मायबोलीवरील आयडी

Submitted by UlhasBhide on 23 October, 2013 - 10:21

मायबोलीवरील आयडी

मायबोलीवर मी गेली ४ वर्षे आहे. इथली काही सदस्यनामे सुरवातीला फारच खटकायची. माणसातले दोष, दुर्गुण किंवा अपप्रवृत्ती दर्शविणारे शब्द सदस्यनाम म्हणून वापरले जाणे विचित्रच वाटायचे. त्यामुळे पहिले काही महिने मी रोमातच असायचो. त्यावेळी अशा सदस्यनामांतर्गत लिहिले जाणारे लिखाण वाचू नये असेच वाटायचे. मायबोलीचं सदस्यत्व रद्द करावं असा विचारही काही वेळा मनात यायचा. याला भाबडेपणा किंवा बाळबोधपणा असेही कोणी म्हटल्यास मला काही वाटणार नाही. जसजसा जुना होत गेलो तसा सरावलो. आता तर निर्ढावलो म्हणायला हरकत नाही.

अशी सदस्यनामे वापरणार्‍या सदस्यांपैकी अनेकांचे लिखाण, प्रतिसाद, गप्पांच्या धाग्यावरील गप्पा, प्रत्यक्ष भेट याद्वारे ही माणसे सद्विचारी, उच्चशिक्षित, अनुभवी, सखोल विचार करणारी इतकेच नव्हे तर मायबोलीबद्दल खूप आत्मीयता असलेली आहेत हे गेल्या चार वर्षात जरी जाणवले असले, तरीसुद्धा असे आयडी काहीसे खटकतातच.

कोणी काय आयडी घ्यावा ही त्या सदस्याची मर्जी, स्वातंत्र्य हे मान्य आहेच. तरीदेखील मनात एक प्रश्न येतोच, की असे आयडी घेण्यामागे काय मनोधारणा/मानसिकता असावी.

माणसात, समाजात दुर्गुण, अपप्रवृत्ती इ. असणारच. रामराज्यात देखील होत्याच. पण म्हणून कोणी (अपवाद वगळल्यास) आपल्या मुलांची नांवं रावण, दु:शासन, त्राटिका ठेवतात का ?

स्वत:च्या दुकानाचे, व्यवसायाचे, घराचे नांव ठेवताना सर्वसाधारणपणे ते चांगले असेल असाच कटाक्ष बाळगला जातो ना ! नवीन इन्व्हेस्टमेंट कंपनी सुरू करणार्‍याला ’दळभद्री इन्व्हेस्टमेंट’ असे नांव सुचविल्यास त्याची काय प्रतिक्रीया असेल ??

याचप्रमाणे विविध व्यवसाय, संस्था इ. साठी काही नांवे सुचली ती अशी :

उद्दाम - सामंजस्य शिक्षा अभियान
कर्दनकाळ - शुश्रूषा केंद्र
बागुलबुवा - शिशुसंगोपन केंद्र
आगाऊ - संभाषणकला विकास केंद्र
नतद्रष्ट - संस्कृती संवर्धन केंद्र
रानडुक्कर - उपहारगृह
कावळा - संगीत विद्यालय
घुबड - ब्यु्टी पार्लर
टवाळ - व्यक्तिमत्व विकास अभ्यासवर्ग
हडळ - आत्मोन्नति वर्ग/केंद्र
इब्लिस - तक्रार निवारण विभाग
डोमकावळा - रंगशाळा
चिंधी - वस्त्रालय
दळभद्री - इन्व्हेस्टमेंट्स
हिडिस - सौंदर्यप्रसाधने
दैत्य - सत्संग
चोर - सिक्यूरिटी एजन्सी

अनेक दिवस मनात खदखदत होतं ते लिहिलंय.
कुणाचाही उपमर्द करणे, खिल्ली उडविणे असा उद्देश नसून जे प्रांजळ मत आहे ते व्यक्त केलंय इतकंच.
---------------------------------------------------------------------------------------------------------
"नांवात काय आहे ?" या बर्नॉड शॉच्या प्रसिद्ध वाक्याची आठवण करून देणारा प्रतिसाद नसावा ही माफक अपेक्षा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धा.रानडे | 25 October, 2013 - 11:07 नवीन

बेफिकीर नर्सिंग होम.....कसं वाटतंय बेफि....>>>>> रिअ‍ॅलिस्टीक वाटतय... नाहितरी तिकडे तेच चाललेल असत...

