) काळी बाई- ब्राझीलमध्ये झोपडपट्टीत राहणारी भंगार विकणारी बाई, फक्त दुसरी शिकलेली पोर्तुगीजमध्ये पण रोज आपली डायरी लिहायची सवय होती तिला. एका पत्रकाराने तिचे लिखाण प्रसिद्ध केले आणि ती फेमस झाली, तिचे चांगल्या वस्तीत राहून मुलांना वाढवायचे स्वप्न पूर्ण झाले.

९) अँजेलाज अ‍ॅशेस - फ्रँक मॅकोर्ट
१०) Iran Awakening :- Shirin Ebadi:- ह्या पुस्तकाच्या इराण जागा होतोय या नावाने प्रतिमा जोशीनी मराठीत अनुवाद केला आहे

११) Desert Flower :- Waris Dirie
१२) Agony and Ecstasy:- a biography of Michael Angelo by Irving Stone
१३) Clarence Darrow for defense:- biography of Clarence Darrow by Irving Stone
१४) In the line of fire :- Parvez Musharraf
१५) Daughter of Destiny :- Benazeer Bhutto
१६) Sunny Days - Sunil Gavaskar
१७) 4th Part Dashadwar se sopan tak:- Harivanshrai Bachchan
१८) Every Second Counts :- Lance Armstrong
१९) Winning :- Jack Welch
२०) Iacocca :- Lee Iacocca
२१) Open :- Andre Agassi
२२) My Life :- Brett Lee
२३) Made in Japan :- Akio Morita (Sony)
२४) A Double Life :- Alyque Padamsee
२५) Controversially Yours :- Shoaib Akhtar
२६) Genghis Khan and the Making of the Modern World -: Ghenghis Khan (हे चरीत्र आहे)
२७) Jinnah :- By Jaswant Singh
२८) The test of my life:- युवराज सिंग
२९) Out of comfort zone:- स्टिव्ह वॉ
३०) Indian summers :- जॉन राईट
३१) ऑन द लाईन :- सेरेना विल्यम्सचे
***************************************************************************************************************************************************************
काही चुकले असल्यास / राहिले असल्यास सांगा.. तसा बदल करेन..... Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Jack cooper ह्या पोलंडमधल्या ज्युचेपण आत्मकथन पूर्वीच वाचले, त्यात तो लहान असताना नाझीपासून आजूबाजूच्या गावात ओळख लपवून काम करतो आणि नंतर कॅनडा येथे पळून जातो असे कथानक आहे, कॅनडा येथे नंतर चित्रपट दिग्दर्शक होतो.

"माझंही एक स्वप्न होतं' ( I too had a dream...Vergese Kurien as told by Gauree Salavee)हे सुजाता देशमुख यांनी अनुवाद केलेले श्री.व्हर्गीस कुरियन यांचे आत्मचरित्र वाचतेय.खूप स्पष्ट,निर्भीड वाटतेय.

मी प्रभावती भावे (पु.भा.भावे यांच्या पत्नी) यांचे ' स्मृतीपूजा' वाचतेय, जवळजवळ पूर्ण होत आलेय, शेवटची काही पाने राहिली आहेत.

In the line of fire - Parvez Musharraf
Daughter of Destiny - Benazeer Bhutto
Sunny Days - Sunil Gavaskar
Harivanshrai Bachchan - 4th Part Dashadwar se sopan tak (Recommended)
Every Second Counts - Lance Armstrong (Recommended)
Winning - Jack Welch
Iacocca - Lee Iacocca
Open - Andre Agassi
My Life - Brett Lee
Made in Japan - Akio Morita (Sony)

Some more..

A Double Life - Alyque Padamsee
Controversially Yours - Shoaib Akhtar
Genghis Khan and the Making of the Modern World - Ghenghis Khan (हे चरीत्र आहे)
Jinnah - By Jaswant Singh
युरी गागारीन - शाळेत असताना वाचलं होतं, आता नाव आठवत नाहिये.

जेव्हा माणूस जागा होतो : गोदावरी परुळेकर : हे आत्मकथनपर आहे. आत्मचरित्र आहे का माहीत नाही. यातला भाग शालेय अभ्यासक्रमात होता. आणखी एक प्रकरण अलीकडेच एका दिवाळी अंकात वाचले.
प्रतिसादांत आलेल्या आत्मचरित्रांची यादी करून मूळ लेखनात(हेडरमध्ये) घेतली तर बरे पडेल.

