तुझं माझं जमेना

Submitted by sonalisl on 29 May, 2013 - 09:07

महेश मांजरेकरांची झी मराठी वर सुरु झालेली मालिका ...'तुझं माझं जमेना'. त्यांच्याच 'मातीच्या चुली' या सिनेमा सारखी आहे. संपुर्ण कथा माहित आहे तरी ही मालिक बघायला (तूतिमी बघून कंटाळलेल्या मला) छान वाटते.....

Tuza-Maza-Jamena-New-Serial-Zee-Marathi-Serial.jpg

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पियु, ती प्रेगनन्ट नसून सासूला अद्दल घडवण्यासाठी कसलंतरी नाटक करत आहे हे ही समजलं की काल संवादांमधून.

आता ती नवी मालीका (एका लग्नाची तिसरी गोष्ट) सुरू होईपर्यंत टाईम पास चालला आहे

मला कळत नाही, एव्हडा एक माणूस (अभिजित) मेलाय त्यांच्या त्या बालिशपणाच्या प्लान मुळे आणि आता हे मंद बुद्धी लोक परत सासूला सुधारायला कसले प्लान-बिन रचत बसलेत....यांचा बालीशपणा किती जीव घेणार आहे???

बंद करा बंद करा, आचरट, फ्लॉप मालिका बंद करा!
चालू करा चालू करा दुसर्‍या मल्लिकाला चालू करा!!

बंद झालीच पाहीजे...बंद झालीच पाहीजे...
तुझं माझं जमेना...तर बंद झालीच पाहीजे...

मला एक शंका आहे. प्रेगच्या पहिल्याच महिन्यात बाळाचा चेहरा कळतो? जरा स्पष्टच विचारल आहे मी....

मुग्धा, ते सगळं त्या कुलकर्णी काकूंना खोटंच सांगत असतात.. नवीन टेक्नॉलॉजी आलीये, वगैरे सगळं खोटंच असतं.. असं काहीही कळत नाही प्रत्यक्षात..

सानी ते माहित आहे ग मला कुलकर्णी काकूंना खोटंच सांगत असतात वगैरे, पण मला असा प्रश्न आहे की पहिल्याच महिन्यात गर्भाच शरीर तयार झालेल असत का? मला वाटतं नसत झालेलं आणि टेक्नॉलॉजी कितीही नवीन असली तरी जिथे काही तयारच झालेल नाहिये तिथे काही दिसण्याचा संबंधच येत नाहिये. मला बेसिकली हे सांगायच आहे कुलकर्णी काकूंना स्वतःला एक मुलगा असुन त्यांच्या ही गोष्ट का लक्षात येत नाही???? कथेत लुपहोल्स असावेत तरी किती, त्याला काही मर्यादा आहेत की नाहित...... Angry

कुलकर्णी काकूंना स्वतःला एक मुलगा असुन त्यांच्या ही गोष्ट का लक्षात येत नाही???? >> त्या 'नातवा'साठी वेड्या झाल्या आहेत. त्यामुळे कशावरही विश्वास ठेवायला तयार आहेत. त्या ज्या अपेक्षा 'नवीन टेक्नॉलॉजीकडून' ठेवत आहेत त्या वेडगळ आहेत हे पूरक संगीत आणि इतर कलाकारांच्या प्रतिक्रिया यावरून पुरेसं स्पष्ट आहे की!

बाकी काही असो, वेगळं होऊन संबंध गोड ठेवा हा संदेश तर ही मालिका देत नाहीये ना? Wink आधी मन्वाची हरेक गोष्ट चूक समजणार्‍या रीमाकाकू आता एकदम 'कूल' झाल्या आहेत ते वेगळे झाल्यापासून! Biggrin

त्या 'नातवा'साठी वेड्या झाल्या आहेत.>>>>> अक्कल गहाण टाकली आहे त्यांनी.... पण वास्तवात इतकी बेअक्कल बाई कोणतीच नसते (मग नातवाचा कितीही ध्यास घेतला असला तरी.) त्यातल्या त्यात खासकरुन ज्या बायका स्वतः गरोदरपण आणि बाळंतपण या अनुभवातुन गेल्या आहेत त्या तरी एवढ्या बेअक्कल नसतात.... सविता मालपेकरसारख्या चांगल्या कलाकाराला अगदीच वाया रादर फुकट घालवल आहे.
कै च्या कैच दाखवतात राव....

पण वास्तवात इतकी बेअक्कल बाई कोणतीच नसते>> वास्तवातली कोणती घटना मालिकेत घडते आणि व्हाईस व्हर्सा? ही मालिका आहे. वास्तव नाही. दोन संपूर्ण भिन्न गोष्टी आहेत Happy

आता त्या 'होणार सून' मध्ये आपली सून नक्की कोण होणार आहे हेही ते बोलत नाहीत एकमेकांशी! 'मला असं वाटलं' या गृहितकावर चाललाय अख्ख्या लग्नाचा खेळ. असं कोणत्या वास्तवात होतं? Biggrin

सोडून द्या. नॉट वर्थ इट.

सोडून द्या. नॉट वर्थ इट.>>>> खरच आहे पौर्णिमा. मांजरेकरांनी अक्कल गहाण टाकल्याने मालिकेतल्या पात्रांना पण कंपल्सरी टाकावी लागत आहे....

मुंबई पासुन अलिबाग ला जाताना वडखळ नाक्या पासुन लेफ्ट ला वळावे लागते रोह्यास जाण्या साठी...नेमकं अंतर मल माहित नाही....मायबोलीकर कृष्णा रोह्याचे आहेत....रोहा ना कोलाड म्हणुन ठिकाण आहे तिथे रिव्हर राफ्टिंग करतात...मस्त जागा आहे......बरेचसे रिसॉर्ट आहेत तिथे....ही पहा लिंक
http://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=9&ved=0CG...

kaalach dakhavale to parat alyacha. sarakha abhijit la martat he ghoshawakya zee walyani aikalela distay.
ani yogayog itake asatat cinemat ki nemaka tyacha lagna jhalela nasanar bagha. :raga:

Pages