आधुनिक सीता - ८

Submitted by वेल on 21 September, 2013 - 06:06

ही मी लिहिलेली पहिलीच कथा. कथा मोठी आहे म्हणून क्रमशः टाकली आहे.

२०१२च्या कालनिर्णय ह्या दिवाळी अंकात डॉ अरविंद संगमनेरकर ह्यांची एक कथा वाचली होती. "ती पुन्हा दिसलीच नाही." ते कथानक वापरून मी ही कथा पुढे चालवली आहे. ती कथा कथानायकाने अनुभवलेली सांगितलेली .. ही कथा कथानायिकेने अनुभवलेली सांगितलेली... माझ्या कथेसाठी मूळ कथानकात काही बदल मी केले आहेत.

भाग ३ - http://www.maayboli.com/node/45054
भाग ४ - http://www.maayboli.com/node/45057
भाग ५ - http://www.maayboli.com/node/45139
भाग ६ - http://www.maayboli.com/node/45250
भाग ७ - http://www.maayboli.com/node/45278

**********************

"हाय साल्या कशी झाली कालची पार्टी? सॉरी मी काल येऊ नाहे शकलो" आत आवाज ऐकू आला. मी ओळखलं हा रफिक, इथे मराठीत दुसरं कोण बोलणार होतं आमच्यासोबत? मी माझे ओले हात पुसून, स्वयंपाकघरातून बाहेर येनार तोवर रफिक स्वतःच स्वयंपाक्घरात दाखल झाला. "अरे कालची पुरणपोळी खायला आलोय. ठेवलीयेस ना माझ्यासाठी नाहीतर बायकोला ओलीस धरून तुला परत पाठवून देइन पुरणपोळी आणायला." मला ऐकतक्षणीच खूप राग आला, मित्र झाला म्हणून कोणी असं बोलतं का? मी सरळ पाठ फिरवली त्याच्याकडे आणि न बोलता एका प्लेटमध्ये पुरणपोळी आणि दूध वाढले.
"काय राव, तुझ्यासाठी पुरणपोळी ठेवली नाही तर मला पुरणपोळी न खातासुद्धा पचेल का? चल खायलाच बस आधी, मी तुझ्याच साठी डबा भरायला सांगत होतो सरिताला. आणि रामण्णाने खिचडी सुद्धा केलीये, ती सुद्धा खाऊन जातोस का?"
"अरे खिचडी डब्यात घेऊन जातो. आता बसून दहापंधरा पुरणपोळ्या जोवर खात नाही ना तोवर मला काही चैन पडणार नाही. ह्या पुरणपोळ्यांसाठी काल सकाळपासून काही खाल्लं नाहिये रे मी." ह्याचं आडनाव गोड्बोले होत की काय गेल्या जन्मी - माझ्या मनात विचार आला.
"तुम्ही रफिक भावोजी ना. हव्या तेवढ्या खा. केवळ तुमच्यासाठी म्हणून पन्नासेक पुरणपोळ्या तरी राखून ठेवल्यात. " असं म्हणत मी रफिककडे वळले. हातात पुरणपोळी आणि दुधाचं ताट घेऊन. ते ताट टेबलावर ठेवून मी त्यांना नमस्कार केला. "मी सरिता. सागरची पत्नी. बोलण्याच्या आणि पुरण्पोळ्यांच्या नादात आपली ओळख होणं राहून जायचं" मी इतकं बोलले तरी रफिक काही बोलला नाही, माझ्याकडे तो डोळे विस्फारून पाहात राहिला.
"अरे कुठे हरवलास, ती तुझी सुनीता नाही, माझी बायको सरिता आहे. खूप साम्य आहे ना दोघींच्या दिसण्यात."
"फक्त दिसण्यात नाही, आवाजात सुद्धा आणि लकबीसुद्धा अगदी सारख्या आहेत, मान वळवायची पद्धत, बोलताना ओठांचा चंबू करायची पद्धत. अगदी सुनीता." रफिक माझ्यावरची नजर न हलवता, पापणी न झपकवता अगदी गंभीर आवाजात बोलला. मला खटकलं, नाही आवडलं त्याचं असं पाहाणं. असं वाटत होतं त्या नजरेने तो मला शोषून घेतोय की काय. मी सागरकडे पाहिलं, त्यालाही नव्हतं आवडलं रफिकने हे असं माझ्याकडे पाहत राहाणं.. त्याने मला नजरेने खूण केली आत जा. मी रफिकला म्हटले"तुमच्यासाठी खिचडीचा डबा भरून ठेवलाय. जाताना नक्की घेऊन जा. माझं थोडं काम आहे आलेच मी." आणि काही काम नसताना मी तिथून निघून गेले. मला वाटलं होतं रफिक खाऊन लगेच निघून जाईल. तो खूप वेळ बसला होता. सागरला उशीर होत होता, पण बॉसच घरात बसलाय म्ह्टल्यावर त्याला निघता येईना की काही बोलताही येईना. इतक्या वेळात मी बाहेर नाही गेले म्हणून रफिकने सागरला म्हटले, "अरे सरिताला बोलव जरा, फातिमाने तिच्यासाठी भेट पाठवली आहे." मला ऐकू येत होते, तरिही सागरने हाक मारल्यावर मी नाईलाजाने बाहेर गेले. "सरी>>>>ता, फातिमाने तुझ्यासाठी भेट पाठवली आहे. बघ तरी, सांग तुला आवडते का?" मी