Open , My life आलेत तर The test of my life: युवराज सिंग , Rafa हीही हवीत.
रिकी पॉंटिंग , अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांची आत्मचरितत्रे आली आहेत.

स्टिव्ह वॉचे Out of comfort zone आणि जॉन राईट चे Indian summers ही पण चांगली आहेत असं ऐकलं आहे. पण दोन्ही सध्या आऊट ऑफ प्रिंट आहेत.. इंडियन समर्सला आत्मचरित नाही म्हणता येणार खरतरं.. कारण ते फक्त राईटच्या भारतीय क्रिकेट प्रशिक्षक पदाची वर्ष कव्हर करतं.

सेरेना विल्यम्सचे ऑन द लाईन पण चांगले आहे.

हो, आजकाल इंग्रजी थोडं जास्त वाचलं जातं! वेगवेगळ्या देशातली वेगवेगळी लोक आणि त्यांचे अनुभव वाचायला मिळतात. थोडी वेगळी संस्क्रुती कळते.

मराठीत तोचतोपणा जास्त जाणवतो आहे.

आत्मचरित्र नाही पण अंजली कीर्तने यांच डॉ आनंदीबाई जोशी यांच चरित्र मी खूप वेळा वाचलं आहे. अप्रतिम आहे.
प्रत्येक वेळी आनंदीबाई जोशी आणि गोपाळराव सुद्धा नव्याने उलगडत जातात.
आहे मनोहर तरी - सुनीताताई ही खूप आवडतं.

पराग - हो इंडियन समर्स हे फक्त त्याच्या भारतीय संघाच्या कोचिंग च्या पाच वर्षांबद्दल आहे. मात्र एकदम इंटरेस्टिंग पुस्तक आहे. क्रिकेटमधे ज्याला इंटरेस्ट आहे त्याला नक्की आवडेल. त्यात भारतीय क्रिकेट मधे गेल्या १०-१२ वर्षांत जो फरक पडला त्याची सुरूवात जॉन राईट च्या कोचिंग च्या काळापासून झाली. त्यामुळेही त्याचे महत्त्व आहे.

आउट ऑफ माय कम्फर्ट झोन तुला हवे असेल मी पुण्यात देता येइल का बघतो. कदाचित माझ्या घरी असेल. ते ही मस्त आहे. त्यावर मी लिहीलेल्या लेखाची रिक्षा Happy
http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2007/node/615.html

कबीर बेदी ची एक्स बायको प्रोतिमा बेदी चे आत्मचरित्र टाईमपास (मी मराठीतून वाचले) बरेच प्रांजळ आहे...
व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली मनस्वी जीवन जगणार्‍या व्यक्टींच्या जीवनाची बहुधा शोकांतीकाच होते . शेवटच्या पर्वात सावरूनही ही शोकांतीका काही थाम्बत नाही . विशेष्तः स्त्रियांच्या बाबतीत. अन्यथा (तो कबीर बेदी नावाचा पोळ सर्व करून सवरून चौथ्या बायकोबरोबर राहतोच आहे. ) आणि मुलगा तारुण्यात स्किझोफ्रेनियाने गेला प्रोतिमा पन्नाशीतच गेली. ही प्रोतिमा दिवसाढवळ्या जहंगीर आर्ट गॅलारी समोर विवस्त्र चालत गेली होती. पूजा बेदी यांची मुलगी. प्रोतिमा शेवटी सन्यसिन तिम्नेपुस्तक वाचून येक मळभ मनावर येतेच....

आकाश नील नाही, बहुतेक नाव हे नव्हते. खूप वर्षे झाली वाचून, नावच आठवत नाहीये.

आनंदी मस्त काम केलेस, हेडरमध्ये माहिती एकत्र केलीस ते.

२४) A Double Life :- Alyque Padamsee>>>>याचा मराठी अनुवाद वाचला आहे. पुस्तकाचे नाव आठवत नाही.पण सुरेख पुस्तक आहे.
'आठवणीतील आठवणी'- किशोर आरस

M C Mary Kom : Unbreakable
उन्मुक्त चां(चं?)दने ही अण्डर १९ वर्ल्ड कपच्या काळातल्या त्याच्या डायरीवरून पुस्तक काढलंय.
द स्काय इज द लिमिट

हा धागा फक्त आत्मचरित्रांपुरता आहे की चरित्रे पण चालणार आहेत का ?
बरेच जण "चरित्रे" पण लिहित आहेत.
असे झाले तर यादी फार म्हणजे फार मोठी होईल.

Pages