ज्योतिष शिक्षण : अभ्यासकांसाठी प्रश्नोत्तरे

Submitted by shikau on 9 May, 2011 - 14:03

ज्योतिषाचा अभ्यास करू इच्छिणार्‍यांनी इथे प्रश्न विचारुयात का? .

मी नुकताच ज्योतिषाचा स्व-अभ्यास सुरु केला आहे. काही दिवसांनी शक्य झाल्यास क्लास लावणार आहे.
तोपर्यंत पुस्तक वाचताना काही प्रश्न पडल्यास ते विचारावेत असे वाटल्याने येथे लिहीत आहे.
जाणकारांनी मार्गदर्शन केल्यास आभारी असेन.

सुरुवात मी करतो. माझे प्रश्नः

१. सत्वगुणाच्या राशी, रजोगुणाच्या राशी आणि तमोगुणाच्या राशी म्हणजे काय?
ह्या गट पाडण्यामुळे काय फरक पडतो?

२. मूल त्रिकोण रास म्हणजे काय? ग्रह मूल त्रिकोण राशीत येतो म्हणजे नक्की काय होतं?

असे इतरही प्रश्न हळूहळू येतील. आपणही प्रश्न विचारा. आभारी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>१. एखाद्या ज्योतिषाने सांगितलेले भविष्य खरे ठरले नाही तर त्याला जाब विचारण्याची व दक्षिणा परत मिळवण्याची सोय का नसावी?<<

एखादा अत्यवस्थ रुग्ण बरा होईलच याची हमी कुठलाही तज्ञ डॉक्टर देतो काय ? हमी देऊनही रुग्ण बरा झाला नाही तर डॉक्टरला जाब विचारण्याची व खर्चलेले (भारी भक्कम) पैसे परत मिळवण्याची सोय का नसावी ?

माश्या ,एखादा रुग्ण का मेला, कशामुळे? याचा कार्यकारण भाव डॉक्टर देऊ शकतो ..पोस्टमॉर्टममध्येही ते शोधता येते

तूमच्या ज्योतिषाच्या भविष्यकथनाची पुंगी वाजली की ते एक तर पळ काढतात किंवा मागच्या जन्मीच्या पापपुण्याच्या अकांऊटच दाखले देतात. Proud इथेच एका थोर अभ्यासकाला अगदी बेसिक प्रश्न विचारले तरी तो दुर्लक्ष करतोय... यावरुन तरी माबोकर लोकांनी शहाणे व्हावे व असल्या भुक्कड गोष्टीमध्ये पैसा आणि वेळ घालवू नये.

हमी देऊनही रुग्ण बरा झाला नाही
<<
माशा,

"डॉक्टर" कडे ग्यारंटी अथवा हमी अथवा खात्री देण्यात येत नाही.

'ऑपरेशनच्या फलनिष्पत्तिबाबत कोणतीही खात्री अथवा हमी अथवा ग्यारंटी आम्हाला दिलेली नाही. कधीकधी अपेक्षित फायदा होण्याऐवजी दुसराच त्रास उद्भवू शकतो, व त्यासाठी पुन्हा ऑपरेशन करावे लागू शकते. हे आम्हाला आमच्या मातृभाषेत सांगितलेले असून ते आम्हाला समजले आहे' असे वाक्य 'कन्सेन्ट'मधे असते. हे पेशंटांना वाचून सांगण्याचे व्हिडिओ शूटींग आजकाल मी सीसीटीव्हीवर करत असतो.

रुग्ण बरा होण्याची 'हमी देणारा' माणूस हा फक्त क्वॅक उर्फ वैदू किंवा बुवा/बाबाच असू शकतो.

माझ्याकडे पेशंट अमुक ट्रीटमेंटची वा ऑपरेशनची ग्यारंटी मागतो, तेव्हा मी त्याला सांगतो, 'भाऊ, तुम्ही वरुन येताना एक ग्यारंटी कार्ड आणलेत, की हा अमुक वर्षे जगेल. ते घेऊन या, त्या कागदावर मी पुढची ग्यारंटी लिहून देतो.'

