ज्योतिष शिक्षण : अभ्यासकांसाठी प्रश्नोत्तरे

Submitted by shikau on 9 May, 2011 - 14:03

ज्योतिषाचा अभ्यास करू इच्छिणार्‍यांनी इथे प्रश्न विचारुयात का? .

मी नुकताच ज्योतिषाचा स्व-अभ्यास सुरु केला आहे. काही दिवसांनी शक्य झाल्यास क्लास लावणार आहे.
तोपर्यंत पुस्तक वाचताना काही प्रश्न पडल्यास ते विचारावेत असे वाटल्याने येथे लिहीत आहे.
जाणकारांनी मार्गदर्शन केल्यास आभारी असेन.

सुरुवात मी करतो. माझे प्रश्नः

१. सत्वगुणाच्या राशी, रजोगुणाच्या राशी आणि तमोगुणाच्या राशी म्हणजे काय?
ह्या गट पाडण्यामुळे काय फरक पडतो?

२. मूल त्रिकोण रास म्हणजे काय? ग्रह मूल त्रिकोण राशीत येतो म्हणजे नक्की काय होतं?

असे इतरही प्रश्न हळूहळू येतील. आपणही प्रश्न विचारा. आभारी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> समाजाला अंधश्रद्धा आणि धर्मांधता जातियता यांच्या गर्तेत धडकणार्यांना विरोध करण्यासाठी फुले आंबेडकरांनी आयुष्य वेचले आहे, असल्या प्रचारकी धग्याला आपण जर प्रखर विरोध केला तर बिघडले कुठे? <<<<<
इथे थोडा मतभेद होऊ शकेल, ज्या फुले आंबेडकरांचे नाव घेऊन तुम्ही "प्रखर वगैरे" विरोध करणार, त्या आंबेडकरांनी स्विकारलेल्या "बौद्ध" धर्मामधे, त्यांचे श्रद्धास्थानांमधे आम्हि ढवळाढवळ करीत नाही आहोत, तेव्हा तुमची "निधर्मी/कम्युनिस्ट/ब्रिगेडी/कॉन्ग्रेसी" मते तुमच्यापुरती ठेवलीत तर बरे, व ती मांडण्याकरता उठसूठ "बौद्धधर्मिय माननीय बाबासाहेब आंबेडकर" यांचे नाव फुकाचेच वापरून उगाच हिंदु धर्माधारीत श्रद्धा/शास्त्रे यात नाक खुपसू नये ही नम्र विनंतीच! Happy

विबासं इत्यादिही सांगता येऊ शकते
<<
आत्ता आहेत त्यापेक्षा अजून किती होतील त्याचे उत्तर हवे आहे. माझी कुंडली मांडून पहा ही विनंती.

धिरज, क्षमा करा पण हा धागा मला प्रचारकी वाटत नाही. मला तरी धागाकर्त्याला रस असलेल्या विषयात चर्चा करण्यासाठी उघडलेला धागा वाटतो. धागाकर्त्याने तर आधीच आभार वगैरे पण मानले आहेत. Happy तसेही मायबोलीवर ज्योतिष या विषयाला प्रतिबंध नाही!

मला जर धार्मिक साहित्यात रस नसेल तर मी ते वाचणार नाही.
पण धार्मिक साहित्यास मायबोली या स्थळावर सतत विरोध करत बसल्याने कुणाचे विचार बदलतील असा माझा समज नाही. ते ही मला पटत नसेल तर मी माझेच संस्थळ काढेन आणि त्यावर धार्मिक साहित्यास बंदी घालेन. Happy

तुम्हाला ज्योतिष विरोधाचे प्रयत्न करायचे असल्यास उत्तमच!
पण त्यासाठी आपला विषय पुर्णपणे मांडून त्याचे योग्य ते संदर्भ देऊन पुर्ण विवेचन केले पाहिजे.
विरोध का केला आहे, दुष्परिणाम काय आहेत, त्यासाठीची उपाय योजना इत्यादी त्यात आले पाहिजे. यासाठी स्वतंत्र धागा उघडा. तेथे योग्य ती चर्चा तुम्हाला सांगोपांग करता येईल.

येथे धागाकर्त्याला ज्योतिष विरोध हा विषय अभिप्रेत नाही असे सकृतदर्शनी वाटते.

