चित्रपटसृष्टीतील दुर्लक्षित लोक

Submitted by फारएण्ड on 10 November, 2013 - 22:03

'शोले' मधला पहिला मालगाडीवाला सीन...ठाकूरशी बोलताना टपावर पायाचा आवाज येतो. त्या डाकूला उडवायला अमिताभ वॅगनमधे जमिनीवर आडवा पडून वरती गोळी मारतो. नंतर त्याचे काय झाले ते पाहताना वेगात चाललेली मालगाडी व त्यामुळे "मागे" पडणारा डाकू. तसेच शेवटी धर्मेन्द्र सर्वांना "चुन चुन के" मारायला जाताना मोठ्या खडकावर उभा असलेल्या एकाला गोळी मारतो. तो तेव्हा भरधाव घोड्यावरून जात असल्याने तो तेथून पुढे गेल्यावर वरचा डाकू खाली पडतो. 'शोले' कितव्यांदा पाहताना या गोष्टी जाणवू लागल्या ते आता लक्षात नाही, पण काय जबरी एडिटिंग आहे असे तेव्हा आम्ही म्हणायचो. हे टायमिंग उत्तम संकलनाशिवाय जमवणे शक्यच नाही असेच तेव्हा वाटायचे. अजूनही वाटते.

मध्यंतरी कोणीतरी त्या ठाकूरच्या हाताचे फोटो नेटवर फिरवत होते. माबोवरही त्याची चर्चा झाली होती.
http://www.maayboli.com/node/17790?page=6

शोलेच्या व्हिडीओज मधे ती क्लिप दिसत नाही, ती "चूक" शोधूनही सापडत नाही असेच त्यातून निष्पन्न झाले होते. १९७५ सालचे संकलन! ठाकूरचे हात दिसणारे कोणतेही शॉट आज ४० वर्षांनंतरच्या तंत्रज्ञानानेही शोधून सापडत नाहीत! काय मेहनत असेल संकलनात, किती वेळा पुन्हा पुन्हा पाहून ते करावे लागले असेल. त्यानंतर असंख्यांनी असंख्य वेळा पाहिलेला चित्रपट. तरीही कोठेही शॉट मधले ब्लूपर्स नाहीत!

हे आज आठवायचे कारण म्हणजे रीडिफ मधली ही बातमी.
http://www.rediff.com/movies/slide-show/slide-show-1-m-s-shinde-intervie...

शोले चे संकलक एम एस शिंदे आजारी व आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. जो आजही भारतात सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट आहे त्याच्या एका मुख्य तंत्रज्ञाची ही अवस्था हिन्दी चित्रपटसृष्टीत काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे हे दाखवते. एखाद्या क्षेत्रात मुळात पैसा नसेल तर समजू शकतो. पण जेथे भंगार चित्रपटही कोट्यावधी रूपये कमावतात तेथे एका प्रचंड कौशल्य असलेल्या तंत्रज्ञाला निवृत्तीनंतर किमान गरजेपुरते पैसे मिळतील अशी कोणतीही व्यवस्था नाही? या वरच्या बातमीत न्यूज व्हॅल्यू करिता बच्चन ई चे नाव घेतले असावे पण कोणी त्यांना वैयक्तिक पैसे नेउन द्यावेत हा तात्पुरता उपाय होईल (तेवढी गरज असेल तर ते आधी नक्कीच करावे), पण असे तंत्रज्ञ, सहकलाकार निवृत्तीनंतर निदान नीट जगू शकतील अशी व्यवस्था किमान फिल्म इण्डस्ट्रीत कशी नाही? अ‍ॅक्टर्स गिल्ड ई असते असे ऐकले आहे तसे तंत्रज्ञांचे नसते काय? मध्यंतरी ए के हंगल यांच्याबद्द्लही अशीच माहिती वाचली होती.

यापुढे शोले पाहताना हे आठवल्याशिवाय राहणार नाही. आपण फॅन लोक काय करू शकतो?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमोल, खरंच वाईट वाटलं. मागे हनगल आणि सनईवादक बिस्मिल्ला खान यांच्याविषयी वाचूनही खूप वाईट वाटलं होतं. त्याबरोबरच या थोर माणसांनी स्वतःसाठीही थोडीशी आर्थिक तरतूद करायला हवी होती, असेही वाटून गेले होते.

इथून काही मदत करायचे प्लॅन असतील, तर मी तयार आहे यथाशक्ती मदत करायला.

फार एन्ड,

शीर्षक वाचून वाटले होते की काही व्यक्तिमत्वांबाबत माहिती दिलेली असेल, पण लेखात व्यक्त झालेली भावना फारच भावली. आत्ता नांव आठवत नाही पण गेल्या दोन तीन महिन्यात असेच कोणीतरी भीक मागताना सापडले होते व त्याच्या अभिनेत्री मुलीने वडिलांचा स्वीकार करायला नकार दिला होता हेही छापून आले होते.

