Submitted by sonalisl on 29 May, 2013 - 09:07
महेश मांजरेकरांची झी मराठी वर सुरु झालेली मालिका ...'तुझं माझं जमेना'. त्यांच्याच 'मातीच्या चुली' या सिनेमा सारखी आहे. संपुर्ण कथा माहित आहे तरी ही मालिक बघायला (तूतिमी बघून कंटाळलेल्या मला) छान वाटते.....

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मांजरेकर मुंबईकर आहेत पण
मांजरेकर मुंबईकर आहेत पण मालीकेतली मंडळी पुण्यातली आहेत.
माहेरची "लिमये" असल्याने नक्की सांगू शकते की लिमये असे बोलत नाहीत.
पण आता डायरेक्टर जे सांगणार
पण आता डायरेक्टर जे सांगणार तेच कलाकार करणार.... पण सुहास जोशी , रीमा सारख्यांनी पण चुक दुरुस्त करायला हव्या..त्यांना तर माहीतच असणार नं..... मांजरेकर थोडे भडक डोक्याचे आहेत तरी पण ....आता काय माहित ....असो..
डॉयलॉग्ज कोण लिहितं त्याची
डॉयलॉग्ज कोण लिहितं त्याची चूक !
ह्म्म बरोबर...पण डायलॉग
ह्म्म बरोबर...पण डायलॉग लिहिणार आणि डायरेक्ट तसच शूट करणार???? मग दिगदर्शक काय करतो??? आणि बाकी कोणास ही चुक लक्षात येत नाही???
काल अभिजीत गेल्यानंतर जोशी
काल अभिजीत गेल्यानंतर जोशी कुटुंब रस्त्यातले खड्डे, बेशिस्त ट्रॅफिक याला दोष देत होते. आता अभिजीतच्या जाण्याचे हे कारण नव्हते. तो त्याच्या विचारात गाडी चालवताना अपघात झाला आणि गेला.
हा आता हे शक्य आहे की त्यांना तसे वाटले असेल.
डॉयलॉग्ज कोण लिहितं त्याची
डॉयलॉग्ज कोण लिहितं त्याची चूक >> बरोबर.
अनिष्का, डेली सोप आहे तो. दिवसाभरामधे आठ दहा तास चित्रीकरण रोज होत असतं. शिवाय आपल्याकडे एपिसोड्स आधी तयार करून ठेवत नाहीत, प्रत्येक काम आयत्यवेळी असतं, इंडस्ट्रीची सवयच तशी आहे. आणि प्रत्येक कलाकार दर वेळेला स्वत:च्या मनाने संवाद बदलू शकत नाही. दिग्दर्शक "कलाकारांनी काय करावं?" यासोबत इतर अनेक व्यवधानांमधे असतो. त्यामुळे प्रत्येक डीपार्टमेंटच्या माणसाने स्वव्तःचे काम परफेक्ट करणे अपेक्ष्हित असते जसे, संवादलेखकाने व्यवस्थित संवाद लिहून देणे अपेक्षित आहे. मुंबईमधे पुणेरी मराठी बोलणारे अनेक लेखक आहेत त्यांच्यापैकी कुणाकडून संवादलेखन का करवून घेत नाहीत??
काय बोलणं हे बरोबर की चूक हा विषय नाही, पण प्रत्येक पात्राचं बोलणं त्या त्या भागाशी, जातीशी, धर्माशी सुसंगत असावं ही अपेक्षा काही फार मोठी नाही. पुणेरी पात्र आहे तर पुणेरी बोलू द्या, बेळगांवकडचं पात्र आहे तर कानडीमराठी बोलू द्या, पण लिहिताना संवाद पण त्या भाषेचा विचार करून लिहा. नुसता अॅक्सेंट मारला म्हणजे पात्र त्या भागातलं होत नाही. कुठलीतरी एक आगरी समाजावरची मालिका होती त्यात संजीवनी जाधव मालवणी बोलायची. दोन्हीमधे चारशे किमी अंतर आहे, दोन्ही भाषा वेगळ्या आहेत. बहुतेक वेळेला प्रेक्षकांना मूर्ख समजलं जातं याचा मला प्रचंड राग येतो. आणि कित्येक प्रेक्षक तो मूर्खपणा चालवूनही घेतात याचा तर अजूनच राग येतो....
इथे मला एक मराठी सिनेमा आठवतो, मुक्ता बर्वे-अशोक सराफचा. त्यामधे प्रत्येक पात्र वेगवेगळ्या मराठी बोलींमधे बोलतं, आणि ते ऐकताना कुठेही खटकत नाही.
प्रबोधन सुरू झाले होते काल
प्रबोधन सुरू झाले होते काल शेवटी शेवटी
काय बोअर झाले गेले दोन भाग!
काय बोअर झाले गेले दोन भाग! हिंदी सिरियलच्या कॉपीप्रमाणे सगळे काही साग्रसंगीत दाखवत होते मूर्ख लोक! ९च्या स्लॉटला मुलं वगैरेही टीव्ही बघत असताना कसले हे दळभद्री शॉट्स!