या देशात कोणताही नागरीक घटनास्वातंत्र्याने राष्ट्रहीताच्या गोष्टीत नाक खुपसू शकतो Proud

भोळ्याभाबड्यांनी इथे प्रश्न विचारावेत आणि 'पैसा कमावणार्याने' सावज सापडल्याच्या आनंदात धडाधड उत्तरे द्यावीत... या धाग्याचे भविष्य लक्षात घ्या ,प्रश्नार्थींचे या धाग्यावर कोणतेही भले होणार नाही परंतु जे 'पोटार्थी' या धाग्यावर आहेत त्यांचे मात्र होईल... go ahead

परत तेच लिहितो -
आपला विषय पूर्णपणे मांडून त्याचे योग्य ते संदर्भ देऊन पुर्ण विवेचन केले पाहिजे.
विरोध का केला आहे, दुष्परिणाम काय आहेत, त्यासाठीची उपाय योजना इत्यादी त्यात आले पाहिजे.
उगाच एकोळी प्रतिसादाने काय साध्य होते?

>>>> अंदाजे माहिती असलेली जन्मवेळ/तारीख कृष्ण्मूर्तीपद्धतीने देखील निश्चित करता येते ना? <<<<
गमभन, तसे शक्य असेलही, पण माझा कृष्णमूर्तिपद्धतीचा अभ्यासच नसल्याने मला त्यावर भाष्य करता येत नाही.

[माफ करा, पण काही आचरट/हिंदूधर्मद्वेषी प्रतिसादांमुळे व्यत्यय आल्याने उत्तर देण्यास उशिर झाला]

ज्योतिषशास्त्राचा पारंपारिक पद्धतीने अभ्यास करायचा झाला तर व.दा भट यांची पुस्तके फार उपयुक्त आहेत.
१.कुंडली तंत्र आणि मंत्र भाग १
२.कुंडली तंत्र आणि मंत्र भाग २
३.व . दा भट यांचे फलीत- तंत्र( ले. कविता काळे )
४.असे ग्रह अशा राशी
५.पंचम स्थान
६.सप्तम स्थान
७.वृश्चिक लग्न
८.समग्र ग्रहयोग
तसेच म. दा भट ह्याचे नवमांश रहस्य हे सुद्धा जरूर वाचा .
वरील पुस्तके कदाचित तुमची वाचून झाली असतीलही .
कृष्णमुर्ती पद्धती हि पण ज्योतिषशास्त्रातील एक खूप चांगली पद्धत आहे. जमल्यास पुढे त्याबद्दल लिहीन .

धन्स Anvita

इब्लिस,

जर का जोतिषी खरोखर निष्णात असेल तर तो नक्कीच तुमचे भाकित सांगू शकेल.

हा दुवा पहा. http://dhondopant.blogspot.in/2010/06/blog-post.html

सुरुवातीचा भाग तुम्हाला रुचणार नाहीच. इथून पुढे वाचा. "एखादी पत्रिका हातात धरली की अर्ध्या मिनीटात हा माणूस कशासाठी आला आहे? हे त्यांना कळत असे........"

गमभन, ज्योतिषी निष्णात असेल वा नसेल, ज्योतिष शास्त्र अचूक असतेच, पण कोणत्या व्यक्तिला स्वतःला स्वइच्छेने कुठे "शेण खायला मिळेल", कितीवेळा शेण खायला मिळेल, असल्या जातकांच्या आचरट प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ज्योतिषाने आपले ज्ञान पणाला लावू नये.
हां, जातकाची अर्धांगिनी जर नवर्‍याचे(जातकाचे) अपरोक्ष विचारत आली की माझा नवरा कुठे शेण खातो आहे का/असल्यास किती ठिकाणी शेण खातो आहे, तर अशावेळी मात्र ज्योतिषाने आपले ज्ञान पणाला लावले पाहिजे असे माझे मत.

अन्विता, कृष्णमूर्तिपद्धतीबाबत थोडक्यात मूलभूत तत्वांचे विवेचन करु शकलात तर उत्तम होईल.

मायबोली वर शोधता "रमेश रावल" (http://www.maayboli.com/user/31251) या सदस्याने कृष्णमूर्ति पद्धतीवर काही लेख लिहीले होते.
http://www.maayboli.com/node/20286
http://www.maayboli.com/node/20321
http://www.maayboli.com/node/38656

अजुन कोणी लेखन केल्यास स्वागतच आहे.

गमभन ,वर दिलेल्या लिंक क्लीक केल्या तर खालील मेसेज येत आहे.

तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.
हे पान वाचण्यासाठी तुम्ही ज्योतिष्य, भविष्य
या ग्रूपचे सभासद असणे आवश्यक आहे.