>>>चित्रपटसृष्टीत काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे हे दाखवते. <<<

वाचलेल्या माहितीनुसार अर्थातच मेजर प्रॉब्लेम आहे असे दिसते.

(थोडे विस्तृतपणे लिहावेसे वाटले म्हणून खालील प्रतिसाद):

हे क्षेत्र थेट आम माणसाच्या आणि तेही फक्त त्याच्या आवडीनिवडीवर जगणारे क्षेत्र आहे. म्हणजे रिअल इस्टेटप्रमाणे आम माणसाची चित्रपट ही गरज असू शकत नाही. धार्मिक स्थळेही पैसा कमवतात पण त्यात माणसाच्या मनोरंजनाचा भाग नसून श्रद्धेचा असतो. क्रिकेटसारखे क्रीडा प्रकारही आम माणसाच्या मनोरंजनावर जगतात पण त्यात मनाच्या खोल गाभ्यात दडलेली सूडस्वप्ने सत्य होताना दिसत नाहीत. स्वतःच्या अर्धवट राहिलेल्या अबोल प्रेमकथा त्यात पूर्ण झालेल्या दिसत नाहीत.

चित्रपट माणसाला सूड पूर्ण झाल्याचे, प्रेम यशस्वी झाल्याचे वगैरे समाधान देतो. याशिवाय गुणगुणण्यास संगीत देतो. सौंदर्यासंदर्भातील दृष्टिकोन निर्माण करतो. (क्वचित प्रमाणात अभिरुची उंचावतोही).

सरळ अर्थ असा, की दैनंदिन आयुष्यातील ताण विसरण्यासाठी योजल्या जाणार्‍या उपायांमध्ये चित्रपटाचे योगदान सर्वाधिक किंवा खूप जास्त असू शकते.

पण या आम माणसाला कधी काय आवडेल ते कोणालाच समजत नाही. बहुतांशी लोकांना काय आवडेल याचेही ठोकताळे चुकू शकतात, चुकतात. मग चित्रपट पडतात. किंवा अनपेक्षितपणे काही चित्रपट गाजतात. कोणत्याही गोष्टीमुळे गाजू किंवा पडू शकतात. जसे कथा, संगीत, देखावे, अभिनेते, संवाद, चित्रीकरण, धीट दृष्ये इत्यादी!

आता ही भट्टी नेमकी कधी व काय केल्यामुळे जमेल याचा अंदाज कोणालाच नसल्याने आज जो डोक्यावर घेतला जातो तो उद्या पायाखाली चिरडला जातो. ही भट्टी कधी जमेल हे माहीत नसल्याने त्यातील प्रत्येकासाठी प्रत्येक क्षण एक जुगार असतो. या जुगारात सगळे इच्छेविरुद्ध किंवा स्वेच्छेने भरडले जातात. मग तिखट राजकारणाला ऊत येतो. एकमेकांना पाण्यात पाहणे, पाठ वळताच विषारी फुत्कार सुरू होणे, सर्वांसमोर मात्र अगदी पायावर डोके टेकवणे, निंदानालस्ती, बदनामी, राजकारण, खोटेपणा या सर्वांची कीड या क्षेत्राला लागते. त्यातच विजयोन्माद आणि पराजय या दोहोंमुळे व्यसनाधीनता टोकाला पोचते.

या अश्या बाबींमुळे जो स्पर्धेतून बाद होत आहे त्याला कशाला पुन्हा वर आणा हाच विचार सगळे करत असणार. याचा परिपाक असावा अश्या माणसांवर अशी वेळ येण्यात!

लांबलचक प्रतिसादाबद्दल क्षमस्व!

-'बेफिकीर'!

सचिन तेंडुलकरला सांगा मदत करायला. किंवा एक चेक पाठवा. त्या साइटला अ‍ॅड्रेस केल्यास पत्ता मिळेल.

सचिन नक्कीच मदत करेल

एम एस शिंदे यांची पुढील माहिती इथे द्यावी.

राहता पत्ता तसेच बँकेतले नाव, तिथला अकाउंट नंबर, IFSC code, शाखा कुठली वगैरे समजले तर थेट पैसे पाठवता येतील. कुणीतरी कृपया पूढाकार घेऊन ही माहिती गोळा करा आणि इथे द्या. पुढचे आपण पाहू.

त्यांना नक्कीच मदत मिळेल.
मध्यंतरी डुप्लिकेट म्हणून काम करणार्‍या कलाकारांचा विमा उतरायला, विमा कंपन्या नकार देतात, असे वाचले होते.
कुठलेही कार्यक्षेत्र असो, भविष्याची तरतूद करणे अत्यंत गरजेचे असते. हे क्षेत्र तसे प्रसिद्धीवर आधारीत असल्याने, अशा बातम्या तरी येतात. बाकीच्या क्षेत्रांचे काय ?

