तुझं माझं जमेना

Submitted by sonalisl on 29 May, 2013 - 09:07

महेश मांजरेकरांची झी मराठी वर सुरु झालेली मालिका ...'तुझं माझं जमेना'. त्यांच्याच 'मातीच्या चुली' या सिनेमा सारखी आहे. संपुर्ण कथा माहित आहे तरी ही मालिक बघायला (तूतिमी बघून कंटाळलेल्या मला) छान वाटते.....

Tuza-Maza-Jamena-New-Serial-Zee-Marathi-Serial.jpg

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक एकता कपूरला उगाच नावे ठेवतात. मांजरेकर दुसरे काय करतात? कोणाची प्लास्टिक सर्जरी नाही केली का अजून?

जरी टॉवरमध्ये गेले तरी चाळीतला स्वभाव गेला नव्हता, मग चाळीचा सेट दाखवला असता तर मालिका अधिक रंगली असती अन कमी बजेट मध्ये काम झाले असते.
(आहे की नाही शेवटी मध्यमवर्गीय विचार!)

सगळं गोड झालं .. मनवा प्रेगनंट आहे, दिप्ती तयार झाली लग्नाला, लिमये दांपत्याला सुन मुलगा युरोप टूर ला पाठवतायत.
लिमयांनी वैभवला पैसे दिलेत नवीन घराचे कर्ज फेडायला.
हुश्श ...

लिमयांनी अभिजीतला पैसे दिलेत नवीन घराचे कर्ज फेडायला << सानेंनी का? की वैभव ला पैसे दिलेत?>>>>> वैभवला दिले पैसे.

शेवटी सगळच गुंडाळले आणि दुसरे पर्व पण येणार आहे म्हणे.

शहिर, पेढे फार म्हणजे फारच डिलीशस दिसत आहेत राओ. ही मालिका पाहण्याचे कष्ट घेतलेल्या तमाम लोकांना वाटले पाहिजेत!

>>> दुसरे पर्व पण येणार आहे म्हणे >>>>> नही ssssssssss Angry

Ekadm survatila manavachya babana Aajoba mhananara ek mulaga dakhavala hota .Malikechya shevati tya sambandi kahich nahi dekhavale ka? Uhoh

तो वैभव ज्यात काम करतो त्या सिरिअल्स अशा अब्रप्टली संपतात्/गुंडाळतात की काय! अमरप्रेम पण काय उरकली होती..

कालच्या भागात रिमा, मि. लिमयेच काम केलेले राया आणि संवादलेखक यांच्या गप्पा चालु असताना ते म्हणाले की महेश मांजरेकरांच मालिकेतल्या संवादांकडे खूप लक्ष असायच. अस जर खरच असत तर माबोकरांनी मालिकेत वापरलेल्या भाषेवरुन शिव्या घालण्यासाठी पान च्या पान खर्च केली नसती.

मला वाटत संपवलि असनार हि मालिका.... actually शेवट काय होणार हे माहित होतेच... मातिच्या चुली पाहिला होता ... अगदी सगळच copy केले ... काहितरी बदल करयचा.... पन असो ... संपलि... संपवलि... आपन सुटलो...एक्दाचे ...

काल कोणत्यातरी मराठी चॅनलवर उंबरठा लागला होता, त्यात स्मिता पाटिल तिच्या मुलिच्या वेण्या घालत झोपाळ्यावर बसलेली असते (ती नोकरीनिमित्त घराबाहेर पडणार असते तेव्हाचा प्रसंग) ती लहान मुलगी पाहिल्यावर सारखं हिला कुठंतरी पहिलंय असं वाटलं. खूप ताण दिल्यावर आठवलं की तिने आत्ता तुझं माझं जमेना मध्ये त्या मनवाच्या आईचा रोल केलाय. गुगलून पाहिलं पण त्या लहान मुलिचा फोटो नाही मिळाला.

मी पण पाहिल ते.... लगेच लक्षात आलि तिच्या बघण्याच्या स्टाईलवरुन. मी बराच उशीरा लावला तेव्हा स्मिता पाटिल आश्रमातुन परत आलेली असते तेव्हा ती अनोळखी नजरेने तिच्याकडे बघते तेव्हा मी लगेच ओळखल आणि मनात विचार आला "काय लक्की आहे हिला स्मिता पाटिलबरोबर काम करायला मिळाल"

Pages