संहिता चित्रपटाच्या पुण्यातील प्रथमखेळ पुर्वसमयी घेतलेली प्रकाशचित्रे

Submitted by हर्पेन on 18 October, 2013 - 06:43

'संहिता' चित्रपटाच्या पुण्यात झालेल्या, पहिल्या खेळापुर्वी घेतलेल्या काही प्रकाशचित्रांमधली ही निवडक प्रकाशचित्रे.

मला या खेळाला उपस्थित रहाण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली ते केवळ आपली मायबोली या चित्रपटाची माध्यम प्रायोजक असल्याकारणाने व चिनूक्सामुळे Happy

आजवर ज्यांच्याबद्दल केवळ ऐकले वाचलेच होते. ज्यांच्या 'पाणी', 'बाई' सारख्या लघूपटांपासून चालू झालेल्या कारकिर्दीचा मी दूरस्थ प्रेक्षक होतो, ज्यांच्या दोघी, वास्तुपुरुष सारख्या चित्रपटांचा चाहता होतो, त्या सुमित्रा भावे सुनिल सुखथनकर या जोडगोळीच्या नवाकोर्‍या संहिता या चित्रपटाच्या प्रदर्शन-निमित्ताने त्यांना जवळून बघण्याची संधी कोण बरे दवडेल. तसेच ज्या चित्रपटाने अनेकविध पारितोषके मिळवून प्रत्यक्ष प्रदर्शनापूर्वीच जनामनात उत्कंठा निर्माण केलेली होती त्या चित्रपटाच्या पुण्यातल्या पहिल्या खेळाला उपस्थित रहाण्यामागे अजून एक कारण म्हणजे मिलींद सोमण. (पण आमचे वेगळे आहे)

जरा अवांतर - मी सध्या मॅरॅथॉन मधे भाग घेण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे. मध्यंतरी पुण्यात झालेल्या रन बियाँड मायसेल्फ नावाच्या चॅरिटी रन मिलींद सोमण अनवाणी पायांनी अर्ध मॅरॅथॉन धावला होता. त्याच स्पर्धेत मी माझी सर्वप्रथम लांब पल्ल्याची शर्यत म्हणजे १५ किमी अंतर धावलो; इथे बूट घालून धावतानासुद्धा नाकी नऊच काय पण दहा अकरा बारा येतात आणि हा माणूस अर्ध मॅरॅथॉन (२१ किमी) हे अंतर बर्‍यापैकी चांगल्या (काँपिटेटिव्ह) वेळेत पार करतो ही गोष्ट माझ्यासाठी त्याच्या रॅम्प, अॅड फिल्म्स, म्युझिक अल्बम किंवा चित्रपटातील भुमिकांपेक्षा फार फार मोलाची वाटते. (याचा अर्थ तुम्हाला असे वाटत असेल की मी त्याच्या ह्या कामांना किंवा ग्लॅमर क्षेत्राला कमी लेखतोय तर हो तुम्हाला नक्कीच कळलंय मला काय म्हणायच आहे Wink ) पण त्या स्पर्धेच्या नंतर मीच इतका दमलेला होतो की त्याच्यापाशी जाऊन चार शब्द बोलायचे त्राणदेखिल माझ्यात उरले नव्हते, त्यामुळे हा दुग्धशर्करा योग (कोजागिरी जवळ आली आहे ना! नाहीतर मणी कांचन म्हणणार होतो) साधायचाच असे ठरवले.

खरेतर फोटो काढायचे असे काही आधीपासून ठरवले नव्हते; चिनुक्साला आयत्यावेळी विचारून मगच कॅमेरा नेलेला. शिवाय अशा प्रकारे फोटो काढण्याची माझी पहिलीच वेळ, त्यात काही फोटो हलले आहेत, फोटो म्हणून त्यांचे मुल्य स्मृतीस उजाळा यापरते काहीच नाही.त्यामुळे काही कमी जास्त झाले असल्यास सांभाळून घ्या.

तर मंडळी अशा रितीने, सहर्ष सादर करत आहे 'संहिता' चित्रपटाच्या पुण्यात झालेल्या, पहिल्या खेळापुर्वी घेतलेल्या काही प्रकाशचित्रांमधली ही निवडक प्रकाशचित्रे.

१. सुमित्रा भावे

२. देविका दप्तरदार

३. मिलींद सोमण

४. मिसो, पुर्वकल्पना नसताना दिसलेले डॉ. मोहन आगाशे आणि सुनिल सुखथनकर

५. सुमित्रा भावे आणि लालन सारंग

६. अमोल पालेकर

७. आरती अंकलीकर टिकेकर

८. अनिल अवचटांसोबत माबोकर साजिरा आणि आनंदयात्री

९ मिलींद सोमण सोबत माबोकरकाशी

१०. मिलींद सोमण बरोबर काशी, अरुंधती कुलकर्णी, केदार जाधव

प्रत्यक्ष खेळाला सुरुवात होण्याआधी तेव्हा उपस्थित असलेल्या चित्रपट निर्मितीशी सर्व संबधित घटकांची ओळख घडवून आणते वेळचे फोटो
११.

१२.

१३.

१४.

१५. आणि.... (last but definitely not least) प्रा...नाही नाही प्राण नाही, आपला चिनूक्स Happy

आणि शेवटचा म्हणताना अजून काही प्रचि.

