Submitted by बागेश्री on 6 September, 2013 - 11:42
आयुष्यावर आयुष्याने
बेसुमार बरसताना,
रक्ताने उंच उसळावे..
फक्त एकदाच!
रंगांनी त्वचेत जिरताना,
बेरंग भावना रंगताना
मुसमूसून जगणे ल्यावे
फक्त एकदाच....
कानाचे गीत होताना
सुरांनी आत जिरताना
ताल शरिराचा ह्या व्हावा,
फक्त... एकदाच...
श्वासांनी गंधित होताना,
मिठीने घट्ट होताना,
अंतर मनांतले सरावे,
फक्त...एकदाच!
क्षणी कासाविस होताना
जगण्याला कोरड पडताना
आयुष्याने गार नीर व्हावे
......... एकदाच....!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान बागेश्री. पुर्ण
खूप छान बागेश्री. पुर्ण कविताच सुंदर आहे.
श्वासांनी गंधित होताना,
मिठीने घट्ट होताना,
अंतर मनांतले सरावे,
फक्त...एकदाच! >> हे खूप आवडले.
छान लिहीलस बागे आवडल
छान लिहीलस बागे
आवडल
मस्त आहे, आवडली
मस्त आहे, आवडली
सुंदर ...
सुंदर ...
श्वासांनी गंधित
श्वासांनी गंधित होताना,
मिठीने घट्ट होताना,
अंतर मनांतले सरावे,
फक्त...एकदाच! >> मस्तच गं.. किती सुंदर लिहीतेस
आवड्ली
नेहमीसारखी नाही आवडली नीर हा
नेहमीसारखी नाही आवडली
नीर हा शब्द फार छान मूड बनवतो आहे ह्या शब्दासाठी पैकीच्यापैकी !!!
धन्यवाद दोस्तहो... ह्म्म
धन्यवाद दोस्तहो...
ह्म्म वैभव.. चालायचंच.. थँक्स
शेवटून दुसरं कडवं जबरदस्त
शेवटून दुसरं कडवं जबरदस्त आहे.
क्षणी कासाविस होताना जगण्याला
क्षणी कासाविस होताना
जगण्याला कोरड पडताना
आयुष्याने गार नीर व्हावे
......... एकदाच....!!
हे आणि असं फक्त बागेश्रीनेच लिहावे. ................. अतिशय दुर्मिळ आवका आहे हा .... !!
हे आणि असं फक्त बागेश्रीनेच
हे आणि असं फक्त बागेश्रीनेच लिहावे
>>>
प्रचंड अनुमोदन!
मस्तच!
(No subject)
अज्ञात, तुमचा "नेमक्या"
अज्ञात, तुमचा "नेमक्या" ओळींवर आला अभिप्राय..जिंकली कविता.
सर्व वाचकमित्रांचे मनःपूर्वक आभार.
बागेश्री, क्या बात है!
बागेश्री,
क्या बात है! कवितेच्या जगात उस्फुर्तपणाला खरंच तोड नाही! आणि पुन्हा पुन्हा असं 'फक्त एकदाच' व्हावं वाटावं इथपर्यंत ताणली जाणारी तहान.. ओढ! पुरता अंदाज नाही पण मी तुमचं 'फक्त एकदाच' अशा अंगाने घेतलंय. पण शेवटी, खरंच एकदाच व्हावं असं जे ग्रेस बोलले तेच..
करा अंगण मोकळे
त्यात विझू नये दिवा
एका झुळुकीने माझा
जन्म मातीत मिळावा!
वाह... बागे ... सुंदर
वाह... बागे ... सुंदर गो....!!!
फक्त एकदाच ...... ""
फक्त एकदाच ......
"" व्वा छान ""
नमस्कार, तुमची कविता खूप
नमस्कार,
तुमची कविता खूप सुंदर आहे. परत परत वाचावीशी वाटते. का कुणास ठाऊक, शेवटचे कडवे वाचतांना मला "प्रश्नार्थक शेवट" या द्रुष्टीकोनातून वाचले तर ते जास्त भावले...
क्षणी कासाविस होताना
जगण्याला कोरड पडताना
आयुष्याने गार नीर व्हावे
......... एकदाच..?
श्वासांनी गंधित
श्वासांनी गंधित होताना,
मिठीने घट्ट होताना,
अंतर मनांतले सरावे,
फक्त...एकदाच!
..... छानच.
सर्व मित्रांचे आभार
सर्व मित्रांचे आभार
कविता आवडली बागेश्री!
कविता आवडली बागेश्री!
Once more ! Ekdaach.
Once more !
Ekdaach.