ज्योतिष शिक्षण : अभ्यासकांसाठी प्रश्नोत्तरे

Submitted by shikau on 9 May, 2011 - 14:03

ज्योतिषाचा अभ्यास करू इच्छिणार्‍यांनी इथे प्रश्न विचारुयात का? .

मी नुकताच ज्योतिषाचा स्व-अभ्यास सुरु केला आहे. काही दिवसांनी शक्य झाल्यास क्लास लावणार आहे.
तोपर्यंत पुस्तक वाचताना काही प्रश्न पडल्यास ते विचारावेत असे वाटल्याने येथे लिहीत आहे.
जाणकारांनी मार्गदर्शन केल्यास आभारी असेन.

सुरुवात मी करतो. माझे प्रश्नः

१. सत्वगुणाच्या राशी, रजोगुणाच्या राशी आणि तमोगुणाच्या राशी म्हणजे काय?
ह्या गट पाडण्यामुळे काय फरक पडतो?

२. मूल त्रिकोण रास म्हणजे काय? ग्रह मूल त्रिकोण राशीत येतो म्हणजे नक्की काय होतं?

असे इतरही प्रश्न हळूहळू येतील. आपणही प्रश्न विचारा. आभारी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>धिरज आपल्या व लिंबुटिंबु यांच्या सदस्यत्वाच्या कालावधीत ९ वर्षांचा फरक दिसला.<<

>>असे म्हणणे हे एखादी व्यक्ती दूसऱ्या व्यक्ती आधी जन्मल्यामुळे (केवळ) जास्त मानाची असे म्हणण्यासारखेच आहे.<<
अस्चिग आपणच विचार करुन पहा पहिला विधानाचा असा अर्थ होतो काय? मी फक्त एका वाक्यात निरिक्षण मांडल. आपण त्याचा अन्वयार्थ काढलात.
आज प्रो जयंत नारळीकरांनी केलेल्या भाषणाचे वृत्त वेगवेगळ्या वर्तमान पत्रात आलेले पहा. सकाळ मधे फलज्योतिष इम्पोर्टेड अंधश्रद्धा म्हटलय. टाईम्स ऑफ इंडियात अस्पेक्ट म्हटलय तर मटा मधे ज्ञान म्हटलय. नारळीकर स्वतः सौम्य परंतु ठाम अशा पद्धतीचे विचार मांडतात. वर्तमान पत्र त्याचे अन्वयार्थ लावत असतात. अंधश्रद्धा निर्मुलन आक्रमक पद्धतीने झाल्यास लोक त्याकडे पाठ फिरवतात असे त्यांचे मत आहे. माझ्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकाचे परिक्षण त्यांनी २००३ मधे लोकसत्ता मधे केले होते त्यात त्यांनी हेच म्हटले होते. पहा http://faljyotishachikitsa.blogspot.in/2006/09/blog-post_115858511190534...

अवांतर- यात आत्मस्तुतीचा दोष मी क्षम्य मानतो.

अरे वा,ते पंचपळीपात्राची पोस्ट उडवली वाट्टं स्वतच्या सोयीकरता.:फिदी: काही उतावीळ लोकांना बौद्ध धर्म मध्ये आणला तेव्हा लगेच स्क्रीन शॉट्स घ्यावेसे वाटले, मग हे पंचपळीपात्र असा ब्राम्हणांकराता कुचकट उल्लेख केला गेला तेव्हा काय झापडं बसली होती का डोळ्यावर? की दातखीळ बसली होती? बामणा भटांना नावे ठेवायची आणी स्वतःवर बेतले की जातियवाद जातियवाद करुन उर बडवत यायचे. यालाच म्हणतात स्वतःचे ठेवायचे झाकुन आणी दुसर्‍याचे पहायचे वाकुन्.:फिदी:

लिंबुभाव समोरचा ज्या भाषेत बोलतो ना त्याच भाषेत आपण बोलावे, त्याला ज्ञानामृत पाजायची गरज नाही. आणी ब्रिगेडीच कशाला बोलतील. आपल्यात असतात की सुर्याजी पिसाळ. माहीत नाही का तुम्हाला?

