मायबोलीवरील आयडी
मायबोलीवर मी गेली ४ वर्षे आहे. इथली काही सदस्यनामे सुरवातीला फारच खटकायची. माणसातले दोष, दुर्गुण किंवा अपप्रवृत्ती दर्शविणारे शब्द सदस्यनाम म्हणून वापरले जाणे विचित्रच वाटायचे. त्यामुळे पहिले काही महिने मी रोमातच असायचो. त्यावेळी अशा सदस्यनामांतर्गत लिहिले जाणारे लिखाण वाचू नये असेच वाटायचे. मायबोलीचं सदस्यत्व रद्द करावं असा विचारही काही वेळा मनात यायचा. याला भाबडेपणा किंवा बाळबोधपणा असेही कोणी म्हटल्यास मला काही वाटणार नाही. जसजसा जुना होत गेलो तसा सरावलो. आता तर निर्ढावलो म्हणायला हरकत नाही.
अशी सदस्यनामे वापरणार्या सदस्यांपैकी अनेकांचे लिखाण, प्रतिसाद, गप्पांच्या धाग्यावरील गप्पा, प्रत्यक्ष भेट याद्वारे ही माणसे सद्विचारी, उच्चशिक्षित, अनुभवी, सखोल विचार करणारी इतकेच नव्हे तर मायबोलीबद्दल खूप आत्मीयता असलेली आहेत हे गेल्या चार वर्षात जरी जाणवले असले, तरीसुद्धा असे आयडी काहीसे खटकतातच.
कोणी काय आयडी घ्यावा ही त्या सदस्याची मर्जी, स्वातंत्र्य हे मान्य आहेच. तरीदेखील मनात एक प्रश्न येतोच, की असे आयडी घेण्यामागे काय मनोधारणा/मानसिकता असावी.
माणसात, समाजात दुर्गुण, अपप्रवृत्ती इ. असणारच. रामराज्यात देखील होत्याच. पण म्हणून कोणी (अपवाद वगळल्यास) आपल्या मुलांची नांवं रावण, दु:शासन, त्राटिका ठेवतात का ?
स्वत:च्या दुकानाचे, व्यवसायाचे, घराचे नांव ठेवताना सर्वसाधारणपणे ते चांगले असेल असाच कटाक्ष बाळगला जातो ना ! नवीन इन्व्हेस्टमेंट कंपनी सुरू करणार्याला ’दळभद्री इन्व्हेस्टमेंट’ असे नांव सुचविल्यास त्याची काय प्रतिक्रीया असेल ??
याचप्रमाणे विविध व्यवसाय, संस्था इ. साठी काही नांवे सुचली ती अशी :
उद्दाम - सामंजस्य शिक्षा अभियान
कर्दनकाळ - शुश्रूषा केंद्र
बागुलबुवा - शिशुसंगोपन केंद्र
आगाऊ - संभाषणकला विकास केंद्र
नतद्रष्ट - संस्कृती संवर्धन केंद्र
रानडुक्कर - उपहारगृह
कावळा - संगीत विद्यालय
घुबड - ब्यु्टी पार्लर
टवाळ - व्यक्तिमत्व विकास अभ्यासवर्ग
हडळ - आत्मोन्नति वर्ग/केंद्र
इब्लिस - तक्रार निवारण विभाग
डोमकावळा - रंगशाळा
चिंधी - वस्त्रालय
दळभद्री - इन्व्हेस्टमेंट्स
हिडिस - सौंदर्यप्रसाधने
दैत्य - सत्संग
चोर - सिक्यूरिटी एजन्सी
अनेक दिवस मनात खदखदत होतं ते लिहिलंय.
कुणाचाही उपमर्द करणे, खिल्ली उडविणे असा उद्देश नसून जे प्रांजळ मत आहे ते व्यक्त केलंय इतकंच.
---------------------------------------------------------------------------------------------------------
"नांवात काय आहे ?" या बर्नॉड शॉच्या प्रसिद्ध वाक्याची आठवण करून देणारा प्रतिसाद नसावा ही माफक अपेक्षा.
>> असे आयडी घेण्यामागे काय
>> असे आयडी घेण्यामागे काय मनोधारणा/मानसिकता असावी.
जे खर्या जगात/आयुष्यात बोलायला धजावत नाही ते निदान आभासी (व्हर्च्युअल) जगात/आयुष्यात या आयडीने बोलणार आहे अशी इतरांना (आणि स्वतःलाही) सूचना?
