Submitted by दाद on 10 October, 2013 - 22:23
कसलाच जिव्हाळा मजला सुचवून जायचे नाही
सांत्वनास माझ्या ये पण बरसून जायचे नाही
(सांत्वनास माझ्या ये पण भिजवून जायचे नाही)
सांगून ठेवतो माझे ना खरेच काही आता
ठरवून माळ गजरा पण विसरून जायचे नाही
(कुस्करला गजरा नकळत सजवून जायचे नाही)
उलटलीच लाघववेळा. दे खूण म्हणालो मी, पण
श्वासांवर माझ्या दरवळ कोरून जायचे नाही
(श्वासांवर माझ्या दरवळ नखलून जायचे नाही)
मी जरा सावरित असता परतून यायचे नाही
हलकेच फुंकुनी जखमा उसवून जायचे नाही
हा अवेळीच का येतो, का वसंत ऐकत नाही
विनविले किती की मजला फुलवून जायचे नाही
तू रंगविले मज म्हणुनी, मी दंग खेळलो रंगी
लपवून चेहरा आता, फसवून जायचे नाही
ये खुशाल आयुष्या तू, कहराच्या ऐन दुपारी
पण अलख गर्जुनी दारी, चुकवून जायचे नाही
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सांत्वनास माझ्या ये पण भिजवून
सांत्वनास माझ्या ये पण भिजवून जायचे नाही
श्वासांवर माझ्या दरवळ नखलून जायचे नाही
ये खुशाल आयुष्या तू, कहराच्या ऐन दुपारी
पण अलख गर्जुनी दारी, चुकवून जायचे नाही
वा वा! शलाका काय लिहिलयंस!!
ये खुशाल आयुष्या तू, कहराच्या
ये खुशाल आयुष्या तू, कहराच्या ऐन दुपारी
पण अलख गर्जुनी दारी, चुकवून जायचे नाही... आह!!
फार सुंदर,,! फार..
असो मी माझ्या मनात आले तसे
असो
मी माझ्या मनात आले तसे बोललो
शेवटची द्वीपदी फार आवडली.
शेवटची द्वीपदी फार आवडली.
अजून एक शल्यकर्म केलय. मतलाच
अजून एक शल्यकर्म केलय.
मतलाच बदलला... पण किंचितच.
जिव्हाळा सुचवून ला जिव्हाळा सांगून ... हा पर्याय नाही पटला. त्याचबरोबर, कोरून, विसरून, नखलून ह्यातले खयाल मलाच जरा जास्तच आवडले होते. म्हणून मतला बदलला.
आता बघा बरं.(मला मजा आली हे घडताना... वाचणार्यांचं ते जाणे )
(मला मजा आली हे घडताना...
(मला मजा आली हे घडताना... वाचणार्यांचं ते जाणे स्मित )
बास!! इथेच जिंकलात दाद!!
मस्त गो बाय... !! सांत्वनास
मस्त गो बाय... !!
सांत्वनास माझ्या ये पण बरसून जायचे नाही... खूपच भिडली ही ओळ!!!
तू रंगविले मज म्हणुनी, मी दंग
तू रंगविले मज म्हणुनी, मी दंग खेळलो रंगी
लपवून चेहरा आता, फसवून जायचे नाही
हा आणि अलखवाला शेर जबरदस्त आहे.
जियो दाद !
खूप छन आहे.. सजवून माळ गजरा
खूप छन आहे..
सजवून माळ गजरा चालेल का?
सांगून ठेवतो माझे ना खरेच
सांगून ठेवतो माझे ना खरेच काही आता
ठरवून माळ गजरा पण विसरून जायचे नाही
मी जरा सावरित असता परतून यायचे नाही
हलकेच फुंकुनी जखमा उसवून जायचे नाही
ये खुशाल आयुष्या तू, कहराच्या ऐन दुपारी
पण अलख गर्जुनी दारी, चुकवून जायचे नाही
फार अप्रतिम शेर ...उत्तम गझल !
खरे सांगायचे तर मला शब्दलाघव फार भावले .
छानै गझल !
छानै गझल !
दाद , खूपच छान लिहिता
दाद ,
खूपच छान लिहिता (नेहमीप्रमाणेच)
>>
उलटलीच लाघववेळा. दे खूण म्हणालो मी, पण
श्वासांवर माझ्या दरवळ कोरून जायचे नाही
ये खुशाल आयुष्या तू, कहराच्या ऐन दुपारी
पण अलख गर्जुनी दारी, चुकवून जायचे नाही
>> हे शेर जास्ती आवडले.
मनापासून धन्यवाद सगळ्यांना.
मनापासून धन्यवाद सगळ्यांना.
ये खुशाल आयुष्या तू, कहराच्या
ये खुशाल आयुष्या तू, कहराच्या ऐन दुपारी
पण अलख गर्जुनी दारी, चुकवून जायचे नाही
सुरेख…
दाद, शेवटचा शेर मस्त, एक
दाद, शेवटचा शेर मस्त, एक पूर्ण आणि अर्थपूर्ण कविता आहे तो शेर म्हणजे. अख्खा एक लेख लिहू शकतेस तू त्यावर :).
अलख आयुष्याचा लखलखता शेर.
सध्या मायबोलीवरील रतिबापासून
सध्या मायबोलीवरील रतिबापासून सुटका म्हणून काही जुने वाचनीय धागे वर काढतोय.
हा अवेळीच का येतो, का वसंत
हा अवेळीच का येतो, का वसंत ऐकत नाही
विनविले किती की मजला फुलवून जायचे नाही<>>>>>सुंदरच....
दाद.. तुम्ही परत या हो
दाद.. तुम्ही परत या हो मायबोलीवर.. कुठे आहात..
कसलं अप्रतिम लिहीता.. ह्रुदयाच्या बंद कुपीचे झाकण क्षणभरासाठी उघडावे आणि त्यातून मुग्ध दरवळ सगळीकडे पसरावा असं वाटलं ही गझल वाचून.. तुमच्या गद्य लेखनाची फॅन होतेच आता पद्य लेखनाचीही झाले!
Pages