चला काय धिंगाणे घालायचे ते घाला, गळे काढायचे ते काढा, उर बडवायचा तो बडवा, कॉम्प्युटरचा की बोर्ड पण बडवा.:खोखो:( बाकी निधर्मीवाल्यांकरता लिहीलेय हो हे)

चालू द्या. आता इथे येणे नोहे.( काय वाकडेतिकडे अर्थ काढायचे ते काढा, पळपुटे,रणछोडदास म्हणायचे ते म्हणा, उत्तर देता येत नाही म्हणून पळाले असेही म्हणा.:फिदी:)

शिकाऊ बेस्ट लक. या सर्व वादाकडे दुर्लक्ष करुन तुम्हाला जे चांगले हवे ते उचला.:स्मित:

ज्योतिष प्रश्नोत्तरे असे धाग्याचे शिर्षक आहे ना!
मी अत्यंत बेसिक प्रश्न विचारले ,एक आव्हान दिले तर लगेच चर्चा ब्रिगेड ब्राह्मण इथपर्यंत खाली आणण्याची काही एक गरज नाही.
पोथीनिष्ठांचं नेहमीच असं असतं की त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत ,चिकीत्सा तर लांबचीच गोष्ट.

पंचपळीपात्र असा ब्राम्हणांकराता कुचकट उल्लेख
<<
टुनटुन बैन,
ब्राह्मण असं लिवायला शिका हो. नसेल जमत तर आपली अहिराणी कशी म्हंते तसं बामन म्हणा सरळ.
पळी-पंचपात्री असा शब्द आहे तो. हे पंचपळीपात्र काये?

कठीण आहे तुमचं.

>>>> ज्योतिष प्रश्नोत्तरे असे धाग्याचे शिर्षक आहे ना! <<<< नाही.
>>>> ज्योतिष शिक्षण : अभ्यासकांसाठी प्रश्नोत्तरे <<<< असे शीर्षक आहे, त्यातिल "शिक्षण" आणि "अभ्यासक" हे महत्वाचे शब्द सोईस्कररित्या का वगळता आहात?
तुमच्या आत्तापर्यंतच्या पोस्टींवरुन तुम्ही ज्योतिषाचे विद्यार्थी/अभ्यासक नसून केवळ अन केवळ धर्म/ज्योतिष न मानणारे हिंदुधर्म/ज्योतिषाचे निंदक आहात हे केव्हाच सिद्ध झाले आहे, अन तसे असताना, ज्या धाग्यावर एक ज्योतिषविद्यार्थी / अभ्यासक म्हणुन तुम्हाला आमंत्रणच असू शकत नाही, तरी तिथे का लुडबुडताय?
स्वतंत्र धागा काढून मान्डा की तुमची "अच्च्या की पच्च्या" विधाने!

पळी-पंचपात्री असा शब्द आहे तो.>>> करेक्ट!

पण कितीतरी जणांच्या तोंडी बोलण्याच्या ओघात 'पंचपळीपात्रं' असं ऐकलंय जे अर्थातच चुकून झालेलं असावं.

लिंबूभाऊ ,तूम्ही आव्हानाला पाठ दाखवून पळ काढलात, तेव्हाच तूम्ही ज्योतिषाचे 'थोर अभ्यासक (?)आहात हे समजले होते. Proud Proud
आणखि एक ज्योतिष प्रश्न
जर एखाद्या अब्जाधिश जोडप्याचे अपत्य आणि कष्टकरी ,गरीब असलेल्या एका जोडप्याचे अपत्य एकाच दिवशी ,एकाच ठिकाणी ,एकाच वेळी जन्माला आले (हे प्रत्यक्षात शक्य आहे) ,तर दोन्ही अपत्य तूमच्या ज्योतिषशास्त्रानूसार त्यांच्या जीवनकालामध्ये एकाच पद्धतीचे लाभ, अरीष्टं मिळवतील...यावर आपला विश्वास आहे काय?
अब्जाधिशाचे अपत्य पहिल्या पाचवर्षात जे आर्थिक, सामाजिक,कौटुंबिक, ऐहिक सुख उपभोगेल तेच तसेच गरीबाचे अपत्यलाही मिळेल याची ग्यॅरंटी ज्योतिषी घेणार काय?
कि इथेही मागचा जन्म ,पुर्वसुकृत वगैरे गोलगोल गप्पा मारुन यजमानांना टांग दिली जाईल. Proud Proud

