आविष्कार २०१३, महापौर छायाचित्र स्पर्धा प्रदर्शन, ठाणे

Submitted by सावली on 22 October, 2013 - 23:57

फोटोसर्कल सोसायटीच्या 'आविष्कार' महापौर छायाचित्र स्पर्धेतल्या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन कलाभवन, ठाणे येथे आहे.
शक्य असेल त्या सगळ्यांनी नक्की तिथे जाऊन या. अ‍ॅक्शन, हिस्टोरिकल प्लेसेस, शाळा या सगळ्याचे फोटो बघण्यासारखे आहेतच पण विषेशकरुन 'टेबलटॉप' या विषयात मधे खुप छान प्रकाशचित्रे आहेत.

जागा - कलाभवन, बिगबझार जवळ, कापुरबावडी, ठाणे
वेळ - २२ऑक्टो ते २७ ऑक्टो. सकाळी १०:०० ते संध्याकाळी ७:००

माझा 'उत्तेजनार्थ' पारितोषिक विजेता फोटो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सील्ड असेल तरी क्षितिजपातळीलाच रहायला हवा बहुतेक. +१

थँक्यु लोक्स Happy
प्रदर्शन नक्की बघा.
अश्विनीके तुला ९९ मार्कस Wink हे खरे लिक्विड नाही. जेली आहे. ( आता गणपतीतल्या पाककला स्पर्धेतली जेली जाऊन पहा Wink )

याचे जजिंग ओपन होते. जज करताना पार्टीसिपंट्सची नावे जज ना माहित नव्हती. मी तिथे उपस्थित होते.
स्पर्धेतले पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकाचे फोटो कन्सेप्चुअल आहेत. खुपच छान आहेत. मी परिक्षक असते तरी त्यांनाच क्रमांक दिला असता.
तिसर्‍या क्रमांकाच्या फोटोमधे आणि या फोटोत परिक्षकांना कन्फ्युजन होतं. स्पर्धेच्या नियमांप्रमाणे फोटोशॉप एडीटींग चालणार नव्हते. त्यामुळे हा फोटो कसा काढला आहे याबद्दल त्यांना बरच कन्फ्युजन असल्याने याला उत्तेजनार्थ पारितोषिक दिलं गेलं.
हा फोटो पाठवण्याआधी लेकीला दाखवला होता तेव्हा ती म्हणाली की हे 'पझल' आहे म्हणुन तीला आवडलं. परिक्षकांच्या बाबतीत ते खरंच झालं. Wink फक्त त्याचा परिणाम जरा निगेटिव्ह झाला.

हार्दिक अभिनंदन गं सावली Happy

अप्रतिम आहे फोटो!

हा फोटो पाठवण्याआधी लेकीला दाखवला होता तेव्हा ती म्हणाली की हे 'पझल' आहे म्हणुन तीला आवडलं<<< मस्तचं Happy

सुं द र Happy

Pages