डॉक्टर हा शरीर दुरुस्त करणारा मेकॅनिक आहे. ग्यारंटी आमच्याकडे मिळत नाही. ती शरिर बनविणार्‍या "कंपनी"कडे मागावी.

- डॉ. इब्लिस.

डॉ़क्टर हा शरीराचे सर्व भाग नीट पणे अभ्यासूनच बनलेला असतो. पण त्या शरीरांचा निर्माता मात्र तो नाही.

शात्रज्ञ हे प्रिव्हेंटीव्ह मेजर्स देतात, तरीही मनुष्य कधी कधी आपल्या वर ताबा न ठेवुन काळजी न घेऊन आजारी पडतो, तेव्हा डॉ. कामी येतो. हा तुमची प्रकृति सुधारु शकतो पण तुमच्या ईच्छा तुम्हालाच नियंत्रीत करायच्या असतात, त्यमुळे डॉ. गॅरेंट्या देऊ शकणार नाहिच.

तुम्ही जर नेहेमी स्वत;ला अगदी फिट ठेवु शकलात, तर डॉ. ची आवश्यकता पडत नसते.

डॉ. कॅन क्युअर यु, दे कॅनॉट, प्रिव्हेंट एनी एलमेंट.

लिंबूटिंबू,
उत्तराबद्दल धन्यवाद.
माझ्या कन्येचे लग्न २००६ मध्ये झाले, म्हणजे तुम्ही म्हणाला होतात तसेच.
पण आता काही जाणून घ्यायची इच्छा नाही.

>>"डॉक्टर" कडे ग्यारंटी अथवा हमी अथवा खात्री देण्यात येत नाही. <<
>>रुग्ण बरा होण्याची 'हमी देणारा' माणूस हा फक्त क्वॅक उर्फ वैदू किंवा बुवा/बाबाच असू शकतो.<<
खर आहे. डॉक्टर कडे गेल्यावर बायपास सारख्या ऑपरेशनच्या अगोदर तो तुमची वा नातेवाईकांची ग्यारंटी नसल्याबद्दल सही घेतो. सांगताना मात्र सांगतो काही काळजी करु नका. अहो वैद्यकशास्त्र आता खूप पुढ गेल आहे. ही ऑपरेशन ९९ टक्के यशस्वी होतात.संख्याशास्त्रीय दृष्ट्या त्याचे विधान बरोबर असते.पण तो तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही त्या ९९ मधले आहात की उरलेल्या एक मधले आहात. समजा तुम्ही दुर्दैवाने उरलेल्या एक मधले असाल तर तुमच्यासाठी ते अपयश मात्र १०० टक्के असते. ज्योतिषी बाबा बुवा मांत्रिक मात्र ग्यारंटी १०१ टक्के देतात. अगदी स्टँप पेपरवर लिहुन देण्याची भाषा करतात. पैसे परत देण्याची भाषा करतात. बघा ज्योतिषाच्या जाहिराती. त्याने असे म्हटले की तुमच्या मनाला दिलासा मिळतो.ती वेळ तर निभावून नेली जाते. दुर्दैवाने ते खर ठरल नाही तर थोडच तुम्ही त्याच्यावर केस टाकणार असता?
पलभरके लिए कोई हमे प्यार कर दे झुटाही सही|

राहू आणि केतू बद्दल मिलिंद चितम्बर यांनी चांगले लेख लिहिलें आहेत . त्याच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.
Ketu
http://astromnc.com/component/content/article/20-discussion/145-ketu

Rahu
http://astromnc.com/component/content/article/17-basics/astrologybasics/...

-

ज्योतिषामधे हा कर्मफलविषयक अन धर्मशास्त्रविषयक पापपुण्याचा "कौटीलिय" प्रश्न कुठून आला?

भविष्य खोटे ठरले की ज्योतिषवाले मागच्या जन्मीच्या कर्मविपाकाचा हवाला देऊन पळ काढतात. मग हा प्रश्न अस्थानी का वाटावा?

नरेंद्र मोदींच्या पत्रिकेचा अभ्यास कोणी केला आहे का ?
१७ sep १९५०
११:०० सकाळी
मेहसाना गुजराथ
astromnc .com वर हा लेख आहे.

http://astromnc.com/20-discussion/208-general-electin-2014-horoscope-ana...

