Submitted by रमा. on 1 October, 2013 - 06:03
राधा प्यारी..
कान्हाच्या या अनेक गोपी
तरी वाटते राधा प्यारी
प्रेम सखी ती, प्राण सखी ती
राधा, राधा, राधा न्यारी
रंग रंगतो, खेळ खेळतो
राधेला या छेड छेडतो
रंगुनी साऱ्या क्रीडांमधूनी
परी असे ही श्वेत बावरी
राधेने त्या चंग बांधला
छळतो मजला श्याम सावळा
पाहतेच मी कसा राहतो
माझ्याविन तो गोपमुरारी
राधेवाचून कसल्या क्रीडा
कसले गोकूळ, मनभर पीडा
करमेना जीव कृष्णाचा हा
राधेचाही प्राण उरावरी
राधे सखये कृष्ण आळवी
म्हणतो राधा, राधा, राधा प्यारी
प्रेम सखी ती, प्राण सखी ती
राधा, राधा, राधा न्यारी
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बहौत खूब!
बहौत खूब!
सुरेख
सुरेख
मस्तच
मस्तच
चौथं कडवं सर्वात विशेष वाटलं.
चौथं कडवं सर्वात विशेष वाटलं.
डॉ. अशोक, अमेय, जय,ऊल्हास जी,
डॉ. अशोक, अमेय, जय,ऊल्हास जी, धन्यवाद..
छान
छान
धन्स शुभांगी
धन्स शुभांगी
चांगली आहे!
चांगली आहे!
उत्कट सुरुवात, छान
उत्कट सुरुवात, छान लिहिलेय.
एखाद्या जागेवर अजून जास्त विचार करता येईल ..
लाघवी कविता !
लाघवी कविता !
भारती ताई, करेन अजून
भारती ताई, करेन अजून विचार..
धन्यवाद विक्रांत
रमा... कृष्णापेक्षाही
रमा...
कृष्णापेक्षाही राधेच्या प्रेमात पडूनच ही कविता उतरली आहे असे जाणवत गेले.
"......छळतो मजला श्याम सावळा
पाहतेच मी कसा राहतो
माझ्याविन तो गोपमुरारी...."
यातील राधेची लटकी अशी धमकी फारच भावण्यासारखी आहे.
मामा, कॄष्णाच्या सारेच
मामा,
कॄष्णाच्या सारेच प्रेमात असतात..राधेला पण फूटेज हवं ना..
छान भाव
छान भाव