आज आपण टॉप ऑफ युरप, युंगफ्राऊ / यंगफ्राऊ ला जाऊ.
बहुतेक सहली झुरीक रेल्वे स्टेशनजवळच्या एका मैदानातूनच सुटतात. युरपमधील इतर देशांतून येणार्या / जाणार्या बसेसही इथेच येतात.
आधी बूक केले असेल तर प्रश्नच नाही पण आयत्यावेळीही जागा असल्यास टुअर घेता येते. वेळेआधी १० मिनिटे बसमधे बसावे अशी अपेक्षा असते. त्या वेळात गाईडची ओळख होते. दिवसभराचा कार्यक्रम कळतो.
पण हवी ती सीट मिळवायची असेल तर मात्र अर्धा तास तिथे जाणे उत्तम.
आमची ही बस मस्तपैकी डबलडेकर होती. मी अर्थातच पहिल्यांदा जाऊन वरची फ्रंट सीट पकडली होती.
झुरीक सोडल्याबरोबर मस्त दृष्यांची मालिका नजरेसमोर सरकत राहते. जुंगफ्राऊला जाण्याआधी १५/२० मिनिटे, इंटरलाकेन ला बस थांबते. तिथे तर गुलाबांचे ताटवेच आहेत. तिथेच हँगग्लायडर्स बर्यापैकी दिसतात. ( गाईडने सांगितल्याप्रमाणे त्यात बरेच अपघातही होत असतात. )
जुंगफ्राऊला जाण्यासाठी आपल्याला कॉग व्हील ट्रेनने जावे लागते. या रेल्वेला दोन रुळांच्या मधे आणखी एक
दातेरी रुळ असतो. या हिरव्या पिवळ्या रेल्वेचा प्रवास अविस्मरणीयच ठरतो.
या डब्यांना मोठमोठ्या खिडक्या आहेत आणि त्यातून बाहेर झुकून फोटो काढायला अजिबात हरकत नसते.
या प्रवासाची सुरवातच एका मोठ्या धबधब्याच्या दर्शनाने होते. आणि बघता बघता आपण उंची गाठत
राहतो.
ट्रॅकच्या आजूबाजूला तर रानफुलांची पखरणच असते. दूरवर युंगफ्राऊ दिसत राहतो. पण अशा ठिकाणी असतो तसा ढगांचा दंगाही असतोच. त्यामूळे ही शिखरे लपंडाव खेळत राहतात.
याच वाटेवर खुप सुंदर घरे दिसतात. रेल्वेट्रॅकला समांतर असा पायी चालत जाण्याचा रस्ताही आहे. त्या रस्त्यावर बरीच माणसे चालताना दिसतात. ( मी कधी जाणार ? ) आणि त्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात असतो.
पण हि गाडी थेट वर जात नाही. मधे एका स्टेशनावर गाडी बदलावी लागते. हि दुसरी गाडी आहे लाल रंगाची
ही मात्र थोड्याचा वेळात एका लंबलचक बोगद्यात शिरते. ( मग मात्र काचा बंद कराव्या लागतात.)
हिमालयाच्याच काय लेहलडाखच्या तुलनेतही जुंगफ्राऊची ऊंची ४,१५८ मिटर्स नगण्य आहे पण एकदम एवढ्या ऊंचीवर जाणे, आपल्याला त्रासदायक ठरु शकते. म्हणून वाटेत ही गाडी दोनदा थांबते आणि सर्वांनी तिथे उतरून जरा हालचाल करावी अशी अपेक्षा असते.
या दोन्ही जागाही खुप सुंदर आहेत. तिथल्या खिडक्यांतून खुप सुंदर दृष्य दिसते. या गाडीचे शेवटचे स्टेशनही बोगद्यातच आहे.
आता बाकीचे पुढच्या भागात. सध्या हे फोटो बघा 
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
तो धबधबा मला जवळून बघायचाच
तो धबधबा मला जवळून बघायचाच होता, सौकुल.
आम्ही त्या vally मधे राहिलो
आम्ही त्या vally मधे राहिलो होतो आणि ४ दिवस आजुबाजूचे treks केले होते. शक्य असल्यास lake bachalpsee trek जरूर करा. अविस्मरणीय अनुभव.
Switzerland मधे सगळ्यात आवडलेली गोश्त म्ह्णजे खूप उन्चीवर आपल्याला अलगद नेवून ठेवतात म्हणजे आमच्या सारख्या लोकान्ना पण hiking चा आनन्द घेता येतो.
हो ना, एरवी या ठिकाणी जाणे
हो ना, एरवी या ठिकाणी जाणे मला तरी अशक्यच.
Pages