कोणी हि पत्रिका पहिली असल्यास आपली मते काय आहेत?

डॉक्टर हा शरीर दुरुस्त करणारा मेकॅनिक आहे. ग्यारंटी आमच्याकडे मिळत नाही. ती शरिर बनविणार्‍या "कंपनी"कडे मागावी >> पटलं Happy
एक्झॅक्ट्ली डॉ. इब्लिस,
ज्योतिष्याचंही असं असु शकेल ना - की काही अंदाज खरे येतील , काही नाही. तिथे तर तुमच्यावर कोणतेही खात्रीशीर उपाय केले जात नाहीत. फक्त काही तर्क बांधले जातात. सगळे उपाय करून थकल्यावरच
काही जण ज्योतिष्याकडे जात असतील, काहीतरी सोलॅस मिळवण्यासाठी.

बायपास व्यवस्थित होऊनही नंतर किडनी, लिवर फेल्युअर ने पेशंट गेलेले बघितलेत.
शिवाय बायपास करणारे डॉक्टर आपले काम आपण व्यवस्थित केले आहे अशा अविर्भावात होते. ' we tried our best ,but .........' ( थोडक्यात पुढे तुम्ही आणि तुमचे नशीब असेच )

परवाच एक्स्प्रेस हाय वे वर टोल च्या लेन मध्ये जे गाडीत बसते होते, त्यांना मागून येऊन ठोकलं.गाडीतले चौघेही जागीच ठार झाले. त्यांची यात काहीच चूक नव्हती. तुम्ही जरी नियमाने वागत असला तरी तुमचे प्रारब्ध
काय असेल ते माहित नाही.ते प्रारब्ध अमुक असेच का असेल तेही माहित नाही.

कुठल्याही पॅथीतले / कोणतेही डॉक्टर कशाचीही गॅरंटी/हमी देत नाहीत. कुठल्यातरी फॉर्म वरती पेशंट्च्या नातेवाईकांच्या सह्या घेतलेल्या असल्याने डॉ.ची जबाबदारीतून मुक्तता झालेली असते.पेशंटकडेही पर्याय नसतो.

राजकारणी आश्वासने देतात ,निवडून येतात्, आपापल्या तुंबड्या भरतात .आश्वासने न पाळल्यामुळे त्यांच्याकडून जनतेला कधी नुकसानभरपाई मिळाली आहे काय ?

पण फक्त ज्योतिष्याने मात्र हमी द्यावी नाहीतर पैसे का परत मागू नयेत अशा प्रकारचा वरती काहीतरी प्रश्न होता.
त्यासंदर्भात मी तो प्रश्न विचारला होता . अन्यथा मला वैद्यकीय पेशाबद्दल/ज्ञानाबद्दल आदरच आहे. Happy

ज्योतिषी आश्वासनं देत नाही तो म्हणे 'अचूक भाकित' करत असतो ...आश्वासन देणे वेगळे आणि सगळ्या जगाचा कालनिर्णय आपल्यालाच कळतो या थाटात बोलणे वेगळे.. फरक कळतोय का?
शंभर गरोदर बायका ज्योतिषाकडे भविष्य बघायला गेल्या ,प्रत्येकीला त्यांने तुम्हाला मुलगा होईल असे भाकित ऐकवले,
मुलगा किंवा मुलगी यांचे जन्मायचे चान्सेस ५०/५० टक्के असतातच, याचा अर्थ अर्ध्या बायका मुलगा झाल्याने ज्योतिषीबुवा कीत्ती ग्रेट' हे गावात सांगत फिरतील व राहीलेल्या आपलच पुर्वजन्मीचे पाप प्रारब्ध या नावे खडे फोडतील ,थोडक्यात नैसर्गीक गोष्टीतही आपले कतृत्व घुसडणारे ठग हे ज्योतिषी असतात.

