फुलपाखरी संशोधक
अनुष्काबद्दल आलेला लेख. आई म्हणून जरा भाव खाऊन घेत्ये!
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/-/articleshow/22...?
मुळात फुलपाखरू हा अत्यंत नाजूक जीव. या जिवाच्या निकटच्या सहवासात अत्यंत सावधपणे राहावं लागतं. फुलपाखरांविषयी उत्सुकता असलेले अनेकजण असले, तरी त्याविषयी संशोधन करणारे कमीच. याच क्षेत्रात सध्या अत्यंत महत्त्वाचं काम करत असलेली तरुणी म्हणजे अनुष्का रेगे.
आसावरी चिपळूणकर
फर्ग्युसन महाविद्यालयात मायक्रोबायॉलॉजी विषयात बीएससी करणारी अनुष्का रेगे ही पुण्याची तरुणी सध्या फुलपाखरांच्या अभ्यासात मग्न आहे. नागझिरा आणि ताडोबासारख्या महाराष्ट्रातील काही राष्ट्रीय अभयारण्यात फिरल्यानंतर आपल्याला जंगल वाचन आवडतंय, हे तिच्या लक्षात आलं. त्यामुळेच अनुष्कानं अभ्यासाचा विषयही जंगलाशी संबंधित घ्यायचा असं ठरवलं आणि सुरू झाला एक संशोधन प्रवास... भारतातील फुलपाखरांचा 'डिस्ट्रिब्युशन मॅप' सध्या अनुष्का तयार करतेय. कोणतं फुलपाखरू देशाच्या कोणत्या भागात दिसतं, राहातं आणि वाढतं याचा नकाशा तयार करण्याचं काम ती करते आहे. याविषयी संशोधन करताना काही रंजक माहिती मिळत गेल्याचं ती सांगते. काही फुलपाखरं विषारी असतात. त्यामुळे पक्षी त्यांची शिकार करत नाहीत. म्हणूनच या विषारी फुलपाखरांच्या दिसण्याची नक्कल बिनविषारी फुलपाखरं करतात आणि स्वतःचा जीव पक्ष्यांपासून वाचवतात. या प्रकाराला 'मिमिक्री' म्हणतात. अर्थात, ही मिमिक्री काही विशिष्ट प्रकारची फुलपाखरंच करू शकतात.
'इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, बंगळुरू इथं मी अर्ज केला. त्यांना आपण यापूर्वी केलेलं काम, उपक्रमांतील सहभाग, आत्ता जे काम करायचंय, त्याचं कारण याविषयी सविस्तर माहिती पाठवली. त्यातून निवड झाल्यावर 'एका रानवेड्याची शोधयात्रा' या पुस्तकाचा लेखक आणि फुलपाखरांविषयीचा संशोधक कृष्णमेघ कुंटेच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. एरवी फारशी महाराष्ट्राबाहेर न फिरलेली मी, फुलपाखरांच्या अभ्यासाच्या निमित्तानं आंध्रप्रदेशात जाऊन आले. बेंगळुरूतील दोन महिन्यांत बरंच 'फिल्ड वर्क' आम्हा चार जणांच्या टीमनं केलं. कोणत्या हवामानात आणि कोणत्या झाडांवर फुलपाखरं राहातात, यांसारखा अभ्यास 'फिल्ड वर्क'मध्ये व्हायचा, तर फुलपाखरांच्या वागण्यासंदर्भातील थोडक्यात, संख्यात्मक विश्लेषण (स्टॅटिस्टिकल अॅनालिसिस) 'लॅब'मध्ये केलं जायचं,' असं ती सांगते.
या अभ्यासादरम्यान कठीण परिस्थितीलाही सामोरं जावं लागल्याचं अनुष्कानं सांगितलं. ''फिल्ड वर्क'नं दमल्यावर आम्ही खोलीवर आलो, की दिवसभरातील निरीक्षणाची नोंद करायचा कंटाळा करायचो. दमछाक झाल्यामुळेही कधीतरी हे काम नकोसं वाटायचं; पण नोंद केली नाही, तर निरीक्षणाचा काहीच फायदा नसल्याचं कृष्णमेघनं पटवून दिल्यावर आम्ही कोणत्याही परिस्थितीत नोंदी करण्याचं काम पूर्ण करायचो.'
अनुष्काच्या मते, प्रत्येक फुलपाखराचं एक निराळंच सौंदर्य असतं. तरीही तिच्या अभ्यासाला 'कॉमन मॉर्मोन' (Common Mormon) या फुलपाखरापासून सुरुवात झाल्यामुळे ते तिचं सगळ्यात लाडकं फुलपाखरू असल्याचं ती सांगते. फुलपाखरांचं स्थलांतरही काहीसं पक्ष्यांप्रमाणेच असलं, तरी त्यावर अजून पुरेसा अभ्यास झालेला नाही. निरीक्षण आणि प्रत्यक्ष क्षेत्राभ्यासासह वाचनाचाही मोठा हातभार या संशोधनासाठी होत असल्याचं अनुष्का आवर्जून सांगते.
फुलपाखरांची एखादी विशिष्ट जात कशी उत्क्रांत झाली, दोन जातींतील साम्य आणि फरक, फुलपाखरांच्या शरीराच्या अंतर्गत रचनेचा अभ्यासही अनुष्का सध्या करते आहे. तिला याच विषयांत पीएचडी करण्याचीही इच्छा आहे. त्यादृष्टीनं तिचे प्रयत्न आणि अभ्यास सुरू आहे.
