पत्रिकेवरुन स्त्री कि पुरुष?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 17 October, 2013 - 10:11

पत्रिकेवरुन व्यक्ती स्री की पुरुष ओळखा, जिवंत कि मृत ओळखा हे आव्हान डॉ अब्राहम कोवूर या भारतात जन्मलेल्या व श्रीलंकेत स्थायिक असलेल्या बुद्धीप्रामाण्यवादी चळवळीचा जनक असलेल्या माणसाने जगभरात जाहीर दिले होते.अंधश्रद्धा निर्मुलन समितीने तीच परंपरा आजही पुढे चालू ठेवली आहे.आज ते आव्हान २१ लाखांचे आहे.अजून कोणत्याही ज्योतिषाने हे आव्हान स्वीकारले नाही.काही ज्योतिषांना हे आव्हान स्वीकारता येत नाही याची खंत आहे. ज्येष्ठ ज्योतिषी श्री श्री भट पत्रिकेवरुन स्त्री कि पुरुष या बद्दल आपल्या ज्योतिषाच्या गाभार्‍यात या पुस्तकात याबाबत म्हणतात," खरे तर ज्योतिषाची शास्त्रीयता सिद्ध करुन देण्यासाठी आणखी आकडेवारी जमा करण्याची किंवा आव्हाने स्वीकारण्याची गरजच उरली नाही.१० पत्रिका देउन त्यातले मुलगा की मुलगी सांगा असा प्रश्न विचारला जातो.' भारतीय ज्योतिष' या हिंदी पुस्तकात या विषयी एक नियम आहे.त्यात थोडा बदल करुन एक नियम प्रचलित आहे तो मुलुंडचे श्री नाडगौडा यांनी कळवला आहे तो असा:-

जन्मलग्न,जन्मकालीन गुरु,सूर्य व राहू यांच्या राशींची बेरीज करावी. त्याला तीनाने भागावे; बाकी शून्य किंवा एक उरला तर पत्रिका मुलाची असते.दोन उरले तर स्त्री ची असते." त्यांनी उदाहरण म्हणुन इंदिरा गांधी व संजय गांधी यांच्या पत्रिकेचा ताळ्यासाठी वापर केला आहे.इंदिरा गांधी:- जन्मवेळेस कर्क लग्न + वृश्चिक रवी+ धनु राहू+ वृषभ गुरु महणजे 4+8+9+2=23 23/3 =7 व बाकी 2 उरली म्हणुन स्त्री. संजय गांधी:- मकर लग्न+ वृश्चिक रवी+ धनु राहू + तुला गुरु म्हणजे 10+8+2+7=27 27/3 = 9 बाकी 0. या नियमाची प्रचीती 60 टक्क्याहून अधिक येते असे म्हटले आहे. या नियमांची छाननी करायची झाली तर पुढे पळवाट सुद्धा आहे. ते म्हणतात," लग्न व रव्यादि ग्रह राशी संधीवर असताना नियम लागू पडत नाही म्हणुन बहुधा प्रमाण कमी पडते."
वस्तुत: संख्याशास्त्रीय दृष्ट्या यदृच्छेने स्त्री का पुरुष हे ओळखण्याचे प्रमाण ५० टक्के आहे. त्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.भटांनी दाखवलेला नियम हा तपासायचा झाल्यास 'संधी' ची पळवाट आहे, भट म्हणतात कि या नियमाची प्रचीती ६० टक्क्याहून अधिक येते तर त्यांनी काही असा प्रयोग केला आहे का? ज्याची आकडे वारी उपलब्ध आहे का?. २००८ मधे झालेल्या आमच्या फलज्योतिष चाचणीचे वेळी देखील भटांनी चाचणीतील संख्याशास्त्र विभागाचे प्राध्यापक सुधाकर कुंटे यांना भेटून या चाचणीचा पडताळा घ्या असे सांगितले होते. कुंटे सरांनी चाचणीतील डेटा ला तो नियम लावून पाहिला होता. पण त्याचे प्रमाण ५० टक्क्यापेक्षा अधिक आढळून आले नाही. हा चाचणीचा अधिकृत भाग नसल्याने तो प्रसिद्ध केला नाही.अथवा त्याची वाच्यता ही झाली नाही.आमच्या खाजगी बैठकीत मात्र याची चर्चा झाली होती.दुर्देवाने कुंटे सरांचे अकाली निधन झाले व तो विषय तिथेच थांबला. इतर ज्योतिषांना देखील भटांचा हा नियम चाचणीसाठी वापरावा असे वाटत नाही. कारण त्याला सार्वत्रिक ज्योतिष मान्यता नाही.फलज्योतिषाला विज्ञानाच्या चौकटीत बसवण्याचा आग्रह हा इतर ज्योतिषांना पसंत नाही.
( ब्लॉगवर पूर्व प्रकाशित)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच हास्पिटलात ट्विन डिलीवरी झाली.
सी- सेक होतं.
एक मुलगा एक मुलगी.
दोघांच्या जन्मवेळेत ३०-४० सेकंदांचा फरक.
आता?