धिरज कांबळे ,
ज्योतिषी अचूक भाकित करतो असा दावा मी केलेला नाही.
आश्वासन शब्द फक्त राजकारण्यांच्या बाबतीत वापरला आहे.
ज्योतिष्यांच्या बाबतीत अंदाज व तर्क लिहिलंय.आय होप फरक कळत असेल.

डॉक्टर बनण्यासाठी काही शैक्षणिक पात्रता लागते.अभ्यासक्रमासाठी ठराविक कालावधी असतो. ह्या सर्व पात्रता पार केल्यानंतर व्यक्ती डॉक्टर बनते .

ज्योतिषी बनण्यासाठी काही पात्रता लागते का?
कोणीही सोम्या गोम्या उठतो कसले तरी ग्रंथ वाचतो आणि समाजात ज्योतिषी म्हणून वावरतो. हे डॉक्टरांच्या बाबतीत शक्य आहे का? कोणीही सोम्या गोम्या उठला नि डॉक्टर झाला .

खरेतर हे ज्योतिषी जी कुंडली काढतात तेच थोतांड आहे हे पुढील मुद्द्यावरून स्पष्ट होते. हे मुद्दे कुठल्याही ज्योतिषाला विचारले तेरी तो तोंडात मिठाची गुळणी घेतो हा अनुभव आहे.

१. आकाशस्थ ग्रह-तारे आपल्या प्रारब्धावर परिणाम करतात की त्यांचे स्थान आपल्या प्रारब्धाची दिशा दाखविते ?
२. जर ते दिशादर्शक आहेत तर त्यांची पूजा-अर्चा करून प्रारब्ध कसे बदलणार ?
३. जर त्यांचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो … तर त्यामागील कार्य-कारणभाव स्पष्ट करा ..कोणते प्रयोग करून ही अनुमाने काढली गेली ?
४. त्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो तर पृथ्वीसारखे आपल्या जवळचे प्रचंड वस्तुमान पत्रिकेत का नाही ?
५. मंगळ आणि गुरुच्या मधील उपग्रहांचा पट्टा का धरला जात नाही ? ज्यामध्ये सेरेस सारखे हजार किमी व्यासाचे प्रचंड गोल आहेत
६. शनीला टायटन आणि गुरूला गनिमिड नामक चंद्र आहेत ते बुधापेक्षा मोठे आहेत … शिवाय प्रत्येकी 60 चंद्र आहेत … त्यांच्या वस्तुमानाचे काय?
७. जर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो तर राहू-केतू मुळात नाहीतच …. ते ग्रहणात भासणारे भासमान बिंदू आहेत … मग वस्तुमान नसताना गुरुत्व कोठून येणार ?
८. अवकाशातील या ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो असे आपले गृहीतक आहे … पण मुळात पत्रिकेतील त्यांचे स्थान हे खरे स्थान नाहीच …. तो आपल्या डोळ्यांना होणारा भास आहे हे आपण शोधून काढले आहे …. मग खऱ्या स्थानाप्रमाणे बदल कधी करणार ?
९. जग सपाट आहे पासून …. सूर्य-केंद्रित विश्व … नंतर आकाशगंगा अशा नवनवीन गोष्टी समजत गेल्या पण पत्रिकेत उजळणी का केली नाही ….
१०. अल्बर्ट आईन्स्टाईन ने सापेक्षतावाद सिद्धांत मांडला …त्यानंतर खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्रीय धारणेत क्रांतिकारी बदल झाले …. न्यूटनसारख्या विख्यात वैज्ञानिकाचे mechanics सुद्धा या बदलातून सुटले नाही …. मग फल-ज्योतिषात बदल का झाले नाहीत … सोपे करून सांगायचे तर … वेळ, वस्तुमान आणि वेग या तिन्हींच्या अभ्यासात सापेक्षतावादाने आमूलाग्र बदल आणले …. तरीही आमच्या पत्रिका आणि वेळेचे गणित तसेच !!!! अणुविज्ञान आणि लघुकणांचा अभ्यास असो किंवा खगोल शास्त्रातील कृष्णविवारांसारखे शोध असोत … ते लागले कारण भौतिकशास्त्री न्यूटनच बरोबर असा आंधळा आग्रह धरून तिथेच थांबले नाहीत

धडाकेबाज, यालाच पोथिनिष्ठता म्हणतात.
तुमचेच बेसिक प्रश्न मी इथे आधिपासून विचारतोय ,परंतु महामोपाध्याय उत्तरेच देत नाहीएत.