<<<

मुग्धा रानडे, तुम्ही बेफि आहात का?

नाही पण तो प्रश्न वाचुन माझ्या मनात आल ते मी लिहिल कॉपी पेस्ट करताना तुमच नाव खोडायच राहुन गेल चुकुन. नाक घासुन माफी मागते मी तुमची बेफीजी... 'नाहितरी तिकडे तेच चाललेल असत'>>> हे वाक्य नर्सिंग होमाला उद्देशुन आहे तुम्हाला नाही. गैरसमज झाला असेल तर परत नाक घासते...

अवांतर प्रतिसादामुळे दोघेही नाक घासा पाहु<<<

काहीतरी भलतंच! इश्श्य!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

बेफी, तुम्ही एकही संधी सोडू नका........डायलॉग मारायची Proud Wink

अवांतर प्रतिसादामुळे दोघेही नाक घासा पाहु<<<

काहीतरी भलतंच! इश्श्य!>> पुन्हा गफलत येथे आयडी बेफी पाहीजे होता कि मुग्धा

माबोच्या प्रथेप्रमाणे मुळ विषय सोडुन भलताच विषय सुरु झालाय इथे... चला वळा परत सगळे आयड्यांच्या गप्पांकडे

काहीतरी भलतंच! इश्श्य!>> पुन्हा गफलत येथे आयडी बेफी पाहीजे होता कि मुग्धा>>>> बेफीच्या प्रश्नाच उत्तर मी दिल ना म्हणुन मग खुन्न्स काढण्यासाठी बेफींनी माझ्या स्टाईलने उत्तर दिल.. अय्या! इश्श! करुन Biggrin

कचरू निकाळजे म्हंजी कोन हे न्हाईच सांगितलं न्हवं ? येका पायानं लंगडतंय म्हुन त्याचं नाव तुंड्या पडलं व्हतं. ल्हानपनापासुन समज कमी. मंग गावचा कचरा गोळा करून जाळायचं काम दिलं पंचायतीन. पन हळुच खोड्या काडतंया अन सोताच हसतंया. आता मोटं झालं पन बालिश चाळे काय जायिना. मंग धोपाटलं कुनीतरी तर भोकाड पसरतंय, त्याची खोड काडली तर हातपाय आपटतंय. आता म्हनलं जाऊंद्या हाय गावातलंच. कायतरी अजुन काम कर म्हनलं तर परसदारी मळा लावलाय म्हनलं. कसला इच्चारलं तर म्हनतंय.. गजलमळा !
आता रं, काय अवदसा आठवली म्हनायची ही ? आता परसाकडं जातंय व्हय कोन बगाय ? पन न्हाई गेलं तर लै जोरात गजला व्हतायत कचरूला.

त्येचा मज्जा सांगनार व्हतो, आवं, मज्जा म्हंजी काय, गावात दुपार पेपर निघतु का सांजच्याला, तितं जातंया हे काड्या टाकाय. पन जाऊंद्या आता. खवळायचं परत. हितं नाय सांगत. आमच्या मैलासरपंचीणबाईला वंगाळ वाटतंय. अन गावचं पाटील बी नाराज व्हतंय.

आयकायचंय म्हनता ? हितल्या पाटलाला रामराम म्हना मंग.

इब्लिस, तुम्ही झोपता कधी? >>
रोज.
चान्स मिळेल तेव्हा.
आजची जवळ-जवळ झोपायची वेळ झालिये. झोपतो आता Wink

Pages