मूळात ज्योतिषाचा उद्देश एखादा माणूस स्त्री की पुरूष ओळखणे हा नसून आलेल्या माणसाला त्याच्य भविष्यातील काही घटनांची माहिती करून देणे हा आहे.
मग अश्या चाचण्या ज्योतिषाच्या अभ्यासाला लावायची गरज काय?

साती, मुद्दा बरोबर आहे पण असा नियम ज्योतिषात आहे हे श्री श्री भटांचेच म्हणणे होते.
कुंडली हा जन्मवेळचा नकाशा असतो. समजा एखाद्या व्यक्तिचे वय ४० आहे तर त्याच्या भूतकाळातील घटना या कुंडलीच्या दृष्टीने भविष्यकाळ असतो. त्याची तपासणी करता येउ शकते. मग अशा वेळी वर्तमानात असणारी ठळक गोष्ट देखील जर कुंडलीवरुन सांगता येत नसेल तर तुम्ही भविष्यकाळ काय सांगणार? जिवंत कि मृत हा आयुष्यातील जन्ममृत्युशी संबंधीत थेट बाब आहे.
कुंडलीवरुन सगळ्या गोष्टी सांगता येतात हा जो समज आहे तो काही लोकांमधे अगदी दृढ आहे. त्यांना असे वाटते त्यात काय एवढे चांगल्या ज्योतिषाला सांगता येईल जिवंत कि मृत, स्त्री कि पुरुष? समंजस ज्योतिषांना हे मान्य आहे कि असे काही सांगता येत नाही. या ज्योतिषाच्या मर्यादा आहेत. भटांनी मात्र असा ज्योतिषात नियम असल्याचे ठासुन सांगितले होते.

काय आहे, की ज्योतिषावर विश्वास नसताना तुम्ही त्याच विभागात बाफ उघडताय (अजून एक) याचं नवल वाटतंय.

इथे कोणीही येऊन काय लिहीणे अपेक्षित आहे ? नेहमीची चार डोकी येणार, वैयक्तिक हल्ले करणार आणि त्यात झालाच तर नक्की कोणता मुद्दा सिद्ध होतो ?

>>सी- सेक होतं.<<
म्हणजे काय? बायओव्हुलर ट्विन का?
>>एक मुलगा एक मुलगी.
दोघांच्या जन्मवेळेत ३०-४० सेकंदांचा फरक<<
३०-४० सेकंद हा जन्मवेळेतील म्हणजे नेमका कशातील फरक?

>>त्यात झालाच तर नक्की कोणता मुद्दा सिद्ध होतो ?<<
सिद्ध नाही पण ज्योतिषातील मर्यादा अधोरेखित होते. काही वाचकांना ही माहिती नवी असू शकते.