कर्दनकाळ - शुश्रूषा
कर्दनकाळ - शुश्रूषा केंद्र
बागुलबुवा - शिशुसंगोपन केंद्र
आगाऊ - संभाषणकला विकास केंद्र
नतद्रष्ट - संस्कृती संवर्धन केंद्र
रानडुक्कर - उपहारगृह
कावळा - संगीत विद्यालय
घुबड - ब्यु्टी पार्लर
टवाळ - व्यक्तिमत्व विकास अभ्यासवर्ग
हडळ - आत्मोन्नति वर्ग/केंद्र
इब्लिस - तक्रार निवारण विभाग
डोमकावळा - रंगशाळा
चिंधी - वस्त्रालय
दळभद्री - इन्व्हेस्टमेंट्स
हिडिस - सौंदर्यप्रसाधने
दैत्य - सत्संग
चोर - सिक्यूरिटी एजन्सी<<<
गामा पैलवान - नाजूक मेंदी काढून मिळेल
लाश - प्रसूतीगृह
सुचना आवडल्या. फकस्त या
सुचना आवडल्या. फकस्त या नावाच्या आयडींना आक्षेप नसला म्हणजे झाले.:स्मित:
रानडुक्कर - उपहारगृह>>>??? हे
रानडुक्कर - उपहारगृह>>>???
हे काय काहीतरीच?
रानडुक्कर - पूर्वग्रहरहीत धडका मारून मिळतील
आता आम्ही म्हटलं की उल्हास
आता आम्ही म्हटलं की उल्हास भिडे हा सुद्धा कसला मजेशीर आयडी आहे ,तर?
म्हणजे भिड दाखवणारा माणूस उल्हासी कसा? किंवा उल्हासी माणसाला भीड कसली?
उल्हास मज्जेकर किंवा गुपचूप भिडे असं नाव असायला हवं.
किंवा उल्हास रंगमंदीर
भिडे वस्त्रालय ही नावे उद्योगांसाठी कशी वाटतात?
ह. घ्या.
हे तुमचे खरेखुरे नांव आहे याची मला कल्पना आहे.
जरा गंमत करत्येय.
बेफिकीरः- तक्रार निवारण
बेफिकीरः- तक्रार निवारण केंद्र नं . २:- इथे बेफिकीरीने समस्या न सोडवता, त्या हळूवारपणे, दुसर्याच्या मतांचा विचार करुन आणी आदर राखुन सोडवल्या जातील. बेफिकीर्.:दिवा:
गुपचूप भिडे <<< रश्मी -
गुपचूप भिडे <<<
रश्मी -
बेफिकीर - अँक्झायटी ट्रीटमेन्ट क्लिनिक
मी कुणाचा सुर्यास्त करतो
मी कुणाचा सुर्यास्त करतो ?????

साती, "आता आम्ही म्हटलं की
साती,

"आता आम्ही म्हटलं की उल्हास भिडे हा सुद्धा कसला मजेशीर आयडी आहे ,तर?" >>> म्हणा की. मला काहीही वाटणार नाही.
गुचुप भिडे
रश्मी,
आक्षेप घेणारा मी कोण ?
रश्मी, बेफी,
मी जाणूनबुजून विरोधाभास दर्शविणारी नावे (संस्था इ. ची) वापरली आहेत.
लेखन "भिड्"ले काका
लेखन "भिड्"ले काका
चांगले लिहीलय. अहो, पण
चांगले लिहीलय.
अहो, पण तुम्हाला माहिते का? होळीच्या वेळेस नै का? निरनिराळे मुखवटे तोन्डाला लावुन सोन्ग सजवतात? तस्सच काहीस हे!
आता दरवेळेसच कै सगळेजण फक्त राहुल/शाहरुखचेच मुखवटे लावुन फिरणार नाही, अस्ते प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी. म्हणून वेगवेगळ्या आयडीज.
लिंबूभौ, इथे पण अनुल्लेख
लिंबूभौ,
इथे पण अनुल्लेख झालाय हो तुमचा
(No subject)
>>> इथे पण अनुल्लेख झालाय हो
>>> इथे पण अनुल्लेख झालाय हो तुमचा <<<<
नाहीहो इब्लिसराव, ते अनुल्लेखवाले वाडकरी असल्या धाग्यांवर फिरकत नस्तात.
हे आपल कस? की स्तंभित झाल्याने मुखातुन शब्दही उमटत नाही अशा वेळा येतात माणसांवर कधीकधी, पण म्हणजे स्तंभित झालेल्याने अनुल्लेख केला आहे असे मानायचे नस्ते. तसच काहीस हे आहे.
अन हे म्हणजे कस हे? की उत्कृष्ट गायक त्याची गायकी सादर करताना, निवडक श्रोतेच (बहुधा आपल्यालाही गाण्यातले कळते हे दाखवुन देण्यासाठी उगीचच मधे मधे) "व्वा व्वा" "व्वाहव्वा" "क्या ब्बात है" असले उद्गार काढीत अस्तात, बाकी जण आपले निमुटपणे गाण्याचा रसास्वाद घेत असतात. तसच काहीस हे आहे. या निमुटपणाला अनुल्लेखाचे नाव ठेवून उणावू नका हो प्लिजच!
वा! साती....................
वा!
