आज आपण टॉप ऑफ युरप, युंगफ्राऊ / यंगफ्राऊ ला जाऊ.
बहुतेक सहली झुरीक रेल्वे स्टेशनजवळच्या एका मैदानातूनच सुटतात. युरपमधील इतर देशांतून येणार्या / जाणार्या बसेसही इथेच येतात.
आधी बूक केले असेल तर प्रश्नच नाही पण आयत्यावेळीही जागा असल्यास टुअर घेता येते. वेळेआधी १० मिनिटे बसमधे बसावे अशी अपेक्षा असते. त्या वेळात गाईडची ओळख होते. दिवसभराचा कार्यक्रम कळतो.
पण हवी ती सीट मिळवायची असेल तर मात्र अर्धा तास तिथे जाणे उत्तम.
आमची ही बस मस्तपैकी डबलडेकर होती. मी अर्थातच पहिल्यांदा जाऊन वरची फ्रंट सीट पकडली होती.
झुरीक सोडल्याबरोबर मस्त दृष्यांची मालिका नजरेसमोर सरकत राहते. जुंगफ्राऊला जाण्याआधी १५/२० मिनिटे, इंटरलाकेन ला बस थांबते. तिथे तर गुलाबांचे ताटवेच आहेत. तिथेच हँगग्लायडर्स बर्यापैकी दिसतात. ( गाईडने सांगितल्याप्रमाणे त्यात बरेच अपघातही होत असतात. )
जुंगफ्राऊला जाण्यासाठी आपल्याला कॉग व्हील ट्रेनने जावे लागते. या रेल्वेला दोन रुळांच्या मधे आणखी एक
दातेरी रुळ असतो. या हिरव्या पिवळ्या रेल्वेचा प्रवास अविस्मरणीयच ठरतो.
या डब्यांना मोठमोठ्या खिडक्या आहेत आणि त्यातून बाहेर झुकून फोटो काढायला अजिबात हरकत नसते.
या प्रवासाची सुरवातच एका मोठ्या धबधब्याच्या दर्शनाने होते. आणि बघता बघता आपण उंची गाठत
राहतो.
ट्रॅकच्या आजूबाजूला तर रानफुलांची पखरणच असते. दूरवर युंगफ्राऊ दिसत राहतो. पण अशा ठिकाणी असतो तसा ढगांचा दंगाही असतोच. त्यामूळे ही शिखरे लपंडाव खेळत राहतात.
याच वाटेवर खुप सुंदर घरे दिसतात. रेल्वेट्रॅकला समांतर असा पायी चालत जाण्याचा रस्ताही आहे. त्या रस्त्यावर बरीच माणसे चालताना दिसतात. ( मी कधी जाणार ? ) आणि त्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात असतो.
पण हि गाडी थेट वर जात नाही. मधे एका स्टेशनावर गाडी बदलावी लागते. हि दुसरी गाडी आहे लाल रंगाची
ही मात्र थोड्याचा वेळात एका लंबलचक बोगद्यात शिरते. ( मग मात्र काचा बंद कराव्या लागतात.)
हिमालयाच्याच काय लेहलडाखच्या तुलनेतही जुंगफ्राऊची ऊंची ४,१५८ मिटर्स नगण्य आहे पण एकदम एवढ्या ऊंचीवर जाणे, आपल्याला त्रासदायक ठरु शकते. म्हणून वाटेत ही गाडी दोनदा थांबते आणि सर्वांनी तिथे उतरून जरा हालचाल करावी अशी अपेक्षा असते.
या दोन्ही जागाही खुप सुंदर आहेत. तिथल्या खिडक्यांतून खुप सुंदर दृष्य दिसते. या गाडीचे शेवटचे स्टेशनही बोगद्यातच आहे.
आता बाकीचे पुढच्या भागात. सध्या हे फोटो बघा 
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
पूर्ण नाव युंगफ्राऊयॉक
पूर्ण नाव युंगफ्राऊयॉक (Jungfraujoch) आहे. यॉक म्हणजे खिंड (pass).
सानीच्या आग्रहानुसार बदल
सानीच्या आग्रहानुसार बदल केला आहे
तरूण मुलीचे नाव उच्चारायला एवढे कठीण का बॉ ?