प्रकाश, सि सेक म्हणजे सीझेरियन.
एखादा असिस्टंट असल्यास फारच थोड्यावेळाच्या अंतरात दोन्ही बाळांना आईच्या पोटाबाहेर काढता येतं.
याऊलट नॉर्मल डिलीवरी असेल तर दोन ट्विन्सच्या जन्मवेळेत काही मिनिटांचा फरक पडू शकतो.

अस आहे तर? माझ्या डोक्यात नॉर्मल डिलिव्हरी होते. सिझेरियन बाबत ज्योतिषात जरा गोंधळच आहे. मागे इथेच कुठेतरी मी याबाबत लिहिले होते.

>>ज्योतिषातील मर्यादा अधोरेखित होते <<
माझ्या माहितीतले तरी ज्योतिषी या शास्त्राच्या मर्यादा जाणतात. बायदवे श्री श्री भट कोण?

बाकि म्हणाल तर मर्यादा कोणत्या शास्त्राला नाहित?

यातून मुद्दा नक्कीच सिद्ध होतो, पण तो अ‍ॅक्सेप्टला जात नाही. भविष्य सांगणे ही एक कला आहे, ते शास्त्र नाही इतकं जरी मान्य झालं तरी त्याने खूप फरक पडतो.

.

श्री श्री भट हे डोंबिवलीचे घराण्याचा वारसा असलेले ज्येष्ठ ज्योतिषी आहेत. ज्योतिष वर्तुळात त्यांचे नाव आदरणीय आहे. त्यांचे मत असे की ज्योतिषाला विज्ञानासारखे नियम असले पाहिजे. ज्योतिषाला विज्ञानाच्या चौकटीत बसवण्याचा त्यांचा आग्रह कायम आहे.
>>बाकि म्हणाल तर मर्यादा कोणत्या शास्त्राला नाहित?<<
मान्यच आहे. या आमच्या आजमितीस मर्यादा आहेत हे ते शास्त्र मान्य करीत असत. वैद्यकशास्त्रात अनेक गोष्टींची कारणे अज्ञात आहेत.
मुख्य मुद्दा स्त्री पुरुष बाबत असलेल्या ज्योतिष नियमाचा आहे.

कॉलेजात असताना मुलींचा हात हातात धरून बडबड करायला व फ्यामिली हिस्टरी विचारायला मिळते म्हणून लिंडा गुडमनचे पुस्तक आणून पामिस्ट्रीचा 'अभ्यास' केला होता. कुंडल्याही मांडायला शिकलो होतो.

एकंदरितच 'ब्लाँडी' मेंट्यालिटी अन त्यावर भरवसा ठेवणार्‍यांचे प्याकेज ओळखण्यासाठी या अभ्यासाचा पर्फेक्ट उपयोग होतो. स्वानुभव.

विबासं चे दिवस नसल्याने विपुसं होते, ते २४ च्या बरेच पुढे गेल्यानंतर कंटाळून हे उद्योग बंद केले.

- (कुडमुड्या) इब्लिस

भारताचं भविष्य मांडायचा प्रयत्न केला असता लालूप्रसाद यादव हा ग्रह बाजूस काढला तर नितीशकुमार प्रधानमंत्री होऊ शकतात, लालकृष्ण हा ग्रह बाजूस काढला असता नरेंद्रभाई प्रधानमंत्री बनू शकतात, मुलायमसिंह हा ग्रह बाजूस काढला तर मायावती प्रधानमंत्री बनू शकतात, पण हे सर्व ग्रह पत्रिकेत हजर झाले तर शरद पवार प्रधानमंत्री बनू शकतात आणि..
,
,
,
,
,
,

शरद पवार हा ग्रह बाजूला काढला तर आसाराम बापू प्रधानमंत्री होऊ शकतात,

निष्कर्ष : भारतात काय होईल हे राजकिय पंडीत सोडाच, दिव्यशक्ती असलेल्या ज्योतिषालाही सांगता येणार नाही.

