पत्रिकेवरुन स्त्री कि पुरुष?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 17 October, 2013 - 10:11

पत्रिकेवरुन व्यक्ती स्री की पुरुष ओळखा, जिवंत कि मृत ओळखा हे आव्हान डॉ अब्राहम कोवूर या भारतात जन्मलेल्या व श्रीलंकेत स्थायिक असलेल्या बुद्धीप्रामाण्यवादी चळवळीचा जनक असलेल्या माणसाने जगभरात जाहीर दिले होते.अंधश्रद्धा निर्मुलन समितीने तीच परंपरा आजही पुढे चालू ठेवली आहे.आज ते आव्हान २१ लाखांचे आहे.अजून कोणत्याही ज्योतिषाने हे आव्हान स्वीकारले नाही.काही ज्योतिषांना हे आव्हान स्वीकारता येत नाही याची खंत आहे. ज्येष्ठ ज्योतिषी श्री श्री भट पत्रिकेवरुन स्त्री कि पुरुष या बद्दल आपल्या ज्योतिषाच्या गाभार्‍यात या पुस्तकात याबाबत म्हणतात," खरे तर ज्योतिषाची शास्त्रीयता सिद्ध करुन देण्यासाठी आणखी आकडेवारी जमा करण्याची किंवा आव्हाने स्वीकारण्याची गरजच उरली नाही.१० पत्रिका देउन त्यातले मुलगा की मुलगी सांगा असा प्रश्न विचारला जातो.' भारतीय ज्योतिष' या हिंदी पुस्तकात या विषयी एक नियम आहे.त्यात थोडा बदल करुन एक नियम प्रचलित आहे तो मुलुंडचे श्री नाडगौडा यांनी कळवला आहे तो असा:-

जन्मलग्न,जन्मकालीन गुरु,सूर्य व राहू यांच्या राशींची बेरीज करावी. त्याला तीनाने भागावे; बाकी शून्य किंवा एक उरला तर पत्रिका मुलाची असते.दोन उरले तर स्त्री ची असते." त्यांनी उदाहरण म्हणुन इंदिरा गांधी व संजय गांधी यांच्या पत्रिकेचा ताळ्यासाठी वापर केला आहे.इंदिरा गांधी:- जन्मवेळेस कर्क लग्न + वृश्चिक रवी+ धनु राहू+ वृषभ गुरु महणजे 4+8+9+2=23 23/3 =7 व बाकी 2 उरली म्हणुन स्त्री. संजय गांधी:- मकर लग्न+ वृश्चिक रवी+ धनु राहू + तुला गुरु म्हणजे 10+8+2+7=27 27/3 = 9 बाकी 0. या नियमाची प्रचीती 60 टक्क्याहून अधिक येते असे म्हटले आहे. या नियमांची छाननी करायची झाली तर पुढे पळवाट सुद्धा आहे. ते म्हणतात," लग्न व रव्यादि ग्रह राशी संधीवर असताना नियम लागू पडत नाही म्हणुन बहुधा प्रमाण कमी पडते."
वस्तुत: संख्याशास्त्रीय दृष्ट्या यदृच्छेने स्त्री का पुरुष हे ओळखण्याचे प्रमाण ५० टक्के आहे. त्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.भटांनी दाखवलेला नियम हा तपासायचा झाल्यास 'संधी' ची पळवाट आहे, भट म्हणतात कि या नियमाची प्रचीती ६० टक्क्याहून अधिक येते तर त्यांनी काही असा प्रयोग केला आहे का? ज्याची आकडे वारी उपलब्ध आहे का?. २००८ मधे झालेल्या आमच्या फलज्योतिष चाचणीचे वेळी देखील भटांनी चाचणीतील संख्याशास्त्र विभागाचे प्राध्यापक सुधाकर कुंटे यांना भेटून या चाचणीचा पडताळा घ्या असे सांगितले होते. कुंटे सरांनी चाचणीतील डेटा ला तो नियम लावून पाहिला होता. पण त्याचे प्रमाण ५० टक्क्यापेक्षा अधिक आढळून आले नाही. हा चाचणीचा अधिकृत भाग नसल्याने तो प्रसिद्ध केला नाही.अथवा त्याची वाच्यता ही झाली नाही.आमच्या खाजगी बैठकीत मात्र याची चर्चा झाली होती.दुर्देवाने कुंटे सरांचे अकाली निधन झाले व तो विषय तिथेच थांबला. इतर ज्योतिषांना देखील भटांचा हा नियम चाचणीसाठी वापरावा असे वाटत नाही. कारण त्याला सार्वत्रिक ज्योतिष मान्यता नाही.फलज्योतिषाला विज्ञानाच्या चौकटीत बसवण्याचा आग्रह हा इतर ज्योतिषांना पसंत नाही.
( ब्लॉगवर पूर्व प्रकाशित)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कापोचेसाहेब,

तुमच्या कुंडली बाबत हे उत्तर लिंबु टिंबु यांनी दिलय. ते बरोबर आहे.