मामी अगदी बरोबर, पण सगळे
मामी अगदी बरोबर, पण सगळे शॉर्टकट वापरतात, म्हणून शॉर्टकटच प्रचलित झालाय.. आता शॉटकटच उच्चारायला इतका अवघड जातोय तर पूर्ण नावाचं काय व्हायचं?
धन्स हो दिनेशदा.. पण अवघड वगैरे काही नाही.. जर्मन भाषेतले उच्चार जसा शब्द दिसतो, तसेच करायचे असतात. फ्रेंचसारखं नाही ते- की दिसतंय एक आणि उच्चार भलताच... मात्र जे हे अल्फाबेटच इकडे यॉट असं म्हणवलं जातं. त्यामुळे त्यापासून सुरु होणारे झाडून सगळे शब्द य वरुनच उच्चारले जातात. त्यामुळे एक गंमतच होते इकडे. ज वरुन नाव असणार्या सगळ्यांना य वरुनच हाक मारली जाते. आमचा एक मित्र-जगदिश, त्याला इकडे यगदिशच म्हणतात. तो तरी बिचारा किती लोकांना खरा उच्चार सांगत बसेल? सोडून देतो तो.. त्यामुळे आम्हीही आता त्याला (चिडवत सुरुवात करुन) यगदिशच म्हणायला लागलोय.
म्हणजे कुणाला जा म्हणायचे
म्हणजे कुणाला जा म्हणायचे असेल तर या म्हणायचे का ?
म्हणजे कुणाला जा म्हणायचे
म्हणजे कुणाला जा म्हणायचे असेल तर या म्हणायचे का ? << हो, पण या म्हणायच्या ऐवजी जा म्हणणे जमणार असेल तरच.
आम्हीही आता त्याला (चिडवत
आम्हीही आता त्याला (चिडवत सुरुवात करुन) यगदिशच म्हणायला लागलोय.
>>> ओम यय यगदीश हरे (राम)
सुंदर प्रचि अगदी ठाशीव
सुंदर प्रचि अगदी ठाशीव रंगरेषांचे .खरंच प्रत्ययकारी. धन्स दिनेशदा
उद्बोधक माहिती जर्मन उच्चारांबद्दल सानी .
हाही भाग मस्तच
हाही भाग मस्तच
धन्स यिप्सी
धन्स यिप्सी
म्हणजे कुणाला जा म्हणायचे
म्हणजे कुणाला जा म्हणायचे असेल तर या म्हणायचे का ?>>>
अप्रतिम.
अप्रतिम.
अप्रतिम!!!!!!!!!!!!!
अप्रतिम!!!!!!!!!!!!!
म्हणजे कुणाला जा म्हणायचे
म्हणजे कुणाला जा म्हणायचे असेल तर या म्हणायचे का ?>>> जा म्हणायचंच नाही.. डायरेक्ट गॅस चेंबर!! परंपरा नको का जपायला?

ओम यय यगदीश हरे (राम)>>> मामे, सगळंच बोलायला लावतेयस बाई तू... हा भाग मी इथे लिहिण्यापासून स्किप करायचा ठरवला होता, पण आता रहावत नाहीये. नवर्याचं नाव जय आहे गं, त्यामुळे दोन्ही मित्र भेटले की हे गाणं नेहमीच गाते मी..
त्याच्या पूर्ण नावाच्या उच्चाराची अजूनच वेगळी आणि अती गंमतीशीर कथा आहे. पण आता नको, नंतर कधीतरी!!
दिनेश कोणती लेन्स रे बाबा?
दिनेश कोणती लेन्स रे बाबा? एके ४७ च आहे अगदी !!
मिलिन्दा माबोवरून बराच काळ
मिलिन्दा माबोवरून बराच काळ गायब होतास... येलकम ब्याक ...
सानी ...
सानी ...
आमचा एक मित्र-जगदिश, त्याला
आमचा एक मित्र-जगदिश, त्याला इकडे यगदिशच म्हणतात. तो तरी बिचारा किती लोकांना खरा उच्चार सांगत बसेल? सोडून देतो तो...>>>>>हो ना माझे युरोपचे कलिग माझ्या नावाचे स्पेलिंग "जोगेश" लिहितात
मै रमता जोगी किंवा जोगन बन
दिनेश.... ~ केवळ अप्रतिम असे
दिनेश....