>>विबासं चे दिवस नसल्याने विपुसं होते, ते २४ च्या बरेच पुढे गेल्यानंतर कंटाळून हे उद्योग बंद केले<<
नंतर कुठले उद्योग चालू केले? Wink Wink

साती, दुसर्‍या पोस्टीला अनुमोदन

तुम्ही जमवा डाटा आणि चाचणी करा, मग निष्कर्ष काढा.

मी आताच माझ्या पत्रिकेची चाचणी केली.

जन्म लग्न - वॄषभ (२)
सुर्य - कन्या (६)
राहु - वॄषभ (२)
गुरु - धनू (९)

बेरीज = २+६+२+९ = १९

१९ भागिले ३ = बाकी = १ म्हणजे पुरुष

लग्न व रव्यादि ग्रह राशी संधीवर असताना नियम लागू पडत नाही म्हणुन बहुधा प्रमाण कमी पडते.

>>

राशी संधिवर ग्रह असताना त्या ग्रहाची राशी कुठली घ्यायची, हे सांगा. अश्या संधीवरच्या ग्रहाची रास निश्चित होत नसल्याने वर दिलेला बेरीज, भागाकाराचा नियम कसा लावायचा हा प्रश्न आहे.
पळवाट नाही.

स्त्री कि पुरुष ओळखायला ज्योतिषी लागतात?
कॉमन सेन्सने ओळखता येत नाही का?

काय जमाना आला आहे Happy

राहुल१२३ Lol अगदी अगदी!
निदान माझ्याकडे येणारे जातक तरी त्यान्ची कुन्डली माझ्यापुढे धरुन सान्गा बघु मी पुरुष की स्त्री असे काही विचारित नाहीत! Proud
अन बहुधा तसे विचारण्याची गरज कुणालाच पडतही नसावी. (पण संख्याशास्त्रीय दृष्ट्या अन तार्किकदृष्ट्या लाखोंमधे अपवादात्मक कुणाला गरज पडतही असेल म्हणा... मी नाकारत नाही, तसेही अन्निसवाले या अपवादात मोडतही असतील म्हणा, कुणी सांगावे, पण असो)

गमभन, मी पण आताच माझ्या पत्रिकेची चाचणी केली.
जन्म लग्न - मिथुन (३)
सुर्य - तुला (७)
राहु - कर्क (४)
गुरु - कुंभ (११)

बेरीज = ३+७+४+११ = २५
२५ भागिले ३ = बाकी = १ म्हणजे (कुंडलीप्रमाणे तरी नक्की) पुरुषच बर्का घाटपांडेसाहेब! Wink

माझ्या पत्रिकेवर नियम लावला असता
जन्मलग्न- कुंभ -११
राहू- कर्क -४
रवि- कन्या-६
गुरु- कुंभ -११
११+४+६+११=३२
३२ भागिले ३ : बाकी २ म्हणजे स्त्री
रवि १ अंश ४४ कला वर आहे पण म्हणुन त्याला 'संधी' म्हणता येणार नाही
आता संधी द्यायची झाली तर प्रत्येक पुरुषात एक स्त्री लपलेली असते व प्रत्येक स्त्रीत एक पुरुष लपलेला असतो असा गोलमाल करता येईल. किंवा तुमची पत्रिका ही उरलेल्या टक्क्यात येते असेही म्हणता येइल.

पत्रिका ही माणसाचीच असली पाहिजे असे नाही. ती देश,शहर प्रांत वास्तू, पक्ष अशा गोश्टींची देखील असते.
१ एप्रिल १९९४ च्या लोकप्रभा अंकात वैजयंता चितळे यांनी एक अभिनव प्रयोगाची माहिती दिली होती. त्यात एका बोक्याची पत्रिका जन्मवेळेनुसार तयार केली. व ती अ, ब व क या ज्योतिषांना दिली. त्यात त्यांनी म्हटले," अभ्यासक अ ने शंका व्यक्त केली होती की ही जी पत्रिका तयार केली आहे त्याच्या रचनेचा व स्वभावांचा आढावा घेता जातक वाघ किंवा मांजर भासते....."
आता बोला.