ग्रुपचे सभासद कसे व्हायचे?

ग्रुपच्या नावावर क्लिक करा. मग तिथे "सामील व्हा" म्हणून लिंक असेल, तिथे क्लिक केले की त्या ग्रुपचे तुम्ही सदस्य व्हाल.

लिंबाजीराव,

शेण खाण्याचा उल्लेख तुम्ही केलात प्रथम. म्हणजे तुम्ही खाऊन पाहिलेत का आधी?

'विबासं सांगता येतात' हे तुमचेच लिहिलेले कॉपीपेस्ट करून प्रश्न विचारला होता.

विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर येत नाही म्हणून सांगावे की सरळ.

गिर्‍हाईकाने विचारलेले प्रश्न चुकीचे आहेत, अन आम्ही उत्तर देणार नाही, ही स्टाईल काय कामाची? आधी जाहिरात करायची की विबासं सांगता येतात. अन विचारलं तर शेण खाण्याबद्दलचे दीडशहाणे रिमार्क लिहायचे. जनाची नाहीच, मनाचीही नाही वाटत का, असं करायला?

दक्षिणा जास्त हवी असेल तर तसे सांगावे. परवडत असेल तर विचार करू आम्ही Proud

उगंच टिव्टिव करत नै तिथे हिंदू धर्म अन पेशवाई आणून गळे काढू नयेत, अन विकृत भाषेत दुरुत्तरेही करू नयेत. तुमच्यापेक्षा जास्त हलकट शब्दांत मला लिहिता येते, हे तुम्हाला ठाऊक आहे. तेव्हा किमान माझ्या संदर्भात तरी योग्य शब्द वापरण्याचा प्रयत्न करावा ही विनंती.

लिंबुमहाराज खरे ज्योतिषी असाल तर हे आव्हान स्विकारा.
२०१४ च्या निवडणुकात कोणता पक्ष सत्तेत येईल? आणि त्यापक्षाचे संख्याबळ अंदाजे काय असेल?
भारत देशावर याचा काय परिणाम होईल.?
देशाची जन्मतारीख- १५ ऑगस्ट १९४७
जन्मवेळ- 00:01 AM
खरे ज्योतिषी असाल तर दोन दिवसात याच धाग्यावर संपुर्ण भविश्य लिहा ज्योतिषाच्या भाषेत,मोघम नको.आव्हान स्विकारले हे आजच्या दिवशी तरी जाहिर करा.

या प्रश्नाला जर लिंबुटींबु यांना फाटा द्यायचा प्रयत्न केला अथवा थेट उत्तर न देता घूमजाव केले तर समजावे ज्योतिष थोतांड आहे. Wink

लिंबुने भविष्य लिहिल्यास व ते खरे ठरल्यास ज्योतिष हे शास्त्र आहे हे मान्य करु. Proud

>>> 'विबासं सांगता येतात' हे तुमचेच लिहिलेले कॉपीपेस्ट करून प्रश्न विचारला होता. <<<<
तुम्ही तसा प्रश्न "विचाराल" याची खात्रीच होती, म्हणुनच बरोब्बर अचूक अंदाज करुन "विबासं" चा उल्लेख केला होता Proud
मात्रा अचूक पडली, गळाला मासा अचूक गुन्तला! Wink

>>>> या प्रश्नाला जर लिंबुटींबु यांना फाटा द्यायचा प्रयत्न केला अथवा थेट उत्तर न देता घूमजाव केले तर समजावे ज्योतिष थोतांड आहे. <<<< ते तर तुम्ही अन्निसवाले तसेही समजत आहातच की! "पब्लिकला" सान्गताय का हे? Wink

राष्ट्रीय पातळीवरील्/मोठ्या भूखण्डासंबंधाने ज्योतिष वर्तवायचा माझा अभ्यास नाही, तसेच असली आव्हाने स्विकारण्याची मला गरज नाही, कारण मी ती स्विकारली काय, न स्विकारली काय, जिंकलो काय की चूकलो काय, त्यामुळे ज्योतिष शास्त्राला तसेच त्यावर असलेल्या जनसामान्यांच्या श्रद्धेला काडीचीही बाधा पोहोचत नाही. (अन त्यामुळेच तर एकवीसाव्या शतकातही सव्वाशेवर्षांपूर्वीच्या फुलेंच्या लेखाचे संदर्भ जिथेतिथे प्रचारात्मक पद्धतीने द्यावे लागताहेत Proud )
अन हे कळून चूकल्यानेच, कायदे करुन ज्योतिषशास्त्रास् थोतांड व ज्योतिषीव्यक्तिस गुन्हेगार ठरविण्याचे ख्रिस्ती कारस्थान चारपाचशे वर्षांपूर्वी युरोपात जसे घडले तसे घडविण्याचे प्रयत्न सत्ताधार्‍यांचे साथीने मुठभर एतद्देशीय हिंदूधर्मद्वेष्टे करु पहात आहेत असा नि:ष्कर्ष कोणी काढला तर चूक होईल काय? असो.