आणि किती तो मेलोड्रामा! सिरियलीत पाणी घालण्यासाठी यांना एकही दुसरा ट्रॅक सापडला नाही????
तसंही रोज बघणं होतच नव्हतं. आता तर बादच!
मुक्ता बर्वे-अशोक सराफचा. >>>
मुक्ता बर्वे-अशोक सराफचा. >>> एडाधो का?
डायलॉग खरंच कोणी लिहीत असेल असंही वाटत नाही कधीकधी. फक्त 'हा असा असा सीन आहे...होऊन जाऊ दे.. अॅक्शन.' अश्या सुचना देत असतील कलाकारांना. मग बोलताना शब्द, व्याकरण यांच्या चुका होणारच.
पण सुहास जोशी , रीमा सारख्यांनी पण चुक दुरुस्त करायला हव्या..त्यांना तर माहीतच असणार नं..... ??? +१
टीव्ही बघत असताना कसले हे
टीव्ही बघत असताना कसले हे दळभद्री शॉट्स!>> +१
त्यादिवशी नेमका बायकोने टिव्ही लावला.
आणि हाच शॉट सुरु होता.
खुप वाइइट इम्पॅक्ट होतो अशा दृष्यांचा.

खासकरुन ज्यांनी कोणा खुप जवळच्यांचे मृत्यु पाहिले आहेत पण अजुन पचवु शकले नाहीत त्यांच्यावर..
पण मुंबईत असेच बोलले
पण मुंबईत असेच बोलले जाते.....आणि सीरीयलीत ते आलय कारण मांजरेकर मुंबईकर आहेत...>>>>>
एकतर हे जनरलायजेशन आहे आणि दुसरं म्हणजे मांजरेकरांनी या मालिकेचे संवादलेखन केलं नाहीयेना?
शिरेलीचं नावंच चुकलेलं आहे,
शिरेलीचं नावंच चुकलेलं आहे, कारण अममोर नावाच्या अख्ख्या चाळितल्या प्रत्येक घरात काय काय चालते ते दाकह्वलंय. भंगार सिरेल. :रागः
मुक्ता बर्वे-अशोक सराफचा. >>>
मुक्ता बर्वे-अशोक सराफचा. >>> एडाधो का?
<<< बरोबर. नाव आठवत नव्हतं.
मुंबईमधे पुणेरी मराठी बोलणारे
मुंबईमधे पुणेरी मराठी बोलणारे अनेक लेखक आहेत त्यांच्यापैकी कुणाकडून संवादलेखन का करवून घेत नाहीत?? >>>>>>>>>>>>> +११११११११
बहुतेक वेळेला प्रेक्षकांना मूर्ख समजलं जातं याचा मला प्रचंड राग येतो.>>>>>>> ग्रँटेड पण धरलं जातं
अख्ख्या चाळितल्या प्रत्येक
अख्ख्या चाळितल्या प्रत्येक घरात काय काय चालते >>>> अगदी अगदी... नव्या जमान्याची चाळवाचाळव दाखवायचा प्रयत्न सपशेल फसलेला आहे.
प्रवीण तरडे आहे बहुतेक
प्रवीण तरडे आहे बहुतेक संवादलेखक या मालिकेचा (तोच तो वैभव-मनवाचे लग्न लावायला आलेला रजिस्ट्रार)
बॅनर, कलाकार, निर्मितीमुल्ये वगैरे बघून सुरुवातीला अपेक्षा उंचावलेल्या... पण या लोकांनी धाडकन जमिनीवर आणले (खरतर पाताळात धाडले ;))
शिरेलीचं नावंच चुकलेलं आहे,
शिरेलीचं नावंच चुकलेलं आहे, कारण अममोर नावाच्या अख्ख्या चाळितल्या प्रत्येक घरात काय काय चालते ते दाकह्वलंय << हो त्यात तुझ माझ (सासु सुन) जमेना हे फक्त अजुन एक गोष्ट झाली आहे सीरीयल मधे
खुप वाइइट इम्पॅक्ट होतो अशा
खुप वाइइट इम्पॅक्ट होतो अशा दृष्यांचा. << आणि असा मेलोड्रामा दाखवायची खरच गरज अस्ते का?
फक्त पुण्यातच नाही तर मी
फक्त पुण्यातच नाही तर मी पश्चिम महाराष्ट्रात कुठेही भाजी 'जळाली' , 'जेवण करणे' इत्यादी शब्द प्रयोग कधी ऐकलेले नाहीत. ही मुंबईची आणि इतर हिंदाळलेल्या जिल्ह्यातली भाषा आहे..
त्या सायरस ला पाहिला का हो
त्या सायरस ला पाहिला का हो कुणी ?
मिसला तो एपिसोड ..