'कृष्णमुर्ती पद्धतीचा 'अभ्यास करायचा असेल तर मराठीतील
खालील पुस्तके फार उपयुक्त आहेत.
१.कृष्णमुर्ती ज्योतिष रहस्य - सुरेश शहासने
२.कृष्णमुर्ती सिद्धांत सुलभ नक्षत्र फलादेश -जोतीन्द्र हसबे
३.कृष्णमुर्ती प्रश्नसिद्धांत - भाग १- जोतीन्द्र हसबे
४.कृष्णमुर्ती प्रश्नसिद्धांत - भाग २ जोतीन्द्र हसबे
५.उपनक्षत्र स्वामीची किमया - सुनील देव
६.दशमस्थान - सुनील देव

-

राहू सहसा ज्यास्थानी वा ज्या ग्रहासोबत असेल, त्याचे कारकत्वात प्रचंड प्रमाणात वाढ/आकस्मितता दर्शवितो, तर केतू नेमके याचे उलट, ते ते कारकत्व लौकरात लौकर संपुष्टात कसे येईल ते दर्शवितो.
>>

राहू प्रथमात असेल तर केतू सप्तमात असेल. याचे फळ कसे असेल? सप्तमातला केतू सप्तमाचे कारकत्व म्हणजे कुटुंबसौख्य कमी करेल का? म्हणजे संसाराविषयीची उदासिनता असेल का?
प्रथमातला राहू मग त्या माणसाला जास्तच स्वकेंद्री बनवेल का?

द्वितीयेतला राहू प्रचंड पैसा दाखवेल? मग ८व्यातला केतू काय दर्शवेल?

हा माझा आडाखा आहे. कोणी जर विस्ताराने सांगितले तर बरे होईल.

माझे अल्पज्ञानानुसार/अनुभवानुसारः

>>>>> राहू प्रथमात असेल तर केतू सप्तमात असेल. याचे फळ कसे असेल? सप्तमातला केतू सप्तमाचे कारकत्व म्हणजे कुटुंबसौख्य कमी करेल का? म्हणजे संसाराविषयीची उदासिनता असेल का? <<<<<
तुमच्या पुढील प्रश्नातच याचे उत्तर आहे ते म्हणजे प्रथमातील राहू व्यक्तिस स्वकेंद्री/आत्मकेंद्री बनवेल, जर चंद्राबरोबर असेल तर प्रचंड प्रमाणात हळवा/सेन्सेटीव्ह बनवेल, अन्य शुभ ग्रहांचे वर्चस्व नसेल तर अतिआत्मकेंद्रितता आढळून येईल. लग्नराशीकडून असेल, तर शारिरीक ठेवणिवर याचे परिणाम दिसतील.
सप्तमातील केतू, जोडीदार्/व्यावसायिक पार्टनर्/वैवाहिक जोडीदार यांचे बाबतीत ते ते संबंध विविध निमित्ताने लौकर संपुष्टात येण्यास कारण ठरेल, मात्र सप्तमेश शुभ संबंधित असेल आणि शुभग्रहांचा जाब असेल, तर हेच संबंध वर्षानुवर्षे "न्युट्रल" स्वरुपात टिकून रहातील. अन मग कधी अशी वाक्येही ऐकायला मिळू शकतील की "यांन्नी ना, वर्षानुवर्षे नियमित नोकरी केली हो, वेळेत गेले अन वेळेत घरी परत आले, पण कधी संध्याकाळी येताना एखादा गजरा घेऊन आलेत असे कध्धी कध्धी झाले नाही होऽऽ!" Wink (न्युट्रल स्वरुप काय असू शकते हे समजण्यासाठी हे उदाहरण दिले)