>>>> रवि १ अंश ४४ कला वर आहे पण म्हणुन त्याला 'संधी' म्हणता येणार नाही <<<<
भावचलित कुंडली बघितली का?
यावर प्रयोग करुन बघायलाच हवा Happy बरे झाले तुम्ही हे कोष्टक/सुत्र इथे दिलेत, आता प्रत्येक कुंडली आली की हे सुत्र वापरुनच बघतो. Happy धन्यवाद

हायला.

माणसाचे डॉक्टर, प्राण्यांचे डॉक्टर, झाडांचे डॉक्टर(कृषीतज्ञ) वेगवेगळे असतात तसे माणसाचे, प्राण्यांचे, झाडांचे ज्योतिषी पण वेगवेगळे असतात की काय?
Lol

होय भावचलिता नुसार देखील रवि तसाच आहे.
भट ज्योतिषाच्या गाभार्‍यात या पुस्तकात जिवंत की मृत बाबत असे म्हणतात की वराहमिहिर च्या बृह्त्ज्जातका नुसार हे सांगता येते. कसे ते मात्र सांगत नाहीत.

पत्रीके वरुन काय काय पाहायचे आहे

मुळात डॉ. लोक मुहुर्ता अगोदरच सिझर करुन बाळ जन्माला आणतात आताशा. तेव्हा देवाने काय तस वेगळ लिहुन ठेवले काय ? मुहुर्त ७.१२ चा दि. १०/१०/१० रोजीचा सिझर द्वारे रात्रई १९.५० चा १५/०९/१० रोजीचा !

रवि महिन्याभराने रास बदलतो , गुरु वर्षाने व राहू दीड वर्षाने त्यामुळे साधारण पण महिन्याभरात जन्मलेल्या लोकात फक्त

लग्नराशीवरूनच बदल होणार.साधारणपणे २ तासात लग्नरास बदलते म्हणजे रोज महिन्याभरात त्याच लग्नराशीवर

जन्मणारे बालक एकतर मुलगी असेल नाहीतर मुलगा. २ तासाच्या फरकात एका दिवशी एकाच शहरात कितीतरी मुले जन्म

घेतात ह्याचा अर्थ ते एक तर सगळे मुलगे किंवा मुली.असे आढळून येत नाही त्यामुळे हा नियम म्हणून वापरताच येणार नाही.

मुळात जे जाणून घेण्याची गरज नाही त्या करता नियमाची पण जरुरी वाटत नाही.

>>>>> मुळात जे जाणून घेण्याची गरज नाही त्या करता नियमाची पण जरुरी वाटत नाही. <<<<<
अस कस म्हणता अन्विताताई तुम्ही? त्याशिवाय "ज्योतिष" हे शास्त्र कसे सिद्ध होणार? हे नै विचारले तर ज्योतिषीव्यक्तिन्ना "कुडमुड्या" कसे ठरविता येणार? Proud

तुमचे लग्न व इतरांच्या राशीबदलाबद्दलचे विचार पटले. Happy

ही जी पत्रिका तयार केली आहे त्याच्या रचनेचा व स्वभावांचा आढावा घेता जातक वाघ किंवा मांजर भासते....."
<<
हे वाक्य सांगून तुम्ही अभ्यासक अ ने अचूक वर्तवले असं सांगताय. त्यावर काय बोलणार ?
पुन्हा एकदा, नक्की मुद्दा काय मांडायचा आहे ? की ज्योतिष सांगणारे अंदाजाने सांगतात ? शक्य आहे.
पुढे ?

Pages