वर लिहिलेल्या प्रकारच्या प्रश्नाला मागे मायबोलीवर ज्योतिषावरुन रान उठलेले होते तेव्हा लिटी आणि मिलिंदने उत्तर दिले होते.

या प्रश्नाला जर लिंबुटींबु यांना फाटा द्यायचा प्रयत्न केला अथवा थेट उत्तर न देता घूमजाव केले तर समजावे ज्योतिष थोतांड आहे

फारतर लिंबुटिंबु थोतांडी आहेत हे सिद्ध होईल. त्यांचा ज्योतिषाचा अभ्यास कमी पडला असेल तर त्यावरुन अख्खे ज्योतिषच थोतांड आहे हे कसे काय??

आमच्या नव्या मुंबईत अनेकजण कोणाकोणाच्या आशिर्वादाने हॉस्पिटल्स उघडुन बसलेले आहेत, कधीकधी अशा हॉस्पिटलमधला एखादा रुग्ण गचकतो, चुकीच्या निदानाने, चुकीच्या औषधोपचारामुळे. त्याला तो डॉक्टर आणि त्याचे अर्धवट ज्ञान जबाबदार.. रुग्ण गचकला म्हणजे पुर्ण अलोपथीच थोतांड?

साधना अनेकोनेक अनुमोदन्स.

धीरज कांबळे तुम्हाला आधीच इथे सांगीतले होते की तुमचा विश्वास नसेल तर टाईमपास करु नका, बाकी बाफ ओसंडुन वहात आहेत तिथे तुमचे ज्ञान वाटा. पेशावाई, पंचपळी पात्र असली जातियवादीक भाषा करुन तुमची विद्वत्ता दिसलीच आहे, कृपया ती अजून दाखवु नका.

माननीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणी महात्मा ज्योतिबा फुले हे दोघेही महान समाज सुधारक कधीही तुमच्या सारखे खालच्या पातळीवर उतरले नाहीत, म्हणूनच ते महान ठरलेत. ते समाजाच्या सर्व घटकांना आपल्या बरोबर घेऊन निघाले, म्हणूनच भारत आज जरातरी एकसंध आहे, नाहीतर त्याचा पाकीस्तान झाला असता. तुम्ही कुठे आहात आत्ता? आणी ज्या पंचपळीपात्र वाल्यांना हिणवत आहात, त्यांनीच डॉ. बाबासाहेबांना साथ दिली हे विसरताय का? इतिहास खणुन काढा मग.

आणी कुणी सांगीतले तुम्हाला की पंचपळीपात्रवालेच ज्योतिषी असतात म्हणून? इतर सर्व समाजात या शास्त्राचे अभ्यासक आहेत. मी स्वतः गेले होते एका बौद्ध धर्मीय काकांकडे ज्यांचे ज्ञान या विषयात खरच पुढे गेले होते. पण वय झाल्याने ते यातुन निवृत्त झालेत. कर्‍हाडचे डॉ. हामजा इब्राहीम मुल्ला हे पण एक चांगले ज्योतिषी आहेत, त्यांचा मुलगा पुण्यात पत्रिका आणी हात बघतो. माहीत नाही अन काही नाही चाल्ले कीबोर्ड बडवायला.

लिंबुभाव धीरज कांबळेंच्या प्रश्नांना उत्तर देत बसुन तुमचा वेळ वाया घालवु नका.

इब्लिस कशाला पत्रिका बघताय विबांस करता? वैनी हाणतील चप्पल घेऊन. तरी पण..:- पत्रिकेत शुक्र बिघडला असेल तर विबांस/ प्रेमविवाह/ प्लर्टींग/ छेडछाडी असे किस्से घडतात. शुक्र चांगला असेल तर प्रेमविवाह सुद्धा टिकु शकतो.