किशोर नांदलोस्कर यांच्या विषयी अशीच एक बातमी ऐकलेली आठवते.
सध्या उपजीवीके साठी संघर्ष करत आहे अस काहीसं होतं. कुणाला कल्पना असेल तर अधिक माहीती द्यावी.

फारेंड,

विषय तसा जुनाच आहे.. हंगल, ललिता पवार, व ईतर अनेक...
'शोले' चे स्थान विशेष म्हणून एम एस शिंदे यांची अडचण आपल्याला अधिक बोचणारी ईतकच. पुन्हा शिंदे च्या जागी मिश्रा असते तर तितका कळवळा असता का हेही सांगणे अवघड आहे.

>>आपण फॅन लोक काय करू शकतो?
तात्पुरती बँडेड! पण मग काय..?

माझ्या माहितीनुसार, मुळात आपली चित्रपट्सॄष्टि is neither organized nor regulated. It has been granted 'industry' status in 2001, merely to allow financing by banks et al and to avoid underworld funding influence and black money. But I don't think it actually offers any retirement or contract benefits to millions of people who work in it in any capacity. Most of them work on cash payments or on verbal terms. Apart from big banners, advertisers, distributers, etc. I don't think any of those other artists works on official contractual terms. So, unless these critical issues of the ecosystem are addressed, you will continue to see few making millions and the rest barely making for their daily wages. The onus thus lies on those others to make some arrangements for their future. Especially in this industry there is no lack of man power and labor. That means less security and very little negotiating powers to the millions of supporting crew. At the most, we hear about some unions or local political leader to take up the cause again for their own vested interests, much likely to get some share of the pie.

We as aduience nevere ever bougthered about what happens behind the scenes. We pay the ticket price and play our part. As a fan, and purely as a consumer I see my responsibility ENDs there.

However, purely from social perspective we should help where we can as an individual. But again, there is no end to this... It is Shinde today, it will be someone else tomorrow. We don't need MBAs to understand that the millions of us actually pay for few hundreds to become rich.
एकंदर विषय व आवाका फार मोठा आहे... याबाबत कायदेशीर निश्चीत माहिती असणारे तज्ञ अधिक सांगू शकतील.

बेफि, प्रतिसाद योग्यच आहे. क्षमस्व ई. कशाला! हिंदी चित्रपट सृष्टीबद्दल आपल्यासारख्या लोकांचे मत असेच आहे. जे वाचतो त्यातून हेच जाणवते.

पण आश्चर्य वाटले हे वाचून. शोले/शान सारख्या चित्रपटाच्या संकलकाला काम न देऊन काय एकेक चित्रपट निर्माण केले होते ८० च्या दशकात त्या महान दिग्दर्शक लोकांनी!

आपण फॅन लोक काय करू शकतो? >>> दक्षिणेत फॅन क्लब्ज असतात ते मदत करतात. रजनीच्या फॅन क्लबच्या जोरावर शाळा चालू आहेत, गरीब मुलांना शिष्यव्रुत्त्या मिळतात, त्याची बायको स्वतः एक सामाजिक संस्था चालवते. ही जाणिव पैसे कमावणार्‍या प्रत्येकाला हवी.

पण मुळातच असे कुणाच्या दयेवर अवलंबून का असावे ? एखाद्या कलाकाराला २०० कोटी रूपयापर्यंत मानधन गेले आहे. रजनीलाच २१० कोटी जेलर साठी मिळाले. एव्हढे पैसे मुख्य कलाकाराला गेले तर इतर कलाकारांच्या मानधनात काटछाट होणार. समाजवादाच्या व्याख्येत वेतनात एव्हढी तफावत असायला नको. सध्या हा आवाज क्षीण, हास्यास्पद आहे.

तंत्रज्ञांची संघटना असेल आणि तिला राजकीय पाठबळ असेल तर शक्य आहे. टीव्ही इंडस्ट्रीत अशी संघटना होती. मध्यंतरी त्यांनी वेतन वाढवण्यासाठी संप केला होता तेव्हां या वाहिन्यांनी साऊथचे कंटेंट्स डब करून दाखवले. जुन्या मालिका दाखवल्या पण पैसे वाढवून दिले नाहीत. (त्या काळातच साऊथच्या सिनेमांचा अभ्यास झाला. :हाहा:)

<< समाजवादाच्या व्याख्येत वेतनात एव्हढी तफावत असायला नको. >>

म्हणूनच समाजवाद नको. प्रत्येक व्यक्तीला डिमांड-सप्लायनुसार हवे तितके वेतन कमवू देत.