संहिता चित्रपटाच्या पुण्यातील प्रथमखेळ पुर्वसमयी घेतलेली प्रकाशचित्रे

Submitted by हर्पेन on 18 October, 2013 - 06:43

'संहिता' चित्रपटाच्या पुण्यात झालेल्या, पहिल्या खेळापुर्वी घेतलेल्या काही प्रकाशचित्रांमधली ही निवडक प्रकाशचित्रे.

मला या खेळाला उपस्थित रहाण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली ते केवळ आपली मायबोली या चित्रपटाची माध्यम प्रायोजक असल्याकारणाने व चिनूक्सामुळे Happy

आजवर ज्यांच्याबद्दल केवळ ऐकले वाचलेच होते. ज्यांच्या 'पाणी', 'बाई' सारख्या लघूपटांपासून चालू झालेल्या कारकिर्दीचा मी दूरस्थ प्रेक्षक होतो, ज्यांच्या दोघी, वास्तुपुरुष सारख्या चित्रपटांचा चाहता होतो, त्या सुमित्रा भावे सुनिल सुखथनकर या जोडगोळीच्या नवाकोर्‍या संहिता या चित्रपटाच्या प्रदर्शन-निमित्ताने त्यांना जवळून बघण्याची संधी कोण बरे दवडेल. तसेच ज्या चित्रपटाने अनेकविध पारितोषके मिळवून प्रत्यक्ष प्रदर्शनापूर्वीच जनामनात उत्कंठा निर्माण केलेली होती त्या चित्रपटाच्या पुण्यातल्या पहिल्या खेळाला उपस्थित रहाण्यामागे अजून एक कारण म्हणजे मिलींद सोमण. (पण आमचे वेगळे आहे)

जरा अवांतर - मी सध्या मॅरॅथॉन मधे भाग घेण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे. मध्यंतरी पुण्यात झालेल्या रन बियाँड मायसेल्फ नावाच्या चॅरिटी रन मिलींद सोमण अनवाणी पायांनी अर्ध मॅरॅथॉन धावला होता. त्याच स्पर्धेत मी माझी सर्वप्रथम लांब पल्ल्याची शर्यत म्हणजे १५ किमी अंतर धावलो; इथे बूट घालून धावतानासुद्धा नाकी नऊच काय पण दहा अकरा बारा येतात आणि हा माणूस अर्ध मॅरॅथॉन (२१ किमी) हे अंतर बर्‍यापैकी चांगल्या (काँपिटेटिव्ह) वेळेत पार करतो ही गोष्ट माझ्यासाठी त्याच्या रॅम्प, अॅड फिल्म्स, म्युझिक अल्बम किंवा चित्रपटातील भुमिकांपेक्षा फार फार मोलाची वाटते. (याचा अर्थ तुम्हाला असे वाटत असेल की मी त्याच्या ह्या कामांना किंवा ग्लॅमर क्षेत्राला कमी लेखतोय तर हो तुम्हाला नक्कीच कळलंय मला काय म्हणायच आहे Wink ) पण त्या स्पर्धेच्या नंतर मीच इतका दमलेला होतो की त्याच्यापाशी जाऊन चार शब्द बोलायचे त्राणदेखिल माझ्यात उरले नव्हते, त्यामुळे हा दुग्धशर्करा योग (कोजागिरी जवळ आली आहे ना! नाहीतर मणी कांचन म्हणणार होतो) साधायचाच असे ठरवले.

खरेतर फोटो काढायचे असे काही आधीपासून ठरवले नव्हते; चिनुक्साला आयत्यावेळी विचारून मगच कॅमेरा नेलेला. शिवाय अशा प्रकारे फोटो काढण्याची माझी पहिलीच वेळ, त्यात काही फोटो हलले आहेत, फोटो म्हणून त्यांचे मुल्य स्मृतीस उजाळा यापरते काहीच नाही.त्यामुळे काही कमी जास्त झाले असल्यास सांभाळून घ्या.

तर मंडळी अशा रितीने, सहर्ष सादर करत आहे 'संहिता' चित्रपटाच्या पुण्यात झालेल्या, पहिल्या खेळापुर्वी घेतलेल्या काही प्रकाशचित्रांमधली ही निवडक प्रकाशचित्रे.

१. सुमित्रा भावे

२. देविका दप्तरदार

३. मिलींद सोमण

४. मिसो, पुर्वकल्पना नसताना दिसलेले डॉ. मोहन आगाशे आणि सुनिल सुखथनकर

५. सुमित्रा भावे आणि लालन सारंग

६. अमोल पालेकर

७. आरती अंकलीकर टिकेकर

८. अनिल अवचटांसोबत माबोकर साजिरा आणि आनंदयात्री

९ मिलींद सोमण सोबत माबोकरकाशी

१०. मिलींद सोमण बरोबर काशी, अरुंधती कुलकर्णी, केदार जाधव

प्रत्यक्ष खेळाला सुरुवात होण्याआधी तेव्हा उपस्थित असलेल्या चित्रपट निर्मितीशी सर्व संबधित घटकांची ओळख घडवून आणते वेळचे फोटो
११.

१२.

१३.

१४.

१५. आणि.... (last but definitely not least) प्रा...नाही नाही प्राण नाही, आपला चिनूक्स Happy

आणि शेवटचा म्हणताना अजून काही प्रचि.