>>>>> प्रथमातला राहू मग त्या माणसाला जास्तच स्वकेंद्री बनवेल का? <<<< होय, मात्र स्वकेंद्रीततेची व्याख्या तरी काय करावी? त्याची उपयुक्तता/अपयुक्तता कशी मोजावी? एखादा चित्रकार असेल, आणि प्रचंड मोठे रिअ‍ॅलिस्टीक चित्र त्याने काढायचे ठरवले तर त्यास आवश्यक मनाची एकाग्रता/चिकाटी, प्रत्यक्ष चित्र काढतानाचा "एकांत" - बाकी जगाचे भान नसणे, हे इतरेजनांना "बाह्यरुपातील आत्मकेंद्रितताच" वाटणार नाही का? अशी आत्मकेंद्रितता असल्याने त्याचे हातुन काही भरीव कार्य होत असेल तर ते उपद्रवी तरी कसे मानावे? तर असे हे कलाकारांचे वेडेपण, एखाद्या बाबीत गुंतून जाणे प्रथमातील राहू तीव्रतेने देऊ शकतो, प्रोव्हायडेड द्याट अन्य ग्रह काय प्रकारे साथ देतात. (बोलिभाषेत घडत असले तरी मी कोणकोणत्या ग्रहाकडून "वाईटच फळ" मिळते असले वर्गीकरण करण्याच्या व त्याद्वारे ज्योतिष वर्तविण्याच्या विरुद्ध आहे म्हणून तोच विचार मी वेगळ्या पद्धतीने मांडू पहातो) पण हीच आत्मकेंद्रितता रवि वा मंगळाचे साथीने "अहंकाराकडे" अन हुकुमशाहीकडे झुकली तर मात्र बराच अनवस्था प्रसंग ओढवतो.

>>>> द्वितीयेतला राहू प्रचंड पैसा दाखवेल? मग ८व्यातला केतू काय दर्शवेल? <<<<
द्वितीयेतला राहू प्रचंड खर्च दाखवेल, अन खर्चाकरता लागणारा पैसा अन्य ग्रह शुभसंबंधित नसतील तर व्यक्तिस कायमस्वरुपी कर्जबाजारी बनवु शकतात जेव्हा अन्य ग्रहांचे पाठबळ असेल, तर व्यक्ति जितका खर्च करेल, तितका आय कुठुन ना कुठुन होत राहील, मात्र "दिवसा अखेरीस शिल्लक शून्य" असे काहीसे विचित्र स्वरुप असेल. (यातिल दिवस म्हणजे रोजचा दिवस या अर्थाने न घेता विशिष्ट निर्दिष्ट ठरवलेला कालखंड असे धरावे). शास्त्रकारांनी द्वितीयातील पापग्रहांचे सोबतच्या राहूचे वर्णन, वडिलोपार्जित संपत्ती/स्थावराबाबत "माकडाचे हाती मोत्यांचि माळ" असे केले आहे.

याचबरोबर द्वितीयातील कोणताही पापग्रह दातांचे व डोळ्याचे विकारही दाखवेल. बोलण्यात फटकळपणा कडे झुकणारी स्पष्टोक्ती असेल, जोडीला पापग्रह असतील तर यांनी शब्दाने केलेले वार समोरच्याला शस्त्राच्या वारापेक्षाही जास्त दुखावुन जातील.

केतू स्थानफल लौकरात लौकर संपुष्टात आणण्याबरोबरच स्थानफलाबाबत गूढताही देतो असे म्हणतात. ८व्यातला केतू, त्यास्थानाचे फल "मृत्यु" यास कमी करताना दीर्घायुष्य देऊ शकेल (मात्र हे दीर्घायुष्य "धडधाकट" असेलच असे नाही, ते अंथरुणाला खिळलेलेही असू शकते), मात्र मृत्युचे कारणाबाबत/इतरांना मृत्युची घटना कळण्याबाबत "गूढता" निर्माण करेल.