देविका

मिलींद

खुदूखुदू हसतंय्‌ गालात

आणि खास लोकाग्रहास्तव मायबोलीकर असलेले समूह प्रचित्रे

आणि परत एकदा, Last but not least मोहन आगाशे आणि.......चिनूक्स Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काशी!!! कसला उजळलाय चेहरा एका मुलीचा! अश्विनी नावाच्या मुलींचे ग्रह उच्चीचे होते या आठवड्यात!

सगळे फोटो आवडले.

देविका दफ्तरदार चा ' फॅब इंडीया' लुक आवडला :).
एका फोटोमध्ये पौर्णिमा मि सो वर कॅमेरा फोकस करताना कॅप्चर केलीये Proud

मस्त मस्त मस्त. कलाकारांपेक्षा माबोकरांच्या फोटोचेच जास्त अप्रूप आहे!
अजून एक माबो प्रिमिअर हुकला, श्य्या Sad

फोटो आवडल्याचे कळवलेत त्याबद्दल धन्यवाद मंडळी, मला सवय ती निसर्गाचे, फुलांचे पक्षांचे फोटो काढण्याची, असे फोटो काढण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग, त्यामुळे फोटो चांगले आले आहेत असे ऐकून मला खूप आनंद होतो आहे Happy

डीजे - "एका फोटोमध्ये पौर्णिमा मि सो वर कॅमेरा फोकस करताना कॅप्चर केलीये" केलीये नाही म्हणू, झाल्ये म्हणावे Happy

आगाऊ - अनेक माबोकर हे देखिल या चित्रपटातील कलाकार होते की Happy

छान Happy

मायबोलीकरांचे ग्रुप फोटो छान आलेत. (मात्र इतक्या सिलेब्रिटीजना एका जागी फोटोसाठी बोलावून जमा करताना दमछाक झाली होती.)

सुमित्रा भाव्यांच्या शेजारी- ती संहिताची बालकलाकार. फारच गोड आहे. नाव विसरलो.

ती विपाशा भिडे.

हर्पेन,
धन्यवाद Happy

देविका दफ्तरदार ची साडी, गेटअप एकदम ग्रेसफुल, एलेगंट ! सगळ्यात जास्त आवडली.
मिसो बद्दल काय बोलणार, पण त्याचा टीशर्ट, चप्पल वगैरे नाही आवडलं. Wink
ती व्हाईट टॉप वाली मुलगी आरती अंकलीकरांची लेक आहे का ? गोड आहे एकदम.
माबोकरांचे फोटो सहीच !

काही निरिक्षणे - बुलेट पॉईंट्स फॉर्म मधे
१. काही माबोकर सेलेब्रिटीस, (इथुन पुढे 'काही' म्हणजेच 'काही माबोकर सेलेब्रिटीज' असे वाचावे) एकदम सावधानच्या पोज मधे उभे आहेत
२. तर काही चक्क गप्पा मारताना दिसत आहेत, फोटो बिटो काय ते तुम्ही काढा आम्ही गप्पा काही थांबवणार नाही
३. काही ग्रुप मधे सुद्धा मिसो ला सोडायला तयार नाहीत मग ग्रुप मधे दिसलो नाही तरी चालेल
४. काही कार्यकर्ते मोड मधे इतके बुडलेले की ग्रुप फोटो मधे आलेच नाही
५. काही फोटोग्राफर मोड मधे(च) असल्याने ग्रुप फोटोत आलेच नाहीत. यांना कुण्णी कुण्णी म्हणाले नाही की बाबांनो तुम्हीही उभे रहा फोटोसाठी आम्ही फोटो काढतो तुमचा....;)

हर्पेन! Proud

फोटो आवडले. आता हा सिनेमा अमेरिकेत केव्हा बघायला मिळेल त्याची वाट बघणे.
लेखनावरून व्यक्ती कशी दिसत असावी याचा अंदाज बांधणे अशक्य. चिनुक्स सांदिपनी ऋषी किंवा अहिताग्नी राजवाडे सारखा दिसत असेल असं वाटलेलं. तो तर फ्लेक्स बोर्डावर झळकणार्‍या 'युवा नेतृत्व' सरखा दिसतो. Happy दिवे.

विकु Happy
हर्पेन सग्गळी प्रचि मस्त. माबोकर सेलेब्रिटीजना बघून छान वाटलं. माझ्या ओळखीची एक सेलेब्रिटी camera च्या मागेच राहिली .. Happy आहे का कुणाकडे प्रचि ?

विकु - तुम्ही इतके प्राचीन आहात? अहिताग्नी राजवाडे ठीक आहे पण तुम्ही सांदिपनी ऋषींना पण बघितलंय? भार्रीच की Wink दिवे

तुमच्या पण लेखनावरून अंदाज बांधता येत नाही, तुमचा पण एक फोटो टाकाल का जरा, आता मला तुम्हाला बघायची उत्कंठा लागली आहे Happy

हर्पेन ...झकास फोटो... आपण फोटो काढलेत आणी सतत कॅमेराच्या मगेच राहिलत .. Happy Happy

असोजी, हे सगळे माझेच फोटो आहेत, (मी काढलेले)

माझा फोटो म्हणजे ज्यात मी आहे असा फोटो मी इथे टाकलाच नाहीये. कारण मला चिनूक्साची भिती वाटते (प्रताधिकार रे बाबांनो प्रताधिकार) Wink

Happy

Pages