त्याच्या हातातून एक छोटी डबी घेतली आणि हेतूपुरस्सर त्याने माझ्या बोटांना स्पर्श केला, इतका हलका की मला कळावा पण सागरला दिसू नये. मी ती डबी घेऊन कोरडं "थँक्स" म्हणून निघत होते, तितक्यात त्याने मागून परत हाक मारली. " सरी>>>>ता, अरे चाललीस काय लगेच, फातिमाने इतक्या प्रेमाने भेट पाठवली आहे. पाहा तरी काय आहे." मी सागरकडे पाहिले, त्याने मला नजरेनेच खूण केली, पाहा काय आहे. मी डबी उघडून पाहिली तर त्यात एक सुंदर पेण्डण्ट होतं हृदयाच्या आकाराचं त्यावर नक्कीच हिरे होते अगदी बारिक परंतु अतिशय सुंदर पद्धतीने रचलेले. त्याला बाजूला एक कळ होती त्यात दोन फोटो अडकवायला जागा होती. मी रफिकला म्हटलं, " हे पेण्डण्ट खूप सुंदर आहे पण खर्‍या सोन्याचं आणि हिरे जडवलेलं दिसतय. खूप महाग असणार हे नक्कीच. इतकी महाग भेट मी नाही घेऊ शकत. माफ करा. " "अग तिने खूप प्रेमाने दिलय खास तुझ्यासाठी. आणि महाग काय. अशी पन्नास आणली तरी ती तुझ्यापुढे महाग नाही ठरायची. आत्ता घाल ते गळ्यात. आणि चाललीस कुठे लगेच. तुझ्याकडे मी पाहुणा म्हणून आलोय, थोडा पाहुणचार तर कर. तुम्ही पाहुण्याला देव मानता ना?" मी पुन्हा एकदा नाईलाजाने मागे वळले. "मला वाटलं तुम्ही इतक्या वेळात सगळ्या पुरणपोळ्या संपवल्या असतील." " अग, पुरणपोळ्या खाल्ल्या मी, पण तुझ्या हातचं काहीतरी. पुरणपोळ्या विकत आणलेल्या होत्या. आणि ह्या डब्यातली खिचडी रामण्णाने बनवलेली. मला मस्त चहा दे करून" मी शांतपणे चहा करायला वळले. न पाहताही मला कळत होतं, त्याची नजर माझ्या पाठीलाच चिकटलेली होती. मी चहा केला, सागर आणि रफिकल दिला. आता मी शहाणी झाले होते, त्यामुळे त्याच्या हातात चहा न ठेवता मी तो टेबलावर ठेवला. आणि मागे वळले, पुन्हा एकदा त्या नजरेपासून दूर व्हायला. "सरी>>>>ता, अरे बस की आमच्यासोबत चहा घ्यायला." " माझा झाला आहे" " अग ठीक आहे अर्धा कप प्यायला काय हरकत आहे. तुझ्या नवर्‍याला चहा खूप आवडतो, तो शेअर नाही करणार त्याचा चहा, मी माझा शेअर करतो, अग बस ग." " मला खरच नको आहे, चहा जास्त झाला की मला अ‍ॅसिडिटी होते. आणि मग उलटी सुद्धा होऊ शकते. प्लीज मी नाही पिऊ शकत" "ओक्के. तुला त्रास होतो म्हटल्यावर मी तरी तुला कसं फोर्स करनार. पण मग दुपारी जेवायला दे मला सोबत. मी तुझ्या हातचं जेवायला तुझ्याघरी येणार आहे बर का." मग उपकार केल्यासारखं सागरकडे वळून त्याने विचारलं," काय सागर चालेल ना तुला? हवं तर दुपारी जेवणाच्या वेळी तू सुद्धा घरीच ये जेवायला, कसं? तसं सुद्धा ह्या आठवड्यात तुझी ड्युटी नाहीच आहे सर्जरीसाठी. मग आपण असं करूया, ह्या आठवड्यात रोज दुपारी ये तू घरी जेवायला, त्या निमित्ताने मला पण जेवायला मिळेल, सरिताच्या हातचं, शुद्ध शाकाहारी, ब्राह्मणी पद्धतीचं जेवण. काय ग सरिता, तू शिकलीस की नाही सागरच्या आईकडून काही. काय मस्त चव आहे त्यांच्या हाताला." ह्यापुढे मी आणि सागर काय बोलू शकणार होतो. ओढून ताणून ओठी हसू आणून सागरने मला विचारलं. "सरिता, चालेल का तुला? येईल का तुला आईसारखा स्वयंपाक करायला?" मीसुद्धा खट. "अरे सागर, तुला मी आधीच सांगितलं होतं ना, मला स्वयंपाक येत नाही फारसा. उगाच मी स्वयंपाक करायचे आणि भावोजींचं पोट बिघडायचं." रफिकला थोडासा राग आला. "काकूंना फोनवर विचार कसा करायचा स्वयंपाक आणि कर. मी जेवायला येणार म्हणजे येणार. तू नुस्ता वरण्भात बनवलास तरी चालेल. हळू हळू शिकशील. काय सागर? आणि हो मला तू सरळ रफिक म्हण भावोजी वगैरे नको ते. उगाच दुरावा आल्यासारखं वाटतं. काय सागर?" मला खूप राग आला होता, त्याला धक्के मारून घराबाहेर काढावसं वाटत होतं. पण एक तर आम्ही त्याच्याच घरात होतो आणि त्याहून महत्वाचं त्याच्याच देशात होतो.