राहुकेतू बाबत जाणवलेले अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे प्रथमसप्तमावर राहूकेतूंचे अधिराज्य असेल, वा ते ज्या ज्या स्थानात असतील, त्या त्या स्थानाबाबतच्या फलात "उपद्व्यापीपणा" आणतील. जसे की प्रथमसप्तमातील राहूकेतूमुळे व्यक्ति जगावेगळी कृती (इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करु पहाणे/केले जाणे), द्वितियातुन खर्च/धाडस याबाबत शिवाय प्रसंगोपात काळवेळ न बघता नको ते बोलणे इत्यादी, अशा प्रकारे प्रत्येक स्थानगत "उपद्व्यापीपणा - विक्षिप्तपणा" आढळून येईल.

[ वरील माहिती वाचून, अर्धवट अभ्यासावरुन तसेच वरील प्रकारचे त्रोटक विवेचन वाचून, तेवढ्यावरुनच कसल्याही प्रकारचे नि:ष्कर्ष वाचकाने वा नवोदित ज्योतिष अभ्यासकाने जातकाबद्दल/स्वतःचे कुंडलीबाबत काढायला जाऊ नयेत ही सावधगिरीची सूचना असे. ]

वा!! छानच विवेचन!

मात्र स्वकेंद्रीततेची व्याख्या तरी काय करावी? त्याची उपयुक्तता/अपयुक्तता कशी मोजावी? एखादा चित्रकार असेल, आणि प्रचंड मोठे रिअ‍ॅलिस्टीक चित्र त्याने काढायचे ठरवले तर त्यास आवश्यक मनाची एकाग्रता/चिकाटी, प्रत्यक्ष चित्र काढतानाचा "एकांत" - बाकी जगाचे भान नसणे, हे इतरेजनांना "बाह्यरुपातील आत्मकेंद्रितताच" वाटणार नाही का? अशी आत्मकेंद्रितता असल्याने त्याचे हातुन काही भरीव कार्य होत असेल तर ते उपद्रवी तरी कसे मानावे?
>>
पटतंय. एकूण ज्योतिषात नुसती पुस्तकी "माहिती" असुन चालणार नाही. फलादेश करताना माणसाची जाण, त्याची थोडी पाश्वभूमीदेखील समजायला हवी.

>>> नुसती पुस्तकी "माहिती" असुन चालणार नाही <<<<
होय, अन भाषेचे, अचूक शब्दयोजनेचे भान असणे आवश्यक आहे.
केवळ वर वापरलेला आत्मकेंद्रितता या शब्दासोबत स्वकेंद्रितता हा शब्दही वापरुन बघा, या दोन शब्दात तुम्ही जितका फरक करू शकाल्/फरक समजु शकाल, तितके तितके तुम्ही फलदर्शनाचे अधिकाधिक जवळ जाल.
मी आत्मकेंद्रिततेचा संबंध, एखाद्या कृतीतील (मग ती कृती स्वत:करता वा इतरांचे(ही) उपयोगी असेल वा नसेल) एकाग्रतेशी लावतो आहे, अन स्वकेंद्रिततेचा संबंध, निव्वळ स्वतःचेपुरते / स्वहितापुरती कृती करण्याशी लावतो आहे.
यात पुन्हा स्वतःपुरते म्हणजे त्या स्वतः चा परिघ पुन्हा व्यक्तिव्यक्तिगणिक बदलत जाइल, जसे की केवळ अन केवळ व्यक्तिकेंद्रिततेतुन आलेली स्वकेंद्रितता निवळ "स्वतःचे दैहिक/भावनिक" गरजांशी संबंधित असेल, मात्र परिघ थोडा मोठा होत असेल, तर त्या "स्व" मधे जवळचे कुटुंबिय/मित्रही असू शकतील, त्यापेक्षा थोडा मोठा परिघ असेल, तर शेजारीपाजारी/लांबचे नातेवाईक्/जातभाई इत्यादी असू शकतील, त्याहीपेक्षा मोठा परिघ असेल, तर धर्म/राष्ट्र इत्यादिंचा विचार होईल. पण कोणत्याही प्रकारात ही "केंद्रितता" कोणत्या ना कोणत्या व्यक्ति/शक्तिशी "एकनिष्ठता" ठेवुन त्या आधाराने फलतफुलत राहील हे नक्की.
कशाशीच केंद्रितता धारण नाही (कशाबद्दलच उत्तरदायित्व नाही), हा मी, हे माझे (मित्र वा शत्रू वा संबंधित वा हितचिंतक), ही माझी संपत्ती/स्थावर/ शिक्षण/पदवी/मानसन्मान/ पत्नी/बायको/मुले/नातेवाईक/ जात-पात्/धर्म इत्यादिक अनेकप्रकारे, कोणत्याच "विषया"वर/वासनेवर स्वकेंद्रितता धारण नाही अशी स्थिती केवळ उच्चप्रतीच्या सन्यासी-योग्यांमधेच असू शकेल व अशी जन्मापासून निर्माण होत पुढे वाढत चाललेली स्वकेंद्रितता त्यागावी व ती कशी त्यागावी हे सांगण्यावरच आख्खे धर्मशास्त्र उभे आहे असे माझे मत.