१ मार्च २०१६ रोजी संध्याकाळी जन्माला हे बालक अस्तित्वात असेल तर जन्माला आले असे म्हणावे लागेल.

(कापोच्या कुणाची नाही, पण काल्/आजचि गोचर प्रश्न कुंडली असावी, सायंकाळचे ५ ते ६.३० ही वेळ दिली असावी.)

परिक्षा घेत होतात का ?

गोचर शब्दाचा अर्थ नाही कळाला. ही कुंडली ऑनलाईन बनवलेली आहे. मूळच्या कुंडलीत त्या पानावर नाव लिहीलेले असल्याने ती देण्यात अर्थ नाही. कुंडली या संस्थळावर जन्मतारीख, जन्मवेळ, अक्षांश, रेखांश, नाव हे सर्व दिल्यावर त्या सॉफ्टवेअर मधे कुंडली बनते.

कुंडली कधी बनवली हे पण महत्वाचे आहे का ? मी लहान असताना एका ज्योतिषाने आग्रहाने बनवून दिलेली आहे कुंडली. पण जन्माच्या खूप वर्षांनी. इंगळे गुरुजी असं काहीतरी नाव होतं. मंडईच्या आसपास रहायचे किंवा ऑफीस होतं त्यांचं. पेढे पण विकायचे.

ही कुंडली कुणाची आहे हे माहीत आहे मला. स्त्री कि पुरूष इतकं ओळखता आल तरी पुरेसं आहे. जिवंत की मृत, व्यवसाय हे सर्व नाही विचारत. ५०% चान्सेस असेही आहेत. हवं असल्यास न्यूट्रल आयडीकडे त्यांची तयारी असल्यास जन्मतारीख, वेळ, ठिकाण, लिंग हे कळवू शकेन. त्याची आवश्यकता नसल्यास पुढे जाऊयात.

नितिनचंद्र:
केवळ ज्योतिष शास्त्र नाही ह्या अशास्त्रीय गृहीतकावर अनेकांना वेठीस धरु नका.
अहो, माझ्या कुठल्या पोस्टवरुन तुम्हाला असं वाटलं?
आणि मी कुणाला काही आव्हान केलेलं नाही. एक उत्सुकता आहे एवढंच.
माझी ९:२१ ची पोस्ट बघा.

इथे पत्रिकेवरुन सांगताना कुणाचे काही चुकले त्यावरुन ज्योतिष्यशास्त्र झुट अथवा, सांगण्यार्‍याची बदनामी होईल असे मला अजिबात वाटत नाही.

१) बँक किंवा तत्सम ठिकाणी नोकरी : अशा ठिकाणी ती व्यक्ती नोकरी करत नाही.

२) वैवाहीक जीवन फारसे सुखावह नाही. : सांगणे अवघड कारण प्रत्येकाच्या संसारात काहीना काही कमी जास्त असतेच. पण वैवाहिक जीवनच सुखावह नाही असे म्हणता येणार नाही.

३) ही व्यक्ती पुरुष असण्याची शक्यता जास्त.: पुरुष आहे. हे आधीपण सांगितले आहे.

४) नाटकात काम करण्याची किंवा नाटक आवडणे / अभिनय आवडणे.
: नाटक पहाण्याची आवड चार चौंघासारखी आहे, विशेष रस असा नाही. अभिनय करत नाही. व्यक्ती एक दोघांच्या नकला करते पण खास कला वगैरे असे नाही.

५) शत्रुला भुईसपाट करण्याची कला : कठीण परिस्थितीशी सामना केलाय असे म्हणता येईल, शत्रुला भुईसपाट करण्याची कला असे मात्र नाही.

परत: यावरुन मी तुमच्या ज्योतिष्य ज्ञानाबद्दल कसलाही कयास केलेला नाही.

जन्म ऑगस्ट मधला, पुरुष, तापट परंतु संयमी हे बरोबर आहे.
बॅंकेतील नोकरी बद्दल ’कर्केचा गुरु फसवा असतो त्यामुळे नोकरी संदर्भातले विधान चुकुही शकते.’ आणि वैवाहिक जीवनाबद्दल ’महादशा अंतर्दशा नसल्यामुळे नेमके सांगता येणार नाही.’ हे तुम्ही आधी सांगितले आहेच.