देविका

मिलींद

खुदूखुदू हसतंय्‌ गालात

आणि खास लोकाग्रहास्तव मायबोलीकर असलेले समूह प्रचित्रे

आणि परत एकदा, Last but not least मोहन आगाशे आणि.......चिनूक्स Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच....
सगळ्या मायबोलीकरांचा आणि संहिताच्या टीमचाही एक घेतला होता ना फोटो?
तो पण टाक ना असेल तुझ्याकडे तर..

हर्पेन ! प्रथमखेळ पूर्वसमय ! मारलंत शीर्षकापासूनच .प्रचि, क्लोज-अप्स अगदी मस्त आलेत.
चिनूक्स , काशी, केदार,अरुंधती, साजिरा , आनंदयात्री ..माबोकरांना नावानिशी पाहून छान वाटलं . चैतन्य म्हणतोय तसे अजून असतील तर टाका ना फोटो.

क्लास! मायबोलीचा बोर्ड मस्त!

काशी आणि अरु !!! Happy काशीचा चेहरा कसल्ला चमकतोय! सह्ही Happy (झारा, बघतेयस ना??? Biggrin )

डॉ. मोहन आगाशेंना देऊळच्या प्रिमियरला पाहिलं होतं तेव्हा एकदम खानदानी पोषाख होता. हा पोषाखही मस्त दिसतोय त्यांना.

मुंबईत एकदम साधे आलेले कलाकार एकदम ट्रेन्डी दिसतायत पुण्यात. राजेश्वरी नाही का आली?

चिन्मय खूप दमलेला दिसतोय.

मस्त फोटोग्राफ्स हर्पेन. Happy

आता तू मिलिंद सोमणच्या पादत्राणांबद्दल त्याच्याशी जे काही बोलत होतास त्यामागची पार्श्वभूमी समजली!!

क्या बात है Happy खासच आलेत सगळे फोटो Happy
देविका इथे कालच्यापेक्षा छान दिसतेय आणि सोमण तर देवा रे देवा!!
किती प्रसन्न भाव आहेत सर्वांच्याच चेह-यावर... हर्पेन, टू गुड!

मस्त आहेत सगळे फोटो .

सगळ्या मायबोलीकरांचा आणि संहिताच्या टीमचाही एक घेतला होता ना फोटो?
तो पण टाक ना असेल तुझ्याकडे तर. >> +१

अर्रे वा, इतक्या सार्‍या प्रतिक्रिया,
धन्यवाद मंडळी,

"सगळ्या मायबोलीकरांचा आणि संहिताच्या टीमचाही एक घेतला होता ना फोटो" - ह्या फोटोत माझ्याकडे कोणी कोणी बघत नाहिये (आयाच्या कॅमेर्‍यात असणार हा फोटो) माझ्याकडचा फोटो तिरक्या कोनातला आहे, तरी हा आणि अजून काही फोटो आहेत ते नंतर टाकतो, जमले तर आजच रात्री नाहीतर रवीवारी दुपारनंतर...

आमचे येथे येत्या रवीवारी (२० ऑक्टोबर रोजी) सकाळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असल्याकारणाने (आयोजकांमधे मी पण आहे) जरा पुर्व तयारी करायची आहे तेव्हा कृपया धीर धरून सहकार्य करा.

तसेच रक्तदानासाठी येण्याचे करावे.
अधिक माहिती इथे मिळेल Happy
http://jahirati.maayboli.com/node/914

कोण आहे रे ते पाहिजे तर फोटो नको टाकू पण रक्त नको मागू म्हणत आहे Wink

काशी, फारच उच्चीचे ग्रह होते गं बाई तुझे काल!! हर्पेन, तो मिलिंदचा क्लोजप जखम करणारा घेतलायस.. त्याला स्वतःलाही आवडेल तो.

छान, हर्पेन Happy मिलिंद सोमणचा क्लोजप खरंच किलर आहे.
मायबोलीकरांसोबतचे ग्रुप फोटो काढलेत तेही इथे टाक की.

काशीने ज्या पद्धतीने मिलिंदला तिच्यासोबतच्या फोटोसाठी सांगितलं, ते अचाट होतं. त्याचा व्हिडिओच काढायला हवा होता. Proud क्षणभर मिलिंदलाच फोटोचं भयंकर टेम्प्टेशन आलं की काय, असं वाटण्याइतक्या लगबगीने त्याने सुंदर पोझ दिली! वरून आवर्जून 'बघू कसा आलाय फोटो' असंही.

चैतन्य, भारती, केदार, समूह प्रचित्रे टाकली आहेत Happy

केश्विनी, अन्जू - पुण्यातल्या चित्रपट प्रदर्शनासाठी राजेश्वरी आली नव्हती Sad

saee, साजिरा, खर्र्च का मिलींदचे फोटो इतके चांगले / किलर आलेत? पण यात माझा हात काही नाही, मिलींदचा आहे Wink

मस्त फोटोज!!
काशी किती हसशील अगं.. चेहरा उजळलाय नुस्ता! Happy

माप्रा, इकडे लॉस एंजिलीसला आणा की एक प्रिमिअर.. आम्ही कसं अन कधी भेटायचं या लोकांना?

अकु आणि काशी लई भारी! मिसो ईज लकी( प्र्त्येक वेळा सेलेब्रिटीच काय कौतुक! आमचे मायबोलिकर काय कमि सेलेब्रिटि आहेत ़कि काय?)
देविका चे स्नेप भारि! मिसो अजुनही भारिच्च दिसतो...

Pages