हो पाहिला ते गोडबोले म्हणुन
हो पाहिला ते गोडबोले म्हणुन एक कलाकार आहेत. दुनियादारी मध्ये अंकुश चौधरीच्या प्रेयसीच्या बापाचा रोल केलेले त्यांना आणल आहे सायरस म्हणुन... अज्जिबात पारसी म्हणुन शोभत नाहीत.....
हो पण या सायरसचं अन मनवाच्या
हो पण या सायरसचं अन मनवाच्या आईचं काही नातं आहे काय? तो भाग पाहीला नाही त्यामुळे विचारतोय. तसं असेल तर फारच वाईट वाटेल मला. तिचा हेअरकट आधी मस्त होता, आता बदललाय का? अन पिवळ्या रंगाची साडी शोभते तिला. चॉकलेटीही मस्त.
(गॉसिप्सची तयारी करतोय बरंका)
त्या सायरस्ने म्हणे मनवाच्या
त्या सायरस्ने म्हणे मनवाच्या आईला लहानपणी आईची माया दिली आहे. तसच अनेक मुलांना त्याने माया दिली आहे. वर हा श्री. भोसल्यांच्या ऑफिसात काम पण केले आहे, म्हणजे अजुन हा माणुस नक्की कोण हे काही समजल नाहिये. परवाच्या एपिमध्ये रिमा लागुने विनोद करायचा प्रयत्न केला, पण विनोद झालाच नाही वर वाटल की उठाव आणि एक ठेउन द्यावी. मनवाचे बाबा रिमाला विचारतात की तुम्हाला सायरस कसा वाटला तर ही म्हणाली की म्हातारा वाटला, त्यावर श्री. लिमये म्हणाले की अग ते दिसायला कसा नाही माणुस म्हणुन कसा वाटला ते विचारत आहेत. त्यावर प्रतिक्रिया म्हणजे अच्छा अस होय"
आता रिमाला एवढ पण कळु नये का? आणि म्हणे शाळेची प्रिन्सिपॉल होती ही
हे मात्र खरं आहे. ते पात्रपण
हे मात्र खरं आहे. ते पात्रपण बकवास वाटलं..
हो ना म्हणजे इतका गाजावाजा
हो ना म्हणजे इतका गाजावाजा करुन आणल कोणाला तर गोडबोल्यांना. त्यापेक्षा दिलीप प्रभावळकरांना घेतल असत तर चालल असत. पु.लंच्या व्यक्ती आणि वल्ली मधला पेस्तनजी काय मस्त वठवला होता त्यांनी?
मुग्धा, हो प्रभावळकर एकदम
मुग्धा, हो प्रभावळकर एकदम पर्फेक्ट बसले अस्ते
आता कुलकर्णी बाई नातवासाठी
आता कुलकर्णी बाई नातवासाठी सुनेवर दबाव आणत आहेत. पुन्हा मागच्याच वेळेचा तमाशा
पुढील भागात म्हणुन दाखवले आहे कि त्यांची सून सांगते कि ती पुन्हा एकदा प्रेग आहे.
सुनेलाही दुसरा चान्स घ्यायचाच होता तर आधी एवढा तमाशा कश्याला केला?
आता संभाव्य एपिसोड्सः
पर्याय १. कुलकर्णी बाई सुनेला या वेळेला गर्भलिंगचिकित्सा करून घे सांगतील. मग त्यावरुन भांडण.. ते भांडण या दोघी (नेहमीप्रमाणे) कुलकर्णी बाईंच्या नवर्याकडे घेऊन जाणार. मग त्याने पुन्हा सुनेची बाजु घ्यायची आणि लोकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न.
पर्याय २. तिला दुसरी मुलगीच होणार आणि त्यावरुन पुन्हा तमाशा. मग त्यावरुन भांडण.. ते भांडण या दोघी (नेहमीप्रमाणे) कुलकर्णी बाईंच्या नवर्याकडे घेऊन जाणार. मग त्याने पुन्हा सुनेची बाजु घ्यायची आणि लोकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न.
पर्याय ३. तिला मुलगा होणार आणि सासु आता एकदम घराण्याला वारस आला असा जल्लोष करणार. पुढे त्या लहान मुलीला हिडिसफिडिस करणार आणि मुलाला स्पेशल ट्रिटमेंट देणार. मग त्यावरुन भांडण.. ते भांडण या दोघी (नेहमीप्रमाणे) कुलकर्णी बाईंच्या नवर्याकडे घेऊन जाणार. मग त्याने पुन्हा सुनेची बाजु घ्यायची आणि लोकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न.
वा पियुपरी पुढच्या दोन
वा पियुपरी पुढच्या दोन आठवड्याच्या एपिसोडच वर्णन केलस म्हणजे आता मालिका नाही बघितली चालेल..
जुळ्या मुली झल्या तर ???
जुळ्या मुली झल्या तर ???
.....
बाय द वे... मालिका फार च
बाय द वे... मालिका फार च पट्पट लीप दाखवतेय....
Pages