जायचे नाही

Submitted by दाद on 10 October, 2013 - 22:23

कसलाच जिव्हाळा मजला सुचवून जायचे नाही
सांत्वनास माझ्या ये पण बरसून जायचे नाही
(सांत्वनास माझ्या ये पण भिजवून जायचे नाही)

सांगून ठेवतो माझे ना खरेच काही आता
ठरवून माळ गजरा पण विसरून जायचे नाही
(कुस्करला गजरा नकळत सजवून जायचे नाही)

उलटलीच लाघववेळा. दे खूण म्हणालो मी, पण
श्वासांवर माझ्या दरवळ कोरून जायचे नाही
(श्वासांवर माझ्या दरवळ नखलून जायचे नाही)

मी जरा सावरित असता परतून यायचे नाही
हलकेच फुंकुनी जखमा उसवून जायचे नाही

हा अवेळीच का येतो, का वसंत ऐकत नाही
विनविले किती की मजला फुलवून जायचे नाही

तू रंगविले मज म्हणुनी, मी दंग खेळलो रंगी
लपवून चेहरा आता, फसवून जायचे नाही

ये खुशाल आयुष्या तू, कहराच्या ऐन दुपारी
पण अलख गर्जुनी दारी, चुकवून जायचे नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

>>उलटलीच लाघववेळा. दे खूण म्हणालो मी, पण
श्वासांवर माझ्या दरवळ कोरून जायचे नाही

वाह!

>>ये खुशाल आयुष्या तू, कहराच्या ऐन दुपारी
पण अलख गर्जुनी दारी, चुकवून जायचे नाही

हा खास 'दाद' टच! लय भारी!!

मस्त... सगळीच गझल आवडली.
त्यातही
ये खुशाल आयुष्या तू, कहराच्या ऐन दुपारी
पण अलख गर्जुनी दारी, चुकवून जायचे नाही
हे फारच आवडले.
खास एकदम!

ये खुशाल आयुष्या तू, कहराच्या ऐन दुपारी
पण अलख गर्जुनी दारी, चुकवून जायचे नाही >>>> अहाहा......

- तशी अख्खी गजलच अप्रतिमे...

विनविले किती की मजला फुलवून जायचे नाही<<< व्वा व्वा

कोरून हा काफिया या जमीनीत चालणार नाही शलाका Happy

तसेच, विसरून हाही काफिया नाही चालणार! Happy

कृ गै न

गझल आवडली.

मी जरा सावरित असता परतून यायचे नाही
हलकेच फुंकुनी जखमा उसवून जायचे नाही

हा अवेळीच का येतो, का वसंत ऐकत नाही
विनविले किती की मजला फुलवून जायचे नाही

ये खुशाल आयुष्या तू, कहराच्या ऐन दुपारी
पण अलख गर्जुनी दारी, चुकवून जायचे नाही<<<

शेर आवडले.

शुभेच्छा!

सांत्वनास माझ्या ये पण भिजवून जायचे नाही

ये खुशाल आयुष्या तू, कहराच्या ऐन दुपारी
पण अलख गर्जुनी दारी, चुकवून जायचे नाही

व्वा.

खरच की...
बेफिकिर, थॅन्क्स.
आता बदलूया... :फार विचार न करता इथे गझलसारखी गोष्टं पोस्टून तोंडावर पडलेली बाहुली:
Happy

अहो काहीतरी काय? हे गझलतंत्र शेवटी आशय खुलवण्यापुरतेच महत्वाचे ठरते पुढेपुढे! स्वतंत्र शेर म्हणून ते शेर उत्तम आहेतच की? Happy

फक्त इतकेच, की लक्षात आल्यानंतर ते सांगितले गेले नाही तर ते तांत्रिकदृष्ट्या अचूक असल्याचे मत बनत जाते, हे होऊ नये म्हणून ज्याच्या लक्षात आले त्याने ते नोंदवावे एवढेच!

बेफिकीर...
बदल्या. (पण आधीची मजा जाते बै).
असो.. तंत्रंच जुळवताना तंतरते माझी. मला गझलचं फेफरं येतं.. त्यामुळे ती स्वाभाविक नाही माझ्यासाठी. झटका आला अन लिहिलं असं असतय.
त्यामुळे माझी पुरणपोळी जितकी दरवेळी वाईट तितकीच गझल पण. पण हौस जात नाही हे ही खरंच.

जुनीच ठेवा.... कविता झाली तरी चालेल.

किंवा पहिल्या ओळीत सुचवून ऐवजी ''सांगून'' असे केल्यास बाकी कुठेच बदलायची गरज पडणार नाही.

...

डॉक्टरसाहेबांनी कस्ला जालिम उपाय सांगितला...
ह्याला म्हणतात कौशल्यं!
आता काय करू? हीच राहू दे का? (राहू दे म्हणते).

मला भावलेली ओळ गेली हो तुमच्या बदलामुळे....

श्वासांवर माझ्या दरवळ कोरून जायचे नाही..............व्वाह.

आवडली

तू रंगविले मज म्हणुनी, मी दंग खेळलो रंगी
लपवून चेहरा आता, फसवून जायचे नाही

ये खुशाल आयुष्या तू, कहराच्या ऐन दुपारी
पण अलख गर्जुनी दारी, चुकवून जायचे नाही

व्वा दाद ! क्या ब्बात !
तंत्रामुळे तंतरणे अगदी जुळतेच आपले दाद, तरीही गझलच्या वाट्याला जावेसे वाटते कधीतरी अशी ती दिलरुबा आहेच Happy
तरीही गझल निर्दोष व्हावी म्हणून केलेल्या सूचना अपार जिव्हाळ्यातूनच आलेल्या म्हणूनच धीरही येतो लिहिण्याचा.

झटका आला अन लिहिलं असं असतय.>>> ह्या बाबतीत सेम पिंच Proud

फक्त तुझा झटका पण एक्सलंट असतोय ग Happy

Shevatacha avadala daad... Pahilya sheratli pahili ol sandigdh vatali...

व्वा ! तुम्ही गझलही लिहिता .... मी तरी प्रथमच बघतोय.
------------------------------------------------------------------
उसवून आणि चुकवून हे शेर सर्वात विशेष वाटले.

तुमच्या लेखांची तारीफ अख्खं जग करतं पण मी कधी वाचले नैत ते ...अनेकदा गद्य वाचायचे ह्या विचारानेच मला झोप लागते ना म्हणून!!...पण तुमचे लेखन वाचायची इच्छा होतीच तुम्ही गझल लिहिता अशी कुणकुणही ऐकली होतीच ....आज तुमची गझल वाचत आसल्याने ती एक इच्छा पूर्ण झाली
त्याबद्दल सर्वप्रथम आभार !!!!

खूपच छान लिहिता तुम्ही (पद्यावरून गद्याची परीक्षा Happy )

आताच्या दिसत असलेल्या रचनेत आधीपेक्षा एक दोन बदल झाल्याचे समजले अजूनही नखलून हा काफिया चालत नाही आहे ..मला बदल असा सुचतो आहे ...

लाघववेळा सरल्याची दे खूण मला काही.. पण
माझ्या श्वासांना दरवळ बनवून जायचे नाही

न अवडल्यास सोडून द्या !! Happy

धन्यवाद Happy अजून गझला येवूद्यात !!

Pages