भरतकाम - साडी आणि कुर्तीच्या बाह्या

Submitted by अश्विनी के on 21 October, 2013 - 01:30

१२ वर्षांपुर्वी प्लेन टसर सिल्क ताग्यातून कापून घेतलं होतं आणि त्यावर भरत केलं होतं. मस्त साडी बनली. अजून जशीच्या तशी आहे (वापरलीही कमीच) Happy

फिशबोन टाका, बटनहोल टाका, उलट टीप घातले आहेत.
DSC_0071.jpgDSC_0074.JPG

ही कुर्ती. ह्याच्या लांब बाह्या पुर्ण ह्या डिझाईनने भरुन टाकल्या. ही कुर्ती वापरली बर्‍यापैकी पण अजूनही एकही भरतकामाचा टाका निघाला नाही. इथे सॅटिन स्टीच आणि उलट टीप वापरले.

DSC_0072.jpg

अजूनही बरेच ड्रेसेस आणि साड्या भरतकाम/पेंट केले होते पण आता शिल्लक नाहीत. होते तेव्हा फोटो काढून ठेवायचं सुचलं नाही. ह्या दोन गोष्टी अजून आहेत म्हणून तुम्हाला दाखवता आल्या. गोड मानून घ्या Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !!!

वॉव....

कसली कला आहे तुझ्या बोटांत! मला एवढं पेन्सीलने कागदावर काढता आले तरी मी स्वतःची पाठ थोपटून घेईन.

कसलं भारी आहे...
मी धावदोर्‍यातही एकासारखा पुढचा टाका घालू शकत नाही.
साड्या, ड्रेसवर भरतकाम करणार्‍याबद्दल मला प्रचंड आदर वाटतो.

मंजू मला पण साधा धावदोरासुद्धा धड जमत नाही.
वीणकाम, भरतकाम अणि शिवणकाम करणारे लोक खूप ग्रेट असतात.

अल्पना आणि मंजुडी ++ १०००००००
केश्वे मस्त... (ड्रेसचे कापड कधि आणुन देऊ????) Happy

धन्यवाद Happy रोज १५ मिनिटं तरी आपल्या छंदांसाठी राखून ठेवता आली पाहिजेत असं वाटतंय. शक्य होईल की नाही माहित नाही.

nikitasurve, क्लास वगैरे नाही. असंच आपलं आवड म्हणून करत असे.

'गुटगुटीत' ने हे दोन्ही आणि बाकीचं भरतकामही पाहिलं आहे. मगाशीच ती म्हणाली तो 'शहेनशहा' (हे नाव मीच ठेवलंय दोन्ही लांब बाह्या पुर्ण भरलेल्या असल्यामुळे) कधीच टाकू नकोस. जपून ठेव.

काशी, दे आणून कापड. कधी पुर्ण करुन मिळेल माहित नाही Proud

अल्पना, मंजू +९९९९९९९९९९९९९९९९९९९९९ Proud

साडीच्या डिझाईनमध्ये छोटेसे आरश्यांटाईप प्लॅस्टिकचे गोल तुकडे मिळतात ते लावले आहेत पण आता लक्षात आलं की ते फोटोत आलेच नाहीत. ते लावतानाही बटनहोलचाच टाका वापरला. कोपर्‍यात ती टिकली असलेला छोट्या बुट्ट्याचा फोटोही अ‍ॅड करतेय.

Pages