शेवटी वैज्ञानिक काय डॉक्टर काय आणी ज्योतिषी काय सगळी माणसेच।. . वैज्ञानिक चुकतात डॉक्टर चुकतात मग ज्योतिषी चुकले तर एवढे काय त्यात ? Happy

बहुदा मान्य झालेल्या प्रमाणित गोष्टी करून वैज्ञानिक काय डॉक्टर चुकले तरी चालतात पण ज्योतिषी गोष्टी प्रमाणित करत नाहीत म्हणून वाद.

ज्योतिषाला स्वतःचे भविष्य ठाऊक असते काय.... कि आपण चोपड्या वाचून इतरांचे भविष्य सांगण्यात आपले आयुष्य व्यतित करणार आहोत हे त्याला पक्के ठाऊक असते ...इतरांना अर्थप्राप्ती, धनप्राप्ती वगैरेंच्या क्लृप्त्या सांगणारा स्वतः जालिम उपाय करुन श्रीमंत का होत नाही.. Proud

प्रत्येक माणसाच्या पत्रिकेत पत्रिकेच्या दर्जा प्रमाणे धनयोग वेगळा असतो. तो ओळखणे हे ज्योतिषाचे काम आहे .
लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र दर वेळेस नांदतातच असे नाही . ज्योतिषी कितीही हुशार असेल आणि पत्रीकेचा दर्जा धनाच्या दृष्टीने जर चांगला नसेल तर त्याला पैसे खूप मिळणारच नाहीत .
कोणत्याही डॉक्टरला कितीही ज्ञान असले तरी तो आजारी पडतोच आणि तरुण वयात मृत्यू पण एखाद्या आजाराने डॉक्टरला येऊ शकतोच नाही का?
त्यामुळे ज्योतिषावर टीका करायची असेल तर ती योग्य उदाहरणे आणि विषयाचा अभ्यास करून करावी .

-

वय वर्षे फक्त काही आठवडे काही दिवस आणी काही तास>मिनिटे>सेकंद.

एव्हढ्या लहान वयातच ह्यांची जी प्रगती बाकिच्या गाव टवाळखोरांबरोबर झाली आहे, त्यानुसार ह्यांचे अति उज्ज्वल

भविष्य अचुक ओळखु येते.

बाकिचे स्वतःचे असे काही कर्तृत्व नसले तरी दुसर्‍याच्या नसलेल्या उण्या दुण्या काढायला महाशय गावच्या पारावर

बाकि टवाळांबरोबर अग्रेसर आहेत.

कुठल्याही विषयावर चेष्टा करण्याची ह्यांची जी वृत्ती आहे, त्यावरुनच असे कळुन येते कि ह्या माबो च्या मंचावर आणखीन एक _ _ _ जन्मले आहे. ह्यांच्या एकंदर वागणुकी वरुन ह्यांचे जन्माचे कारण आणि कर्ता Happy ह्यांचा अंदाज लागु शकतो.

ह्यांच्या भविष्याचे आणखीन कैक पैलु आहेत, ते सांगत बसायला ईथे जास्त जागा नाहीये, हळु हळु अनुभवास येईलच.

लिंबु टिम्बु, मी इथे नवीन सदस्य आहे. तुमच्या प्रतिसादावरून असे वाटले की तुम्ही पत्रिका बघता. बघत असाल तर कृपया तुमचा ई-मेल किंवा फोन नंबर मिळेल का? मला माझी पत्रिका दाखवायची आहे.

मयी, लिंबुटिंबु यांचा आय डी उडालाय. त्यापेक्षा तुम्ही इथले जुने ज्योतिषी, MNC उर्फ मिलींद चितांबर यांना पत्रिका दाखवा.

https://www.maayboli.com/user/4839 मिलींद यांचा ब्लॉग पण आहे.

http://astromnc.blogspot.com/

Pages