>>>> मायबोलीवर हेच तर चालते. <<<<
होय, माबोवर ब्रिगेडी/नक्षली/बुप्रावादी/अंनिसवाले यांचे प्रमाण वाढल्यापासून हल्लि हेच चालते!
पूर्वी कसे? फार फार तर अमक्याची आयडी ड्युप्लिकेट आहे, अन तमका विकृत आहे तर त्याचा कम्पुने अनुल्लेख करा इतकेच चालायचे. Proud
ही हल्लीची ब्रिगेडी/नक्षली गणिते फारच वेगळी आहेत.
इतकी की "धर्मयुद्ध" करणार्‍या व काही काळ जैन/बौद्ध अहिंसेच्या प्रभावाखाली घालवलेल्या हिंदूंवर जेव्हा कसलाही विधीनिषेध न मानणार्‍या हिंसक क्रूर शक/हूण/कुशाण/सिकंदरादिक तसेच मोंगलांची हिंसाप्रचूर आक्रमणे झाल्यावर तेव्हाचे ते हिंदू जसे अचंबित झाले असतील, तसेच माबोवरील विचारी जनांचे, या ब्रिगेडी/नक्षली/बुप्रावादी/अंनिसवाल्यांच्या निरर्गल निर्बुद्ध आक्रमणाने होते आहे!

मित्रांनो 'ज्योतिषी ठग' आव्हानाला पाठ दाखवून कसा पळ काढतात ते बघितले ना...आता तरी सुधारणा घडवा स्वतःमध्ये
अत्यंत संदिग्धभाषेत स्वतःची थोतांडे खपवणारी ही मंडळी आहेत .
इब्लिसने विचारलेला विबासंचा प्रश्न,देशमुख व मी केलेले २०१४ च्या भाकिताचे आव्हान या एकाचेही समाधानकारक व ज्योतिषाच्या अंगाने उत्तरे देण्यास इथले प्रकांडज्योतिषि असमर्थ आहेत, कारण त्यांची भांडाफोड व्हायची भीती त्यांना आहे.

चला लिंबुला आणखि सूट देतो ,तीन महिन्यांमध्ये भूखंडादी गोष्टींचे मोघम भाकित करण्या इतपत आपले ज्ञान वाढवा व भाकित करा.. मोघम भाकित केले तरी चालेल. बोला आहे का तयारी?दोन दिवसात सांगा.. की आताही पाय लावून पळणार आहात? Wink

आणखि काही प्रश्न

​सुर्य हा तारा आहे तुमचे प्रकांड ज्योतिषी त्याला ग्रह समजून पत्रिकेत का मांडतात.
पुराणात सुर्य हा शनीचा बाप आहे असे म्हणतात .नवग्रहांना तोच ग्रॅव्हीटीने बांधतो. मग सर्वात जास्त प्रभाव टीनपाट शनीचा आणि मंगळाचा आणि फॅण्टसीतल्या राहू केतुचा का?
चांगला मुहुर्त बघून त्याच मुहुर्ताला सिझेरीयने एखादे अपत्य जन्माला आले/ आणले तर त्याचे भविष्य आपल्याच हाती आहे/होते असे मानायचे का?थोडक्यात त्या जीवाची डेस्टीनी लिंबू वगैरे सारखे गावगन्ना ज्योतिषि ठरवणार काय...

खरे पाहता इब्लिस यांचा प्रश्न अभ्यासासाठी चांगला आहे. शुक्रावरुन एखाद्याचे विवासं आहेत की नाहीत ते कळेल. पण किती जणांशी संबंध असतील ते कसे ठरवू शकतो? कोणी सांगू शकेल का?

>>>> पण किती जणांशी संबंध असतील ते कसे ठरवू शकतो? <<<<<

मंगळ जर नीचेचा/निर्बली, शुक्राचे सानिध्यात/योगात, पण गुरूचे शुभ नजरेत असेल, तर अशी व्यक्ति केवळ मानसिक दृष्ट्या मनोराज्यातच केवळ "विबासं" चे इमले बांधिल, प्रत्यक्ष कृति शून्य असेल.