एवढी श्रीमंत नाहीय.
जन्म कुंडली आणि लग्न कुंडली यात काय फरक असतो?
म्हणजे वर दिलेली कुंडली जन्म की लग्न यावरुन फरक पडेल का? की जी दिली आहे त्यावरुन तुम्ही काय ते जाणता?

मानव पृथ्वीकर,

धन्यवाद,

ऑगस्ट महिना हा तर ज्योतिष गणिताचा भाग होता. आपण साल सांगीतले नाही. ज्या अर्थी पत्रीका निघाली आहे तेव्हा जन्मवेळ / स्थळ आणि जन्मतारीख माहित असल्याखेरीज पत्रीका बनु शकत नाही.

या धाग्यावर तमाम ज्योतिषी मंडळींना खोटे ठरवण्याचा प्रयत्न डॉ अब्राहम कोवुर यांचे नाव सांगुन केला गेला याबाबत हा त्रागा होता.

आणखी एखादा प्रयत्न होऊ शकतो परंतु ही व्यक्ती अस्तीत्वात असण्याचा पुरावा आणि जन्मतारीख / जन्मवेळ /जन्म स्थळ बरोबर असल्याचा पुरावा असल्यानंतर मी हा प्रयत्न नक्की करीन.

यात ह्या व्यक्तीला ओळखणारी आणि किमान सायन्स ग्रॅज्युएट आणि ज्योतिषशास्त्र पारंगत व्यक्ती असल्यास याबाबत खात्रीने पडताळा होऊ शकतो. मी मृत्युबाबत विधान करणार नाही. यासाठी अशी आव्हाने स्विकारलेल्या महाराष्ट्र ज्योतिष परिषद या संस्थेशी संपर्क करावा.

{{ y2j | 2 March, 2016 - 18:23

खूप म्हणजे करोडपती तरी .अस नसेल तर त्या व्यक्तीची जन्म्वेळ चुकीची असेल .
}}

करोडपती म्हणजे श्रीमंत????

मी पस्तीस वर्षांपूर्वी केवळ काही हजार खर्चून (तेही कर्ज काढून व हप्त्या हप्त्याने फेडून) पुण्यात बांधलेल्या बंगल्याची आजच्या दराने किंमत दहा कोटी होईल. त्यात इतर मालमत्ता म्हणजे फर्निचर, दागिने, गाड्या व बँकेतली बचत आणि शेअर बाजारातली गुंतवणूक मिळविली तर मी करोडपती म्हणजे श्रीमंत होईल का?

मला तरी वाटते आजच्या जमान्यात किमान एक अब्ज अथवा अधिक मालमत्ता असणार्‍यास श्रीमंत समजावे.

म्हणुन मी खूप म्हटल . माझी ही 2-3 करोड ची शेती आहे म्हणून मी करोड़पति होत नाही .पण तुमच्या म्हणण्य नुसार ज्याची 90 करोड़ ची प्रॉपर्टी आहे तो श्रीमंत नाही ?

<<प्रकाशजी, प्रश्न फार ट्रीकी आहे. ट्रीकी म्हणजे खवचट, खोडसाळ ह्या अर्थी.

सामान्य लोकांना म्हणजे कोणाला? त्यांच्या वाटण्याने नक्की काय सिद्ध होईल? समजा ९० टक्के लोकांना असं वाटलं की जोतिषाला सांगता यायला पाहिजे तर पुढे काय?

कुंडलीवरुन स्त्रीपुरूष-जीवंतमृत सांगणे तेवढेच निरर्थक आहे जेवढे मार्कशीटवरुन कोणत्या कंपनीत नोकरी मिळेल हे सांगणे. बाकी ज्यांचे प्रश्न जेन्युइन असतात त्यांना उत्तरे मिळतात. परिक्षा पाहू जाता फळ मिळणे नाही.>>

मस्त पोस्ट आहे ही! परिक्षा पाहू जाता फळ मिळणे नाही.
तुम्ही तुमच्या स्कॉर्पिओ स्टोरीत पण लिहलं होतं प्रेडिक्शन्सबद्दल. या विषयावर तुम्ही लिहिलेलं वाचायला आवडेल.