[वरील वाक्यशब्दरचना कुठूनही कॉपीपेस्ट करुन वापरलेली नसून, परमेश्वर जशी बुद्धि देईल तसे तसे ते मी केवळ टाईप करीत जातो आहे. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला ऑफिसमधे बसुन इतर कामे/अवधाने सांभाळत असताना "अशी विश्लेषणात्मक" उत्तरे देऊ शकणे यात "माझे" कसलेही कर्तुत्व/बौद्धिक कौशल्य नाही, हे विचार्/शब्द/वाक्यरचना (बहुधा "मेंदुतील कसल्यातरी केमिकल लोच्यामुळे Proud ") स्फुरणे ही केवळ देवाचीच कृपा होय असेही माझे मत आहे. ]

ऑफिसच्या पैशाने मायबोली बघणे, हे चौर्यकर्म ठरत नाही का? चित्रगुप्ताच्या डायरीत याची चोरी म्हणून नोंद होते का?

लिंबुभाऊंनी इतका मोठा डिसक्लेमर टाकलाय याचा अर्थ आपण बहुतेक फारच भव्यदिव्य पोस्ट लिहिलीय असं त्यांना वाटतंय.
Wink

>>>>> ऑफिसच्या पैशाने मायबोली बघणे, हे चौर्यकर्म ठरत नाही का? <<<<< ऑफिसची परवानगी नसेल, तर नक्कीच ठरते, चौर्यकर्माशिवाय "फुकटे" हा शब्द मला जास्त योग्य वाटतो.

>>>>> चित्रगुप्ताच्या डायरीत याची चोरी म्हणून नोंद होते का? <<<< नक्किच होते. अन जेवढ जेवढ म्हणून विनापरवानगीचे/चौर्यकर्मम्हणुन/फुकटचे "वसुल" केले असेल, त्याची परतफेड या ना त्या रूपाने/या वा त्या ठिकाणी पण याच जन्मी करावी लागतेच लागते भले मग ती ती व्यक्ति ब्रिगेडी/बुप्रा/नक्षली असेल. Wink

ज्योतिषामधे हा कर्मफलविषयक अन धर्मशास्त्रविषयक पापपुण्याचा "कौटीलिय" प्रश्न कुठून आला?