मात्र मंगळ बलिष्ठ असेल, सोबत शुक्राचे युति/अर्धलाभ/केंद्र योग/प्रतियुति इत्यादीक सानिध्य असेल, तर मंगळामुळेची कृतिप्रविणता, संख्यात्मक मोजमाप करायला उपयुक्त ठरेल, मात्र गुरूचा जाब मंगळावर नसायला हवा.
जर गुरुचा जाब नसेल, तर विधीशून्य रितीने व्यक्ति विबासं कडे मार्गक्रमणा करेल.
याचबरोबर, अशाप्रकारे बिघडलेल्या मंगळशूक्र योगाचे सानिध्यात चंद्र लुडबुड करीत असेल, तर अशा संबंधांची वारंवारता व सातत्य वाढेल.
रवि हा ग्रह प्रतिष्ठाकारक आहे, तो या मंगळशुक्राचे जोडगोळीजवळ गृहित धरलेला नाही, मात्र तो यांचे युतियोगात व स्वतःच बलिष्ठ असेल, तर मात्र अपप्रतिष्ठेच्या भितीने तरी का होईना, व्यक्ति केवळ मनोराज्येच करेल वा लपुनछ्पुन उद्योग करील. मात्र रवि स्वतःच निर्बली होउन या जोडगोळीचे सानिध्यात असेल, तर अशी व्यक्ति प्रतिष्ठा/अपप्रतिष्ठा वगैरे कशाचाही विधीनिषेध बाळगणार नाही, समाजाची तमा करणार नाहीत.
साधारणतः सप्तमाचे "षष्ठ-सप्तम-अष्टम" अर्थात व्यय-प्रथम-द्वितिय स्थानी वरिल योग असता फळ प्रकर्षाने दृष्टोत्पत्तीस येते, जेव्हा इतर स्थानी हिच फळे, त्या त्या स्थानाच्या कारकत्वाबाबत बिघाड देतात जसे की पंचमस्थानाजवळील मंगळशुक्राची अशुभस्थिती शिक्षणात प्रचंड प्रमाणात धरसोड दाखवेल्/अडथळे/विलंब दाखवेल. यामुळे स्थानपरत्वेदेखिल सूक्ष्म विचार करणे आवश्यक असते, केवळ मंगळ-शुक्र कुठेतरी दिसताहेत म्हणुन साप साप म्हणून भूई धोपटण्यात अर्थ नसतो.

सबब, अर्धवट अभ्यासावरुन तसेच वरील प्रकारचे त्रोटक विवेचन वाचून, तेवढ्यावरुनच अशा कसल्याही प्रकारचे नि:ष्कर्ष वाचकाने वा नवोदित ज्योतिष अभ्यासकाने जातकाबद्दल/स्वतःचे कुंडलीबाबत काढायला जाऊ नयेत ही सावधगिरीची सूचना असे.

असे नि:ष्कर्ष काढताना हस्तसामुद्रिकाचा वापर करणेही योग्य ठरते, मदतीचे ठरते, जसे की जातकाचे हातावर आयुष्यरेषेला मनगटा/अंगठ्याकडून वर येऊन छेदणारी रेषा तपासावी लागते, त्याच बरोबर अंगठ्याचा/नखाचा आकार/शुक्र उंचवट्याची बलिष्ठ स्थिती/व निस्तेज गुरु उंचवटा तपासावा लागतो.
याशिवाय, जर शनिग्रह देखिल मंगळाचे सन्निध मधे अवसानघातकी लुडबुड करीत असेल तर अशा कृत्यात अशी व्यक्ती शारिरीकदृष्ट्याही क्रूरकर्मे करु शकते (जसे की दिल्ली बलात्कार प्रकरणात दिसून आले). याशक्यतेकरता शनिचे बोट व शनिउंचवटा तत्काळ निर्देश करू शकतो.

हे गुढ शास्त्र असल्याने, कॉम्बिनेशन/पर्कॉम्बिनेशनचि संख्या अफाट असल्याने वरीलप्रमाणे एखाददुसरे/मोजके नियम/गृहितके मांडुन वाचकांची दिशाभूल्/गैरवापर/चूकीचा वापर/गैरसमज होण्याचि शक्यता असल्यानेच, आजवर, ज्योतिष विषयावर अशा स्वरुपाची चर्चा घडवुन आणली जात नाही/आणू नये असे माझे मत. व त्यानुसारच मी वर अत्यंत मोजके व केवळ दिशादिग्दर्शनाचे निर्देश केवळ ज्योतिष अभ्यासकांकरता केले आहेत.

त्यामुळेच अभ्यासू ज्योतिषी, त्याकरता चिंतन/मनन/प्रत्यक्ष उदाहरणे शोधणे याचबरोबर गुरूचा शोध घेऊन गुरुमुखाने एकांतात बाकी शंकानिरसन करुन घेतात.

Pages