प्रा शरद उपाध्ये "आत्मा हा अविनाशी असून त्याला जन्म मृत्यू नाही. त्याला लिंग भेद ही नाही. त्यामुळे एखादी जन्मपत्रिका तपासून १) ती व्यक्ती जिवंत की मृत हे सांगता येत नाही. २) ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे सांगता येत नाही.३) गर्भार स्त्रीची जन्मपत्रिका तपासून तिला मुलगा होणार की मुलगी हे सांगता येत नाही" - संदर्भ: माझा फलजोतिष शास्त्राचा अभ्यास ले.वि.सू बागलकर

या वरून एक विनोद आठवला.
एक पंजीबाई, वय वर्षे ९० च्या आसपास, कौतुकाने आपल्या नव्या पणतूला घेऊन आंघोळ घालायला गेली. आंघोळ घालता घालता तिने ओरडून नातीला विचारले, अगो, तुझे हे पोर मुलगा की मुलगी?
नात फेसपाम करून झाल्यावर म्हणाली अग आज्जे, तू आंघोळ घालते आहेस ना, तुला दिसत नाही का?
पंजी सुस्कारा सोडून म्हणाली, दिसते आहे ग, पण आता विसरले कसे सांगायचे मुलगा की मुलगी!

मला एक कायप्पा ढकलपत्र आले त्यात मास्टर दीनानाथांवर ज्योतिष विषयक एक लेख होता; त्यात असे म्हटले आहे की मास्टर दीनानाथांनी अभ्यासपूर्वक ज्योतिष विषयामध्ये अनेक सिद्धांत मांडले होते." समस्थानी शनि असेल तर स्त्रीची कुंडली आणि विषमस्थानी शनि असेल तर कुंडली पुरुषाची समजावी. दशमांत रवि म्हणजे सत्यवचनी! दशमांत मंगळ म्हणजे कुलदीपक! दशमांत गुरु, अर्थात सर्वत्र मान! पंचमात मंगळ, शनि असणे, म्हणजे संततीयोग नसणे. अष्टमेश सप्तमात स्त्रीकडून धनलाभ! लग्नी बुध असणे म्हणजे, बोलका, चतुर, लेखनाची आवड! लग्नी शुक्र असणे, म्हणजे गायनकलेत निपुण! नवमात गुरु - चंद्र - दिगंत कीर्ती लाभणे. शनि-चंद्र समोरासमोर, दरिद्री योग. गुरु-चंद्र ९/५ योग = चांगला! शुक्र -चंद्र, ९/५ योग = उदार वृत्ती! गुरु-शुक्र योग ९/५ त कलावान. असे अनेक सिद्धांत मास्टर दीनानाथांनी मांडले होते!"

आता खरंतर शनि दर दोन तासांच्या अंतराने आणि दोन तासांच्या कालावधीसाठी सम स्थानात वा विषम स्थानात असतो. मग त्या दोन तासांच्या कालावधीत काय सगळेच फक्त स्त्री बालके वा फक्त पुरुष बालके असतात का? या साध्या मुद्द्यावर तो खोडून काढता येतो.
मी माझ्याकडच्या कुंड्ली संग्रहातल्या चार कुंडल्यांना तो लावून पाहिला. तसे काही आढळले नाही.

उत्तम माहीती. प्रघा धन्यवाद.
- शुक्र -चंद्र,९/५ योग = उदार वृत्ती!
- दशमांत मंगळ म्हणजे कुलदीपक!
ही उदाहरणे माहीत आहेत.
-------------------
सप्तमेश लाभात असतानासुद्धा, जोडीदाराकडुन लाभ असतो का?

सप्तमेश लाभात असतानासुद्धा, जोडीदाराकडुन लाभ असतो का?>>>> हो. पण सप्तमेश लाभात व लाभेष सप्तमात असा अन्योन्य योग असेल तर परस्पर लाभ होतो. अन्यथा जोडीदाराकडून तुम्हाला लाभ पण तुमच्याकडून जोडीदाराला काहीच लाभ नाही. Happy

हाहाहा.
मुलीचा आहे तसा.
शरद उपाध्येंना पत्रिका दाखवली हो ती तिची व व्हिडिओ कन्सल्टेशन केले होते. मधे कोव्हिडच्या काळात ते करत असावेत आम्हाला तरी संधी मिळाली होती. त्यांनी मुली शी बोलताना, २ दा ठासून सांगीतले - पैशाकरता लग्न करायचं नाही Happy
हाहाहा म्हटलं ते सप्तमेश लाभात असल्यानेच म्हणत असावेत Wink
बाकी ती शिकवण आईवडीलांनी द्यायची असतेच ते तर अध्याहृतच आहे. असो.

Pages