चेक Maize
गृपः मका + पनीर + चीझ
लागणारे साहित्यः
१) बेस:
१ कप पोलेन्टा (मक्याचा रवा),
पनीरचा स्लॅब
ऑलिव्ह ऑइल / स्प्रे
मिठ
२) स्प्रेड:
१/२ कप क्रिम चीज (किंवा अवाकाडो + क्रिम चीझ )
अवाकाडो घातल्यास लिंबाचा रस
कोथिंबीर पेस्ट
मिठ
३) साल्सा:
लालबुंद टोमॅटो - गर काढुन बारीक तुकडे करुन
हिरवी ढोबळी मिरची - बारीक तुकडे करुन
मक्याचे दाणे
उकडलेल्या किडनी बीन्स
कोथिंबीर - भरपूर
हिरवी मिरचीचे तुकडे
*सिझनींग
४) टॉपिंग्स:
कॉर्न चिप्स,
उरलेले आवाकाडो / क्रिमचीझ स्प्रेड
*सिझनींग
*सिझनींग - ओरेगानो+लाल तिखट+भाजक्या जीर्याची पावडर+धणे पवडर ( किंवा वाळलेल्या कोथिंबीरीची पूड)
१) बेस:
- १ कप पोलेन्टा ४ कप गरम पाण्यात घालावा त्यात थोडे मिठ आणि ऑलिव्ह ऑइल घालुन शिजवावा. ट्रे मधे सेट करायला ठेवावा.
- पनीरच्या ब्लॉक (मधील शक्य तितके पाणी काढुन टाकावे^) चे आयताकृती तुकडे (साधारण ४ इंच लांब) करुन घ्यावेत.
- पोलेन्टा सेट झाला की त्याचेही पनीरच्याच साईझचे तुकडे करुन घ्यावेत.
- ग्रिल/ पॅन/ओव्हन गरम करुन पोलेन्टावर ऑइल स्प्रे मारुन हलके फ्राय करुन घ्यावे. जास्त खरपुस नको.
२) स्प्रेड:
- स्प्रेड साठी घेतलेले सर्व पदार्थ नीट मिक्स करुन घ्यावेत.
३) असेंबली:
- बटर पेपर वर एक तुकडा पोलेन्टाच त्याला थोडं स्प्रेड लवुन त्याच्या सईडला आणि वर पनीरचा तुकडा, त्याशेजारी परत पोलेन्टाचा तुकडा असे रचुन घ्यावे आणि थोडावेळ फ्रिज मधे सेट करायला ठेवावे.
४) साल्सा:
- टॉमेटो सोडुन सर्व जिन्नस एकत्र करावे. टॉमेटो अगदी आयत्यावेळेस घालावे अन्यथा साल्साला पाणी सुटेल.
५) सर्व्ह करताना:
- सेट झालेल्या बेस चे १ इंच रुंद काप काढावेत - आता चेकरबोर्ड पॅटर्न दिसेल.
- सॅल्सा डीशवर पसरून त्यावर हा चेकर्ड बेस ठेवावा.
- वरतुन आवाकाडो क्रिम घालावे आणि कॉर्न चिप्स चे तुकडे पेरावे *सिझनिंग भुरभुरावे..
दिसायला लांबलचक वाटली तरी पाकृ अगदी सोपी आहे.
- मेक्सिकन बरीटो/ टाको यांच्या लायनीतला हा प्रकार ट्राय केला आहे. टॉर्टियाज्/टाकोज ऐवजी चेकर्ड बेस. हे आधी करुन ठेवता येतिल. फ्रिज मधे २-४ दिवस सहज रहातिल.
- सपर्धेत कांदा / लसूण वापरायचा की नाही अशी शंका आल्याने साल्सा मधे कांदा वापरला नाहिये पण एरवी लाल कांदा बारीक चिरुन घालता येइल.
- एक पोलेन्टा शिजवायचे प्रमाण सोडले तर बाकी सर्व कमी-आधिक करता येइल.
- *सिझनींग ऐवजी \विकतचे सिझनींग वापरता येइल.
ला़जो..........सुपर्ब आयडिया
ला़जो..........सुपर्ब आयडिया गं.... सुंदर आणी टेस्टी दोन्हीचामेळ लाजबाब आहे
कसं सुच्तं तुला असंविचारायचंहोतं,पण जौ दे!!!!!!
माझा दंडवत स्विकारा
माझा दंडवत स्विकारा
अग ते पुर्णब्रह्मचे कोट काढ
अग ते पुर्णब्रह्मचे कोट काढ ना
पुर्णब्रह्म असं लिही नुसतं
कल्पकता, प्रेक्षेंटेशन एकदम
कल्पकता, प्रेक्षेंटेशन एकदम भारी. माशेऑच्या स्टँडर्डच्या पाककृतीशी स्पर्धा कशी होणार?
<असेंबली:
- बटर पेपर वर एक तुकडा पोलेन्टाच त्याला थोडं स्प्रेड लवुन त्याच्या सईडला आणि वर पनीरचा तुकडा, त्याशेजारी परत पोलेन्टाचा तुकडा असे रचुन घ्यावे आणि थोडावेळ फ्रिज मधे सेट करायला ठेवावे.>
एवढ्याने ते चेकर्ड बेस सेट होतात म्हणजे मस्त. फक्त या बेसची चव कशी असेल याबद्दल उत्सुकता आहे.
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.
पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383
मस्तच..
मस्तच..
Pages