साती....................:खोखो:
बेफिकीर नर्सिंग होम.....कसं
बेफिकीर नर्सिंग होम.....कसं वाटतंय बेफि....हल्के घ्या हो!!!
(No subject)
(No subject)
उकाका, १ नंबर.. साती
उकाका, १ नंबर..
साती
"लिंबूभौ, इथे पण अनुल्लेख
"लिंबूभौ, इथे पण अनुल्लेख झालाय हो तुमचा" >>> विषयाशी संबंधित नसल्याने 'limbutimbu' हे नांव लेखनात आलं नाही. माझ्या अल्पमतीनुसार लिंबुटिंबू हा शब्द दुर्गुण किंवा अपप्रवृत्ती दर्शविणारा नसून एखाद्याची क्षमता विषद करणारा आहे. (लिंबुभौ सक्षम नाहीत असे मला म्हणायचे नाही हे सांगण्याची आवश्यकता नसावी.)
-----------------------------------------------------------------------------------------------------
बेफिकीर या सदस्यनामाबाबत माझ्या अत्यल्पमतीनुसार माझं मत :
बेफिकीर हे विशेषण स्वत:ची काळजी न करणार्याबाबत वापरले जाते. बेफिकीरी ही अपप्रवृत्ती नाही.
त्यामुळे या सदस्यनामाचाही उल्लेख लेखात केलेला नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------
(बेपर्वा हे विशेषण, विशेषकरून दुसर्यांची काळजी/पर्वा न करणार्याबाबत वापरले जाते.)
-----------------------------------------------------------------------------------------------------
माझ्या स्मरणात असलेल्या सदस्यनामांचा मी उल्लेख केला आहे.
अनेक राहिली असतीलही........ क्षमस्व.
भिडे काका, इब्लिसगिरी ही
भिडे काका,
इब्लिसगिरी ही नक्की कोणती अपप्रवृत्ती आहे ते जरा यक्षप्लेन करणार का?
"भिडे काका, इब्लिसगिरी ही
"भिडे काका,
इब्लिसगिरी ही नक्की कोणती अपप्रवृत्ती आहे ते जरा यक्षप्लेन करणार का?" >>> माझ्या आठवणीनुसार कुठल्यातरी प्रतिसादात किंवा वाहत्या धाग्यात तुम्ही एक लिंक दिली होती. त्यावर इब्लिस या शब्दाचा अर्थ
किंवा स्पष्टीकरण दिले होते. कृपया ती लिंक पाहणार का ? माझ्या संग्रही असती तर मीच दिली असती.
त्याचप्रमाणे माझ्या या लेखनातील दुसरा परिच्छेद देखील परत वाचावा ही विनंती.
राग/गैरसमज नसावा, लोभ असावा.... वृद्धिंगत व्हावा हीच अपेक्षा आणि इच्छा.
वळल तर सूत नाही तर भूत ही
वळल तर सूत नाही तर भूत ही म्हण कुठल्या आयडी कडे पहात मनात येते?
भिडेजी, अहो, म्हणूनच म्हटलं.
भिडेजी,
अहो, म्हणूनच म्हटलं. इब्लिसपणा हा शब्द थोडा वात्रटपणा या अर्थी घेतात. ती अपप्रवृत्ती कशी? उच्छृंखलपणा म्हणा हवं तर. बाकी मी शिरेसली घेत नाहिये. गम्मत गम्मतच चाल्लिये. सो फिकिर नॉट.
घाटपांडे साहेब,
ती म्हण मला आरशात पाहिल्यावर मनात येते
>>ती म्हण मला आरशात
>>ती म्हण मला आरशात पाहिल्यावर मनात येते<<
हॅहॅहॅ. आपन काय बी बोल्लो नाय बरका
>>>> वळल तर सूत नाही तर भूत
>>>> वळल तर सूत नाही तर भूत ही म्हण कुठल्या आयडी कडे पहात मनात येते? <<<<
(तस नसेल तर नशिबवान आहात म्हणेन!
)
इथल्या भासमान आयडीज्कडे बघायची गरज आहे?
हे मनात यायला कलंत्र पुरेसे ठरले नाहीका अजुन?
जामोप्या म्हणजे कोण?
जामोप्या म्हणजे कोण?
मस्त लिहीलेय काका :
मस्त लिहीलेय काका :P:
रानडुक्कर - उपहारगृह>>>> हे
रानडुक्कर - उपहारगृह>>>> हे कस काय सुचल तुम्हाला
बेफिकीर नर्सिंग होम.....कसं वाटतंय बेफि....>>>>> रिअॅलिस्टीक वाटतय... नाहितरी तिकडे तेच चाललेल असत...
उकाका भारी लिवलंय. लाला
उकाका भारी लिवलंय.
लाला अमरनाथ, लाला किरोडीमल वानी आपुनबी लाला म्हनत अस्तो तर उलाला उलाला हे गानं आपल्या काकासाठी म्हनता आलं अस्तं कि.
Pages