~ केवळ अप्रतिम असे लिहून थांबणे म्हणजे तुमची वर्णनशैली आणि चित्रे यांचा खरे तर अपमानच होईल... इतका भरभरून आनंद दिला आहे या धाग्याने.
काही [पोरकट म्हणा हवे तर...] शंका :
१. हँगग्लायडर्सच्याबाबतीत तुम्ही लिहिले आहे "गाईडने सांगितल्याप्रमाणे त्यात बरेच अपघातही होत असतात. )...." ~ म्हणजे नेमके काय समजले नाही.
२. चित्र क्रमांक १ मध्ये दिसणारा बोर्ड चक्क इंग्रजीमध्ये आहे. माझ्या समजुतीप्रमाणे स्वीसच्या राष्ट्रीय भाषा फ्रेंच आणि जर्मन असून या दोन्ही भाषा "इंग्रजी" ला आपल्या कधीच मानत नाहीत....तरीही बोर्ड मात्र इंग्रजीत.... [किंवा टुरिस्टसची सोय म्हणून ?]
३. चित्र क्र. २ : जलाशय .... इतका शांत ? म्हणजे पाण्यावर लाटेची एक चुणीही दिसत नाही....किमान फोटोत. असा तलाव पाहणे किती हर्षदायक असेल.
बाकी बांधकाम आणि बागांच्या फोटोबद्दल.....पाहातच राहिलो आहे.
हे पण सुंदर दिनेशदा.
हे पण सुंदर दिनेशदा.
मस्तच फोटो आणि वर्णन
मस्तच फोटो आणि वर्णन ............
चित्र क्रमांक १ मध्ये दिसणारा
चित्र क्रमांक १ मध्ये दिसणारा बोर्ड चक्क इंग्रजीमध्ये आहे. >> मामा,इंग्रजी पाटीचं काय घेउन बसलाय, स्विसमधे पर्यटकांच्या सोइसाठी हिंदीमधे पण पाट्या आहेत काही ठिकाणी
अशोक, स्विस भाषा अशी कुठली
अशोक,
स्विस भाषा अशी कुठली भाषाच नाही. जो देश शेजारी त्या देशाची भाषा तिथे चालते. ( फ्रेंच, जर्मन, इतालियन, झेक ) पण इंग्लीश मात्र सगळीकडेच चालते. आणि हिंदीतल्या पाट्या पुढच्या भागात दिसतीलच.
हे ग्लायडींग करताना लँडींगचे तंत्र न जमल्याने अपघात, झाडावर अडकणे असे काही अपघात होतात.
तो जलाशय, मानवनिर्मित आहे पण तिथले नैसर्गिक जलाशयदेखील असेच शांत आणि स्वच्छ आहेत. बायोलॉजिकली क्लीन म्हणतात ते लोक.
रॉबिन, साधाच आहे कॅमेरा. मी
रॉबिन, साधाच आहे कॅमेरा. मी तर ऑटो मोडच वापरतो.
अॅडजस्टमेंट वगैरे काही नाही. ( कुणाला जमताहेत म्हणा त्या ! )
मनीष....आणि दिनेश.... होय,
मनीष....आणि दिनेश.... होय, स्वीस म्हणजे पर्यटकांचे नंदनवनच असल्याने त्यांच्या सोईसाठी इंग्रजी वापरण्याची शक्कल [आता तर तुम्ही दोघेही म्हणत आहात की हिंदीही वापरली जात आहे] वापरणे योग्यच म्हणा. फक्त स्वीस देश जर्मनीशी फारच गुफ्तगू करीत असल्याने तिथे इंग्रजीचा एवढा बडेजाव असेल असे वाटले नव्हते.
थॅन्क्स
मस्तच
मस्तच
सुंदर!! प्रचि १६, २५ अगदी यश
सुंदर!!
प्रचि १६, २५ अगदी यश चोप्रांच्या सिनेमात शोभतील अशी आहेत.
दिनेशदा...मस्त
दिनेशदा...मस्त
फार सुंदर, तुमच्यामुळे
फार सुंदर, तुमच्यामुळे स्विसदर्शन घडतयं
हा staubacch waterfall चा
हा staubacch waterfall चा अजून एक फोटो
आणि Lauterbrunnen vally
Pages