हैद्राबादी व्हेज बिर्याणी..

Submitted by इडली on 15 October, 2013 - 09:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१) बासमती तांदुळ - २ वाट्या
२) कांदे - २
३) आलं - १ चमचा (किसलेले)
४) लसुण - १ चमचा (किसलेले)
५) हिरवी मिर्ची - २-३
६) कोथिंबिर -१ वाटी (चिरलेली)
७) पुदिना - १/२ वाटी (चिरलेला)
८) पनीर
९) फ्लॉवर - १ पाव
१०) स्वीट कॉर्न
११) मटार
१२) गाजर
१३) हळद - ३ चमचे
१४) तिखट -२ चमचे
१५) जीरं
१६) लवंग -४-५
१७) तमालपत्र - २-३
१८) वेलदोडा- ३-४
१९) दालचिनी ५-६ तुकडे
२०) दही ३-४ चमचे
२१) तूप - २-३ चमचे
२२) केशर
२३) लिंबाचा रस - २ चमचे
२४) मीठ

क्रमवार पाककृती: 

तांदूळ ३० मिनीटे आधी धूवून ठेवा.

कांदा उभा चिरुन तळुन ठेवा. सोनेरी कुरकुरीत होईपर्यन्त तळा.

फ्लॉवर व पनीरचे थोडे जाड तुकडे करुन त्यात मटार,स्वीट कोर्न व गाजराचे बारीक तुकडे घालुन एकत्र करा. त्यात आलं, लसुण पेस्ट, हळद, तिखट, मीठ, वेलदोडे (अख्खे), दालचिनी तुकडे घाला. त्यातच लिंबाचा रस, बारीक चिरलेली हिरवी मिर्ची,कोथिंबिर,पुदिना,तळलेला कांदा आणि दही घालुन सर्व जिन्नस नीट ए़़कत्र करुन ३० मिनीटे मॅरिनेट करा.

एका भांड्यात तांद्ळाच्या दुप्पट पाणी घेऊन त्यात जीर,लवंग तमालपत्र घालुन तांदुळ शिजवत ठेवा.
तांदुळ पुर्ण शिजवुन न घेता किंचीत कच्चे असतानाच त्यातले पाणी काढुन वेगळे ठेवा. (भातातून लवंग व तमालपत्र पण वेगळे काढा.)

मोठ्या नॉन स्टीक पॅन मधे मॅरिनेट केलेले मिश्रण पसरवा. त्यावर सगळा भात घालून वरुन २ चमचे तूप घाला. दुधात केशर मिक्स करुन ते भातावर घाला. पॅनवर घट्ट झाकण बसवा व १० मिनिटे शिजवत ठेवा.

कांदा-कोथिंबीर रायता करुन गरमा गरम बिर्याणी बरोबर खायला घ्या......

वाढणी/प्रमाण: 
२-३
अधिक टिपा: 

पुदिन्यामुळे बिर्याणीला खूप छान स्वाद येतो..... नक्की घाला.

माहितीचा स्रोत: 
Mehboob alam khan
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यात वरून ब्रेडचे तळलेले तुकडे पण मिक्स करतात.
बावा, इत्ते साल हैद्राबादमें काटे कब्बी व्हेज बिरानी बोलके नै खाई. एक बार करको देकतूं. कसम चारमिनार्की, पुदिना भौत टेस्टी लगता सच्ची. घी बी थोडा झ्यादाइच डालना बोलके है. उंगलीओं को लगे जैसा रैना. बेकार कंजूसी नै करना.

थँक्यू ! Happy

अश्विनीमामी,
मेर्कूभी हैद्राबादी बोल्ना सिक्ने मंगता.. घी , पुदीनाका सच्ची बोली! झ्यादाइच डाल्ना बोल्के है Wink

इस बार फोटू रख्खा नै हां. अगली बार नक्की!

अमा,
हैदराबादाकू रैना, तो व्हेज बिर्यानी खाके मू का टेस्ट कायकू खराब करना जी? अस्ली बिर्यानी बोले तो लजीज गोश्त का मजा. इस्मे खालीपीली घासफूस मिलाके खराब नै करना मंगता जी. वैसे भी कल कू बक्रीद है बावा!

छान.