अनुष्काचे अभिनंदन. तिने
अनुष्काचे अभिनंदन. तिने निवडलेल्या क्षेत्रात तिची उत्तरोत्तर प्रगती होवो ही शुभकामना!
अभिनंदन गो तुझ्या लेकिचा आणि
अभिनंदन गो तुझ्या लेकिचा आणि तुझा पण..
मस्त वाटला वाचुन.
अनुष्काचे आणि आई म्हणुन
अनुष्काचे आणि आई म्हणुन तुमचेही अभिनंदन! फुलपाखरु हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. त्यावर संशोधन करते. छान वाटले.
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
अनुष्काचे अभिनंदन आणि
अनुष्काचे अभिनंदन आणि शुभेच्छा
अनुष्काचे अभिनंदन आणि
अनुष्काचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
अनुष्काच कौतुकअभिनंदन लेकिला
अनुष्काच कौतुकअभिनंदन लेकिला अस वेगळ करु दिल्याबद्दल तुझहि कौतुक
अनुष्काचे अभिनंदन पुढच्या
अनुष्काचे अभिनंदन
पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!!!!!
खूप खूप अभिनंदन दोघींचही आणि
खूप खूप अभिनंदन दोघींचही आणि अनुष्काला पुढील वाटचालीकरता शुभेच्छा.
अभिनंदन...
अभिनंदन...
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा !
वा! अभिनंदन आणि शुभेच्छा!!
वा! अभिनंदन आणि शुभेच्छा!!
शैलजा अभिनंदन तुझ्या लेकीचे
शैलजा अभिनंदन तुझ्या लेकीचे आणि खुप सार्या शुभेच्छा !
शैलजा, अनुष्काचे अभिनंदन आणि
शैलजा,
अनुष्काचे अभिनंदन आणि पुढील संशोधनास शुभेच्छा! युवराज गुर्जर यांनी फुलपाखरांचे बरेच फोटो काढले आहेत. त्यावरून लोकप्रभेत दोनतीन लेखही आले आहेत. त्यांची थोडीफार मदत होऊ शकेल असे वाटते. संपर्काकरिता नाव गुगलून बघावे.
आणि तुमचंही अभिनंदन.
आ.न.,
-गा.पै.
भारतात लेपिडोप्टेरॉलॉजी फोरम
भारतात लेपिडोप्टेरॉलॉजी फोरम आहे का?
अरे क्या बात है!! अनुष्काचे
अरे क्या बात है!! अनुष्काचे खूप अभिनंदन. मस्तच वेगळी वाट निवडली आहे..
मनापासुन अभिनंदन!!
मनापासुन अभिनंदन!!
वा मस्तच. एकदमच इंटरेस्टींग
वा मस्तच. एकदमच इंटरेस्टींग विषय !!!
मस्त! मस्त! मस्त!
मस्त! मस्त! मस्त!
शैलजा, तुझ्या लेकीचं अभिनंदन!
शैलजा, तुझ्या लेकीचं अभिनंदन! आत्तापासून आपल्याला काय आवडतं हे माहित होणं आणि तेच करीयर म्हणून निवडून त्याचा पाठपुरावा करणं खूपच कौतुकास्पद आहे. तिला पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा!
अनुश्काचे आणि शैलजा तुझेही
अनुश्काचे आणि शैलजा तुझेही खूप अभिनंदन. खूप कौतुक वाटले.
लेकीला हे काम पूर्ण झाले की सायंटीफिक पेपर पब्लीश करायला सांग उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतांना नक्कीच फायदा होईल.
पुन्हा एकदा सगळ्यांचे
पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्या काका, मावश्या, दादा, तायांच्या कौतुकाने अनुष्काही एकदम खुष झालीये!
शोभनामावशी, थ्यांकयू!
गा_पै - युवराज, केहीमकर, वेळासचे भाऊ ह्यांच्याशी आता ओळखी झाल्यात. कुंटे, अनुज खरे, किरण पुरंदरे ह्यांच्यासोबत अनुष्का काम करत आहे. हे सगळे तिला पुढच्या करियरसाठी अत्यंत जबाबदारीने आणि मायेने घडवत आहेत.
रुनी, हो गं,पेपरवर काम सुरु आहे.
मृण - तुझा प्रश्न विचारते तिला.
अनुष्काचे खूप खूप कौतुक आणि
अनुष्काचे खूप खूप कौतुक आणि शैलजाचे अभिनंदन.
मस्त वाटले वाचून. मनःपूर्वक शुभेच्छा.
अनुष्काचे अभिनंदन! तिचं खूप
अनुष्काचे अभिनंदन!
तिचं खूप कौतुक वाटलं...तिला पीएचडी साठी शुभेच्छा!!
अरे वा! अभिनंदन!
अरे वा! अभिनंदन!
मस्त वाटलां गो. गावाक जावच्या
मस्त वाटलां गो. गावाक जावच्या गडबडीत वाचुचो रवललो लेख.
तुझ्या फुलपाखराचा खुप कौतुक आणि अभिनंदन. तुझापण हां
वा! मस्तच. अभिनंदन!
वा! मस्तच. अभिनंदन!
अरे वा! अनुष्काचे आणि तुझे
अरे वा!
अनुष्काचे आणि तुझे मनःपूर्वक अभिनंदन
दोघींचे (माय-लेकींचे) हार्दिक
दोघींचे (माय-लेकींचे) हार्दिक अभिनंदन आणि अनुष्काला पुढील वाटचालीकरता अनेकानेक शुभेच्छा.
मस्तच , अभिनंदन अनुष्का
मस्तच , अभिनंदन अनुष्का
Pages