आविष्कार २०१३, महापौर छायाचित्र स्पर्धा प्रदर्शन, ठाणे

Submitted by सावली on 22 October, 2013 - 23:57

फोटोसर्कल सोसायटीच्या 'आविष्कार' महापौर छायाचित्र स्पर्धेतल्या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन कलाभवन, ठाणे येथे आहे.
शक्य असेल त्या सगळ्यांनी नक्की तिथे जाऊन या. अ‍ॅक्शन, हिस्टोरिकल प्लेसेस, शाळा या सगळ्याचे फोटो बघण्यासारखे आहेतच पण विषेशकरुन 'टेबलटॉप' या विषयात मधे खुप छान प्रकाशचित्रे आहेत.

जागा - कलाभवन, बिगबझार जवळ, कापुरबावडी, ठाणे
वेळ - २२ऑक्टो ते २७ ऑक्टो. सकाळी १०:०० ते संध्याकाळी ७:००

माझा 'उत्तेजनार्थ' पारितोषिक विजेता फोटो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! वा! सुंदर Happy
(टेबलटॉप फोटोग्राफीबद्दल नुकतंच वाचनात आलं होतं. भन्नाट प्रकार असतो तो.)

त्या आडव्या ग्लासमध्ये सांडणार नाही इतपत द्रवपदार्थ हळूहळू भरला का?

अगं, हो, मगाशी तो प्रश्न टाकला आणि मग मलाही जाणवलं, की आपण जरा मठ्ठपणाच केला तसं विचारून Proud

सावली अभिनंदन!!! सुंदर फोटो.

शनिवारी प्रयन्त करतो प्रदर्शनाला भेट देण्याचा.

कडांमध्ये द्रव भरलेले म्हणजे? द्रव सील्ड आहे का काचेच्या पोकळीत? सील्ड असेल तरी क्षितिजपातळीलाच रहायला हवा बहुतेक.

बापरे! भिषोण सुंदर!!!
या प्र्.चि. ला उत्तेजनार्थ मिळाले तर प्रथम पारितोषिक विजेते चित्र पाहाण्याची इच्छा आहे.

फार सुंदर........................

चाबुक ... !!!
कातिल आलाय फोटो ... आणि याला उत्तेजनर्थ??? म्हणजे प्रदर्शन खरोखरच बघण्या सारखे असणार.

इंद्रा.... प्रदर्शनाला गेलास तर एक फोटो वृत्तांत टाक रे इथे Happy

Pages