त्या दुपारपासून रफिक रोज दुपारी आमच्याच घरी जेवायला असे. माझ्याशी फार अदबीने वागत असे, पण आपुलकी दाखवून शाब्दिक जवळीक दाखवायचा प्रयत्न करत असे. त्याने कधी शारिरीक जवळीक दाखवायचा प्रयत्न केला नाही की मीही त्याच्या आजूबाजूलाही फिरले नाही.

आठवड्यानंतर सागरच्या एका मागोमाग एक सर्जरी सुरू झाल्या. रफिकचं येणं थांबलं. सागर घरी नसताना रफिक कधीच घरी आला नाही. पण सागर घरी असताना तो रोज यायचा. सकाळी नाश्त्याला किंवा रात्री जेवायला. वेळ असेल तर गप्पा मारत बसायचा. तो कधी स्वतःच्या घरच्यांबद्दल बोलला नाही की कधी फतिमाला त्याने आमच्याकडे आणलं नाही. जगातलं, भारतातलं राजकारण, सामाजिक विषय, वाढत्या वयातल्या मुलांचे प्रॉब्लेम्स काहीही विषयावर तो बोलू शके. फक्त एक कम्पल्शन असायचं मी तोथे असलं पाहिजे. मला नाही आवडायचं. मी एकदा तसं सागरला बोलून दाखवलं. "अग खटकतं मलाही, पण कसं बोलून दाखवणार, एक तर जुना मित्र. त्यातून आता बॉस काय आणि कसं सांगायचं? मला असं वाटतं की तुला पाहून त्याला सुनीताची आठवण येत असणार. होईल ठीक थोड्या दिवसात." का कोण जाणे मनात पाल चुकचुकली.
दोन आठवडे झाले तरी रफिकच्या चकरा काही कमी होईनात.

