मायबोलीवरील आयडी
मायबोलीवर मी गेली ४ वर्षे आहे. इथली काही सदस्यनामे सुरवातीला फारच खटकायची. माणसातले दोष, दुर्गुण किंवा अपप्रवृत्ती दर्शविणारे शब्द सदस्यनाम म्हणून वापरले जाणे विचित्रच वाटायचे. त्यामुळे पहिले काही महिने मी रोमातच असायचो. त्यावेळी अशा सदस्यनामांतर्गत लिहिले जाणारे लिखाण वाचू नये असेच वाटायचे. मायबोलीचं सदस्यत्व रद्द करावं असा विचारही काही वेळा मनात यायचा. याला भाबडेपणा किंवा बाळबोधपणा असेही कोणी म्हटल्यास मला काही वाटणार नाही. जसजसा जुना होत गेलो तसा सरावलो. आता तर निर्ढावलो म्हणायला हरकत नाही.
अशी सदस्यनामे वापरणार्या सदस्यांपैकी अनेकांचे लिखाण, प्रतिसाद, गप्पांच्या धाग्यावरील गप्पा, प्रत्यक्ष भेट याद्वारे ही माणसे सद्विचारी, उच्चशिक्षित, अनुभवी, सखोल विचार करणारी इतकेच नव्हे तर मायबोलीबद्दल खूप आत्मीयता असलेली आहेत हे गेल्या चार वर्षात जरी जाणवले असले, तरीसुद्धा असे आयडी काहीसे खटकतातच.
कोणी काय आयडी घ्यावा ही त्या सदस्याची मर्जी, स्वातंत्र्य हे मान्य आहेच. तरीदेखील मनात एक प्रश्न येतोच, की असे आयडी घेण्यामागे काय मनोधारणा/मानसिकता असावी.
माणसात, समाजात दुर्गुण, अपप्रवृत्ती इ. असणारच. रामराज्यात देखील होत्याच. पण म्हणून कोणी (अपवाद वगळल्यास) आपल्या मुलांची नांवं रावण, दु:शासन, त्राटिका ठेवतात का ?
स्वत:च्या दुकानाचे, व्यवसायाचे, घराचे नांव ठेवताना सर्वसाधारणपणे ते चांगले असेल असाच कटाक्ष बाळगला जातो ना ! नवीन इन्व्हेस्टमेंट कंपनी सुरू करणार्याला ’दळभद्री इन्व्हेस्टमेंट’ असे नांव सुचविल्यास त्याची काय प्रतिक्रीया असेल ??
याचप्रमाणे विविध व्यवसाय, संस्था इ. साठी काही नांवे सुचली ती अशी :
उद्दाम - सामंजस्य शिक्षा अभियान
कर्दनकाळ - शुश्रूषा केंद्र
बागुलबुवा - शिशुसंगोपन केंद्र
आगाऊ - संभाषणकला विकास केंद्र
नतद्रष्ट - संस्कृती संवर्धन केंद्र
रानडुक्कर - उपहारगृह
कावळा - संगीत विद्यालय
घुबड - ब्यु्टी पार्लर
टवाळ - व्यक्तिमत्व विकास अभ्यासवर्ग
हडळ - आत्मोन्नति वर्ग/केंद्र
इब्लिस - तक्रार निवारण विभाग
डोमकावळा - रंगशाळा
चिंधी - वस्त्रालय
दळभद्री - इन्व्हेस्टमेंट्स
हिडिस - सौंदर्यप्रसाधने
दैत्य - सत्संग
चोर - सिक्यूरिटी एजन्सी
अनेक दिवस मनात खदखदत होतं ते लिहिलंय.
कुणाचाही उपमर्द करणे, खिल्ली उडविणे असा उद्देश नसून जे प्रांजळ मत आहे ते व्यक्त केलंय इतकंच.
---------------------------------------------------------------------------------------------------------
"नांवात काय आहे ?" या बर्नॉड शॉच्या प्रसिद्ध वाक्याची आठवण करून देणारा प्रतिसाद नसावा ही माफक अपेक्षा.
अश्या कश्या या झोपायच्या
अश्या कश्या या झोपायच्या वेळा?
जवळ - जवळ झोपायच्या, लांब - लांब झोपायच्या!
कमालच आहे.
अहो, ते सगळे पेशंटवर अवलंबून
अहो, ते सगळे पेशंटवर अवलंबून असते. त्यामुळे चान्स मिळाला की लंबी ताणून देणे इतकेच उच्च ध्येय असते.
हाऽऽऽऽऽऽऽऽय लक्ष्य१०१४ उर्फ
हाऽऽऽऽऽऽऽऽय लक्ष्य१०१४ उर्फ ठो.
जे खर्या जगात/आयुष्यात
जे खर्या जगात/आयुष्यात बोलायला धजावत नाही ते निदान आभासी (व्हर्च्युअल) जगात/आयुष्यात या आयडीने बोलणार आहे अशी इतरांना (आणि स्वतःलाही) सूचना?
+१.
त्यात काही वाईट नाही असे मला वाटते. कुणा कुणाच्या आयुष्यात खर्या जगात जर फारसे सुख, आनंद नसेल नि आभासी जगात मिळत असेल तर मिळू द्या त्यांना.
खर्या आयुष्यात काय केले, बोलले ते त्यांचे त्यांना लखलाभ. तिथे जे करणे जमले नाही, पण करायची तर इच्छा आहे. अश्या वेळी असे आभासी जग उपयोगी पडते.
सगळे मनातल्या मनात ठेवून एक दिवस बंदूक घेऊन निरपराध बालकांची हत्या करायची नि वर मनोविकारांमुळे असे झाले, मला जनतेच्या पैशात पोसा आता, असे म्हणण्यापेक्षा हे बरे. काय राग, वाईट विचार, फालतूपणा असेल तो इथेच ठेवला तरी सुदैवाने इथे इथले लिहीलेले फारसे मनावर न घेणारे लोक आहेत.
फिकीर ही अक्षरे छूट अशी
फिकीर ही अक्षरे छूट अशी दिसतात. चष्मा लागला का पहायला हवा.
Pages