>>>> लिंबुभाऊंनी इतका मोठा डिसक्लेमर टाकलाय याचा अर्थ आपण बहुतेक फारच भव्यदिव्य पोस्ट लिहिलीय असं त्यांना वाटतंय <<<<< Lol Lol Lol
तस नाहीये ते, थोड्या वेळानंतर वाचताना मलाच माझ्या पोस्ट्समधे थोड्यावेळापूर्वी मीच काय लिहीलय ते कळत नाही, त्यासाठी डिस्केमर! Wink
अन ते नै का? उठसुठ स्क्रिनशॉटस् घेऊन पोलिस/समाजकल्याणखात्याकडे पाठवायच्या धमक्या देणारे? तर त्याची काळजी म्हणूनही ते डिस्क्लेमर, बर्का! Proud

अचुक ज्योतीष वर्तवणे हा एक खरा प्रकार आहे.

भलेही आजच्या काळापर्यंत ह्या विद्येचे कैक पैलु काळानुसार लुप्त झाली ही असतील, काळानुसार ह्या जगात सर्वच गोष्टीचे सत्व वा शक्ति कमी अथवा क्षीण होतच असते,

ह्याचा अर्थ असा नाही कि ह्या कला, विद्या आस्तित्वात नाहित.

हे सर्व काही जसंच्या तसं अस्तित्वात आहे, फक्त ते संपूर्णपणे अवगत आता होत नाही. कारण त्यासाठी आता

तेव्हढा वाव राहिला नाही.

त्या विद्येचे प्रभाव सर्वांनाच ज्ञात आहेत, पण ती संपूर्णपणे अवगत जर नसेल करता येत ( पूर्ण ज्ञान उपलब्ध नाही

म्हणुन ), अथवा कोणत्याही कारणाने, तर बाप दाखीव नाहितर श्राद्ध कर अश्या उर्मट प्रवृत्ति दाखवुन आपल्याच

अकलेचे नसलेले दिवे जाळण्याचा माणसाने प्रयत्न करु नये.

ज्यांना अजुनही ह्या विद्यांचे ज्ञान बहुतेक वा पूर्ण असेल त्यांचे ऐकुन घेऊन सरळ पणे प्रश्न विचारायला काय जातं ?

कोणी एक आपल्या कार्यालयात बसुन तुमच्या विचित्र प्रश्नांची उत्तरे नीटपणे देतो आहे, तर स्वतःला नशीबवान

समजा, नाहितर तुमच्या रिकामटेकड्या चेष्टेखोर कुतर्कांची कोणाला दखलही घ्यायची गरज नाहिये.

> याबद्दल तुम्हाला या चर्चेतून बाद केलं पाहिजे.

साती, केलं पाहिजे असं म्हणणं हे फ्युचरिस्टीक नाही वाटत? आय मीन भविष्यात ... Happy

आश्चिग या असल्या बाफांवर येतात याचेच मला आश्चर्य वाटते.
<<<
बाकीच्यांना ही असेच आश्चर्य वाटावे आणि त्यासाठी तरी सगळ्यांनी इथे यावे म्हणून त्यांची युक्ती असणार ती Proud

पण इथे येऊन काय उपयोग? जे विश्वास ठेवतात ते ठेवणारच. वर घाटपांड्यांनी लिहिलेच आहे कसे हिरीरीने समर्थन केले जाते त्याचे, का केले जाते त्याचे.

आणि ज्यांचा विश्वास नाही त्यांना ह्या विश्वासरावांपुढे कितीही डोके आपटले तरी उपाय शुन्य..... Happy अगदी आश्चिगने येऊन सांगितले की बाबांनो हे आकाशातले ग्रह तारे माझ्या अभ्यासाचा विषय आहेत, मी त्यांचा दगड माती वायु समजुन अभ्यास करतो, ते तेव ढेच आहेत , तुम्हाला वाटते तसे प्रभवी ते नाहीत तरी काय फरक पडणार आहे?

त्याऐवजी आश्व्चीग एखादा नवा लेख लिहिण्यात तोच वेळ कामी लावु शकतील ना....

या धाग्याचे भवितव्य काय आहे इतके कोणी सांगेल का? आणि प्रशासकांच्या निर्णयाशी ते जुळले नाही तर सांगणारे स्वतंत्र धागा काढून भविष्य वर्तवण्याची चूक केली असे लिहून माफी मागतील का?

Pages