"सागर मला रफिकचं लक्षण काही ठीक दिसत नाही. मला वाटतं तू बोलावंस त्याच्याशी."
" मला कळतय. पण काय करायचं ग? रफिकच्या जागी तुझी जवळची मैत्रिण असती आणि तुझ्याजागी मी तर तू काय केलं असतस? तेच करूया आपण." मी गप्प बसले.

असच अजून एक आठवडा गेला. "सागर मला वाटतं की मी परत जावं." "क्काय? अग आत्ता महिन्याभरापूर्वी आलीस इथे तू." " हे बघ मला आता जे रोजचं रफिकचं येणं सहन होत नाही. रोज डोळे खिळवून माझ्याकडे पाहत असतो. तू कसं सहन करतोस रे? मला तर त्याचे डोळेच फोडावेसे वाटतात." "त्याकरता तू परत जाणार का? अग असं तसं नही वागत आहे ना तो?" "सागर, तू त्यादिवशी विचारलस माझी मैत्रिण रफिकच्या जागी असती आणि तुझ्या जागी मी तर काय केलं असतंस. मी तिला सरळ खडसावलं असतं. पुन्हा घरी येऊ नको म्हणून सांगितलं असतं. तुला नोकरी बदलायला सांगितलं असतं. आणि त्याचं मन कधी पलटेल आणि तो कधी वाईट वागेल सांगता येतं का? हा देश आपला नाही आहे उगाच मला भीती वाटत राहाते. "ठीक आहे. आजच मी तिकिट बुकिंग करायला सांगतो लवकरात लवकरचं." "हो आणि माझ्या जाण्याबद्दल आपण कोणालाही सांगायचं नाही. मी गेल्यानंतरच सांग. सांग घरी आजीला बरं नव्हतं म्हणून गेले परत." "तू म्हणशील तसं आणि मग तू येऊ नकोस इथे परत. घरी सगळ्यांना काय सांगायचं ते मी पाहातो. मीच दर सहा महिन्याला येत जाइन. अजून दोन वर्ष मला इथे काढावी लागतील. मला कळतं आहे इथे तुला विचित्र वाटतय आणि भीतीदेखील वाटतेय. खरंतर रफिकच्या नजरेची भीती मलादेखील वाटते कधीकधी. पुढच्या एक दोन दिवसातलं तिकीट सुद्धा मिळू शकतं. तू तुझं सामान भरून तयार राहा. हो आणि रामण्णा किंवा शिवालासुद्धा कळू देऊ नकोस. माझंसुद्धा मन थोडं कावरंबावरं होतं आहे."

क्रमशः

पुढचा भाग - http://www.maayboli.com/node/45427

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिताय . मी मूळ गोष्ट वाचली होती साधारण वर्षभरापूर्वी, तेव्हापासून खूप अस्वस्थ होते गोष्ट चटका लावणारी आहे, सारख वाटायचं बिचाऱ्या सरिताच पुढे काय झाल असेल? का कोण जाणे मला ती पहिली गोष्ट सत्यकथा वाटते . तुम्ही आधीच म्हणालात तुमची कथा काल्पनिक आहे. पण वाचायला आवडेल. आता कुठे ही कथा सरिताची म्हणून पुढे जाणार आहे. शेवटा मात्र गोड करा . त्या रफिकला चांगला धडा शिकवा.

फातिमा?? की सकिना??==+१ - आधीच्या भागात रफिकच्या बायकोचा उल्लॆख सकीना असा केला आहे. प्रस्तावानेप्रमाणे सरिता ही सकीना होणार आहे. जरा clarify कराल का?

पु . ले. शु.

Maanaskanya,

Mee punhaa vachen ti kathaa. Tya kathet mi mala have tase badal kelet. Pan naava tarii jashee aahet tashee theven. Ithe Fatima he rafikchya baykocha nav ahe

कथा इंटरेस्टींग होत चाललिये पण भाग थोडे मोठ मोठे टाकाल का? सुरवात करेपर्यंतच क्रमशः येतं Sad

बाकी तुम्ही म्हणताय की आधीच कथा लिहिली आहे आणि आता थोडे फेरबदल करुन पोस्ट करत आहात तर मोठे भाग टाकायला काही हरकत नसावी. Happy